वडिलांचे मुलीस पत्र

कच्चा पापड पक्का पापड's picture
कच्चा पापड पक्क... in जनातलं, मनातलं
11 Jan 2011 - 3:53 pm

प्रिय मुली,

सगळ्या घरांना दार असतात, पण सगळीच नसतात मायेची कोठार
हे शिकाशिलच तू कधी ना कधी.
मात्र हे ही लक्षात ठेव
की प्रत्येक उन्हात असते एक तरी शीतल सावली

अन प्रत्येक काट्यावर एखाद कोमल फूल
जीवघेण्या दरया असतात तसेच असतात झूलते पूल
दुष्ट माणसंच्या मनातही असते दडलेले कोवळे मूल

मला माहित आहे
सगळ्या गोष्टी शिकवल्यात आईने तुला
जमेल तेवढ पहात रहा उघड्या डोळ्यानी जग
जगायचा प्रयत्न कर चौकाटी वाचून

पण लक्षात ठेव
पक्ष्यानाही कस वाटत घरात अधारल म्हणून
तारुण्याची चव राखताना जागी राहू देत
तुझ्या मनात प्रेमळ आईची ऊब.

आणि वाटू दे घरादाराला तुझा आधार
कृष्णांन उचललेल्या गोवर्धनाखाली उभ राहिल्यासारखा

तुला हा धडा मिळू दे
की अकारण परिस्थितिला शरण जाण हा गुन्हा असतो
आणि अकारण बंड करून वादळ उठवण
हा ही असतो तितकाच प्रमाद

आपल्याला दुसरयान समजुन घेण्याआधी
दुसरयाला आपण समजुन घेण
हा ही असतो स्त्रित्वाचा महान प्रसाद

पण म्हणून जळु नयेस तू
परिस्थितिच्या कठोर मूर्ति समोर मूक उदबत्तीसारख
आणि असू नये तुझ्या ओठांवर कडवट चव
जळुन गेलेल्या उदाबत्तिच्या राखेसारखी

आपल्या कल्पना आपल्या निष्ठा
यावर विश्वास असावाच तुझा
पण उघडी असावीत तुझी सुजाण, समंजस कवाड
सर्वांना उघडी असलेल्या मंदिरा सारखी

निष्ठा जपण्याची जबाबदारी असते दुसरयाची
हे समजुन घेताना
मिटू नयेत दार तुझ्या आत्म्याची

ठिपक्या ठिपक्यन्ना जोडत साकारणार्या
रांगोळीसारख जोडणार असाव तुझ अस्तित्व
तहानलेल्या पाण्याइतक वाटाव
घरादाराला तुझ महत्व !

शेवटी एक सांगतो बेटा
प्रेम, सन्मान हे आहेत डोन्गरातुन मिळणारे प्रतिसाद
प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम
आपल्याच ओठातून साद

तोडणे सोपे जोडणे अवघड
ठावुक आहे तुला
पण कधीही समजू नकोस की
लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला

भावाइतकच घर अजुनही तुझ आहे
पायाखालची वाळु सरकली तर
माहेर तुझ भक्कम आहे

झालेस काही विपरीत तर लिहशील पत्र
लक्षात ठेव
बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र
--------------------*-----------------------

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

11 Jan 2011 - 4:05 pm | यशोधरा

आवडलं.

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 6:09 pm | नरेशकुमार

बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र

एकदम मनातले वाक्य.

कविता काय वर्णन करु, अप्रतिम !

मागे मिपावर एका लेखात एक ऑस्कर अवार्ड मिळविलेल्या एक चलचित्राचि आठवन झाली.
Oscar Awarded Father and Daughter short animation movie असे काहितरी नाव होते.
कोनाला सापडेल तर द्याल का.
http://www.youtube.com/watch?v=MgdsfRDxIeQ

विजुभाऊ's picture

11 Jan 2011 - 4:18 pm | विजुभाऊ

खरच खूप आवडली कविता

छान लिहीलंय.
अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांच पत्र सारखंच.
आवडलं.

अप्पा जोगळेकर's picture

11 Jan 2011 - 4:26 pm | अप्पा जोगळेकर

अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांच पत्र सारखंच.
हेच म्हणतो.

टारझन's picture

11 Jan 2011 - 4:32 pm | टारझन

याच धरतीवर " ओबामांचे मुषर्रफांस सुकाळी पत्र " देखील वाचायला आवडेल . .. :)

अवलिया's picture

11 Jan 2011 - 5:27 pm | अवलिया

याच धर्तीवर "संपादकांचे सदस्यांस पत्र" वाचायला आवडेल :)

नरेशकुमार's picture

11 Jan 2011 - 6:20 pm | नरेशकुमार

बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र

संपादकच असतो सदस्याचा खराखुरा मित्र. असे उगा वाटुन गेले.

अवलिया's picture

11 Jan 2011 - 6:20 pm | अवलिया

शक्यता नाकारता येत नाही.

छोटा डॉन's picture

11 Jan 2011 - 6:37 pm | छोटा डॉन

>>याच धर्तीवर "संपादकांचे सदस्यांस पत्र" वाचायला आवडेल

ओके, तसे तर तसे.
तसा आग्रह असल्यास हे शिवधनुष्य आम्ही उचलु असे सांगतो, मात्र नंतर व्यनीतुन श्या दिलेल्या ऐकुन घेणार नाही, ओके ?

अवांतर : ओरिजनल पत्र खुपच छान :) धन्यवाद.

- डॉन्या लिंकन*
(* नंदन, माफ कर रे बाबा, उगाच आपलं तुझ्या पदवीची झेराक्स गळ्यात बांधुन फिरतो आहे )

अवलिया's picture

11 Jan 2011 - 6:51 pm | अवलिया

ओके, तसे तर तसे.
तसा आग्रह असल्यास हे शिवधनुष्य आम्ही उचलु असे सांगतो, मात्र नंतर व्यनीतुन श्या दिलेल्या ऐकुन घेणार नाही, ओके ?

हा हा हा !! जरुर उचला शिवधनुष्य !!
लिहि लिहि.. लवकर लिही

निदान त्यामुळे तरी तू लिहिता होशील

हा डॉन्याच का एकटा सारखा सारखा ते धणुक्ष उचिलणार ?? ते क न चालणार बाकी लोकांच्या हाडांतील कॅल्शियम काय कमी झाले आहे ? ए कोण आहे रे तिकडे ? जागुकडची खुब्याची कॅल्शियमयुक्त भाजी घरपोच करा समद्यांच्या. आणि हा , ह्या डौण्याला नका देऊ , ऑलरेडी कॅल्शियम खुप आहे त्याच्या कडे. असो , अधिक प्रकाश गगनबिहारींसारखे जाणकार टाकतीलंच .

( मिपा वरच्या बेंद्रीणींना सुर्‍याचे पत्र लिहीण्याच्या विचारात ) टार्‍या म्हात्रे
ब ना ब कशी चालती ...

अनुराग's picture

11 Jan 2011 - 4:59 pm | अनुराग

आवडले

आपल्याला दुसरयान समजुन घेण्याआधी
दुसरयाला आपण समजुन घेण
हा ही असतो स्त्रित्वाचा महान प्रसाद

हे सगळ्यांसाठीच असाव.

छान आहे कविता.

Pearl's picture

12 Jan 2011 - 8:19 am | Pearl

>> आपल्याला दुसरयान समजुन घेण्याआधी दुसरयाला आपण समजुन घेण हा ही असतो स्त्रित्वाचा महान प्रसाद
>> हे सगळ्यांसाठीच असाव.

+१

बाकी कविता मस्तच!! आणि

भावाइतकच घर अजुनही तुझ आहे
पायाखालची वाळु सरकली तर
माहेर तुझ भक्कम आहे

झालेस काही विपरीत तर लिहशील पत्र
लक्षात ठेव
बापच असतो मुलीचा खराखुरा मित्र

या ओळी तर अप्रतिम!

५० फक्त's picture

11 Jan 2011 - 5:15 pm | ५० फक्त

छान लिहिलंय,

हे असं मुलीला सांगु शकणारा बाप किति सुसंस्कारित असेल आणि त्याचं कुटुंब या सगळ्याचा हेवा वाटतो.

हर्षद.

मस्त कलंदर's picture

11 Jan 2011 - 5:56 pm | मस्त कलंदर

खूप आवडली कविता!!!!

शुचि's picture

11 Jan 2011 - 6:14 pm | शुचि

सुंदर!!! अप्रतिम.

कविता आवडली

प्रतिसादासाठी घालावी लागते प्रथम
आपल्याच ओठातून साद

+१

ओळ न ओळ भिडली मनाला.

एक कन्या म्हणुन , एक आई म्हणुन, एक व्यक्ति म्हणुन सार्‍या पैलुतुन झळाळुन उठणार एक उत्क्रुष्ट काव्य !

अन हे सांगणारा एक पिता !

पुलेशु कच्चा पापड .

प्राजु's picture

11 Jan 2011 - 8:27 pm | प्राजु

अतिशय सुरेख!!! खूप आवडले.
बाबांची आठवण झाली.

'मुलीचा बाप ' हे नातं इतकं गुंतागुंतीचं आहे.. या नात्याला खूप पैलू आहेत. या कवितेमध्ये त्यातले काही उलगडून दाखवले आहेत नक्कीच. :)
पुलेशु.

ईन्टरफेल's picture

11 Jan 2011 - 9:03 pm | ईन्टरफेल

'मुलीचा बाप ' हे नातं इतकं गुंतागुंतीचं आहे.. या नात्याला खूप पैलू आहेत.

या कवितेमध्ये त्यातले काही उलगडून दाखवले आहेत नक्कीच.>>

+१ सहमत

स्वाती२'s picture

11 Jan 2011 - 9:08 pm | स्वाती२

सुरेख!

मुलूखावेगळी's picture

11 Jan 2011 - 10:56 pm | मुलूखावेगळी

आवडली कविता मनापासुन
कारन माझे वडील पन माझे खरे मित्र आहेत

मेघवेडा's picture

12 Jan 2011 - 1:12 am | मेघवेडा

वा! मस्तच. आवडले.

ज्ञानराम's picture

12 Jan 2011 - 10:00 am | ज्ञानराम

एक एक ओळ खरी आहे....
डोळ्यांत पाणी आलं

"दुष्ट माणसंच्या मनातही असते दडलेले कोवळे मूल " हे साफ चूक आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jan 2011 - 12:00 pm | परिकथेतील राजकुमार

छान आहे.

सविता००१'s picture

12 Jan 2011 - 12:17 pm | सविता००१

खूप छान. मनाला भिड्णारी.

स्मिता.'s picture

12 Jan 2011 - 12:29 pm | स्मिता.

पत्र खूप आवडलं... बाबांची आठवण आली.

पण कधीही समजू नकोस की
लग्नानंतर पाहुणी झालीस आम्हाला

पायाखालची वाळु सरकली तर
माहेर तुझ भक्कम आहे

या ओळी वाचून तर डोळ्यात पाणी आलं. कोणत्याही लग्न झालेल्या मुलीला कधी ना कधी आपण एकटे आहोत अशी जाणीव होते. ती जाणीव तात्पुरती आणि बहुदा बिनबुडाची असते. पण अश्या मनस्थितीत वरील ओळी किती आधार देऊन जातील.