उडान (२०१० )

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
1 Feb 2011 - 12:59 pm

उडान

णमस्कार्स ,

संबंधितांना टिप : हा लेख उडवायचा असल्यास किमान एकदा सुचित करावे . कारण कळल्यास आजन्म ऋणी राहु.
मस्तकलंदर या मुलीने ह्या विषयावर लिहायला प्रवृत्त केल्याने तिचे औपचारिक आभार.

डिस्क्लेमर : ह्या प्रकाराला चित्रपट परिक्षण म्हणता येणार नाही. नव्हे तो आमचा प्रांत ( शिवाय जात / धर्म ) नव्हे.

काल रात्री जरा फावला वेळ मिळाला. सहज मुव्हीज चं फोल्डर ब्राऊझ करत होतो. सगळे छाणछाण चित्रपट पाहुन झाले होते. " १२७ आवर्स " हा चित्रपट पहाणार होतो .. पण त्याच्या शेजारीच मला "उडान" दिसला. परवाच एका फिल्म अॅवॉर्ड कार्यक्रमात ह्या चित्रपटातल्या नायकाला बेस्ट डेब्यु का काही तरी असा अॅवॉर्ड मिळाला होता. म्हणुन सहज क्लिक केलं..
चित्रपटाविषयी कोणतीही पुर्वकल्पना नव्हती. पण सुरुवातीलाच मंजोत सिंग ची एंट्री पाहुन थोडा इंट्रेस्ट आला. आणि हा हा म्हणता चित्रपट पुर्ण संपवला. चित्रपट संपल्यावर गळा दाटुन आलेला. डोळे ओले होते ,आणि मेंदु ला मुंग्या आलेल्या होत्या. अनपेक्षित रित्या एका अतिषय सुंदर असा चित्रपट पाहिला होता.

चित्रपटाची सुरुवात होते ती शिमल्यातल्या प्रतिष्ठित समजल्या जाणार्या बिशप कॉटन स्कुल मधे. चित्रपटाचा नायक "रोहन" आणि त्याचे चार मित्र ( विक्रम, बिनॉय आणि मनिंदर) रात्री हॉस्टेलच्या भिंतींवरुन उडी मारुन शहरात जातात ते प्रौढ चित्रपट पहायला. चित्रपट सुरुही होतो , तोच एकाला थेटराच्या मागच्या सिट वर एक बुड्ढा आणि एक व्यावसायिक स्त्री व्यवहार करण्यात मश्गुल् दिसतात. त्यांचा तो व्यवहार आपसुक तो दुसर्या मित्रांना सांगतो . अपेक्षेप्रमाणे ते कमेंट पास करतात. तो बुढौ नेमका त्यांचा हॉस्टेलप्रमुख निघतो. पोरं पळुन जातात पण वाटेत एकाचा पाय मुरगळतो आणि हॉस्टेलप्रमुख त्यांच्या आधी हॉस्टेल मधे पोहोचतो आणि मग प्रकरण उघडकीस येतं. अपेक्षेप्रमाणे सर्वांना स्कुल मधुन काढुन टाकण्यात येतं . मनिंदर ने शाळेतल्या उनाड पोराची भुमिका मस्त केली आहे.

रोहन हा कविता करतो , कथाही लिहीतो . त्याला पुढे लेखक व्हायचं असतं.

रोहन आपल्या घरी "जमशेदपुर" ला निघुन येतो. रोहन चा पप्पा म्हणजे "क्यो की सांस भी ... " मधल्या तुलची चा तिसरा मिहीर विराणी अर्थात रॉनित रॉय असतो. रोहन ने आपल्या बापाला गेली ८ वर्षे पाहिलेलंच नसतं. रोहनची आई गेल्यावर त्याची हॉस्टेलला रवानगी झालेली असते. बाप एकही शब्द न बोलता त्याला कार मधे बसवतो , घरी गेल्यावरही शब्द न बोलता घरात निघुन जातो. रोहन स्वतः त्याची ट्रंक घेउन वर त्याच्या जुण्या रुम मधे जातो तेंव्हा त्याच्या रुम वर एका ६ वर्षाच्या मुलाने कब्जा केलेला असतो. तो आपला सावत्र भाऊ आहे आणि त्याचीही आई गेली आहे , हे त्याला तेंव्हा समजते. "अर्जुन" त्याचं नाव. रोहन अर्थातंच त्याला झिडकारतो . त्याचं सगळं सामान काढुन स्वतःचं सामान लावतो.
संपुर्ण चित्रपटात अर्जुन कडुनही अतिशय उत्तम अभिनय करवुन घेतला आहे.

रोहनचा पप्पा , रोहन आणि अर्जुन ला घेऊन त्याच्या भावाकडे डिनर ला जातात. हा भाऊ म्हणजे राखी का स्वयंवर मधला ढेप्या अँकर. तिथे रोहन ला त्याची इच्छा न विचारता इंजिनियरिंग शिकायला जाण्याचा आदेश होतो. रोहन तो झिडकारतो , आर्ट्स लिटरेचर करुन लेखक होण्याची इच्छा जाहिर करतो. तेंव्हा पप्पा त्याला खुप काही ऐकवतो. रोहन उलट बोलल्यावर त्याच्यावर हात पण उगारतो. अंकल रोहनच्या बाजुने असतो. बापाचे क्रुर नियम, पोरांना अजिबात समजुन न घेणं , त्यांना स्वतःच्या ढाच्यात मोल्ड करणं, ह्या गोष्टींत पोरांची होणारी कुचंबना अप्रतिम रित्या हाताळली आहे.
रोनित रॉय ला बहुतेक पोरांनी आपल्याला बाबा /डॅड म्हणनं पसंत नसावं .. त्यामुळे पोरांनी आपल्या सिनियर्स ला जसे सर म्हणतो तसं "सर" म्हणावं हा त्याचा आग्रह असतो.

रोहन ह्या वातावरणाला कंटाळुन निराष होतो. त्याचा बाप त्याला कॉलेजा आधी त्याच्या फॅक्टरीत कामं करायला लावतो.
रात्री बापाची गाडी घेऊन गुपचुप दारु प्यायला जाणे , सिगारेटी फुंकणे, बापाच्या पाकिटातनं पैसे चोरणे सगळं रोहन करतो. अर्जुन खुप लाघवी आहे. त्याची ही आई गेल्यामुळे तो एकटाच पडलेला आहे. सर चा त्याला कायमंच धाक आहे. आणि रोहन आल्यामुळे तो रोहन शी सलगी करु पहातो पण रोहन त्याला अॅक्सेप्ट करत नाही.
एकदा अर्जुन ची शाळेतुन कंप्लेंट येते , आणि नेमक्या त्याच वेळी रॉनित ला शाळेत यावं लागल्यामुळे त्याचा काँट्रॅक्ट जातो. तो अर्जुन ला घरी इतका मारतो की त्याला हॉस्पिटल मधे दाखल करावे लागते. रोहन ला जेंव्हा कळलं की आपल्या बापाने अर्जुनला एवढ्या बेरेहमीने मारलंय .. तेंव्हा त्याला खुप वाईट वाटतं. हॉस्पिटल मधुन आल्यावर रोहन आणि अर्जुन जवळ येतात. रोहन इंजिनियरिंग ला फेल झाल्याने रोनित त्याचं शिक्षण बंद करुन फॅक्टरीत फुल टाईम कामाला लावण्याचा निर्णय घेतो. तसं च छोट्या अर्जुनला ही हॉस्टेल ला पाठवण्याचा क्रुर निर्णय घेतो. शिवाय तिसरं लग्न करणार असल्याचंही सांगतो . त्याचा भाऊ त्याला समजवायचा प्रयत्न करतो पण रॉनित त्यालाही अपमान करुन घराबाहेर काढुन देतो.
तिकडे रोहन चे स्कुलमेट्स मुंबै ला मस्त ऐश करत असतात. एका मित्राच्या पप्पांनी रेस्टॉरंट काढुन दिलेलं असतं तिथे तिघे ही मौजमजा करत असतात. त्यांच्याशी रोहन जेंव्हाही फोन वर बोलतो तेंव्हा कष्टी होतो.

पण बापाच्या ह्या क्रुरतेला कंटाळुन रोहन शेवटी मुंबै ला जाण्याचं ठरवतो. अर्जुन ची रवानगी हॉस्टेलला ठरलेली असते जो चित्रपटात मला सगळ्यात टची क्षण वाटला.
शेवटी काय होतं ? रोनित आपल्या मुलांना समजुन घेतो ? तिसर्या लग्नाचा निर्णय कँसल करतो ? की रोहन मुंबै ला निघुन जातो ? की बापाच्या फॅक्टरीत काम करुन आपलं लेखक व्हायचं स्वप्न मोडुन काढतो ? लहानग्या अर्जुनला हॉस्टेलच्या जंगलात सोडण्यात येतं ?
शेवट काय होतो ते पहायचा असेल तर चित्रपट पहा. जर आवडला नाही तर माझ्याकडुन १०० रुपै फुकट घेऊन जा.

चित्रपटात खुप छोट्या छोट्या गोष्टी प्रभावी पणे दाखवल्या आहेत. दिग्दर्शकाचं काम अफलातुन आहे. पण बाप रॉनित रॉय , मोठा रोहन आणि छोटा अर्जुन सगळ्यांनीच तेवढ्याच उत्कृष्ठ अभिनयाने चित्रपटाला न्याय दिलेला आह.

हिंदी चित्रपट ( मग ते अॅक्शन असो वा ड्रामा , थ्रिलर असो वा सायफाय ) मी नेहमी कॉमेडी मुव्ही म्हणुनच पहातो. आणि त्यातल्या भंकसपणावर मनमुराद हसतो. पण उडान ने आमच्या ह्या विचारसरणीलाच छेद दिला. डोळे पाणावले.

चित्रपटप्रकटन

प्रतिक्रिया

काही जणांच्या विनंतीवरुन प्रतिसाद संपादीत.

टारोबा छान लेखन !!

llपुण्याचे पेशवेll's picture

1 Feb 2011 - 1:03 pm | llपुण्याचे पेशवेll

चांगले परीक्षण. आपल्या सूचनेवरून चित्रपट पाहील्या जाईल.

परिकथेतील राजकुमार's picture

1 Feb 2011 - 1:12 pm | परिकथेतील राजकुमार

सुंदर परिक्षण टारबा.

हा चित्रपट पाहिला आहे, खुप आवडला असे नाही पण बरा वाटला. हा चित्रपट म्हणे त्या चित्रपटाचा दिग्दर्शक विक्रमादित्य ह्याच्या आयुष्यावरच बेतलेल आहे. त्यानी स्वतःनी मात्र हि बातमी स्विकारलेली नाही अथवा नाकारलेली नाही.

छान सांगितले आहे .. धन्यवाद

र्टारु चे डोळे पानावाले :)
हे वाचुन आमचे बि पानावले :)
बाकि पिक्चर मस्त आहे !
एकदा बघा अवश्य !

sneharani's picture

1 Feb 2011 - 1:22 pm | sneharani

आता पहायला हवा चित्रपट!

प्रीत-मोहर's picture

1 Feb 2011 - 1:24 pm | प्रीत-मोहर

मी सुढ्ढा पाहीण म्हणातेय !!!

उतरवुन घेतल्या आहे. लवकरच पाहिल्या जाईल. :)

दिपक's picture

1 Feb 2011 - 1:34 pm | दिपक

मागे पाहिला तेव्हा खुप आवडला होता. सगळ्यांनी छान कामे केली आहेत. गाणी आणि पार्श्वसंगीत प्रसंगाला साजेसे आहे. बरेचसे प्रसंग भावुक करतात. सुरुवातीचा ’कांतीशाह के अंगुर’ वाला सिन तर धम्माल आहे. २०१० मधल्या उत्कृष्ट चित्रपटापैकी ’उडान’ आहे. पाहिला नसेल तर नक्की पहा.

मस्त रे टारु!

मैत्र's picture

1 Feb 2011 - 1:37 pm | मैत्र

टारबा - थोडा स्पॉईलर अ‍ॅलर्ट (मराठी) वगैरे टाकायचा की राव !
जवळ जवळ सगळीच ष्टोरी पोष्टवली आहे...

बरंच ऐकलं होतं उडान बद्दल ... आता तुझ्या परीक्षणामुळे लवकरच पहावा लागेल ...

छोटा डॉन's picture

1 Feb 2011 - 1:54 pm | छोटा डॉन

हिंदी चित्रपट ( मग ते अॅक्शन असो वा ड्रामा , थ्रिलर असो वा सायफाय ) मी नेहमी कॉमेडी मुव्ही म्हणुनच पहातो. आणि त्यातल्या भंकसपणावर मनमुराद हसतो. पण उडान ने आमच्या ह्या विचारसरणीलाच छेद दिला. डोळे पाणावले.

:)
छान, चित्रपट जरुर पाहु, धन्यवाद :)

- छोटा डॉन

विकास's picture

1 Feb 2011 - 8:35 pm | विकास

चित्रपट नक्कीच बघायला आवडेल...

मुलूखावेगळी's picture

1 Feb 2011 - 1:54 pm | मुलूखावेगळी

छान परिक्षण

मी हा चित्रपट पाहिला आहे.
पन मला ह्यातला एन्ड पुर्र्न पिक्चर पेक्षा जास्त आवड्ला.
आनि इथे लिहिल्याप्रमाने तो बघे पर्यन्त उत्सुकता तानली जाते

utkarsh shah's picture

1 Feb 2011 - 2:14 pm | utkarsh shah

मला देखिल हा चित्रपट फार आवडला होता. जेव्हा शेवटी रोहन च्या मागे रोनित रॉय लागतो, पण त्याला पकडु शकत नाही तेव्हा पहिल्यांदाच छान वाटले.

स्वैर परी's picture

1 Feb 2011 - 2:16 pm | स्वैर परी

दिलेल्या वेळेत बाबाबरोबर पहाटे लावलेली धावण्याची शर्यत रोहन पुर्ण करु शकला नाही, कि छोट्या अर्जुनचा हा एक शब्द "डिसग्रेसफुल" आणि त्याची तो शब्द बोलताना जीभेची आणि तोंडाची होणारी हालचाल अतिशय लाघवी आहे.
चित्रपट खुप आवडला असे नाही, अर्थात अनुराग कश्यप च्या भावाने दिग्दर्शित केलाय त्यामुळे थोडाफार "अनुरागी स्पर्श" जाणवतो.

मस्त कलंदर's picture

1 Feb 2011 - 2:36 pm | मस्त कलंदर

डिसग्रेसफुल!!! विसरलेच होते हे ही... धन्यवाद

मस्त कलंदर's picture

1 Feb 2011 - 2:35 pm | मस्त कलंदर

अरे व्वा. लेख येऊन तेरा कमेंटस आल्या पण नवीन लेखनाचे पान रिफ्रेश न केल्याने कळालेच नाही. असो.

मी बरेचदा चित्रपट डाऊनलोड करून पाहते. त्यामुळे तद्दन फालतू पिक्चर अगदी १० मिनिटांच्या आतच संपतात. हा चित्रपट चालू असताना मात्र एकदाही पुढे ढकलावासा नाही वाटला. काही पूर्वकल्पना नसताना हा सिनेमा पाहायला घेतला. पहिल्या सीननंतर कसला मूव्ही असणार आहे हे काहीच कळत न्व्हतं. पण रोहन घरी आल्याच्या प्रसंगापासून मात्र लॅपटॉपवरून नजरच हटली नाही.
वर टारझनने म्हटलं आहेच. तरीही , अर्जुनचा अभिनय अगदी लाजवाब आहे. कमीत कमी बोलणारा, सगळं काही मूकपणे नजरेने पिणारा , तरीही बालसुलभ उत्सुक डोळ्यांनी पाहणारा असा गोड छोकरा आहे तो. बाबा आणि भावाचे निरोप एकमेकांना पोचवताना पहिला मजला ते बाबाची कार अशी कसरत करतो, बाबाने मारलेय हे स्वतः सांगत नाही, पण कपडे बदलताना आडोशाचा हट्ट धरतो. अशा छोट्या छोट्या प्रसंगातून त्याला छान दाखवलंय. चित्रपटाचा शेवटही छानच. काही चित्रपटांत घडतं तसा आधी एकदम आक्रस्ताळा आणि नंतर उगीच ओढूनताणून जुळवलेला वगैरे असतो, हा तसा वाटत नाही.
टारू, आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद रे. आणि असं चांगल्या* सिनेमांबद्दल लिहिण्यासाठी माझा तुला नेहमीच आग्रह राहील.

*आता उचकपाचक करत नाही. पण माझ्यामते तू ज्यावर लिहिलेले आहेस असे सिनेमे: अंदाज अपना अपना, उडान. हे दोन्हीही माझे आवडते आणि माझ्यालेखी चांगल्या कॅटेगरीतलेच आहेत.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Feb 2011 - 2:35 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

चित्रपट ओळख आवडली.

अवांतरः मकामावशींची कृपा झाल्यास हा ही पिच्चर पाहेन.

वपाडाव's picture

1 Feb 2011 - 2:35 pm | वपाडाव

आहेच मुळी एक नंबर चित्रपट....
अप्रतिम व्यक्तिरेखा "बाप नि पोरगा" दोघांचीही....
जिंकलास भावड्या....
हेच उद्गार निघतात...

चित्रपट परीक्षण आवडले. जरुर पाहीन हा सिनेमा.
धन्यवाद टारु.

सहज's picture

1 Feb 2011 - 3:10 pm | सहज

लेख व प्रतिसाद वाचून सिनेमा चांगला आहे असे वाटतेय. असो कुठल्या चॅनलवर लागलाच तर बघीन.

तुझ्या अफ्रिकेच्या वास्तव्यात तू पाहीलेल्या काही चांगल्या अफ्रिकन सिनेमांचे परिक्षणदेखील येउ दे!

प्रदीप's picture

1 Feb 2011 - 8:59 pm | प्रदीप

तुझ्या अफ्रिकेच्या वास्तव्यात तू पाहीलेल्या काही चांगल्या अफ्रिकन सिनेमांचे परिक्षणदेखील येउ दे!

जरूर, जरूर.

पण त्याअगोदर कुमार गोडबोल्याचे पुढे काय झाले त्याची स्टोरी येऊ दे. का तो सुक्का सुक्काच मसणात गेला? तर तसे तरी का होईना, एका भागात लिहून टाका!!

चिगो's picture

1 Feb 2011 - 3:13 pm | चिगो

टारूचं रेकमेंडेशन असल्यावर आणखी काय पायजे... :-)
मस्त परीक्षण रे टार्झ..

कवितानागेश's picture

1 Feb 2011 - 3:30 pm | कवितानागेश

नाव वाचल्यावर वाटले, 'लेख उडण्याबद्दल' चे परिक्षण आहे- उडान!
पण खरोखरचं चित्रपट परिक्षण निघले!

नाव वाचल्यावर वाटले, 'लेख उडण्याबद्दल' चे परिक्षण आहे- उडान!

हा हा हा :) आपल्या सारख्या सदस्यांमुळेच मला लिखाणाची प्रेरणा मिळते. मग त्या एखाद्या णासक्या कांद्याला सहन करुन घेतो आम्ही ;)

सहमत आहे. टारुचा आदर्श घेऊन आम्ही पण असल्या सडक्या कांद्यांना फाट्यावर मारतो.. जियो टारु !!

नरेशकुमार's picture

1 Feb 2011 - 6:52 pm | नरेशकुमार

अवांतर : कांदे सध्या स्वस्त झालेले दिसतायेत.

प्राजक्ता पवार's picture

1 Feb 2011 - 3:55 pm | प्राजक्ता पवार

सुंदर चित्रपट परिक्षण .

मनराव's picture

1 Feb 2011 - 4:32 pm | मनराव

१०० रुपडे तयार ठेवा...........

स्वाती दिनेश's picture

1 Feb 2011 - 4:42 pm | स्वाती दिनेश

हा सिनेमा बघायचा आहे एकदा असं मनात होतंच, आता टारुने करुन दिलेली ओळख वाचून लवकरच पाहणार..
टारु, सिनेमाची ओळख आवडली.
स्वाती

स्वाती दिनेश's picture

1 Feb 2011 - 4:54 pm | स्वाती दिनेश

एकच प्रतिसाद दोनदा उमटल्याने हा पुसत आहे,
स्वाती

सेरेपी's picture

1 Feb 2011 - 8:04 pm | सेरेपी

चित्रपट पाहील्यावर वाचेन. बर्याच दिवसांपासुन पाहायचा होता :-)

धनंजय's picture

1 Feb 2011 - 9:43 pm | धनंजय

परीक्षण छान लिहिले आहे.

सुरवात वाचली. लेखाची लांबी बघुन सम्पूर्ण ओळखी वाचलेली नाही. कारण असं वाटलं बरीचशी स्टोरी सांगितली आहेस. :)
चित्रपट बघितल्यावर मग वाचतो हा लेख

अनेक दिवसांनी आलेला एक चांगला चित्रपट. लहानग्याशिवाय रोनीत रॉयचा अभिनय अगदी बघण्यालायक!