नाती

अभिसरिका's picture
अभिसरिका in जे न देखे रवी...
14 Jan 2011 - 10:46 pm

नाती
नाती नाती नाती...........
जुळ्लेली, जोडलेली, लादलेली......

खरच हवी असतात का आपल्याला ही नाती ?
वाटत', बरेच वेळा आपल्याला ग्रुहितच धरतात ही नाती....!

नाती....काही प्रेमाची, काही मैत्रीची, काही कर्तव्याचीही,
दमछाकच होते मात्र निभावताना ही नाती...!

नाही तोडून टाकता येत त्याच्यापासून आपल्याला.....
मग वहावा लागतो भार आयुष्यभर मनात नसताना

पण असतात अशीही काही नाती....
ज्ञ्याना काहीच नाव नसत......
ते मात्र नेहमीच मनापासून हव असत,..!
अशा नात्याना कधीच देऊ नये नाव
नको व्हायला त्या नात्याचा उगीचच अपमान..

आयुष्यभर मनात ती जपून थेवायची असतात..
जाई - जुईच्या सुग"धासारखी नेहमी अनुभवायची असतात

अशा नात्यामुळेच तर आयुष्य जगायला बळ येत...
अनुभवताच येत नसेल सुग"ध तर मनाला काय अर्थ..?

शांतरसकविता