सांजवेळी सोबतीला - एकदा येऊन जा
ओठ जे गातात गाणे - ओठी तू घेऊन जा
ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या
वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा
न भेटण्याची कारणे आता मला देऊ नको
भेटण्याच्या कारणांची - कारणे ऐकून जा
याच - साठी टाळतो मी - पौर्णीमेचा चंद्र ही
कोजागिरी असते कशी ?- तू एकदा दाऊन जा
शब्द ही सोडून जाती - लागता चाहुल तुझी
मी जे मुक्याने बोलतो - तू एकदा समजून जा
श्वास ही बघ एक होती - "मी "- न् - "मी"! --"तू" -न्- "तू" !
देह मी ठेवीन तेव्हा "अमर" - तू होऊन जा
आज आयुष्या मला - थोडी "तिची" सोबत हवी
धन्य मग वाटेल मरणे - तू एकदा जगवून जा
काटा फुलाशी राहतो तैसा असे रुसवा तिचा
समजूत मी काढेन ग ! - तू भांडणे ऊकरून जा
कोण जाणे ? कोणत्या काळात मग भेटू पुन्हा ?
हुंदके देईन "मी" - "तू" पापण्या भिजवून जा
मयुरेश साने...दि..०४-जानेवारी-११
प्रतिक्रिया
5 Jan 2011 - 8:14 am | प्रकाश१११
ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या
वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा
छान गझल. आवडली
5 Jan 2011 - 1:32 pm | गणेशा
छान
ज्या - मुळे फुलती कळ्या - अन् पाकळ्या होती खुळ्या
वसंत तो "मी" प्रितीचा - तू भेटुनी बहरून जा