भारत स्वतंत्र झाल्यापासून पाकिस्तान भारताला एखाद्या कुत्र्यासारखा चावतोय. लचका तोडतो आणि मग भ्याडासारखा शेपूट घालून पळून जातो. १९९२ चे जबरी बॉम्बस्फोट, २६/११ चा रक्तपात, लोकल ट्रेनमधले आणि बेस्ट बसमधले बॉम्बस्फोट, अक्षरधाम मंदिरावरचा हल्ला, संसदेवरचा हल्ला, जर्मन बेकरीतला स्फोट, हैदराबादचा स्फोट...काही विचारू नका. शिवाय जगभर धर्मांध अतिरेक्यांनी घातलेला धुमाकूळ तर संतापजनक आहे. ९/११ चा विमाने घुसवून इमारती पाडण्याचा अघोरी प्रकार असो की अजून कुठल्याही देशात होणारा रक्तपात असो, धर्मांध अतिरेकी जगाला बुडवायला निघालेले आहेत. सगळ्या देशांनी या 'जिहादीं'ची धास्ती घेतलेली आहे. त्यांचा हेतू काय आहे हेच कळत नाही. सगळे जग यांना कशासाठी इस्लामधर्मीय बनवायचे आहे हेच कळत नाही. तसं पाहिलं तर असे होणे कधीच शक्य नाही. पण आपण लोकांच्या शरीरातून रक्त बाहेर काढले म्हणजे आपल्याला अल्ला स्वर्गात जागा देईल ही जी काही शिकवण आहे ही इतकी हास्यास्पद आहे की त्यावर हसावे की रडावे हेच कळत नाही.
...राहुल गांधी म्हणतात सगळ्यात धोकादायक हिंदू दहशतवाद, पी. चिदंबरम म्हणतात भगवा दहशतवाद भयंकर, दिग्विजय सिंग म्हणतात हिंदू दहशतवाद्यांकडून हेमंत करकर्यांना धोका होता....
...काल एका चर्चेत पत्रकार प्रकाश बाळ हिंदूत्व दहशतवाद अशी एक नवीन संकल्पना मांडतात...
माझ्या लहानपणापासून मी असा शब्द कधीच ऐकला नव्हता. एखादा जर तुम्हाला लाथा-बुक्क्यांनी मारतोय आणि तुम्ही जर प्रत्युत्तर म्हणून दोन चापटा मारल्या तर ते दोन चापटा मारणे म्हणजे लगेच दहशतवाद होतो? म्हणजे त्याने मुकाट मारच खात रहायचे का? आणि मग राहुल गांधींसारखे शेंबडे पोर म्हणते की हिंदू दहशतवाद भयंकर आहे म्हणून! परक्या देशात दोन उत्तुंग टॉवर्स विमाने घुसवून पाडणे हा दहशतवाद किती भयंकर आहे याची कल्पना राहुल गांधींना नाही?
आज प्रत्येक ठिकाणी मुसलमान बांधवांना संशयाने पाहिले जाते. दहशतवादाचा हा कलंक जास्त भयंकर नाही? दाढी ठेवलेला आणि टोपी घातलेला इसम पाहिला की मनात येणारा पहिला विचार असतो की हा मुसलमान आहे. त्यांच्या या दिसण्यावरूनच यांना अडचणींचा सामना करावा लागतो. हा प्रकार घृणास्पद नाही? धर्म ही इतकी महत्वाची गोष्ट आहे? तो कोवळा कसाब थंडपणे निरपराध लोकांना मारतो हा दहशतवाद नाही? कोवळ्या मुलांची गोरी-गोरी नाजूक त्वचा क्षणात फाटून त्यातून रक्ताच्या चिळकांड्या उडतात आणि बोबड्या बोलांची मुले क्षणात एक रक्त-मासाचा गोळा होऊन निश्चेष्ट पडून राहतात ही आहे यांची धर्माची व्याख्या? काही कळत नाही बुवा...
प्रकाश बाळ अजून एक मत मांडतात, दहशतवादाला रंग असतो. जसा भगवा दहशतवाद आहे तसाच हिरवा दहशतवादही आहे. हे खरे असेल का? ज्याच्या त्याच्या जातीचा त्याच्या त्याच्या दहशतवादाला रंग...
उद्या जैन दहशतवाद उगवेल. मग ब्राह्मण दहशतवाद, मग शीख दहशतवाद, त्यानंतर मराठा, चांभार, कुंभार, शिंपी, कासार, सीकेपी, बुध्द, ख्रिश्चन, ज्यू ....असे सगळे दहशतवाद जन्म घेतील. मग त्यापुढे जाऊन यजुर्वेदी दहशतवाद, ॠग्वेदी दहशतवाद, शहाण्णव कुळी दहशतवाद, त्वष्टा कासार दहशतवाद, फूलमाळी दहशतवाद....
मग ॠग्वेदी दहशतवादी हातात जानवे, पळी-पंचपात्र, घंटी घेऊन दहशतवाद माजवायला निघतील, जो दिसेल त्याच्या डोक्यावर घंटी मारायची आणि दक्षिणा उकळायची...श्वेतांबर जैन दहशतवादी आपापल्या दुकानातील माल लोकांना मारून दहशतवाद माजवतील, कुंभार दहशतवादी गाडगी-मडकी फेकून मारतील...शिंपी दहशतवादी कापडं मारून फेकतील...
इतका आवश्यक आहे दहशतवाद? इतकी आवश्यक आहे जाती-धर्माची नशा? की लोकांच्या भावना भडकावत ठेवण्याची ही राजकारण्यांची नामी आणि हुकुमी युक्ती आहे? काहीही झालं की काढ उकरून जाती-धर्माचं मढं आणि पेटव लोकांना, त्यांच्या कच्च्याबच्च्यांना, त्यांच्या कष्टाने उभ्या केलेल्या घरांना, स्वप्नांना...इतके मूर्ख आहोत आपण? की हा देखील आपल्या मूर्खपणाचा एक निराळाच दहशतवाद?
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 7:32 pm | गणेशा
काय बोलु .. तुम्ही जे बोलत आहात तसेच बर्यापैकी वाटते ..
5 Jan 2011 - 7:44 pm | तिमा
इतका त्रागा करुन काही उपयोग होणार आहे का ? आपल्या मायबाप सरकारने आपल्या देशाच्या लोकसंख्येवर ताबा ठेवण्यासाठी पाकिस्तानला काँट्रॅक्ट दिले आहे.
5 Jan 2011 - 7:55 pm | अप्पा जोगळेकर
श्री. इंटरनेटस्नेही सांगून गेलेत

बिअर प्या आणि चिल रहा.
चिल + रिलॅक्स = चिलॅक्स
तेंव्हा तूर्तास हे घ्या.
6 Jan 2011 - 11:14 am | रणजित चितळे
प्रकाश बाळ कोण ह्या वर प्रकाश टाकेल का कोणी. मी गेली बरीच वर्ष महाराष्ट्राबाहेर राहतो. माफ करा.
पण त्यांचे ह्या विधानाचा निषेध करतो.
6 Jan 2011 - 12:22 pm | परिकथेतील राजकुमार
ज्यांच्या आडनावातच 'बाळ' आहे.... त्यांच्याकडे काय लक्ष द्यायचे ? हॅ हॅ हॅ
8 Jan 2011 - 12:56 am | आकाशस्थ
इतके मूर्ख आहोत आपण? की हा देखील आपल्या मूर्खपणाचा एक निराळाच दहशतवाद?
......मला वाटतं, आपण "हुश्शार" मूर्ख आहोत !!
...आकाश.