कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
28 Jan 2011 - 2:58 pm

दोन कविता देत आहे, एक आईच्या भुमीकेमधुन आणि दुसरी मुळ कविता अविनाश काकांनी लिहिलेली बाबांच्या भुमिकेतुन ...
अविनाश काकांची कविता वाचताना अजुनही मन भरुन येते.. ... (कविता पुन:प्रकाशित)
-----------

१.

मी.. तू अन तुझा पपा
आपल छोटस नटलेल जग..
सासरी तू गेल्या पासुन
बैचेन झाले आहे अगदी, हे घरट ..

तुझी ती रुम, तुझी पुस्तके ,
तुझा कॉम्प, सारं तसच
अगदी शांत ...
आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही
की तुझा किलबिलाट तेथे
अगदी निरस वाटते आहे ग पोरी

आठवतं मला अता ते
तुझा पसारा पाहुन माझं ओरडणं
जास्त काम पडयचं मला
पण ह्यानी तुझी बाजू घेतली तरी
रागारागातच सारं आवरणं

रोज सकाळची तुमची ती मस्ती
आणि ते भांडन .. विसरेल कशी मी
हा.. तुमच्या त्या चिडचिडीत
विसरायची मी नाष्टा करताना
त्यात मीट टाकायचे
अन मग तुम्हालाच कारण धरुन ओरडायचे

अता रोज नाष्टा करताना काही मिस नाही होत
तरी पण बरेच काही मिस वाटते आहे

तुझे ते मैत्रीणीं बरोबर
घरात ढुडघुस घालणे
कार्ट्यांनो SS म्हणत माझ नेहमीच तुम्हाला रागावणे
पण नाही ग .. अता मला सार परत हव आहे
पण .. पण अता ते शक्य नाहीये
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...

रात्री जेवताना .. तुमचे लक्ष नसायचे जेवाताना
सारखे आपले ते पी. जे. आणि काही नसेल तर
माझ्या वरती हळुच प्रेमळ टोमणे
अन माझं आपलं मग पुन्हा ओरडणे
लाडवून ठेवून बिघडवली आहे लेकीला
म्हणत यांनाही बजावणे..

पण अता सार बदलल आहे. .
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस ...

---- शब्दमेघ ( "स्त्री..भावनांचा प्रवास" या माझ्या डायरी मधुन )

२.
तु मी अन ममा, आपला ग्रुप होता..
त्यात आपल्या दोघांचा Secrete groupहोता.
आता आपला ग्रुप फुटला आहे,
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या रुमच्या दारावर लावलेल पोस्टर
It is my Mess and i Love it
पलंगावर पुस्तके उघडी, कपडे पडलेले,
बाजुला ड्राईंग बोर्ड,त्या वर ड्राईंग शीटसचे भेंडोळे
कॉंम्प चालु, अन त्यात तुझा अभ्यास चालु
ममान तुला पसाऱ्या बद्दल दटावणे,मग चिडचिड,
मी हळुच तुझी बाजु घेणे.."सासरी काय होईल देव जाणें"
तिच पुट्पुटणे....आता सार शांत आहे...
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तुझ्या कॉलेजची अन मी कारखान्याला जाण्याची एकच वेळ..
मग, ति सकाळची मरण घाई..माझ्या नकळत अंघोळीला जाणे.
१५-२० मिनीटे बाथरुम अडवणे..माझी चिड्चीड..आता फक्त आठवणी
कामावरुन दमुन आलो की..Whatzzz up dad..How was the day विचारण...
रात्री जेवण झाले कि Long ride ला जाण....... मग त्या कॉलेजच्या गमती सांगण..
पी.जे..ऎकविण..ति बरीस्ता कॉफि पिणे...ह्या साऱ्या आठवणी..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार..
आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि..
तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन.
ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ
टेडी बिअर, आणी स्टफ टॉइज पलंगावर बसलेली, तुझी वाट बघत..
फ्रीज मधल्या दुधाच्या पिशव्या,अन बोर्न व्हिटाचा डबा तसाच..
कारण दुध पिणारी माऊ अमेरिकेला गेली आहे.
आम्हाला आठवण येते..पण आम्हि पण खुष आहोत..
कारण लग्न करुन तु सासरी गेली आहेस
तुझ्या नव्या जगात तु रमली आहे..

---- अविनाश कुलकर्णी

कविताजीवनमान

प्रतिक्रिया

कच्ची कैरी's picture

28 Jan 2011 - 5:11 pm | कच्ची कैरी

वा मस्तच कविता !

पैसा's picture

28 Jan 2011 - 10:33 pm | पैसा

एका नाण्याच्या दोन बाजू. विशेष म्हणजे अविनाश कुलकर्णी एवढं भावनाशील लिहितीलसं वाटलं नव्हतं कधी! हा एक सुखद धक्का.

प्रकाश१११'s picture

29 Jan 2011 - 12:10 am | प्रकाश१११

गणेशा -मला वाटते मी पूर्वी प्रतिक्रिया दिली होती. तुम्हा दोघांच्या
कविता छान आहे.

तुझी ती रुम, तुझी पुस्तके ,
तुझा कॉम्प, सारं तसच
अगदी शांत ...
आता तुझ्या बाबांची लुडबुड नाही
की तुझा किलबिलाट तेथे
अगदी निरस वाटते आहे ग पोरी

हे सर्व भन्नाट
आणि अविनाश कुलकर्णीचे

तु म्हणजे घरातल आनंदाच कारंज होत..थुइथुइ उडणार..
आता तुझ्या मैत्रीणीचा थवा येत नाहि..चिवचिवाट नाहि..
तुझी रुम शांत आहे..पुस्तके कपाटात.कपडे पण घडी करुन.
ड्रॉईंग बोर्ड भिंतिला टेकुन उभा..कोपऱ्यात गणपती बाप्पा ध्यानस्थ
मस्त जमलेय सर्व .आवडले

लवंगी's picture

29 Jan 2011 - 9:24 am | लवंगी

दोन्ही कविता मस्तच

नरेशकुमार's picture

29 Jan 2011 - 2:08 pm | नरेशकुमार

कविता छान आहे,

पण हा ईमोशनॅलिजम माझ्या घरात नाही.
माझ्या बायकोचे माहेर, सासर, आनं राहते घर एकाच शहरात आहे.
बर्‍यांचदा ती एकाच दिवसांत तिन्ही ठिकानी जाउन येते.