नमस्कार,
महाराष्ट्राबाहेर काही साईबाबांची मंदिरे आहेत तेथे अनेक प्रकारच्या आरत्या म्हंटल्या जातात. बेंगळूरमध्ये काही मंदिरांत साईबाबांची आरती मराठीतच म्हंटली जाते. आरती मराठीत असली तरी लिहिली असते कन्नड लिपीमध्ये. खाली दिलेल्या आरतीचा भाग मी कन्नडमधून मराठीत जशाच्या तसा लिहिला आहे.आरतीचे पुस्तक छापायच्या आधी सुधारणा असतील (आहेतच!) तर क्रूपया सुचवाव्यात.
नमस्काराष्टक
अनंता तुला ते कसे रे स्तवावे |
अनंता तुला ते कसे रे नमावे ||
अनंता मुखांचा शिणे शेष गाता |
नमस्कार साष्टांग श्री साईनाथा || १||
स्मरावे मनी त्वत्पदा नित्य भावे |
उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे ||
तरावे जना तारुनी मायताता ||२|| नमस्कार...
वसे जो सदा दावाय संत लीला |
दिसे अज्ञ लोकांपरी जो जनाला||
परी अंतरी ज्ञान कैवल्यदाता ||३|| नमस्कार....
बरालादला जन्म हा मानवाचा |
नरा सार्थका सादनीभूत साचा||
धरा साईप्रेमा गळाया अहंता || ४|| नमस्कार...
धरावे करी सान अल्पज्ञ बाला |
करावे आम्हा धन्य चुंबेनि गाला ||
मुखी घाला प्रेमे खरा घास आता ||५|| नमस्कार...
सुरादिक ज्यांच्या पदा वंद्ताती |
शुकादिक ज्या ते समानत्व देती ||
प्रयागादि तीर्थ पदि नम्र होता ||६|| नमस्कार....
तुझ्या ज्या पदा पाहता गोपबाली |
सदा रंगली चिन्त्वरुपी मिळाली ||
करी रासक्रीडा सवे क्रूष्णनाथा ||७|| नमस्कार ....
तुला मागतो मागणे एक द्यावे |
करा जोडितो दीन अत्यंत भावे||
भवी मोहिनीराज हा तारि आता ||८|| नमस्कार.
अधोरेखित केलेले शब्दांचे अर्थ मलाही माहित नाहीत.शब्द तरी चुकीचे असावेत.
कोणाकडे मराठी आरती असेल तर क्रूपया तुलना केल्यास् बरे होईल.
प्रतिक्रिया
31 Jan 2011 - 1:14 am | धनंजय
१. अनंता मुखांचा शिणे शेष गाता : "शेष" शब्द प्रामादिक असावा. पण काही सुधार सुचत नाही. कल्पनाशक्ती चालवण्याची अनुमती असल्यास :
अनंता मुखाचा शिणे घोष गाता
२. वसे जो सदा दावया संत लीला | (दावया किंवा दावण्या = दाखवण्याकरिता)
३. बरा लाभला जन्म हा मानवाचा |
४. नरा सार्थका सादनीभूत साचा|| (मला काही सुचत नाही)
५. धरावे करी सान अल्पज्ञ बाला | (आहे तसे ठीक वाटते)
६. करावे आम्हा धन्य चुंबोनि गाला ||
७. सदा रंगली चित् त्वरुपी मिळाली || (एक कल्पना - "तुझ्या चैतन्यमय रूपात मिळून गेली" या अर्थी)
31 Jan 2011 - 10:51 am | चिरोटा
धन्यवाद धनंजय. ४ आणि ६ ला पर्याय सुचतो का बघुया.
31 Jan 2011 - 11:17 am | प्यारे१
१. अनंता मुखांचा शिणे शेष गाता : "शेष" शब्द प्रामादिक असावा. पण काही सुधार सुचत नाही. कल्पनाशक्ती चालवण्याची अनुमती असल्यास :
अनंता मुखाचा शिणे घोष गाता
शेष नाग हा हजार मुखांचा आहे असे पुराणांमध्ये वर्णन आहे. शिणे हा शब्द शिणणे वरुन घेतला आहे. शिणणे म्हणजे थकणे, दमणे. हजार मुखांचा हा शेष देखील महती गातांना शिणतो असे असावे. म्हणून वरील मूळ पदच योग्य वाटते.
31 Jan 2011 - 10:23 pm | धनंजय
हा विचार केला होता, पण पहिल्या दोन ओळींशी चढती भांजणी जुळत नाही.
पहिल्या दोन ओळी गाणार्या भक्ताच्या स्वतःच्या कमतरतेचे वर्णन करतात. तिसरी ओळही तशीच असावी, अशी अपेक्षा होते.
मात्र कवी शेषनागाबद्दल बोलत असेल, तर ठीकच आहे.
31 Jan 2011 - 11:12 pm | आमोद शिंदे
(सुधारणा सुचवण्यासाठी का असेना) साईबाबांच्या धाग्यावर धनंजय पाहून कणभर खेद झाला.
1 Feb 2011 - 1:04 am | धनंजय
भाषाव्यवहार आणि आस्वादव्यवहारासाठी कुठलाच विधिनिषेध नाही :-)
याबाबत ऊहापोह या लेखाच्या शेवटल्या दोन परिच्छेदांत केलेला आहे.
31 Jan 2011 - 11:02 am | विजुभाऊ
नाईल काका त्यानी पूजा करावी की नाही हे विचारलेले नाहीय्ये.
सुचवता येत असतील तर सुधारणा सुचवायला सांगितलेय.
असो
२. वसे जो सदा दावया संत लीला |
वसे जो सदा दाखवी संत लीला
३. बरा लाभला जन्म हा मानवाचा |
सहमत
४. नरा सार्थका सादनीभूत साचा|| (मला काही सुचत नाही)
नरा सार्थका साद अनुभूती साचा.
( खर्या अनूभूतीचा साद ऐकल्यामुळे मानवी जीवनाचे सार्थक झाले
५. धरावे करी सान अल्पज्ञ बाला | (आहे तसे ठीक वाटते)
सान = लहान मूल ( उदा सान थोर )
६. करावे आम्हा धन्य चुंबोनि गाला ||
करावे आम्हा धन्य चुम्बोनी माथा.
किंवा
करावे धन्य आम्हा देवोनी प्रीती
31 Jan 2011 - 11:07 am | रामदास
विजूभाऊ ,हा शब्द साधनीभूत असा असेल का ? (म्हणजे हा बदल केल्यावर अर्थात सुलभता येते का ?)
31 Jan 2011 - 11:45 am | पाषाणभेद
"बेंगळूरमध्ये काही मंदिरांत साईबाबांची आरती मराठीतच म्हंटली जाते."
एकदम मस्त
31 Jan 2011 - 5:15 pm | गणेशा
माझे मराठी खुप कच्चे आहे , तरीही एक प्रयत्न करत आहे.. आवडले नसल्यास सोडुन द्यावे, माझ्याकडे एकही आरती नाही त्यामुळे ते पाहुन बदल सांगत नाहिये. त्यामुळॅ ग्राह्यता शुन्य मानली तरी चालेल.
धन्यवाद
--------------
१. अनंता मुखांचा शिणे शेष गाता (मला शिणे ह्या शब्दाचा अर्थ माहित नाहिये)
२. वसे जो सदा दावाय संत लीला |
दावाय हा शब्दप्रयोग बरोबर आहे, गावाकडे दाखवणे या शब्दाला अजुनही दावायला असाच शब्दप्रयोग येतो.
दावयास हा शुद्ध भाषेमध्ये वापरताना त्या शब्दाचा अर्थ सेम राहिला तरी थोडा बदल झाला आहे.
उदा. गाईला दवाखान्यामधी दावाय पाहिजे ( ही गावाकडची भाषा)
येथे दावाय हा शब्द दाखवण्यास, दाववयास, असाही केला जातो.
३. बरालादला जन्म हा मानवाचा |
नरा सार्थका सादनीभूत साचा||
धरा साईप्रेमा गळाया अहंता ||
बरे झाले लादला हा जन्म मानवाचा
हा नर सार्थकी लागला आहे सादनीभूत साचा
येथे सादनी म्हणजे साधन अश्या अर्थी आहे, सादन हा खुप जुना शब्दप्रयोग आहे, कुठे तरी वाचल्यासारखा वाटतो आहे.
साधन हा शब्दप्रयोग सादने याचाच अपभ्रंश आहे .
पण येथे त्याचा अर्थ असा आहे की.
हा मानवाचा जन्म लादला गेल्याने ह्या शरीराचा म्हणजे भूत साचाचा साधन(सादन) म्हणुन उपयोग झाला आणि तुझ्या प्रेमामध्ये ह्या भूत साचातुनही ह्या नराचे सार्थक झाले आहे .
४. धरावे करी सान अल्पज्ञ बाला |
करावे आम्हा धन्य चुंबेनि गाला ||
मुखी घाला प्रेमे खरा घास आता ||
अल्पज्ञ हा शब्दप्रयोग योग्य आहे,
चुंबेनि ऐवजी चुंबुनी असा शब्दप्रयोग योग्य वाटत आहे, तरीही वरील ३ मध्ये दिलेल्या शब्दाप्रमाणे चुंबेनि हा त्या जुन्या काळात अस्तित्वात असलेला शब्द ही असु शकतो .. मला माहित नाही
अर्थ : हे साईनाथा, थोर महात्म्या, तुला हातात धरले असता तु अल्पज्ञानी बालकाप्रमाणे भासतो ..
आमच्या गालास चुंबुनी तु आम्हाला धन्य करावे आता
आणि हे प्रेम आमच्या जीवनात असेच राहुद्या अश्या अर्थाने तिसरी ओळ मला वाटते आहे.
५. सदा रंगली चिन्त्वरुपी मिळाली || (अर्थ मला कळाला नाही)
31 Jan 2011 - 5:50 pm | दिगम्भा
चित्स्वरूपी,
दावण्या,
लाधला,
साधनीभूत,
हे बरोबर वाटते आहे
31 Jan 2011 - 6:27 pm | llपुण्याचे पेशवेll
मला पण लाधला हाच शब्द योग्य वाटला होता.
25 Feb 2011 - 11:30 am | kamalakant samant
ही आरती नव्हे तर हे नमस्काराष्टक होय.
श्री साईदास म॑डळ-पुणे येथील पर॑परेप्रमाणे-
उरावे तरी भक्तिसाठी स्वभावे ||=
उरावे परी भक्तिसाठी स्वभावे.
तरावे जना तारुनी मायताता
तरावे जगा तारुनी मायताता
वसे जो सदा दावाय संत लीला |
वसे जो सदा दावया स॑तलीला.
बरालादला जन्म हा मानवाचा |
बरा लाधला जन्म हा मानवाचा.
नरा सार्थका सादनीभूत साचा||
नरा सार्थका साधनीभूत साचा.
करावे आम्हा धन्य चुंबेनि गाला ||
करावे आम्हा धन्य चु॑बोनी गाला.
मुखी घाला प्रेमे खरा घास आता
मुखी घाल प्रेमे खरा ग्रास आता.
सदा रंगली चिन्त्वरुपी मिळाली ||
सदा र॑गली चित्स्वरूपी मिळाली.