प्रजासत्ताक दिन माझे मनोगत (माझ्या बालपणीचा भारताचा ते इंडियाचा प्रवास ))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture
निनाद मुक्काम प... in जनातलं, मनातलं
27 Jan 2011 - 3:51 am

इंग्रजांच्या काळात सर्वाना शिक्षणाची समान संधी व अश्या अनेक गोष्टी भारतीय समाजात नव्या होत्या (ह्या त्यांनी अर्थातच स्वताचा राज्यकारभार सोयीने व्हावा म्हणून केल्या )पण .भारता स्वतंत्र झाला तेव्हा ३५ कोटी भारतीय जनतेपैकी किती लोक साक्षर होती ?
साक्षर लोकांमधील किती लोक प्रगल्भ होती? .म्हणजे स्त्री पुरुष समानता .आदि मुद्यात .
देश स्वतंत्र झाला तेव्हा सत्ताधारी पक्षाला प्रबळ विरोधक नव्हते .हे सुदृढ लोकशाहीचे लक्षण नव्हते .युके मध्ये हुजूर मजूर तर अमेरिकेत रिपब्लिक व डेमोक्रेटिक असा प्रकार भारतात अनेक दशके नव्हता
.त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या डोक्यात सत्तेचा कैफ गेला .शीण विरोधी पक्ष लोकांमध्ये लोकप्रिय न होता विविध लेबेले सत्ताधारी पक्षाकडून स्वीकारून जनतेपासून नि सत्तेपासून लांब असायचा
दूरदर्शन चे एककलमी कार्यक्रम (कोणी मेले कि ७ दिवस सुतकी चेहेर्याचे सतारवादन ) हे त्यांच्या निरस नि निसत्वतेचे मासलेवाईक उदाहरण .
लोकसंख्येचा स्फोट व त्यामानाने न वाढलेला रोजगार
पहिल्या .हरित क्रांतीनंतर ठप्प पडलेला शेती व्यवसाय पर्यायाने अन्न धान्यांच्या कमी उत्पादनाने वाढती महागाई (त्यात काळाबाजार करणारे आले )अडाणी जनतेला नवे खादीधारी संस्थानिक लाभले. ज्यांची पिढ्यानपिढ्या चाकरी करणे व भावनिक मुद्याला भूलणे ह्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता .
गावातून शहराकडे लोकांचा वाढते प्रमाण (त्या प्रमाणात शहर नियोजन हा प्रकार गोर्या साहेबांकडून न शिकल्यामुळे काळ्या साहेबांनी मुंबई सारख्या शहराची लक्तरे होऊ दिली .तिला धारावीचा मुकुट मणी चढवला .आशियातील सर्वात भव्य दिव्या असे गोरगरीबांसाठी करमुक्त संकुल अशी व्याख्या बनली .)
भारतात तुरळक अपवाद वगळता नवीन शहरे नव्या शतकातील संकल्पनेनुसार बनली नाहीत .मोहोन्द्जाडो चे बांधकाम पाहून थक्क होणारे जग त्यांच्या वंशजांकडून भकास शहर निर्मितीचा संकल्प पाहून अधिकच थक्क होत होते .
७० ८० च्या दशकात परिस्थितीने मुल्ये व आदर्श ह्यांची धूळधाण उडवली .रोटी कपडा मकान मधील नायक आपली पदवीचा चिटोरा उद्वेगाने फेकून देतो .तर एकेकाळी महिनाभर वसंत उत्सव साजरा करणाऱ्या भारतीयांचा वंशज रोटी कपडा मकान ह्या साध्या मुलभूत गरजासाठी तारुण्य खर्ची करत होता .तारुण्याची आहुती देऊन (तेरी दो टकेकी नोकरी / मेरा लाखोका सावन जाये .) काय विरोधाभास आहे नाही .

जागतीकरण ९० च्या दशकात आले .उच्च मध्यमवर्ग झपाट्याने निर्माण झाला .पण तळागाळातील जनतेला फार्म विले अजून माहित नाही .कारण भारनियमन हे त्यांच्या एकूण जगण्यावर विकासावर लागू झाले ..
शहर व गावातील जनतेतील दुरी वाढत गेली (दे धक्का मधील मक्याचा स्पर्ध्धेच्या शेवटी असलेला संवाद सर्व काही सांगून जातो .) टिंग्या ह्या सिनेमाची गोष्ट भारत नावाच्या खेड्यांच्या राष्ट्रात घडली असे शहरातील उंच
इंडियात राहणाऱ्या मुलांना वाटू लागले .तर नवल ते काय .
शिक्षण शेत्रात नवीन बदल नव्या काळानुसार करणे अशुभ मानले गेले .इंग्रजांच्या काळात नोबेल मिळवणारे भारतीय स्वतंत्र भारतात नोबेल का नाही मिळवू शकले .संशोधनासाठी ब्रेन डेन का झाले मुलभूत संशोधन करण्याकडे काळ न जाता वर्षभर घोका नि परीक्षेत ओका.असा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन का बदलला ? .अश्या शुल्लक प्रश्नाकडे ना सरकारला स्वारस्य आहे ना जनतेला .कला /वाणिज्य /विज्ञान असा मध्यमवर्गीय स्वातंत्र्या नंतरच्या मध्यमवर्गीय ३ पिढ्यांचा प्रवास हा पोट भरण्यापुरता होता .शिक्षणाने काही शतके आधी भारतीय मनसे सुसंस्कुत होत .स्वतान्त्रानंतर शिक्षणाचा उपयोग नोकरी ह्या एकमेव ध्येयासाठी झाला .त्याने शिक्षणाचा बाजार मांडल्या गेला .गुरु पौर्णिमा हा सण मराठी शाळापुरता व भारतीयांसाठी शाळेपुरता मर्यादित राहिला .
सीमेवरील युद्ध सामान्य जनतेपर्यत पोहचले .ते दहशतवादाच्या रुपात .
सीमेपलीकडील लाल भाई विलक्षण वेगाने प्रगती करत भारताच्या सीमावादावर दुराग्रही भूमिका घेतात .पाक बांधव आपल्या देशाची लोकसंख्या कमी व्हावी म्ह्णून हरप्रकारे उपाययोजना आखतात .
नेपाळ व म्यानमार ला लाल तर बांगलादेश ला हिरवा तर श्रीलंकेला दोघाचाही वेढा पडला आहे .त्यामुळे प्रत्केक सीमेवर रात्र वैर्याची आहे .
भारताची सजलेली नटलेली बाजारपेठ प्रगत जगाला उपभोगला हवी आहे
.
अश्यावेळी प्रजासत्ताक दिनी सचिनला भारत रत्न न मिळाल्याची बातमी वाचली .
कायदा राबवणारे लोकप्रतिनिधी ह्यांचे जिंवत पाणी दहन वाचले .

सहज तू नळीवर उषाकाल होता होता लावले .

समूह गीताच्या पाश्व भूमीवर वेडा झालेला अगतिक निळू फुलेंचा पत्रक्रार पहिला .
माझी तशी अवस्था होऊ नये म्हणून उपभोग्य संस्कुतीत मग्न होण्यासाठी म्युनिकच्या रात्रीच्या मोहक नगरीत भटकती केली .
आता हा लेख टंकताना रात के हम सफर ....
तू नळीवर पहात शयन कशाकडे चाललो आहे .

मांडणीविचार

प्रतिक्रिया

निदान निळू फुले होण्याइतकी तर नक्कीच नाही. कबूल आहे की ज्या वेगानी प्रगती करता आली असती त्या वेगानी झाली नाहीए. पण अजून ही वेळ हातातून गेलेली नाही. पण सध्या विविध चॅनेल वर जो काही उघडा नागडा व्यवहार किंवा रियालिटि शोज चा धुमाकूळ आहे तो चिंताजनक आहे. म्हणजे असा धुमाकूळ असायला ना नाही परंतु समाज मन एव्हढे परिपक्व पाहिजे की त्यातील योग्य त्याच गोष्टी उचलल्या पाहिजेत. दुर्दैवानी भारतीय समाज तेव्हढा परिपक्व नाही.

जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर मेहनतीला पर्याय नाही. असे अनेक आदर्श डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करता येऊ शकते. पण मीडिया चुकीस्या गोष्टींना आदर्श म्हणून प्रॉजेक्ट करतेय. ते सुधारायला पाहिजे.

बाकी लेख झकास.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Jan 2011 - 5:42 am | निनाद मुक्काम प...

गोगल साहेब
आपल्या मताचा पूर्ण आदर करून म्हणतो
कि प्रस्तुत सिनेमात निळू फुले राजकारणाचे दशावतार व जनतेची हाल उघड्या डोळ्याने पाहतो नि अनुभवतो .नि शेवटी अगतिकतेने वेडा होतो .असे दाखवले आहे .
मी पंचतारांकित हॉटेलात २ वर्ष मुंबईत काम केले . व समाजातील बड्या धन्दान्द्ग्यांचे चोचले पुरवले आहेत (अतिथी देवो भावो हि आपली संस्कृती नाही का ?)
तो काळ २००२ आता
तर घोटाळेच १००० कोटींचे होतात
परिस्थिती वाईट आहे पण वाईटातून कलाम/सचिन / त्यांची ध्येयनिष्ठा तर देव आनंदचा ह्या वयातही असणारा चिरतरुण उत्साह लता आशा ताई /बाबासाहेब पुरंदरे / आमटे पितापुत्र / बंग दांपत्य/अनिल अवचट
असे काही विभूती आपणात आहेत तर पणशीकर व भीमसेन जोशी हे त्यांच्या आठवणी त्यांच्या कार्यातून आपल्याला मागे सोडून गेले आहेत .
बाकी सर्वत्र आदर्श व्यवस्था आहे .