एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला.
"रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला
प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला
अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला -
"रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -
आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,
मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला ?
विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला
मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?"
- नाहिद नालबंद
प्रतिक्रिया
25 Jan 2011 - 9:13 pm | विकास
मजेदार आहे...
आधी मला वाटले की आता काही नवीन पौराणीक धागे दोरे मिळाले की काय ज्यातून सिद्ध झाले की रावणाला रामाने मारलेच नाही वगैरे म्हणून. ;)
26 Jan 2011 - 1:07 am | चिंतामणी
मलासुध्दा असेच वाटले होते.
विनोदाचे कवीतेत भन्नाट रुपांतर केला आहेस.
25 Jan 2011 - 9:38 pm | स्वानन्द
झकास! विनोद ऐकला होता. पण कवितेच्या रुपात पण आवडला :)
25 Jan 2011 - 9:40 pm | गणेशा
कविता आवडली .. मस्त आहे
25 Jan 2011 - 10:00 pm | विसोबा खेचर
रावण हा देखील दशरथाचाच मुलगा होता असे मी ऐकले आहे..!
असो,
कविता मात्र छान.. :)
तात्या.
25 Jan 2011 - 10:14 pm | दैत्य
नाना, ब्येष्ट कविता बघा ! असा एक जोक ऐकला होता ! तुमची हरकत नसेल तर ह्यच्याच पुढे दोन कडवी सुचत आहेत...ती टाकतो..
मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?"
तेवढ्यात चुणचुणीत विद्यार्थी पुढे आला,
"हिंसेबद्दल सगळे निषेध व्यक्त करुयात
मूक-निदर्शने आणि जाहिर शोकसभेने
मारेकर्याचे मन बदलूयात!"
मास्तरांना अतिशय आनंद झाला
वाटले अहिंसेचा आज केवढा विजय झाला
अधिकारी मात्र पेंचात पडला, म्हणला
काय करावे ह्या गावाला, ह्या शाळेला,
काय हो मास्तर, सहज सोप्पा सवाल काय विचारला
इतिहास सोडून तुम्ही राजनितीत घुसला
'राम' उत्तर अपेक्षित होते,
त्याचाही तुम्ही 'हे राम' केला!
25 Jan 2011 - 10:25 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
कविता आवडली आणि दैत्याची कडवीसुद्धा.
25 Jan 2011 - 10:38 pm | गणेशा
मस्त रिप्लाय ... आवडला
25 Jan 2011 - 11:09 pm | स्वानन्द
नाना??
अस्सं आहे होय!! :)
26 Jan 2011 - 9:42 am | चिंतामणी
प्रत्यक्षाहुनी प्रतीमा उत्कट.
26 Jan 2011 - 2:18 am | विकास
एकदम जबरा!
25 Jan 2011 - 11:03 pm | jaydip.kulkarni
उत्तम आहे कविता
26 Jan 2011 - 12:27 am | सद्दाम हुसैन
हा हा हाहा
26 Jan 2011 - 3:20 am | शिल्पा ब
मस्त...दैत्यांचे उत्तरही आवडले.