मी तुमचे नाव ऐकून आहे
तुम्हीपण मला नुकत्या नुकत्या नावाने ओळखू लागला आहात
आपले शब्द मात्र एकमेकाचे छान मित्र झाले आहेत
कोण हो तुम्ही.?
कोण हो मी ..?
हा आपण प्रश्न नाही विचारायचा
कधीसुद्धा ..!!
कारण आपले शब्द छान मित्र झाले आहेत
आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या
मुठभर उधळलेल्या ....
आपापल्या परीनं चमकत राहतील
चांगले मित्र होऊन मस्ती करतील
करुद्या...!
खेळूद्या ...!!
आपण त्यांची मैत्री बघू
कधीतरी मनात येते माझ्या:
शब्दाचा मित्र जो आहे , जी आहे
किती छान आहेत ....!
मित्र जर ईतका छान तर त्याचे आई बाबा किती असतील .छान ...?
[कारण आपण आपल्या शब्दांचे आई -बाबा आहोत ना ??]
तरीसुद्धा
आपण नाही भेटायचे कधी सुद्धां ....
एकमेकानां
आपले शब्द भेटतायतना ?
मला
तुम्हाला
आपल्याला
तेवढे पुरे आहे
नाहीका ..?
तुमच्या शब्दावरून मी छान कल्पना करतोय तुमची
तुमच्या स्वभावाची
तुमच्या प्रेमळपणाची
बस.... !!
तेवढे तुम्हालाही पुरे आहेना ..?
कारण तुम्ही कोठे ..?
परदेशात ..!
महानगरात ..!!
शहरात ...!!!
मी खेड्यात
कौलारू घरात
माझे शब्द तुमच्या शब्दाशी दोस्ती करून आहेत
तेवढे मला पुरे आहे
माझ्यां शब्दाचे आई बाबा धन्य आहेत ....!!
प्रतिक्रिया
19 Jan 2011 - 2:11 pm | गणेशा
आपले शब्द म्हणजे आभाळातील चांदण्या
मुठभर उधळलेल्या ....
आपापल्या परीनं चमकत राहतील
चांगले मित्र होऊन मस्ती करतील
करुद्या...!
खेळूद्या ...!!
आपण त्यांची मैत्री बघू
हे जास्तच आवडले ..
आणी बाकीचे विचार म्हणजे माझ्या मनात असलेलेच येथे उतरलेत असे वाटते आहे.
20 Jan 2011 - 9:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मलाही आपण म्हणता त्याच ओळी आवडल्या.
अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
19 Jan 2011 - 3:46 pm | पियुशा
"माझे शब्द तुमच्या शब्दाशी दोस्ती करून आहेत
तेवढे मला पुरे आहे !"
मस्त मस्त मस्त :)
19 Jan 2011 - 3:52 pm | स्पा
एक नंबर कविता
पक्या (पक्या म्हटल्याने तुम्हाला राग तर नाही ना आला... ;) ) झकास रे
19 Jan 2011 - 8:56 pm | शुचि
>> तुमच्या शब्दावरून मी छान कल्पना करतोय तुमची
तुमच्या स्वभावाची
तुमच्या प्रेमळपणाची>>
सुंदर :)
19 Jan 2011 - 9:36 pm | पैसा
सगळ्याच कल्पना सुंदर आहेत.
20 Jan 2011 - 11:04 am | स्पंदना
अॅक्चुअली इथे 'हॅलो मित्रा' ची दाद हवी ना?
20 Jan 2011 - 9:30 pm | मीली
कवितेचे नाव वाचल्यावरच वाटले कि हि तुमची कविता असणार.....
शब्द अगदी मनातून थेट कागदावर उतरवण्याचे कसब अप्रतिम.
तुमच्या याआधीच्या कविता पण आवडल्या.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा !