बायका

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
29 Jan 2011 - 3:15 pm

नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ?
एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा
"पहिल्यापासूनंच शांताबाई वचक ठेवा सुनेवर
नाहीतर एक दिवस,मिर्‍या वाटील डोक्यावर"

दिवसभर तोंडाची अखंड चालू असते टकळी
हिची सून गोरी अन् तिची सून काळी
हिच्या मुलीला गेलेत 'दिवस'
तिच्या मुलीला संपलाय 'आठवा'
हिचा जावई काळा अन् तिचा नवरा बावळा

"सांगू नका कुणाला बरं!" असं बजावून चारचारदा
बातम्या देतात एकमेकींना, काय म्हणावे आता या बायकांना
नसत्या चौकशा कशाला, लागतात या बायकांना ?
एकमेकींना येता - जाता, शिकवत असतात शहाणपणा

-नाहिद नालबंद

हास्यकविता

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

29 Jan 2011 - 4:46 pm | कच्ची कैरी

नालबंदवरच बंदी घालावी असे वाटते म्हणे नसत्या चौकश्या कशाला लागतात या बायकांना ?अहो भाऊ आमच्याजवळ स्वत:सठी वेळ नाही इथे चौकशा कुण्याच्या करणार ?येता -जाता शिकवत असतात शहाणपणा -आमच्याजवळ शहाणपणा आहे म्हणुन शिकवतो दुसर्यांना कारण ज्ञान वाटल्याने वाढते आणी म्हणुनच आम्हा बायकांजवळ ज्ञान वाढतच चालले आहे .

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 5:59 pm | नरेशकुमार

....आणी म्हणुनच आम्हा बायकांजवळ ज्ञान वाढतच चालले आहे .

चग मेयो, .......मेयोवा ?

लेख बायकांवर आहे , कच्च्या कैर्‍यांवर नाही .. ह्यांना मिरचीचे लोणचे का लागले कळले नाही ;)

- अंबा पाय्री

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 6:36 pm | नरेशकुमार

ठिक आहे, मिंतियान ला भेटु.

आमोद शिंदे's picture

30 Jan 2011 - 3:39 am | आमोद शिंदे

तसेही कैरी पिकली की त्याला आंबा म्हणतात! कैरी ही कच्चीच असते. हे म्हणजे पिवळे पितांबर, गाईचे गोमुत्र म्हंटल्यासारखे झाले.

नाहिद नालबंद's picture

29 Jan 2011 - 8:06 pm | नाहिद नालबंद

अहो "कच्ची" कैरी
कळकळीची विनंती -
एवढं मनाला लावून (सिरियसली) घेऊ नका हो !
लिखाणाकडे एक कलाकृती म्हणून पहाल का ?

नाहीतर एक दिवस,मिर्‍या वाटील डोक्यावर"

हे वाक्य मी टारुबाळाबद्दल ऐकले होते.

शिल्पा ब's picture

30 Jan 2011 - 1:21 am | शिल्पा ब

आणि त्याने ते खरे करुन दाखवले.. ;)

बाकी तुम्ही पण पुरुषमुक्तीवाले का हो नाहिदभाउ?

धनंजय's picture

30 Jan 2011 - 3:11 am | धनंजय

वात्रटिका जमलेली आहे.

गुंडोपंत's picture

31 Jan 2011 - 6:33 am | गुंडोपंत

हेच म्हणतो

आमोद शिंदे's picture

30 Jan 2011 - 3:40 am | आमोद शिंदे

प्रयत्न चांगला आहे.

स्वानन्द's picture

31 Jan 2011 - 9:46 pm | स्वानन्द

खुमासदार :)