अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य
मग ..शब्द काय आहेत ?
बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्या ..दुसरे काय ..
आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..?
अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..?
की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ?
काहीच कळत नाही...
भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ?
की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ?
अस असेल तर काय असत मग ..
वृत्त ..लय .. मुक्तछंद.. ?
मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे
आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात
आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़टलय .. या नियमात
का नाही कळल मला.. आयुष्य .. अन आयुष्याची कविता...?
प्रतिक्रिया
13 Jan 2011 - 9:45 pm | प्रकाश१११
आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..?
अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन..?
की मनात काहीच नाही म्हनुन विचार करणारे एक चलन ?
काहीच कळत नाही
छान .बरे वाटले. अव्यक्त मनाला व्यक्त करण्याचे साधन असते
खूप खरे आहे हे . आवडले.
14 Jan 2011 - 6:34 am | नरेशकुमार
प्रतिसाद म्हनजे काय असतात ?
मुक्तक छान !