मी, पिलू आणि जॉगिंग ..........................
पिलू चा परिचय ( पिलू हा आमचा लाडका १ वर्षाचा भू भू आहे ,१ महिन्याचा होता तेव्हा भावाने आणले होते पाळायला ,त्याला पिलू म्हणायचो आणि तेच नाव पडल )
हिवाळ्यात जठराग्नी फारच क्रियाशील असतो (असे म्हणतात ),त्यामुळ जास्ती भूक लागते ,पण ह्या जास्तीच्या खावडी मूळ माझ वजन ३-४ किलो वाढल चांगलच ! आता काय करायचं ? जिमला जायचं ? नको ते फार दूर आहे ,आणि मुलींची ब्याच दुपारी असते
मग घरीच दोरीवर उड्या मारून पहिल्या ८ दिवस ,भाऊ ओरडायचे ए.sssss काय सकाळी सकाळी भूकंप झाल्यासारखं वाटतय
गपे ...................................................
८ दिवसात ३०० ग्र्याम कमी फक्त ,याचा काही उपयोग नाही व्हायचा ,......मैदानात badminton खेळावं तर तिथे कॉलनीतल्या मुलांचा कट्टा ,दुसर काय कराव बर ?
शेवटी अकलेचे दिवे पाजळून जॉगिंगचा पर्याय शोधला सकाळी उठून जॉगिंग करायचे किमान अर्धा तास ,आई तयार झाली माझ्या बरोबर यायला
झाल रोज सकाळी साडे पाचला आई म्हणायची चला ,उठा जॉगिंग ला नाही जायचं ?अस म्हणत बिछाना खसकन ओढायची ,(असा राग यायचा )मी परत पाच मिनिट करत तोंडावर घायची अशा ओढ -ओढीत अर्धा तास तरी निघून जायचा कस बस उठून आवरून साडे सहाला बाहेर पडायचो ,
मग फिरून आल्यवर परत झोपायची सोय नाही
झाले ,रुटीन सुरु ..........सकाळी उठायचं अगदी जीवावर यायचं पण फिरून आल कि मस्त फ्रेश वाटायचं
७-८ दिवस झाले नाही तोच आमच्या जॉगिंगचे तीन तेरा वाजले आणि आम्हाला बंदी घालण्यात आली सांगते किस्सा ...........
चार पाच दिवसापूर्वी आईचा गुडघा दुखतो म्हणून आई सकाळी मला म्हणाली आज मी नाही येत तू पप्पूला नाहीतर प्रशुला (बंधू आमचे)घेऊन जा
(पप्पूला नाहीतर प्रशुला ते दोघेही जाम आळशी त्यांची सक्काळ ९ ला सुरु होते )
दोघानाही उठवण्याचा प्रयत्न केला ,पळए .......................जा ना तू सकाळी सकाळी बोर नको करू जायचं तर जा ,परत उठवशील तर बघ ...?
असा सज्जड दम दिला मला..............
आजीला म्हणाल तू येते का ?( तिने रागाने पाहिलं कारण तिला केरकचरा ,अंगणात सडा मारायचा होता ,रोजचा
नित्यक्रम .........)
काय करावे कुणाला जॉगिंगसाठी तयार करावे हा मोठा प्रश्न होता ,तसे
कॉलानितल्या ४-५ टाळकी (मावश्या) जायची फिरायला पण त्यांच्या बरोबर न गेलेलच बर कधी हि भेटल्या तरी एकच प्रश्न "काय पियू आता लाडू कधी ?शिक्षण झाल,जोब पण करतेय छान,
(जस लाडू हे फार दुर्मिळ खाद्य आहे आणि माझ्या लग्नातच याना लाडवाच दर्शन होणारेय )
असो............
विचार करता करता १५-२० मिनिट गेली
तस डोक्यात क्लिक झाल.......
अरे आपला पिलू आहे कि आपल्याबरोबर !तशी हि तो कधीपण वाटच बघत असतो कधी गेटच्या बाहेर हुंदडायला मिळेल याची !
चला आज त्यालाच सैर करून आणू हा विचार पक्का झाला
घरी सांगितले मी पिलूला घेऊन चाललेय बरोबर
आई ; सांभाळून ,तुला जमेल का ?फार ओढतो तो बघ बाई ,नाहीतर व्हायची पंचाईत
मी ;- टेन्शन नको ,मी आहे वोक्के !
मी त्याची साखळी सोडत होते तेव्हा तो आनंदाने इतक्या उड्या मारत होता ,शेपटी हलवत होता ,दोन पायावर उभ राहून माझी गळा भेट घेत होता
आता आम्ही दोघही कॉलनीच्या बाहेर पडलो १० मिनिटावर एक जॉगिंग पार्क आहे तिथ जाऊन पिलुला बांधून थोड मस्त जॉगिंग करूया असा आमचा एकतर्फी प्लान होता
थोड चौकात गेलो तर एका आलिशान गाडीच टायर बघून पिलुने ते ओले करून टाकले ,जाऊ दे ..............
आता पिलू इकडे तिकडे बघत मस्त ऐटीत चालला .जणू तोच फिरायला आलेला............(आणि मी त्याची सेवक )
फिरायला जाणार्या लोकांची ये जा चालूच होती
ओळखीचे चेहरेहि दिसत होते,
मी आणि पिलू मस्त रमतगमत निघालो ......
दिवसा खचाखच भरलेले चौक शांत शांत होते ,
बायाबापड्यांची केरवारा ,सडा रांगोळी चालली होती
बालाजीच्या मंदिरात आरती चालू होती .........एकदम प्रसन्न वाटत होते
असेच आम्ही दोघे चालत असताना
समोरच्या चौकात ते दोघे बसले होते
आम्हला पाहताच ते दोघे (कुत्रे)उठून उभे राहिले आणि त्यांनी पीलुकडे बघून गुर्र्कायला सुरुवात केली .
( बहुतेक त्यांच्या भाषेत म्हणत असतील "ए हिरो,
मुह उठाके किधर चला रे sssssssssचल ,अभी इधर से कल्टी मार ये इलाका अपुन का हे ,क्या समझे ")
ते गुरकाताय पाहून पिलूही चालू झाला .भोव भोव भोव भोव ....................(पिलूचा आवाज एकदम खणखणीत )
(चल, चल, रस्ता क्या तेरे बाप का हे क्या ? चलबे शाना बन )
ते दोघे तिकडून आणि हा इकडून
त्यांना हाकलण्यासाठी मी दोन तीन छोटे दगड मारून पहिले .......हाड हाड हाड ...............
पण ते वस्ताद त्यांचा एरिया होता म्हणून जास्ती शायनिंग मारत होते .जागचे हलायला तयार नाही
इकडे पिलूला पण चेव चढला मी त्याला पिलू गप्प गप्प म्हणायचे तसा तो जास्तीच भून्कायाचा
जणू सर्व आसमंत त्यांच्या भुंकण्याने दमदमून गेले
त्यांना पाहून काही लोकांच जॉगिंगच रुपांतर रनिंग मध्ये झाले
काहींनी तर तिथून मागे कल्टी मारून टाकली
( कुतार्यांच्या भांडणात मध्ये पडायला
कुणी डेरिंग करत नाही,ज्याच्या त्याच्या मर्जीचा (बेंबीचा) प्रश्न !)
सगळे दुरूनच हयाड हायड हयाड..................................
आता गुरगुरणे थांबून जोरजोरात भुंकण चालू झाल पिलू आमचा त्यांच्या दिशेन झडप मारायला बघत होता आणि ते दोघे पण पिलुला घेराव घालत आमच्या एकदम जवळ आले त्यांचा जोडीला अजून १-२ सामील झाले आता माझे काही खर नाही कुत्रा चावल्यावर नक्की किती injection घ्यायची हा विचार चालू झाला मी सर्व शक्तीनिशी पिलूची साखळी धरून त्याला जितकी मागे ओढत होते तितक्या दुप्पट वेगात तो मला खेचत पुढे घेऊन जात होता
दोन चार मिनिटांच्या गोंगाटात मला सकाळी सकाळी घाम फुटला होता ,
पिलुला दुसर कुत्रा चावू नये ह्या भीतीपायी मी साखळी घट्ट धरली होती कारण त्याच्या व्यक्सीनेशनला त्याने डॉक्टरांची
आणि आमची कशी पंचाईत केली होती हे आम्हला चांगलेच माहित होते
आणि त्यांच्या एकमेकावर झडपा - झडपी चालू झाली पिलुला आवर्रायाच सोडा, तोच मला चांगला फरफटत होता साखळीने हात पार कचून कचून गेले..
मी हि ठरवले होते काही झाल तरी साखळी सोडायची नाही माझ सर्व शक्ती एकवटून पिलुला खेचण चालंलेल आणि पिलूच मला "कीस झाड कि पत्ती समजून फरफटवन ! पिलू चांगलेच हिसके मारत होता
या आमच्या खेचाखेचीत जोर लावल्यामुळ साखळीच हुक तटकन तुटून पट्ट्यात राहील आणि साखळी माझ्या हातात !
माझे दोन दात खांबावर आदळून पडण्याचा योग होता पण तो थोडक्यात हुकला
दोन सेकंद काही सुचलच नाही कुत्रांची क्याव क्याव ,भोव............ भोव होऊन पांगापांग झाली पिलू आमचा जीव खावून एका कुत्र्याच्या मागे पळत एका गल्लीत दिसेनासा झाला
मिनिटभर काही सुचलच नाही आणि
आणि मी मागून पिलू पिलू ओरडत पळायला लागले
"फार उत मला ह्याला फिरायला आणायचा मरा आता"
एक दिवस जॉगिंग नसत केल तर ...............पण नाही आम्हाला ssss फार भोगा आता
वरतून पिलू सापडला तर बर नाही तर .........काय काय ?
अरे यार एक वेळेला मी हरवले तरी चालेल पण पिलू हरवला तर .........केवढे बोलणे बसतील पप्पूचे त्याचा लाडका न तो !
अरे बाप रे गोची झाली हा विचार करत मी सकाळी सकाळी भाजीवाले, इड्लीवले ,
फेरीवाले जश्या आरोळ्या ठोकतात तसे पिलू पिलू करत करत बोंबलत सुटले ,जिथ कुत्र्यांचा भूकाण्याचा आवाज येईल त्या दिशेन धावत सुटले ,कुणाचा कारखाली बघ .कुणाच्या कम्पाउन्ड मध्ये बघ, कुठ घाबरून बसलाय का? त्याला बाकीच्या कुत्रानी चावले तर नसेल न ?असे दुष्ट विचार येऊ लागलेले बिचारा पिलू कसा असेल ?कुठे असेल ?
बर भावाला फोन करावा तर
मोबाइलच नव्हता जवळ , दुकाने उघडली नसल्यामुळ करणार तरी कुठून ?आणि समजा कुणाचा फोन उसना घेऊन केलाही असता तरी सकाळी सकाळी शिव्यांचा ( म्हणजे तश्या नाही ,गाढवे ,मूर्खे ...इति) खरपूस नाष्टा आम्हास नकोच होता म्हणून पिलुला शोधून घरी नेणे एवढाच पर्याय शिल्लक !
एका कनवाळू बाईला माझी दया आली ती म्हणाली पिलू तुमचा लहान मुलगा आहे का ?हात सोडून पळाला का कुठ ?
( डोम्बल तुमच ) पिलू कुत्रा आहे माझा ....
(कुत्र्याच नाव पिलू ठेवत का कुन्ही?) चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह घेऊन तोंड वाकड करून सडा घालू लागली
जिथे जिथे कुत्री भुंकण्याचा आवाज येत होता तिथे तिथे मी पिलुला शोधत होते ,माझ्या या शोध मोहिमेत मला दोन चार लहानग्यांनी फार मदत केली ,पण ती वायाच गेली पिलू काही सापडला नाही साडेसात वाजले ,आता घरी जाऊन भावाला सांगणे आणि सर्वांची बोलणी खाणे एवढाच पर्याय शिल्लक !
हताश होऊन मागे फिरले ,डोळ्यासमोर सारखा पिलूच ,आज माझ्य शहाण पनामुळ पिलू हरवला ,काय गरज होती मला ..........इति. फारच अपराध्यासारख वाटत होत ,कारण पिलू सर्वांचा लाडका !घरी आले ,"पिलू हरवला " एका दमात सांगून टाकले ,त्या वाक्याने झोपलेले आळशी सदस्य खडबडून जागे झाले क्काय ? पिलू हरवला कुठे ? कधी ?कसा?ते सांगायला वेळ नाही आधी त्याला शोधाव लागेल !झाल सगळीकडून एकाच प्रश्न "तुला काय गरज होती पण त्याला बरोबर नेण्याची बावळट!"माझा चेहरा रडवेला झाला होता
एरवी चूक माझी नसताणा जर कुणी मला बोलल तर ,त्यांना आपण का हिच्या नादी लागलो ह्याचाच पस्तावा होतो
पण आज गप्प राहण्याशिवाय काय पर्याय ?
भावाने गाडी काढली :चल बस मागे लवकर , गाडीवर बसणार ,तोच पिलू धावत धावत (जणू एखाद महायुद्ध जिंकून) घराकडे येताना दिसला
त्याला बघून मला एवढा आनंद झाला , कि जेवढा
अमर अकबर अंथोनी मधल्या प्राण आणि निरुपमा रोय यांना त्यांची हरवलेली ३ मुल २० वर्षानि सापडल्यावर हि झाला नसेल
असो .....................
पिलू सापडला ,(नव्हे परत आला.....................)
जग जिंकल अस वाटल
आल्याबरोबर शेपूट हलवत गळा भेट घेतली त्याने माझी आणि पप्पूची .................
आनंद अवर्णनिय ........................
आता या गोष्टीला ७-८ दिवस झालेत आता मी त्याला फिरवण्याची रिस्क घेत नाही (बंदी आहे )
प्रतिक्रिया
28 Jan 2011 - 12:13 pm | स्वैर परी
पियुशा! खुप छान लिहिले आहेस ग!
अगदी डोळ्यासमोर सगळा प्रसंग उभा राहिला बघ!
30 Jan 2011 - 3:31 pm | मी-सौरभ
कुत्रे हिंदीत का बोलतात..????
मुंबईतले अहेत वाट्टे
30 Jan 2011 - 3:44 pm | पियुशा
बरे यु .पि. तले नाहि म्हनलास ते
28 Jan 2011 - 12:22 pm | नन्दादीप
मस्त लिहिलाय...छान...
28 Jan 2011 - 12:32 pm | गणेशा
मस्त लिखान .. एकदम आवडले ..
28 Jan 2011 - 12:57 pm | पिंगू
हाहाहा... भारीच आहे तुझं पिलु पुराण... बाकी पुराणातील पुढच्याही ओव्या येउ द्या..
- पिंगू
28 Jan 2011 - 1:15 pm | Pearl
लेख आवडला. मला पण लहानपणी कुत्र्याची पिल्लं, माउ, माउची पिल्लं खूप आवडायची. पण एकदा शेजार्यांच्या कुत्र्याच्या पिलाचं नख लागलं (आणि मला वाटलं की आपल्याला कुत्र चावलं) तेव्हा घरं ते डोक्टरांच क्लिनिक आणि क्लिनिकमध्येही नंबर येउन डोक्टरांकडे जाउन त्यांनी "कुत्र चावलं नाही. फक्त नख लागलं आहे" हे सांगेपर्यंत माझं अखंड रडं चालू होतं. डोक्टरांनी सांगितल्यावर मात्र हायस वाटलं :-)
तेव्हापासून कुत्र्यांपासून लांब असते. माउ मात्र अजूनही आवडते.
28 Jan 2011 - 3:42 pm | योगी९००
पियूषा ....मस्त लेख..
पर्ल..(पासून कुत्र्यांपासून लांब असते. माउ मात्र अजूनही आवडते.) ...
आयला... उगाच मी माझे नाव बदलले..(ह.घ्या.)
28 Jan 2011 - 1:54 pm | कच्ची कैरी
मी कुत्र्याला व त्याच्या पिलालाही खूप घाबरते नेहमी त्यांच्यापासुन लांबच असते ,बर ते जाउ दे ,खूप छन लिहितेस गं तु ! वाचायला मजा आली .
28 Jan 2011 - 2:24 pm | लॉरी टांगटूंगकर
-मी पण पळताना कुत्री मागे लागून जॉगिंगची रनिग होईल म्हणून सुरु नाही केली.कुत्र्यालाच बरोबर घेऊन जाने हा बेष्ट पर्याय आहे ......
८ दिवसात ३०० ग्र्याम कमी!!!!!!!!!!!!!!!!!!!!!वाह असे पण चालेल खरेतर मला पण वजनकाटे इतके खंग्री असतात ना आमच्याकडचे; त्यात least count 3 किलोचा आहे.
28 Jan 2011 - 3:16 pm | पियुशा
आम्च्या काट्याचा लिस्स्ट कौण्ट २० gm आहे त्यामुळ
28 Jan 2011 - 5:16 pm | इंटरनेटस्नेही
चान चान.. मस्त लिहीलं आहेस..
28 Jan 2011 - 6:08 pm | संदीप चित्रे
गप्पा मारताना एखादा मस्त किस्सा ऐकावा, तसं वाटलं लेख वाचताना.
>> जस लाडू हे फार दुर्मिळ खाद्य आहे आणि माझ्या लग्नातच याना लाडवाच दर्शन होणारेय
क्या बात है !
28 Jan 2011 - 10:04 pm | निशदे
अगदी चित्र उभे राहिले डोळ्यासमोर..........पंचेस छान आहेत. :)
28 Jan 2011 - 10:52 pm | प्राजु
असंच होतं..
आमच्या भागामध्ये एक अशीच भटकी कुत्री होती. तिला झालेली पिल्लं आमच्या कंपाऊंड मध्ये यायची. घरात सगळ्यांना कुत्र्याची आवड.. त्यामुळे कोणीही काहीही बोललं नाही. मग.. त्यातली काही पिल्ल कोण कोण घेऊन गेलं. एक पिलू मात्र तसंच होतं. ते ही बराच वेळा आमच्या कंपाऊंड मध्ये दिसायचं. त्या पिलू चा हळूहळू 'कुत्रा' मध्ये रूपांतर झालं.. पण आमचं अंगण काही त्यानं सोडलं नाही. आम्हा सगळ्यांना ओळखायचा तो. आम्हीही जरा थोपटायचो त्याला. अधून मधून एखाद्या अंगणातच कुठेतरी बसलेला दिसायचा तो. एकदा एक भाजीवाला आला होता. आणि ते गेट उघडून आत येत असता हा त्याच्या अंगावर गेला आणि त्याचं धोतर फाडलं. तो आमचा पाळलेला कुत्रा नव्ह्ता त्यामुळे त्याची जबाबदारीही घेता येत नव्हती. (तेव्हा आमच्याकडे ऑलरेडी एक पामेरियन होता). शेवटी बाबांनी एका गड्याला सांगून त्याला लांब माळावर सोडून यायला सांगितले.
बरोबर ८ व्या दिवशी मी स्कूटी काढत असताना, बदामाच्या झाडाखाली महाशय आरामत बसलेले दिसले.. मला खूप आनंद झाला. मग आम्ही डॉक्टरांना बोलावून त्याचं वॅक्सिनेशन केलं.. आणि तो आमचा दत्तक कुत्रा झाला... नाव राजा ठेवलं. :)
29 Jan 2011 - 12:06 am | आत्मशून्य
हा हा हा :)
29 Jan 2011 - 2:58 pm | आवशीचो घोव्
...."फार उत मला ह्याला फिरायला आणायचा मरा आता" ....
:D
मस्तच लिहिलंय
29 Jan 2011 - 3:33 pm | नारयन लेले
खरच छान
त्याच बरोबर वजन कमिकरण्याचा सल्ला देण्याचा प्रयत्न लक्शात आला.
छान
विनित
29 Jan 2011 - 5:41 pm | मनीषा
मस्त आहे पिलू पुराण .. आणि जॉगिंगची चित्तर कथा .
मग आता लाडू कधी .. ?
30 Jan 2011 - 12:28 pm | पियुशा
मग आता लाडू कधी .. ?
पत्ता द्या १ खोका पाथवुन देइन मनिशा दि ;)
30 Jan 2011 - 2:40 pm | इंटरनेटस्नेही
या उठसुठ लाडु मागण्यार्यांना धरुन चोपायला पाहिजे एकदा..
-
(व्यक्तिस्वातंत्र्यप्रेमी) इंट्या.
30 Jan 2011 - 3:28 pm | मी-सौरभ
आमच्या भुभु च नाव 'पिल्या' आहे ;)
31 Jan 2011 - 1:15 pm | विकाल
"कुतार्यांच्या भांडणात मध्ये पडायला
कुणी डेरिंग करत नाही,ज्याच्या त्याच्या मर्जीचा (बेंबीचा) प्रश्न !)
सगळे दुरूनच हयाड हायड हयाड.................................."
अग आय आय...नाद भरी..!
31 Jan 2011 - 1:51 pm | खादाड अमिता
क्या बम्बैया लिख रे ली है बॉस! पट्या!
31 Jan 2011 - 7:35 pm | मनराव
पियुशा,
लेख मस्त जमलाय.....
त्याला फिरवण्याची रिस्क रोज घेत जा.........आपोआप वजन कमी होइल........ ;)
1 Feb 2011 - 2:26 pm | धमाल मुलगा
छानच.
पाळिव प्राण्यांची कोणतीही आठवण्/किस्सा मला खूपच आवडते/आवडतात. विशेषतः कुत्रे आणि मांजरींबद्दलचे. :)
इतकं निर्व्याज प्रेम करतात आणि लळा लावतात की काळजाचा तुकडाच होऊन बसतात.
छान किस्सा आहे पियुषा. :) आणि पेश्शल तुझ्या ष्टाईलीतलं वाचायला आणखी मजा आली!
1 Feb 2011 - 2:33 pm | गणेशा
कय मस्त रिप्लाय दिलास रे मित्रा .. कविता करायला लागला की काय मध्येच
1 Feb 2011 - 2:56 pm | धमाल मुलगा
कविता कसल्या रे बाबा...इथे यमकाचं गमक अजुन उमजलं नाहीये. प्राचीला गच्ची धड जोडता येत नाही, आणि कवितेसारख्या मोठ्या गोष्टीत कुठे हात मारु ब्वॉ :)