तारुण्य ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
20 Jan 2011 - 1:17 pm

तारुण्य किती मस्त असते
एक छान कविता असते
तारुण्य म्हणजे सळसळनारा कल्लोळ असतो
बेदम असा उत्साह असतो
मस्तीचा एक डंख असतो
डंख मारण्याची
डंख घेण्याची
हीमत म्हणजे तारुण्याचा कैफ असतो

तारुण्याला नसतो भविष्यकाळ
नसतो भूतकाळ
त्याला असतो फक्त वर्तमानकाळ
भूतकाळाने तो नाही मन रिझवत
तो जगत असतो आजची स्वप्ने
आणि ठाऊक असतात उद्याची बहाणे

तारुण्य पाखराच्या मस्तिसारखे असते
फुलपाखरासारखे झुलत असते
काय करू नि काय नको
त्यांचे मस्त एक गाणे असते

तारुण्यात असते आभाळावर मुठ उगारण्याची हिम्मत
कोठल्यातरी ध्यासाने त्यांचे मन जाते झिंगत
काविता सुद्धा जमून जातात अस्सल मस्त
टिकून राहतात जन्मभर सुद्धा
आयुष्यभर तिची मस्त संगत

तारुण्य म्हणजे बंदुकीची गोळी
तारुण्य म्हणजे सिव्हाची आरोळी
तारुण्य म्हणजे भर दुपारचा सूर्य
रात्रीचा फुललेला पिवळा पिवळा चंद्र
तारुण्य म्हणजे छान जमून गेलेली फक्कड लावणी
एखादा छानसा फड
एखादी गाण्याची मैफल
जी आणते चव बेचव आयुष्याला ....!!

शृंगारकविता

प्रतिक्रिया

गणेशा's picture

20 Jan 2011 - 1:44 pm | गणेशा

अप्रतिम

टारझन's picture

20 Jan 2011 - 1:49 pm | टारझन

प्रकाश१११काकांच्या भुतकाळातली कविता दिसत्ये :) आमच्या वेळी जरा वेगळंच आहे

परिकथेतील राजकुमार's picture

20 Jan 2011 - 2:03 pm | परिकथेतील राजकुमार

छान कविता.
आज सकाळी सकाळी रोजच्यासारखी तुमची एक नविन कविता आली असेल ह्या अपेक्षेन खुप अधिरतेने मिपावर लॉग इन केले होते पण निराशाच झाली.

पियुशा's picture

20 Jan 2011 - 4:46 pm | पियुशा

वा मस्त लय भारि!

डावखुरा's picture

20 Jan 2011 - 5:44 pm | डावखुरा

मस्तय....