खरे तर हा वॅलेंटाईन भेट प्रवास गद्य म्हणुन लिहायला घ्यायचा असे ठरवले होते तेंव्हा, पण संपुर्ण गद्य आपोआप च पद्य म्हणुनच लिहिले गेले, त्या प्रवासातील एक कविता छान वाटली म्हणुन येथे देत आहे, बाकीचे गद्य विभागातच लिहित आहे.
(प्रसंग गावाकडे गेलेल्याची आठवण येत असतानाचे संभाषण)
सखी :
आठवतं का तुला
पारंब्यांच्या विळख्यात
वड उभा असलेला
पारावरच्या पोराला
कवेत घेवू पाहणारा
प्रियकर :
आठवतं मला तेंव्हा
तुझ्या बटांचं मोहक उडणं
वार्याच्या मंद झुळुकेनं
प्रेमाचे गीत गाणं
सखी :
कातरवेळी आकाशाने
रंगीत पदर सोडलेला
नदीच्या काठावर
सूर्य नाजुक निजलेला
प्रियकर :
हलक्याच मिठीत
ओढणीचा तोल ढळलेला
स्पर्शाच्या मोहक संगतीत
देह चैतन्यात नाहलेला
सखी :
मंद चंद्राचा कवडसा
अंगणात प्राजक्त ओला
गोठ्यातून घुंगराची किणकिण
आवाज मायेचा लाभलेला
प्रियकर :
गंधाने फ़ुललेल्या रात्री
तारकांचा पहारा
अंधाराच्या मिठीत गहिर्या
निशब्दतेचा सडा सांडलेला
-- शब्दमेघ
प्रतिक्रिया
1 Feb 2011 - 1:14 pm | अवलिया
सखी
मुलायम ओठांनी
चुंबिलेस तु ओठांना
जसे उतरले दव
पहाटवारा वाहतांना
प्रियकर
मिटलेले डोळे तुझे
उर माझा धपापला
हलकेच पाहिले मी
चोरुन तुझ्या चेहर्याला
सखी
नेहमीची तुझी खोड
चोरुनी पाहतोस मला
सांग मग त्यावेळेस
तु का माघारी फिरला
प्रियकर
काय सांगू तुला आता
तुझा बाप दूर दिसला
त्याने मागल्या वेळी
भर बाजारी बडवला
1 Feb 2011 - 1:21 pm | गणेशा
खुपच सुंदर !
खुप खुप आवडले ..
इतक्या कमी वेळात इतके सुंदर काव्य .. लाजवाब ...
1 Feb 2011 - 1:44 pm | कच्ची कैरी
ह्या विकांतला गावी गेला होतात तेव्हा सुचली वाटतं,असो कविता एकदम फूल टू फट्याक आहे .
आणि अवलिया तुस्सी भी छा गये ,निचोडके रख दिया!वा मस्तच!
1 Feb 2011 - 2:14 pm | गणेशा
नाहि .. तेंव्हा नाही सुचली हो ..
फट्याक शब्द आवडला
1 Feb 2011 - 1:47 pm | sneharani
दोन्हीही कविता मस्त!
:)
1 Feb 2011 - 6:36 pm | प्रकाश१११
गणेशा -मस्त फोर .. !!सिक्ष नाही लिहिता येत ...
1 Feb 2011 - 6:51 pm | गणेशा
'k' आणि 's' प्रेस केल्यावर 'क्स' तयार होतो
आणि
'k' 'S' 'h' प्रेस केल्यावर 'क्ष' होतो.
धन्यवाद ..
3 Feb 2011 - 5:31 am | शुचि
एक्स अक्षराने पण क्ष होतो.