शुन्य शब्दांत या
भावनांची झोळी
रक्तात उतरलेली
सांजसंध्या कोवळी
घनदाट आठवांचा
सैरभैर पसारा
अर्धओले मन
सावळभाव गहिरा
बधिर पावले ही
तिमिरात थबकली
अस्तित्वाची किनार
क्षितिजापार बुडाली
आई .. तुझ्या आठवांची
पंक्ती आकाशी भिडलेली
ह्रद्यस्थ माझ्या जपलेली
तवअस्तित्वाची कोरीव लेणी...
स्पंदणांच्या हिंदोळ्यावरी
विचारांची अवखळ फ़ांदी
दु:खाच्या तरंगावरती
स्वप्नथेंबांची पालखी
निशब्द शांततेत साठलेले
काहुर मनातले अस्तव्यस्त
हरवलेल्या मार्गावरती
तुझी आशादायी मुर्ती...
--------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
24 Jan 2011 - 11:04 pm | कच्ची कैरी
फारच छान शब्दरचना .कवितेतल्या भाव अगदी मनाला भावले .
25 Jan 2011 - 7:14 am | प्रकाश१११
घनदाट आठवांचा
सैरभैर पसारा
अर्धओले मन
सावळभाव गहिरा
अतिशय छान. आई मिटलेला श्वास .फार सुरेख लय आणि कवितेवरची अप्रतिम पकड.
फार वरच्या दर्जाची कविता !!
+१
25 Jan 2011 - 11:51 am | निवेदिता-ताई
आई .. तुझ्या आठवांची
पंक्ती आकाशी भिडलेली
ह्रद्यस्थ माझ्या जपलेली
तवअस्तित्वाची कोरीव लेणी...
अगदी माझ्या मनातील भावच जणू...........
25 Jan 2011 - 6:43 pm | गणेशा
कैरी, निवेदिता ताई आणि प्रकाश जी आपले मनपुर्वक आभार.