शनी - समज गैरसमज

धोंडोपंत's picture
धोंडोपंत in जनातलं, मनातलं
29 Apr 2008 - 6:50 am

शनीग्रहाबद्दलच्या या लेखमालेत या लेखात सप्तमातल्या शनीबद्दल लिहिण्याचा मानस आहे. पंचमातील शनी आणि संततीसौख्य याबद्दल पूर्वी एका लेखात सविस्तर लिहिलेले आहे. जिज्ञासूंना तो लेख आमच्या ब्लॉगावरील Blog Archieves मध्ये सापडेल. शनी संततीसौख्यावर काय परिणाम करतो हे तेथे समजेल.

या लेखात मानवी जीवनातील अत्यंत महत्वाच्या म्हणजे विवाहसौख्याच्या बाबतीत शनी काय फले देतो हा विषय आहे.

सप्तमस्थान हे विवाहाचे स्थान आहे. व्यक्तीला लाभणारा वैवाहिक जोडिदार, त्याला मिळणारे विवाहसौख्य, लैंगिक क्षमता, लैंगिक आवडीनिवडी, जोडीदाराचा दर्जा, त्याची/तिची मानसिक व शारीरिक स्थिती, स्वभाववैचित्र्य, हे सर्व सप्तमस्थानावरून पाहिले जाते. तसेच धंद्यातील भागीदार, व्यापारात येणारे यश/अपयश या गोष्टी समजतात. हे दशमाचे दशम स्थान आहे. त्यामुळे दशमेशाला या स्थानात बल प्राप्त होते.

आयुष्यात ज्या ज्या व्यक्तिंशी संबंध येतो, त्या व्यक्ती सप्तमावरून पाहिल्या जातात. प्रथम स्थान म्हणजे स्वत: जातक, तर सप्तम स्थान म्हणजे त्याच्या समोरची व्यक्ती. डॉक्टर- पेशंट, वकील- अशील, निवडणूकीत एकमेकांसमोर उभे असलेले प्रतिस्पर्धी, सावकार- ऋणको, अशा सर्व गोष्टी सप्तमावरून समजतात.

त्याचप्रमाणे दंड, घटस्फोट, कायद्याने आलेला बंधनयोग, माणसाची परदेशातील कीर्ति ही सप्तमावरून पाहतात. सप्तम हे मारक स्थान आहे.

या स्थानातल्या शनीबद्दल अनेक ज्योतिर्विदांनी वाईट फले सांगितली आहेत. त्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे सप्तमातील शनी विवाहाला विलंब करतो. ही गोष्ट निर्विवादपणे खरी आहे.

वैद्यनाथ म्हणतात:-

" भाराध्वश्रमतप्तधीरधनिको मंदे मदस्थानगे।"

हा शनी मनुष्याला सतत प्रवास करायला लावून "तप्त"(?) व निर्धन करतो. तसेच ते पुढे स्त्रियांच्या कुंडलीतील सप्तमस्थ शनीची फले देतांना सांगतात की,

" लंबा पीनपयोधरा।"

म्हणजे सप्तमस्थ शनी असणार्‍या स्त्रियांचे स्तन लांब (लोंबणारे किंवा खाली उतरलेले) आणि पुष्ट असतात. तसेच, अजून एक फल त्यांनी दिले आहे, ते म्हणजे

"माधवशंकर प्रियसुतस्थानं वधूसंगमे।"

याचा अर्थ शंकराचा प्रिय सुत म्हणजे पुत्र..... म्हणजे गणपती..... त्याच्या स्थानी... म्हणजे गणपतीच्या देवळाच्या आसपास... स्त्रीशी समागम करणारा असा होतो.

लंबा पीनपयोधरा हे फल स्त्री कुंडलीस केवळ अवलोकनाने नेहमी अनुभवास येते. पण वरील गणपतीच्या देवळाच्या आसपास समागम करणार्‍या पुरूषाबद्दल दिलेले फल आमच्या अनुभवास आलेले नाही.

कदाचित पूर्वीच्या काळी खेड्यात रात्रीच्या सुमारास असे लोक देवळाच्या बाजूला जी पडवी किंवा सामान ठेवण्यासाठी ज्या खोल्या असतात, त्यात एकांत शोधत असावेत. आता शहरातल्या गणपतीच्या देवळात एवढी गर्दी असते की गणपतीलाही तिथे रहायला जागा नाही. त्यामुळे आजच्या काळात हे फळ अनुभवास येणे कदापि शक्य नाही.

पीन पयोधरा या सूत्राबद्दल आम्ही खूप चिंतन केले. ज्योतिषविषयाचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन जिज्ञासूंना मिळावे म्हणून त्याबद्दल लिहित आहोत. कारण या गोष्टी कोणत्याही पुस्तकातून किंवा अभ्यासक्रमातून शिकवल्या जात नाहीत. या प्रत्येकाने स्वत:च्या तपश्चर्येतून आत्मसात करायच्या असतात. आम्ही केलेल्या तपश्चर्येतून गवसलेले नवनीत आम्ही येथे मांडत आहोत.

अभ्यासकाने ज्योतिष शिकत असतांना प्रत्येक सूत्रावर दीर्घ चिंतन करणे आवश्यक आहे. आम्ही शब्दाशब्दावर प्रदीर्घ चिंतन केलेले आहे. एकेक सूत्रावर तासनतास आणि दिवसेंदिवस विचार केला आहे. आजही ही विचारमंथनाची प्रक्रिया अव्याहतपणे सुरू आहे. आमची विद्यार्थ्याची भूमिका आजही संपलेली नाही. अज्ञाताचा शोध घेण्याची ही ओढ कधीही न संपणारी आहे.

ज्योतिषशास्त्र हा ज्ञानाचा एक महासागर आहे आणि आजपर्यंत जे ज्ञान आम्ही प्राप्त करून घेतले आहे ते म्हणजे एखाद्या महासागरातून काही ओंजळी भरून घेण्याइतपत आहे. "आम्ही फार ज्ञानी आहोत" असा आमचा कधीच दावा नव्हता, आजही नाही आणि उद्याही नसेल. कारण हे शास्त्र इतके विस्तृत आहे की "आम्ही खूप ज्ञानी आहोत" असा दावा जो कोणी करेल तो महामूर्ख असेल. संपूर्ण आयुष्य या शास्त्रासाठी देऊनही यातील सर्व कळले असे होणार नाही याची आम्हांला कल्पना आहे.

पण आम्ही या शास्त्राचा आमच्यापरीने सखोल अभ्यास करून, त्याचा फायदा समाजाला करून देऊ शकलो ही बाब आमच्यासाठी अवश्यमेव महत्वाची आणि समाधानाची आहे. आजपर्यंत हजारो लोकांना आमच्या मार्गदर्शनाचा जो फायदा झाला त्याचे श्रेय पूर्वाचार्यांचे आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीत म्हटले आहे,

"व्यासांचा मागोवा घेतु। भाष्यकाराते वाट पुसतुं॥

महाराज म्हणतात आम्ही व्यासमहर्षींचा मागोवा घेत पुढे गेलो. भाष्यकार शंकराचार्य आहेत त्यांना मार्ग विचारत आम्ही मार्गक्रमण केले.

आम्हीही ज्ञानेश्वरमाऊलीचेच अनुकरण करीत आहोत. या शास्त्राच्या पूर्वाचार्यांनी दाखविलेल्या मार्गाने आम्ही जात आहोत. असे ज्ञानी आचार्य लाभणे हे आमचे भाग्य आहे. हे आर्य सनातन वैदिक संस्कृतीचे आमच्यावरील ऋण आहेत.

तर सांगायची गोष्ट म्हणजे,

"पीन पयोधरा" या सूत्रावर जेव्हा आम्ही विचार केला तेव्हा आम्हाला दोन प्रश्न पडले.

१) आचार्य वैद्यनाथांनी सप्तमातील शनीची फले सांगतांना स्त्रीच्या स्तनांचा उल्लेख कसा केला? कारण सप्तमावरून मानवी शरीरातील ज्या भागाचा बोध होतो तो भाग म्हणजे ओटीपोट, गुह्येंद्रिये, मुत्राशय कंबर हा आहे. तिथे स्तनांचा संबंध काय?

२) शनीचे कारकत्व हे आकुंचित करण्याचे, कोणतीही गोष्ट आक्रसून घेण्याचे आहे. अशा परिस्थितीत स्तनांची पुष्टता ते कशी सांगतात? गुरू प्रसरणशील आहे. शनी आकुंचनशील आहे. पुष्ट स्तन असणे हे शनीच्या कारकत्वाशी विसंगत नाही आहे काय?

बरं, आचार्य वैद्यनाथांसारखा विद्वान माणूस जेव्हा हे सांगतो तेव्हा त्याच्यामागे भक्कम वैचारिक बैठक असणारच. वैद्यनाथ म्हणजे कोणी देवळात पंचांग घेऊन बसणारे कुडमुडे ज्योतिषी नव्हते. ते अत्यंत विद्वान होते. त्यामुळे त्यांनी सांगितले ते शास्त्राच्या कसोट्यांवर घासून पुसून मगच सांगितले असणार.
त्यामुळे या सूत्रांची कारणमीमांसा शोधणे हे आवश्यक आहे.

चिंतन केल्यावर हे लक्षात आले की सप्तमस्थानाचा शनी दशमदृष्टीने चतुर्थस्थानाला पाह्तो. चतुर्थस्थान हे फुफ्फुसे, छाती, स्तन या शरीराच्या भागाचे निदर्शक आहे. त्यामुळे तिथे असलेली शनीची दृष्टी त्या भागावर परिणाम करणार हे उघड आहे. त्यामुळे या फलामध्ये नमूद केलेला स्तनांचा संबंध पटतो.

शनी हा आकुंचन करणारा आहे. त्या आकुंचनामुळे मुळात उन्नत असलेले अवयव आक्रसले जातात आणि कुठल्याही अवयवातील " muscle-tone" कमी झाल्यावर त्यातील घोटीवपणा जाऊन ते लोंबतात.

अभ्यासकांनी तर्कपद्धती कशी वापरावी हे समजण्यासाठी वरील विवेचन केले.

भृगुमहर्षी सांगतात:- शरीरदोषकर:। कृषकलत्र।

या माणसाचे शरीर रोगी असते. याची पत्नी कृश म्हणजे सडसडीत बांध्याची असते.

पाश्चात्य ज्योतिर्विद श्री. ऍलन लिओ म्हणतात:-

This planet tends to delay or hinder the marriage prospects. However, it promises faithful and steady partner one who is just tough rather grave and serious, very industrious, persevering, careful, thrifty and economical. "

सर्वसाधारणपणे बहुतेक आचार्यांनी सप्तमाच्या शनीची फळे नकारात्मक दिली आहेत. हा शनी विवाहास विलंब करतो हे निर्विवाद सत्य आहे. पण शनीच्या राशीकडे लक्ष दिले पाहिजे. मकर, कुंभ आणि तुळेतला शनी सप्तमाची फळे चांगली देतो. मकरेचा शनी जोडिदार आप्पलपोट्या आणि स्वार्थी दाखवतो. कुंभेचा शनी त्यापेक्षा बरा. वायुराशीचा असल्याने जोडीदार बुद्धिमान, व्यासंगी असतो. हा शनी मकरेत कुंभेत असता बायको सावळी असते. मकरेत सप्तमात शुक्र शनी अंशात्मक युतीत असता जोडीदार सावळा आणि जरा जास्त कामुक असतो. लग्न, द्वितीय, अष्टम आणि व्ययात जर मंगळ असेल तर द्विभार्यायोग होतो.

कुंडलीत शुक्र कमजोर असेल आणि सप्तमात शनी असेल तर जोडिदार थंड असतो. या लोकांना त्यांच्या मनाप्रमाणे शरीरसुख मिळत नाही. द्विस्वभाव राशीतला शनी सप्तमात असता दोन, तीन विवाह होतात.

बलवान शनी सप्तमात वक्री असेल आणि शुक्र जर सप्तमेशाशी षडाष्टकात असेल तर दोन तीन विवाह करूनही शेवटी एकटे रहावे लागते. सुखी वैवाहिक जीवनाची अपेक्षा करता येत नाही.

अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते.

भागिदारी, कोर्टकचेरीची कामे यात हा शनी अपयश देतो. शनी सप्तमेश असून मंगळाच्या अशुभयोगात असेल तर या लोकांनी भागीदारीत व्यवसाय करू नये.

सप्तमात शनी बुध यांची अंशात्मक युती असता तो माणूस नपुंसक असतो. त्यांनी वैद्यकीय चाचण्या आणि उपचार केल्याशिवाय विवाह करण्याच्या भानगडीत पडू नये आणि जोडिदाराचे आयुष्य बरबाद करू नये.

पराशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. या फलाचा अनुभव आम्हांला आलेला नाही. तसे सांगणारे फारसे कोणी आम्हांला भेटले नाहीत. किंबहुना, जे भेटले त्यांना तसे विचारल्यावर त्यांनी कबूल केलेले नाही. फक्त एक जण असा भेटला ज्याने हे कबूल केले. त्याच्या कुंडलीत शनी मंगळ युती सप्तमात आणि त्यावर लग्नातून हर्षलचा प्रतियोग अशी ग्रहस्थिती होती.

शनीबद्दल अधिक माहिती पुढील भागात.

आपला,
(विस्तृत) धोंडोपंत

ज्योतिषप्रकटन

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

29 Apr 2008 - 6:26 pm | विसोबा खेचर

शनीचा लेख लै भारी लिहिलायस रे धोंड्या!

पुढचा भागही लिही...

तात्या.

वरदा's picture

29 Apr 2008 - 9:15 pm | वरदा

अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते.


नवर्‍याची पत्रिका पाहिलीच पाहिजे ;)

नंदा प्रधान's picture

30 Apr 2008 - 5:36 am | नंदा प्रधान

राशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा.

पत्रिका बघायच्या आधी हे पण लक्षात ठेवा ;)

कौंतेय's picture

1 May 2008 - 8:20 am | कौंतेय

या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा.

हा काय प्रकार आहे??

नंदा प्रधान's picture

1 May 2008 - 8:36 am | नंदा प्रधान

कौंतेया हे वाक्य माझे नसुन वरील लेखातील धोंडोपंताचे आहे. त्यामूळे हा प्रकार आहे हे मला विचारुन काहीही साध्य होणार नाही.
-नंदा

वाटाड्या...'s picture

30 Apr 2008 - 3:15 am | वाटाड्या...

धोंडोपंत

आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना...

धन्यवाद,

मुकुल

वाटाड्या...'s picture

30 Apr 2008 - 3:16 am | वाटाड्या...

धोंडोपंत

आपल्याला पण लई इटरेस्ट आहे..पण..एकदा ते सप्तम, दशम आणि सगळीच स्थानं कशी बघायची ते सांगा ना...
कारण आपला पण राशिस्वामी शनी आहे म्हणे....जरा आभ्यास करावा म्हणतो...

धन्यवाद,

मुकुल

वरदा's picture

1 May 2008 - 7:46 pm | वरदा

(मिस्टर का मिस माहीत नाही)
काय वाट्टेल ते बोलून पुढे स्मायली लावू नका....
अग्निराशीतला शनी पत्नी पुरूषी प्रकृतीची देतो. मेष आणि सिंहेचा असेल तर बायको कजाग, भांडकुदळ असते आणि तिची सेवा करीत आणि तिचे मूड सांभाळत आयुष्य काढावे लागते.

मी माझ्या नवर्‍याशी भांडते असं तो म्हणतो मजेत, आणि तो सिंह राशीचा आहे म्हणून म्हटलं मी त्याची पत्रीका पाहीन

पराशरांनी या शनीचे एक फळ दिले आहे. ते म्हणजे स्त्री विटाळशी असतांना तिच्याशी संभोग करणारा. या फलाचा अनुभव आम्हांला आलेला नाही. तसे सांगणारे फारसे कोणी आम्हांला भेटले नाहीत. किंबहुना, जे भेटले त्यांना तसे विचारल्यावर त्यांनी कबूल केलेले नाही. फक्त एक जण असा भेटला ज्याने हे कबूल केले. त्याच्या कुंडलीत शनी मंगळ युती सप्तमात आणि त्यावर लग्नातून हर्षलचा प्रतियोग अशी ग्रहस्थिती होती.

ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही....
काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला..... X(

धोंडोपंत's picture

2 May 2008 - 6:41 pm | धोंडोपंत

ह्याच्याशी त्याचा काय संबंध? हे कुठल्या स्थानातल्या शनी मुळे होतं असं काहीहि म्हटलेलं नाही....
काहीही लिहायचं ह्याला काही अर्थच नाही.....उचलला हात आणि लावला कळफलकाला.....

वरदा,

आम्ही उचलला हात आणि लावला कळफळकाला हे करण्याइतपत मूर्ख नाही. तुम्ही बृहत पाराशरी वाचलेली आहे काय? ती आधी नीट वाचावी. त्यात काय लिहिले आहे ते जाणून घ्यावे मग अशा प्रतिक्रिया द्याव्यात.

स्वतःला माहिती नसतांना किंवा स्वतःचा अभ्यास नसतांना लोकांना मूर्खात काढणे हे कोणते लक्षण आहे हे आम्ही सांगायला नको.

तुम्ही लेख नीट वाचलेलाही दिसत नाही कारण सदर लेख हा सप्तमस्थानाबद्दल आहे असे लेखात नमूद केलेले आहे. तो जर नीट वाचला असतात तर हे कुठल्या स्थानातल्या शनीमुळे होते हा प्रश्न रामायण वाचल्यानंतर रामाची सीता कोण या पद्धतीने तुम्ही विचारला नसतात.

आम्ही लिहिलेल्या गोष्टींशी तुम्ही किंवा इतर कुणीही सहमत असले पाहीजे असा आमचा मुळीच आग्रह नाही....पण तुम्ही वैयक्तिक रोख ठेऊन "उचलला हात आणि लावला कळफलकाला" सारखे काहीही लिहित सुटाल आणि ते खपवून घेऊ अशा गैरसमजात राहू नका. या शास्त्रासाठी आम्ही आमची जिंदगी पणाला लावली आहे. दिवसरात्र एक करून आम्ही या शास्त्राचा अभ्यास केला आहे. तपश्चर्या केली आहे.

विचारांना विरोध जरूर करा पण हे वर जे तुम्ही वैयक्तिक पातळीवर तारे तोडलेत ते पुन्हा आमच्या बाबतीत तुटता कामा नयेत.

पुढील लेखाला कधी प्रतिक्रिया दिलीत तर ती संयमित आणि सूज्ञ असावी हे आवर्जून सांगून येथे थांबतोय.

धोंडोपंत

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

देवदत्त's picture

2 May 2008 - 7:29 pm | देवदत्त

धोंडोपंत,
मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे.

बाकी, चालू द्या.

विसोबा खेचर's picture

3 May 2008 - 2:02 am | विसोबा खेचर

धोंडोपंत,
मला वाटते, तो प्रतिसाद वरदा ह्यांनी़ नंदा प्रधानना लिहिला आहे.

हेच म्हणतो..

पंत, वरदाने ते उत्तर नंदाला दिले आहे, तुमचा यात काहीच संबंध मला तरी दिसत नाही/दिसला नाही...

असो.. बाकी चालू द्या..

तात्या.

वरदा's picture

2 May 2008 - 10:22 pm | वरदा

तुम्हाला कसं म्हणेन मी असं मी त्या नंदा प्रधानने जी फालतू गंमत केली ना त्यावर रागावले.....