स्वप्न

नाहिद नालबंद's picture
नाहिद नालबंद in जे न देखे रवी...
23 Jan 2011 - 5:05 pm

निळे, जांभळे, केशरी, तांबडे
मेघ मेघात मिसळले होते

हाती हात एकमेकांचे
बोटात बोट गुंफले होते

नयनांशी नयन दोघांचे
काहीतरी बोलले होते

घेता जवळी साजणाने
लाजूनी शहारले होते

चुंबिताना अधर माझे
स्वप्नी पाहिले होते

- नाहिद नालबंद

शृंगारकविता

प्रतिक्रिया

गुंडोपंत's picture

24 Jan 2011 - 8:57 am | गुंडोपंत

मस्त आहे.
पण म्हणायला किंवा चाल लावायला जमले नाही.

धनंजय's picture

25 Jan 2011 - 12:19 am | धनंजय

+१

नाहिद नालबंद's picture

25 Jan 2011 - 8:17 pm | नाहिद नालबंद

आहे की नाही तुम्हाला चाल लावायला आव्हान ?

मुलूखावेगळी's picture

24 Jan 2011 - 11:17 am | मुलूखावेगळी

मस्त आहे

स्वानन्द's picture

24 Jan 2011 - 4:23 pm | स्वानन्द

छान!

दैत्य's picture

25 Jan 2011 - 8:28 pm | दैत्य

निळे, जांभळे, केशरी, तांबडे
मेघ मेघात मिसळले होते

मस्त आहे! मला ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला पहाटे असंच वाटत होतं..!!!!