दु:ख आता फार झाले
स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले
झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले
झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले
झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले
खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले
पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले
बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले
उत्तरांना पेलताना
प्रश्नही बेजार झाले
“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद आता बार झाले
...............गंगाधर मुटे...........
प्रतिक्रिया
30 Jan 2011 - 12:23 pm | प्रकाश१११
गंगाधर मुटेजी-
स्वप्नही लाचार झाले
दु:ख आता फार झाले
झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले
खूप छान आणि मस्त लय. आवडली
31 Jan 2011 - 6:00 am | गुंडोपंत
झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले
झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले
हे आवडले.
31 Jan 2011 - 9:42 pm | स्वानन्द
साहेब, ह्या सगळ्या कवितांचा एक संग्रहच प्रकाशित करून टाका आता!
31 Jan 2011 - 10:57 pm | गंगाधर मुटे
१० नोव्हेंबर २०१० रोजी माझा "रानमेवा" हा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला आहे. अधिक माहिती साठी येथे भेट द्यावी.
http://gangadharmute.wordpress.com/ranmew/prsh/
1 Feb 2011 - 7:13 am | प्राजु
एकेक शेर खणखणीत आहे... जबरदस्त!!