ओळख

दादा बापट's picture
दादा बापट in जनातलं, मनातलं
28 Jan 2011 - 1:36 am

नमस्कार ,
अखेर मिपा चे सदस्य झालो. १५ आठवडे लागले. तात्याने मिपा सुरु केले तेव्हा कोकणस्थ वर आवाहन केले होते त्याच वेळेस नोन्द्णी करायला हवी होती. असो. मी मिपा चे आणि सुधीर काळे यान्चे आभार मानतो.
दादा बापट हे माझे खरे नाव. उगाच परा, शूची वगैरे टोपण नावे वापरून लेखण करायचा माझा प्रान्त नाही.
लवकरच टी. बाळू चा सामना मधला लेख वाचून मला स्वरभास्करान्ची कीव का वाटली ते टाकायचा विचार आहे.

वावरविचार

प्रतिक्रिया

आपले स्वागत आहे.
शुचि हे माझे खरेच नाव आहे. पण आडनाव सांगून कायस्थ की कोकणस्थ की देशस्थ, कुणबी, मराठा की सोनार आदि काहीही माहीती मी देऊ इच्छित नाही. तो माझा प्रांत नाही म्हणून मी हेच नाव घेतले आहे. असो.

भडकमकर मास्तर's picture

28 Jan 2011 - 2:04 am | भडकमकर मास्तर

तातडीने स्पष्टीकरण दिलेले फार्फार आवड्ले.....
आता परा, तूही सांग की माझे खरे नाव पराच आहे म्हणून...

एकदा दाबा पटकन उबळ हसण्याची.

मूळ चर्चाप्रस्तावात शूची असभ्य उल्लेखनीयता कशापायी? पराचा कावळा काय म्हणून करा?

पण शुचि यांनी नेटका आणि स्वच्छ समाचार घेतल्यामुळे सगळे सारवले-सावरले असे वाटते.

विकास's picture

28 Jan 2011 - 5:36 am | विकास

पण आडनाव सांगून कायस्थ की कोकणस्थ की देशस्थ, कुणबी, मराठा की सोनार आदि काहीही माहीती मी देऊ इच्छित नाही. तो माझा प्रांत नाही म्हणून मी हेच नाव घेतले आहे.

कोकणस्थ/देशस्थ/कुणबी/मराठा/सोनार आदी प्रांत आहेत? ;) (ह.घ्या. आणि अर्थातच प्रतिसादातील मूळ मुद्याशी सहमत. )

बाकी दादा बापटांचे स्वागत आणि लेखनाबद्दल शुभेच्छा!

पंगा's picture

3 Feb 2011 - 8:25 am | पंगा

कोकणस्थ/देशस्थ/कुणबी/मराठा/सोनार आदी प्रांत आहेत?

कोकणस्थ/देशस्थ/कुणबी/मराठा/सोनार हे सर्व महाराष्ट्रातील समुदाय आहेत.

कदाचित महाराष्ट्र हा आपला प्रांत नव्हे, असे तर सुचवायचे नसेल ना त्यांना? (पुन्हा अतिरिक्त माहिती! आणि तीही बहुधा चुकीची! "धूळफेक, धूळफेक" ती यालाच म्हणत असावेत काय?)

(अतिअवांतरः 'धूळफेकी'तला 'फेक' हा इंग्रजी, की मराठी?)

रेवती's picture

28 Jan 2011 - 2:15 am | रेवती

शुचीतैशी सहमत.

अडगळ's picture

28 Jan 2011 - 2:13 am | अडगळ

तुमच्या नावात " दादा" आहे , "बाप"(ट) आहे , जरा मान राखा त्येचा . जरा शहाणपणानं , दमानं घ्या की .
कशाला उगीच आल्या आल्या समद्यास्नी उरावर घ्यायचं ?

शहराजाद's picture

29 Jan 2011 - 4:04 am | शहराजाद

मिपावर स्वागत , दा.

तुमच्या नावात " दादा" आहे , "बाप"(ट) आहे

बापट आडनावावरून लहानपणी गुजराती मित्राकडून ऐकलेला बापट शब्दाचा वापर आठवला. दुकानदार लोक गिर्‍हाइकांसमोर आपापसांत बोलताना किमतीचे उल्लेख बापट (दुप्पट) शब्द वापरून करत. 'बापट दस' म्हणजे खरे पाच. त्याप्रमाने बापट दादांना नुसते 'दा' म्हणावे का बंगालीप्रमाणे? :)

बाकि शुचिशी सहमत.
पुलेशु

मिपावर खरे सदस्यनाम अथवा टोपणनाव हे सदस्यनाम घेण्याची मुभा आहे.
तुम्हाला कोणते नाव घेण्यात स्वारस्य असेल त्याप्रमाणे करावे.

दादा बापट's picture

28 Jan 2011 - 2:22 am | दादा बापट

माझा कोणावर व्यक्तीगत आरोप करण्याचा हेतू नव्हता. तूमचे नाव शूची असो अथवा सारीका असो मला काही देणे घेणे नाही. आणि तूम्ही कितीही टाळले तरी 'जात' जात नाही, मग टाळायचे तरी कशाला हा माझा वीचार आहे.

मिसळपावर जातीयतेचे उल्लेख टाळावेत ही विनंती.
याउपर आपली मर्जी.
नाईलाजाने धागा अप्रकाशीत करावा लागेल.

आमोद शिंदे's picture

28 Jan 2011 - 6:58 am | आमोद शिंदे

मिसळपावर जातीयतेचे उल्लेख टाळावेत ही विनंती.

जातीयतेचा उल्लेख करणे हा दादांचा उद्देश दिसत नाही. जातीचा उल्लेख शुचि ह्यांनी ह्या धाग्यावर आणला आहे (तोही चुकिचा आहे असे नाही). तुम्ही विनाकारण त्याला भलते वळण देत आहात असे वाटले.

चित्रा's picture

28 Jan 2011 - 7:32 am | चित्रा

भलते वळण दिलेले आहे असे वाटत नाही. धाग्याचे वळण फारसे सरळ दिसत नाही :)

असो.

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:39 pm | दादा बापट

धन्यवाद. मी तेच म्हणतो.

आमच्या कुटुंबापुरता जात गेली आहे. आम्ही ३ जातींचे लोक व्यवस्थित रहात आहोत. मुलीने चवथ्या जातीत लग्न केले तरी बेहत्तर , मुलगा गुणी हवा, तिला आवडणारा समजावून घेणारा वगैरे वगैरे. एनीवे ती खूप लहान आहे. सहज सांगते आहे.

आणि शूची नाही हो शुचि.

जातीपातीची ही माहीती देण्याचा प्रांत नसताना पार आपल्यात किती जातींचे लोकं रहातात आणि आपली मुलगी भविष्यात काय करणार आहे / केले तरी चालेल इत्यादी अति वैयक्तिक माहीती जालावर एकाच लेखात खालोखालच्या प्रतिसादांत देणे रोचक वाटते . आपल्या वैयक्तिक गोष्टींचे मिपावर कोणाला औत्सुक्य असेल असे वाटत नाही. असे उल्लेख टाळले तरी चालु शकतात.

दादा बापट , पहिल्याच लेखात कोण्या सदस्याचे नाव घेण्याचा हेतु समजला नाही. चित्रा आणि रेवती ह्या मुली म्हणतात त्याप्रमाणे हे वळन काही सरळ वाटत नाही !!

बाय द वे , मी टारझन .. कारण माझं नाव टारझन .. तुम्हाला प्रॉब्लेम असल्यास कळवा :) सही गनीक माझे नावही बदलते :)

- पादा कुबट

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 11:32 am | llपुण्याचे पेशवेll

पादा कुबट
आरारा. म्हानगर पालिकेच्या सुलभ बाहेरूण जात असल्याचा भास क्षणभर झाला.

स्पा's picture

28 Jan 2011 - 11:34 am | स्पा

असेच म्हणतो
पाहुणा म्हणून तुमचं निरीक्षण दांडगं दिसतंय ..
भरपूर अभ्यास करून मिपाच्या आखाड्यात उतरलेला दिसताय...
पहिल्याच लेखात काही सदस्यांवर कमेंट(ते हि गरज नसताना ) ?

बाकी मी 'स्पा' आणि हे माझे खरे नाव आहे ;)

शुचि's picture

28 Jan 2011 - 2:04 pm | शुचि

प्रश्न आणि उत्तरात आता बरच अंतर पडले आहे पण तेव्हा दादा बापटांनी मला हा प्रश्न विचारला होता की "जात ही जाता जात नाही ना" मग? असा त्यांचा विचार होता. त्याला प्रत्युतार म्हणून माझे ते उत्तर आहे. नीट वाचा.

टारझन's picture

28 Jan 2011 - 2:58 pm | टारझन

तरीही बापटांनी आपली मुलगी परक्या जातीतल्याशी लग्न करेल का ? असा प्रश्न विचारलेला दिसला नाही. विनाकारण आपली "एक्स्ट्रा वैयक्तिक" माहिती जालावर देण्यावर टिपण्णी केली होती , बहुतेक कळाली नसावी. कळावी असा आग्रह नाही.

बापटांच्या धाग्यात जातीपातीचा उल्लेख हा याच प्रतिसादामुळे सुरु झाल्या सारखे वाटते.

तरीही, खुलाश्याबद्दल धन्यवाद.

- दादा येड्पट

पंगा's picture

29 Jan 2011 - 10:18 pm | पंगा

जातीपातीची ही माहीती देण्याचा प्रांत नसताना पार आपल्यात किती जातींचे लोकं रहातात आणि आपली मुलगी भविष्यात काय करणार आहे / केले तरी चालेल इत्यादी अति वैयक्तिक माहीती जालावर एकाच लेखात खालोखालच्या प्रतिसादांत देणे रोचक वाटते .

सहमत आहे.

तसेच पाहायला गेले, तर आमच्या विस्तृत कुटुंबात आम्ही किमान दोन वेगवेगळ्या लिंगांचे लोक व्यवस्थित राहत आहोत. योगायोग म्हणजे, मी आणि माझ्या पत्नीनेच नव्हे, तर माझ्या आईवडिलांनी, माझ्या दोन्ही आजीआजोबांनी*, तसेच (खात्रीलायक माहितीनुसार) माझ्या पत्नीच्याही आईवडिलांनी आणि दोन्ही आजीआजोबांनी आंतरलैंगिक विवाह केले आहेत. म्हणजे आमच्या कुटुंबापुरता लिंगभेद गेला आहे असे मानावयास हरकत नसावी. हे मीही सहजच सांगत आहे.

आमच्या मुलानेही मोठा झाल्यावर संकुचित वृत्तीने सलैंगिक विवाह न करता, आंतरलैंगिक विवाह करून कुटुंबाची उदारमतवादाची परंपरा पुढे चालू ठेवावी असे आपले आम्हाला तरी बॉ वाटते. असो.

*बाय द वे, माझ्या दोन्ही आजोबांनी वेगवेगळ्या वेळी प्रत्येकी दोन वेगवेगळ्या स्त्रियांशी आंतरलैंगिक विवाह केले होते असे कळते. या माझ्या दोन्ही आजोबांत लिंगभेदभावाचा दुप्पट अभाव (आणि त्याचप्रमाणे दुप्पट स्त्रीदाक्षिण्य) असावे, अशी अटकळ बांधताना ऊर अभिमाणाणे भरूण येतो.

आजानुकर्ण's picture

3 Feb 2011 - 9:44 am | आजानुकर्ण

:))

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:41 pm | दादा बापट

बरोबर.
पत्रिकेची अत्तापासून वाट पहात आहे.

गणपा's picture

28 Jan 2011 - 2:32 am | गणपा

दादा आता ओळख करुन दिली आहेच.
त्या लेखाच लवकर पहा. वाट पहातोय.
आवांतर : मी फस्ट इंप्रेशन वरुन माणसाची परिक्षा करण सोडलय हल्ली. अपेक्षाभंग होणार नाही अशी आशा करतोय. :)

दादा बापट's picture

28 Jan 2011 - 2:44 am | दादा बापट

लवकरच. बाकी मी तूमच्या रेसीपीन्चा चाहता आहे.
हिम वादळ झाल्यामूळे जरा वेळ मोकळा मिळाला आहे.

क्लिंटन's picture

28 Jan 2011 - 2:28 am | क्लिंटन

माझे खरे नाव क्लिंटनच आहे म्हणून मी तेच वापरतो. :)

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 8:22 am | नितिन थत्ते

सहमत आहे.

क्लिंटन खरे नावच वापरतात. परवाच त्यांच्याकडे गेलो तेव्हा त्यांनी मोनिकाला देखील भेटवली. ;)

क्लिन्टन यांच्याशी सहमत. परवा भेटझाली त्यावेळेस त्यानी हिलरी ने त्यांचे फोटो पाहिल्याचा उल्लेख केला होता.
माझे नाव विजुभाऊ आहे.
तूम्ही कितीही टाळले तरी 'जात' जात नाही, मग टाळायचे तरी कशाला हा माझा वीचार आहे
तुमचा जन्म एखाद्या जातीतील कुटुम्बात झाला यात तुमचे काय कर्तृत्व . आणि त्यात अभिमान किंवा गौण वाटण्यासारखे काय असते. जात असली काय अन नसली काय सारखेच.
तुम्ही कोकणस्थ आहात हे सांगायचे प्रयोजन काय ?
तुम्ही हिमवादळाचा उल्लेख करीत आहात त्यावरून एका जुन्या मुरब्बी जाल आयडीची आठवण आली.
इनो सम्पलेले दिसतेय

जरा वैयक्तिकंच विचारतो .. :) विजुताई सुद्धा तुम्हाला "विजुभाऊ" च म्हणतात का हो विजुभाऊ ? ;)
व्यनि केला तरी चालेल हं :)

हे असं स्वत:च्या नावालाच भाऊ लाऊन घेण्यासारखा शुरविर पणा दुसरा नाही , असे मला वाटते ;)

- टाटा तापट

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2011 - 12:25 pm | परिकथेतील राजकुमार

अस उगाचच वाटत की थत्ते चाचा आणि क्लिंटन हे दोघे इतरांना दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही किती जवळचे मित्र आहोत. इथे पुन्हा एकदा फक्त याच दोघांना टार्गेट करायचा हेतू नाही. असे बरेच लोक इथे आहेत परंतु आत्ता माझ्या डोक्यात फक्त हेच दोघे पटकन आले. आणि बाद वे, दोघे ही चांगले लेख लिहु शकतात. त्यामुळे मी कोणत्या ही वैयक्तिक आकसापोटी यांच्यावर टीका करत नाही.

कडूबोळ

क्लिंटन's picture

28 Jan 2011 - 12:33 pm | क्लिंटन

थत्ते चाचा आणि क्लिंटन हे दोघे इतरांना दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही किती जवळचे मित्र आहोत.

आवडले.

दोघे ही चांगले लेख लिहु शकतात.

धन्यवाद रे

मी कोणत्या ही वैयक्तिक आकसापोटी यांच्यावर टीका करत नाही.

त्याची खात्रीच आहे तेव्हा ते वेगळे सांगायलाच नको.

असो.

(जवळचा मित्र) क्लिंटन

पंगा's picture

29 Jan 2011 - 10:15 pm | पंगा

अस उगाचच वाटत की थत्ते चाचा आणि क्लिंटन हे दोघे इतरांना दाखवायचा प्रयत्न करतायत की आम्ही किती जवळचे मित्र आहोत.

नशीब 'थत्ते चाचा आणि क्लिंटन हे एकाच व्यक्तीचे दोन आयडी आहेत' अशी अटकळ बांधली नाहीत.

बाकी चालू द्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

28 Jan 2011 - 9:00 am | llपुण्याचे पेशवेll

सहमत. क्लिंटनचे खरे नाव क्लिंटनच आहे म्हणून तो तेच वापरतो. ;)

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:44 pm | दादा बापट

चेलू काय म्हणते? आणि हिलू २०१२ मधे परत उभी रहाणार का?

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 2:54 am | निनाद मुक्काम प...

मुक्काम पोस्ट जर्मनी असे
नाव धारण केले आहे .कारण
मूळ नाव निनाद कुलकर्णी .
हे अनेकदा माझ्या लेखातून /प्रतिक्रियेतून सदानकदा येत राहत ( आणि काही विशेषणे व माझा तपशील शिल्पा ब वेळोवेळी मिपा सदस्यांना पुरवतात )
तुमचे आगमन गाजणार असे दिसते .
हेट मी लव मी
बट यु कान्ट इग्नोर मी
असा तुमचा खाक्या एकंदरीत दिसून येत आहे .
असो
आपल्या कडे टोपणनावाने साहित्य निर्मिती करण्याची फार मोठी परंपरा आहे .
मी स्वताला ह्या दशकातला रमेश मंत्री समजतो ( समजायला पैसे लागत नाहीत .)

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 11:29 am | शिल्पा ब

तुम्हाला काय प्रोब्लेम आहे हो? तुम्ही स्वताच सांगितल्याशिवाय आम्हाला एवढं डीट्टेलमधी समजलं का ? आणि लोकांनी विसरू नये म्हणून सांगावं लागतं जे तुम्ही करताच...उलट तुम्हालाच मदत करतेय मी...तेसुद्धा फुकट...हो का नाई?

टारझन's picture

28 Jan 2011 - 11:31 am | टारझन

हा हा हा .. ही मुलगी फॉर्म मधे आहे आज :)

- चिकन चेट्टिनाद मुक्काम पोल्ट्री

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Jan 2011 - 12:21 pm | निनाद मुक्काम प...

छे छे
प्रोब्लेम अजिबात नाही आहे .
उलट मौज वाटते

निशदे's picture

28 Jan 2011 - 3:26 am | निशदे

अहो दादासाहेब...........ज्याला जी आवडतात ती नावे तो तो इथे घेतो. त्यात तुम्हाला उचकायला काय झाले एकदम? तुम्हीसुद्धा 'दाबा' असे नाव घेउन तर बघा........सॉल्लिड फेमस व्हाल. :)

प्रसाद_डी's picture

28 Jan 2011 - 10:22 am | प्रसाद_डी

दादा चे नाव इथुन पुढे" दा.बा." असेच घेनार मी....... (आपुलकी म्हनुण.... बाकी काही नाही...)

चिगो's picture

28 Jan 2011 - 10:03 pm | चिगो

>>तुम्हीसुद्धा 'दाबा' असे नाव घेउन तर बघा........सॉल्लिड फेमस व्हाल.

य्येकच लंबर यार... आपल्याला ल्लै आवडलं..

अर्धवटराव's picture

28 Jan 2011 - 5:54 am | अर्धवटराव

अपचन, खोकला आणि कुणी अवघड ठिकाणी लाथ घातली तर चालु लागायला उपयुक्त अशे जिन्नस सतत बाळगणारा एक दादा बापट आमच्या ओळखीचा आहे... तुमच्या नाकाच्या टोकावर तिळ आहे का हो ?

(नामाभिमानी) अर्धवटराव

नरेशकुमार's picture

28 Jan 2011 - 6:23 am | नरेशकुमार

अहो दादा,
'अवतार' घेनार्‍यांची भुमी हाय ही.
विष्णू नी नायका ११ अवतार घेतले.

आमोद शिंदे's picture

28 Jan 2011 - 6:55 am | आमोद शिंदे

दादा बापटांचे स्वागत! टी बाळूवरचा लेख कधी येतो ह्याच्या प्रतिक्षेत..

आजानुकर्ण's picture

28 Jan 2011 - 10:19 am | आजानुकर्ण

टी बाळूवरचा लेख कधी येतो याची वाट मीही पाहत आहे. भीमसेन जोशींवरील श्रद्धांजलीपर लेखातही स्वतःची लाल/भगवी करायचे सोडले नाही.

बायदवे माझे नाव आजानुकर्ण.

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:47 pm | दादा बापट

एकदम चोकस. माझ्या लेखाचा उद्देश तोच आहे. वेळ मिळाला की लगेच टाकीन.

बायदवे माझे नाव आजानुकर्ण.

बायदवे स्वाक्षरीसाठी एक सुचवणः

"माझं नाव कर्ण. आजानु कर्ण."

पाहा जमतंय का.

नीलकांत's picture

28 Jan 2011 - 8:15 am | नीलकांत

नमस्कार ,

तुमचे मिसळपाववर स्वागत आहे. नवीन आहात तर कृपया येथे दिलेली धोरणे एकदा वाचून घ्यावी.

थोडा वेळ इतर लेख वाचा म्हणजे येथील वातावरणाशी ओळख होईल. काही अडचण आल्यास संपादक मंडळ मदतीला आहेच.

- नीलकांत

श्रावण मोडक's picture

28 Jan 2011 - 1:47 pm | श्रावण मोडक

धन्य आहेस तू. मला तरी इतकं सरळ सुचवणं जमलं नसतं एकूण रागरंग पाहून. :)

अवलिया's picture

28 Jan 2011 - 2:15 pm | अवलिया

>>>काही अडचण आल्यास संपादक मंडळ मदतीला आहेच.

तरीही अडचण आल्यास नीलकांत मदतीला आहेच. :)

त्यानंतरही अडचण आली तर... देव तुमचे भले करो ;)

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:49 pm | दादा बापट

धन्यवाद.
मी जरी आत्ता सभासद झालो असलो तरी गेले दीड वर्श नियमीत वाचक आहे.

पर्नल नेने मराठे's picture

28 Jan 2011 - 10:09 am | पर्नल नेने मराठे

मी ही स्वतला डायना समजते ;) आमचे चार्ल्स आज कुठे दिसत नाहित ते :-?
अवांतर : बापट काका आपले स्वागत .. जपुन वावरा हं इकडे.

प्यारे१'s picture

28 Jan 2011 - 10:19 am | प्यारे१

आज्जी अहो डायना 'डाय'ली की.....!!! १३ वर्षे झाली त्याला.

बाकी, दादा बापट ह्या आयडीची 'शीआडी चोक्शी' व्हावी अशी आम्ही मागणी करतो.

डाळ्च काळी वाटू र्‍हायली ना भौ....!!!

प्रसाद_डी's picture

28 Jan 2011 - 10:25 am | प्रसाद_डी

दा. बा. च्या आय.डी. ची सी आइ डी व्हावी या सठी वीन्ंती करतो.

शिल्पा ब's picture

28 Jan 2011 - 11:37 am | शिल्पा ब

ओ भाउ, पब्लिकमधे त्यांना कशाला दा बा (म्हणता)?

बाकी नवीन आय डी ने आल्याआल्याच शुची अन पराशी वाकड्यात का घेतलंय काय माहित? एवढीच हिम्मत होती तर टारझनच नाव घ्यायचं होतं हि आपली माझी प्रेमळ सूचना.

अन समजा मला कोणी विचारले माझ्या आय डी बद्दल तर मी सांगेन कि, मी माझे नाव काय वाटेल ते घेईन ....हरकत घेणारे तुम्ही कोण? तुम्हीसुद्धा हेच म्हणा हासुद्धा एक प्रेमळ आग्रह ...नाहीतर उगाच तुम्हाला हे लोक त्रास द्यायचे.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jan 2011 - 4:58 pm | विश्वनाथ मेहेंदळे

>>बाकी नवीन आय डी ने आल्याआल्याच शुची अन पराशी वाकड्यात का घेतलंय काय माहित? एवढीच हिम्मत होती तर टारझनच नाव घ्यायचं होतं
ओ ताई, तुम्ही काय सुचवू पाहत आहात? पराशी वाकड्यात जायला हिम्मत लागत नाही? तुम्ही पराला Underestimate करीत आहात.

स्पा's picture

28 Jan 2011 - 5:01 pm | स्पा

गेल्या काही दिवसात काही नवीन सदस्यांनी असेच धागे काढले आणि त्यांना जुने सभासद त्यांच्या स्टाईलमध्ये "उत्तम मदत" करत आहेत. त्यात काही नवल नाही. तुम्ही मात्र संघ बदललेला पाहून मौज वाटली. कुणी कसे वागावे हे त्याला सांगण्याचा हक्क मला नाही, पण एक निरीक्षण नोंदवले. ;)

विश्वनाथ मेहेंदळे's picture

28 Jan 2011 - 5:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

बाकी वाकड्यात जायचे उद्देश अनेक असू शकतात. हेच बघा ना, त्यांनी केवळ ४ ओळी लिहिल्या पण मिपा वर अनेक जण त्यांना पटकन ओळखू लागले. नाहीतर कितीतरी मेगाबायटी प्रतिसाद किंवा काही लेख किंवा अनेक खरडी लिहाव्या लागल्या असत्या.

स्पा's picture

28 Jan 2011 - 5:09 pm | स्पा

हे बाकी उत्तम बोललात :)

स्प्या आणि मेहेंदळ्यांचा दोस्ताना आहे काय ? जिथे तिथे प्रतिसादाला उपप्रतिसाद चिटकेल :)
अर्थात कोणी कोणाला कुठे आणि कसे चिटकावे हे सांगण्याचा हक्क मला नाही . मी माझे एक निरिक्षण नोंदवले.

प्रकाश१११-गणेशा ही एक अजुन जोडी :)

- एकनाथ दळंदळे

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 11:45 am | विजुभाऊ

मी ही स्वतला डायना समजते आमचे चार्ल्स आज कुठे दिसत नाहित ते :-?

अरे बापरे..... लेडी डायनाला प्रिन्स चार्ल्स ने बाईकव्रून पाडले असे चित्र इमॅजीन करतोय.
लेडी डायना चार्ल्स ची "ही इज माय ध्यान" अशी ओळख करुन देतेय असेही इमॅजीन केले.
अवघड आहे चार्ल्स्चे

परिकथेतील राजकुमार's picture

28 Jan 2011 - 12:29 pm | परिकथेतील राजकुमार

दादा बापट हे माझे खरे नाव

अरे रे ! आपल्याबद्दल सहानभूती आहे.

आमच्या खर्‍या नावात आमचे नाव + वडीलांचे नाव + आडनाव असे आहे.

असो...

नशिब एकेकाचे.

नितिन थत्ते's picture

28 Jan 2011 - 12:36 pm | नितिन थत्ते

माझे खरे नाव खराटा आहे. पण मी नितीन थत्ते या आयडीने येथे वावरतो. काही प्रॉब्लेम?

अवलिया's picture

28 Jan 2011 - 12:45 pm | अवलिया

माझे खरे नाव नाना चेंगट आहे. पण मी अवलिया या आयडीने येथे वावरतो. काही हरकत?

विजुभाऊ's picture

28 Jan 2011 - 1:22 pm | विजुभाऊ

माझे खरे नाव नाना चेंगट आहे. पण मी अवलिया या आयडीने येथे वावरतो. काही हरकत?

अवलिया या आयडीने इथे चेंगटपणा करतो असे म्हणा.

श्रीराम गावडे's picture

28 Jan 2011 - 1:37 pm | श्रीराम गावडे

कोथरुड परिसरात हिम वादळ झाल्याचे ऐकिवात नाहि.

नरेशकुमार's picture

28 Jan 2011 - 1:38 pm | नरेशकुमार

आयला, माझे नावंच विसरुन गेलोय.
बर्थ-सर्टिफिकेट वर बघुन सांगवे लागेल. कुठे ठेवले आहे......ते पन विसरुन गेलोय.

मै कोन हुं, मै कहां हुं ?

एका संपादकाडे तुमची कुंडली वगैरे आहे म्हणे.
विचारुन पहा. ;)

नरेशकुमार's picture

28 Jan 2011 - 2:49 pm | नरेशकुमार

माझी अर्धि लाकडे पोहोचलि आहेत, अर्धि मार्गावर आहेत.
आता कुंडली बघुन काय करनार ? ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडेच राहुंदे.

उगा कुंडली वगेरे घरात बघुन बायकोचा गैरसमज व्हायचा !

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:53 pm | दादा बापट

तूमच्या कडे कन्दील आहे का?

घाशीराम कोतवाल १.२'s picture

2 Feb 2011 - 6:22 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहो दा.बा. कंदिल आमच्या आंबोळ्याकडे आहे.
तो कंदिल पेटला कि कोण तरी खपला १०० % हे नक्की

श्रावण मोडक's picture

28 Jan 2011 - 1:51 pm | श्रावण मोडक

एकूण नव्या बाटलीत जुनी दारू!

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Jan 2011 - 2:11 pm | ब्रिटिश टिंग्या

मोडकप्रेमी.ब्लॉगस्पॉट.कॉम :)

क्खॅ क्खॅ क्खॅ
टिंग्या अगदी हेच मनात आल होत. ;)

श्रावण मोडक's picture

28 Jan 2011 - 2:33 pm | श्रावण मोडक

हलकट! ;)

नीलकांत's picture

28 Jan 2011 - 7:04 pm | नीलकांत

मोडकप्रेमी.ब्लॉगस्पॉट.कॉम

अ़क्षरश: फुटलो. :D

-नीलकांत

पदार्पणात नाबाद अर्धशतक ठोकल्याने बापटांचे अभिनंदन :)

विसोबा खेचर's picture

28 Jan 2011 - 2:51 pm | विसोबा खेचर

दादा,

स्वागत..!

कोकणस्थ, चित्पा वगैरे ग्रुपवर जरी आवाहन केलं असलं तरी मिपावर जातीपातीच्या राजकारणाला, चर्चेला, स्थान नाही..

मराठी प्रेमी, आणि मिसळपाव आवडणारा.. एवढ्या दोनच जाती येथे आवश्यक आहेत..

असो,

तात्या.

कापूसकोन्ड्या's picture

28 Jan 2011 - 6:41 pm | कापूसकोन्ड्या

स्वागतं सुस्वागतं
माझे खरे नाव कापूसकोन्ड्या आहेच की.
हे मी अगदी शपथेवर (?) सांगतो. नाव सार्थ करण्यासाठी मग कापुसकोन्ड्यासारखे धागे काढत बसतो. सर्व जण त्याला बर्यापैकी फाट्यावर मारतात ही गोष्ट वेगळी. पण राजहंसारखे चालणे नसले तरी आम्ही काय चालूच नये काय?
तुमचा टी बाळू वरील लेखाची वाट पहात आहे.

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 8:55 pm | दादा बापट

तात्या,
मिपा सारखे स्थळ सूरू केल्याबद्दल धन्यवाद. ठाण्याला आलो की भेटू.

मराठे's picture

28 Jan 2011 - 8:43 pm | मराठे

दादासाहेब.. नाही मंजे रागावू नका हां ! पण 'दादा' हे तुमचं खरं नाव कसं काय? पाळण्यातलं नाव 'दादा' असलेलं मी तरी कधी ऐकलेलं नाही... म्हणजे एक प्रकारे 'दादा', 'आबा', 'नाना', 'तात्या' वगैरे ही सगळी टोपण नावंच नाही का?

बाय द वे, मराठे हे माझं खरं (आड)नाव. आणि मिपा वर स्वागत.

कुंदन's picture

28 Jan 2011 - 8:53 pm | कुंदन

मग ठिकच आहे.
पण सगळ्याच आवाहनांपासुन संभाळुन बर का...

इन्द्र्राज पवार's picture

29 Jan 2011 - 3:32 pm | इन्द्र्राज पवार

सदस्याने कोणत्या नावाने इथे वावरावे याबाबतचे स्वातंत्र्य खुद्द मिपा संपादक मंडळानेच दिले असल्याने अस्तित्वात असलेल्या नावाबाबत (गरज नसताना) व्यक्रोक्तीयुक्त विधान करणे शक्यतो टाळल्यास सुरुवातीलाच सदस्य संबंधात कटुता निर्माण होणार नाही. 'नाव' काय आहे यापेक्षा त्याचा/तिचा इथला सहभाग कशाप्रकारे आहे याकडे लक्ष दिल्यास मग नावच काय पण 'आडनाव' देखील दुय्यम होऊन जाईल. मी 'इन्द्रराज पवार' या मूळ नावानेच इथले सदस्यत्व घेतले आहे म्हणजे काही विशेष केले असे बिलकुल होत नाही. सदस्यत्वाचेवेळी हे नाव दिले आणि (त्यावेळी...) केवळ तीनचार मिनिटाच्या आतच छाननीचे सोपस्कार पूर्ण होऊन सदस्य झालो देखील आणि पाचव्याच मिनिटाला चक्क सहभागसुद्धा कार्यरत झाला.

टोपणनावाने वावरणार्‍या सदस्यांच्या बुद्धीचा आवाका प्रशंसनीय आहेच आहे, हे मान्य असल्याने त्यांच्या नावाने मनी कुठलाही डावा विचार डोकावत नाही. त्याचबरोबर 'अमुक एक आडनाव आहे म्हणजे बाय डीफॉल्ट ती व्यक्ती तल्लख आणि हुशार किंवा पराक्रमी असणारच' असेही मानण्यात अर्थ नसतो. 'गोखले' आडनावाची व्यक्तीदेखील हौदातील गळक्या तोट्यातून वाहणार्‍या पाण्याच्या उत्तरासाठी कॅलक्युलेटर जवळ घेत असेल; तर एखादा 'भोसले' किचनमध्ये भेंडी कापताना थरथरत असलेला दिसेल.

इन्द्रा

एखादा 'भोसले' किचनमध्ये भेंडी कापताना थरथरत असलेला दिसेल.

अहो त्याच्या हातात सुरी द्या.. तलवार दिल्यावर थरथरेल नाय तर काय ओलं करेल?

नावातकायआहे's picture

29 Jan 2011 - 4:34 pm | नावातकायआहे

ओ! नावात काय हाय?

दादा बापट's picture

29 Jan 2011 - 9:37 pm | दादा बापट

आमचा जन्म आधी झाला म्हणून दादू हे नाव पडले त्याचे पुढे दादा झाले. आता दादा साहेब बहूतेक " कन्दील लागल्यावरच" होणार.
पाळ्ण्यातले नाव "विश्वास" असे आहे.
"दाबा" असा शॉर्टकट होऊन तपे लोटली. बापट ह्या आडनावाचा जितका अपभ्रन्श झाला असेल तितका अजून कोणाचा झाला नसेल. मुन्ज झाल्यावर " बापट तूझी शेन्डी उपट" असे चिडवून जीव नकोसा झाला होता.

मुन्ज झाल्यावर " बापट तूझी शेन्डी उपट" असे चिडवून जीव नकोसा झाला होता.

आणि पौगंडावस्थेत पोरं काय चिडवायची हो ? :)

पर्नल नेने मराठे's picture

30 Jan 2011 - 12:04 am | पर्नल नेने मराठे

दादा आता गपा की !!!

चुचु देते चापट

प्रास's picture

1 Feb 2011 - 9:26 am | प्रास

राम राम दादा नि इतर मित्रांनो!

मी ही आठवड्यापूर्वीच इथे दाखल झालोय. २-३ लेखही टाकलेत इथे.

आधीही नियमित वाचक वगैरे नसल्याने मिपाचा आढावा घेणं सुरू असताना हे लिखाण गावलं नि वाचता वाचता खरंच फुटून गेलो. दादा नि इतर सदस्यान्च्या क्रिया-प्रतिक्रिया भन्नाट आहेत. :)

अर्थात माझ्याविषयी - मी 'प्रास' कारण माझ्या 'प्रसाद' या नावाची पहिली चार रोमन अक्षरं घेतल्यास हा उच्चार होतो........