काही दिवसांपूर्वी आपण माझ्या बरोबर काही आयटी वाल्यांच्या सवयीचा आस्वाद घेतलात. आता अजुन काही जमातीं कडे आपण पहाणार आहोत.
सर्वात पहिले : उच्चभ्रू !! (आंतरजालीय भाषेत या जमातीच्या लोकांना हुच्चभ्रू असे ही म्हटल्या जाते.)
आमचे कट्टर शत्रुत्व असलेली ही जमात, आपल्याला गल्ली-बोळात सहजासहजी सापडणार नाही, मात्र शनिवारी-रविवारी एखाद्या मॉल मध्ये आरामशीर सापडेल. अंगात , आंग्लभाषेत, आय एम अश्या ऍटिट्यूड धारी अक्षराने सुरु होणारं , अथवा एखादं प्रवचनीय वाक्य असलेले राऊंड नेक चे टी-शर्ट असेल. खाली पंधरा ते वीस खिशे असलेली दोन-तृतीयांश पाय झाकणारी (ज्याला धड 'चड्डी ' म्हणता येत नाही ) अशी विजार असेल. पायात सॉक्स सकट ब्रॅन्डेड शुज असतील. गळ्याभोवती भरगच्च हेडसेट असेल.(आणि अंगाभोवती भरगच्च मास असेल.)हाताशी मॉलमध्ये वस्तू वाहून नेणारी पाळणा-गाडी असेल.त्या पाळणा-गाडीत किमान एक तरी रेडि-टु-कुक किंवा मग पास्ता वगैरे ची पाकिटे असतील आणि नजर बावचळल्यासारखी इकडे-तिकडे भिरभिरत असेल.
त्याच्या शेजारी एखादी जीन्स आणि जॅकेट परिधान केलेली, नाईट स्लिपर्स घातलेली स्त्री असेल.आपल्याला नुकतच सोळावं संपवून सतरावं लागलय असा अविर्भाव करीत केस मोकळे सोडलेले असतील. मोकळे केस नुकतेच 'गार्नियर' अथवा इतर तत्सम केश-कलप लावण्याचा उत्पादनाने रंगविलेले स्पष्टपणे दिसतील. वि.सु. : गळ्यात असलेले मंगळसूत्र झाकलेले असण्याची दाट शक्यता आहे. पाळणा-गाडीत रेडि-टू-कुक मध्ये एक पाकिट दाल-तडका चं देखील आहे, याची अजिबात लाज, खंत, शरम चेहर्यावर दिसणार नाही, उलट माज दिसेल. या वर्णन केलेल्या बाबी आपल्याला आढळून आल्यास समजून जावे की हा त्या जमातीचा प्राणी आहे.
या जमातीतील लोकांना बर्याच सवयी असतात . ही मंडळी खूपच कमी-वेळा घरात जेवतात आणि जेवलेच तर, जेवताना काटे-सुरे (आणि मोकळं झाल्यावर 'प्रेशर पाइप ' ;) ) वापरतात. (काही महाभाग तर 'गो ग्रीन - डोन्ट वेस्ट पेपरचा टी -शर्ट घालुन मुक्तहस्ताने टिश्यू पेपर वापरतात.) असो. केवळ अंगाने भारतात रहाणारी ही जमात एकुण आंतरजाल, फोन , दूरचित्रवाणी या माध्यमातून जगाच्या संपर्कात असते. पण शेजारच्या खोलीत आपली नुकतीच वयात आलेली कन्यका फोनवर काय गुण उधळते आहे ? हे यांना माहीत नसते. कुठल्यातरी देशाचे पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष सध्या कुठल्या देशाच्या टुरवर जाउन काय टुर-टुर करताहेत हे यांना चांगले ठावूक असते. त्यातल्या त्यात बीबीसी आणि सिएनएन या दोन चॅनेल्स शिवाय जगात बातम्या देणारे दुसरे चॅनेल नाही असा यांचा ठाम विश्वास असतो.
या जमातीतील सहसा समस्त प्राण्यांचा फेसबुकवर पॉलिटिकल व्युज चा स्टेटस नॉट इंटरेस्टेड असा असतो. शिवाय मतदानाच्या दिवशी हे प्राणिमात्र, मॅकडोनाल्ड, सब-वे किंवा त्याच प्रकारच्या हॉटेलात बसून, ' बर्गर ' मधील माल-मसाला टेबलावर सांडवत असतात. आपल्या सुपूत्र किंवा सुपूत्रीला , पेप्सी पिताना भरल्या नजरेने (जणू काही ते अमृत पीत आहेत) पहात असतात. मात्र वर्ष-समाप्ती ला यांना चांभाराची तीव्र गरज पडते. टॅक्सचे कॅलक्युलेशन्स करताना ' दिस ब्लडी पॉलिटिशयन, रुनडं दिस कन्ट्री ' किंवा अश्या प्रकारच्या वाक्यात या देशात चाललेल्या ढिसाळ राज्यकारभाराची कुंथून-कुंथून आठवण काढतात. अन्यथा वर्षभर ही मंडळी ओबामा - ओबामा असा जप करताना आढळते.
वार्षिक सहलीला जाणे, ही या मंडळी अजुन छान एक सवय.सहलीला जाणे म्हणजे शॉर्ट पॅन्ट, पाठीला सॅक आणि हातात बिसलरीची बॉटल असणे आवश्यक आहे असा यांचा समज आहे. नाही, नाही , प्रत्येक गोष्ट करताना ड्रेस कोड असणे असा यांचा एक समज आहे. (आतील कपड्यांना ही ड्रेस कोड असेल का ? असा कधी-कधी मला विचार पडतो.) तर , सहलीला जाताना ही मंडळी सहसा स्वतःच्याच कारनं जातात. आणि कार मध्ये लॅपटॉप ही घेउन जातात. छानपैकी हिरवळीचा, ऐतिहासिक वास्तुचा,वारश्यांचा आनंद घेत असताना, ऍडीशनल आनंद म्हणवून आपल्या ब्लॅकबेरी वर इ-मेल्स चेकवत असतात किंवा फोनवरच मोठ्या आवाजात, मिट द टारगेट, व्हेअर आर मिनीटस ऑफ मिटींग, व्हेयर डु वी स्टॅन्ड ऑन दिस, आय विल पूट दिस टु सीइओ, अशी काहीतरी वाक्य उच्चारतात.(चार विरंगुळ्याचे क्षण जग की रे लेका कधीतरी !! )
बद्धकोष्ठ !! हा रोग निसर्ग नियमाने म्हणा वा जन्मजात देणगी प्रमाणे यांना मिळतो. तसं पहायला गेले की ही मंडळी , साधी शिंक जरी आली तर, चहात आलं टाकुन प्यायच्या ऐवजी, रूबी , जहांगीर, इनलॅक्स किंवा मग दिनानाथ इस्पितळात स्वतःला अॅडमीट करून घेतात. महिन्यातून एकदा उगाच अंतर्बाह्य मेडिकल चेक-अप नावाचा महागडा आणि गोंडस प्रकार करून इस्पितळाचा वार्षिक ताळेबंदाचा आकडा यांच्या इतकाच फूगवित असतात आणि इतके करून ही सरते शेवटी म्हातारपणात या प्राणिमात्रांना हास्य-क्लबात दाखल व्हावे लागते.
आमची दुसरी प्रिय जमात म्हणजे : गुंठा मंत्री !!
मित्रांनो, या जमातीतील लोकांना भेटणे अवघड नाही तसेच ते सोप्पे देखील नाही. या जमातीतील प्राणिमात्रांना बघण्याकरिता आपल्याला शहराच्या मध्यवर्ती भागापासून जरा दूर जावे लागेल.समजा, उदाहरणार्थ, आपण पुणे शहर घेवू यात. (च्या मारी हे वाक्य लिहीताना क्षणभर गणिताच्या मास्तरसारखं वाटल मला.) शहरापासून दूर चाकण, वाघोली, खडकवासला, निगडी पासून ते तळेगाव या हाय-वे ला टच असणार्या रस्त्यावर , एखाद्या ढाब्यात, वाईन शॉपी, किंवा बार मध्ये आपल्याला ही जमात सापडेल.
बाहेर स्कॉर्पियो ऊभी असेल (त्या आधी क्वालिस उभ्या असायच्या आणि त्या ही आधी अॅम्बॅसिडर) आणि त्यावर घड्याळाचे चिन्ह असण्याची दाट शक्यता आहे. घड्याळाचे चिन्ह नसले तर आख्ख्या खान-दानाच्या नावाची पाटी नक्की असेल, भगवा वा शिवरायांचे चित्र देखील असू शकतं , पण अशी स्कॉर्पिओ असणे जरा विरळाच .बार मध्ये गेल्यावर, माणसांच्या गर्दीत, ज्या प्राणिमात्रांच्या शरीराच्या उघड्या (बोटे,मान,मनगट, अगदी कधी-कधी कान सुद्धा) भागात सर्वात जास्त सोनं दिसेल तोच हा मनुष्य-प्राणी !! पण त्या ही पेक्षा सोप्या पद्धतीने त्याला ओळखायचं असेल तर त्याच्या उन्हाने रापलेल्या चेहेऱ्याकडे बघावं. दिपक मानकर, राखी सांवत, मंहम्मद अली,अब्बु आजमी, आजम पानसरे,शोएब अख्तर, रिकी पॉन्टिंग, अजित पवार आणि विराट कोहली या सर्वांच्या चेहेऱ्यावर मिळून जो माजोरीपणा आहे त्याच्या दहापट माजोरी चेहरा दिसला रे दिसला की समजून जावे की हा प्राणीमात्र ' गुंठा मंत्री " या सदरात मोडतो.
या लोकांच्या काही खास सवयी आहेत. कपड्यांचा बाबतीत ही लोक अतिशय दक्ष असतात. स्वच्छ पांढरा शर्ट (हाफ ही असू शकतो .) आणि खाली पांढरी पॅन्ट, सहसा सूतीची असते. पण बुट हा पायात घालायचा प्रकार नसून, आपल्याच एखाद्या कार्यकर्त्याकडून, भर सभेत खायचा प्रकार आहे, असा यांचा समज असतो त्यामुळे पायात सदैव चप्पल असते. घड्याळ ही फक्त वेळ बघण्यासाठी ची वस्तू आहे यावर या जमातीच्या लोकांचा विश्वास नसतो.सोनं तर अंगभर पसरलेले असते. शिवाय घड्याळ ही सोन्याचा खर्व असलेली वापरतात. (वर हिरेजडीत !! च्या मारी , अशी घड्याळ वापरल्याने जर मॅनेजरच्या आणि बापाच्या शिव्या खाण्याचा वेळा चुकणार असतील तर मी आजच्या 'घडीला किमान दहा तरी ऑर्डर द्यायला तयार आहे.)
लग्न सोहळा !! या प्रणिमातेरांचा (हा शब्द असाच मुद्दामून लिहीला आहे.) लग्न सोहळा नामक जो काही प्रकार आहे त्याला आपण ' शक्ती प्रदर्शन ' सोहळा देखील म्हणू शकता. ५० तोळे सोने घेणे अथवा देणे ही अतिशय किरकोळ बाब आहे. नववधू चा साडीच्या(शालू) ऐवजी दागिन्यांनी देखील झाकल्या जाऊ शकते असे आपल्याला वाटू शकते. एखादा मंत्री (मग तो भु-विकास मंत्रालयाचा का असेना.), पालक मंत्री नाहीतर किमान साखर कारखान्याचा चेअरमन लग्नाला हजर असतोच, शिवाय लग्न-पत्रिका म्हणजे मतदान-यादीतील एखाद पान असलेच पाहिजे (समस्त नावे पाटील या तीन शब्दाने संपणारी ) समस्त पाव्हण्यांची नावे जरी पत्रिकेत असली तरी ऐन वेळेला नवरदेवाच्या मावशीची नणंदेच्या जावयाच्या तिसर्या मुलीच्या सासूची चौथ्या नंबरची बहीण अडून बसतेच. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली एखाद्या लग्नात आपल्याला बायका नाचविलेल्या ही दिसतील.
हे प्राणीमात्र 'धनदांडगे' या सदरात मोडतात. मन्थंली रिजल्टस, व्कार्टरली रिझल्टस, इयरली रिझल्टस किंवा रेसेशन या टर्मशी या लोकांचा काही सबंध नसतो, उलट जर का 'मार्केट पडलं ' असं आपण यांना सांगीतले तर " कुढ्ढालं ? बाजार समिती च का ?" असे विचारुन समोरच्याला कपाळावर हात मारायला लावेल. बाजार समिती, सरकारी गाळे,आडते, बाळू वाहतुकीचे ट्रक्स अश्या सरकारी मालमत्ता म्हणजे यांची सत्ता-स्थाने असतात, पर्सनल लोन्स, होम लोन्स वगैरै फालतू प्रकार आहेत, (आमच्या एका गुंठा मंत्री मित्राला गोड आवाजातल्या कन्येने " आपली काही पर्सनल लोन ची रिक्वायरमेंट आहे का ? " असे विचारल्यावर त्याने " मला तर नाही पण तुला पाहिजे असलं तर सांग ,पाच-पन्नास देतो मी, ये सांजच्याला असे म्हणून त्या कन्येला अक्षरशः रडवले होते. )
असो. ज्या प्रमाणे सवयी आहेत, त्याच प्रमाणे त्याला अपवाद ही.
पुढील भागात : फिल्मी, पुस्तकी आणि बुंगारी.
प्रतिक्रिया
3 Jan 2011 - 3:15 pm | गणपा
क ड क रे सुहाश्या
3 Jan 2011 - 3:37 pm | टारझन
हा हा हा ... उच्चभ्रुंची लक्षणं नव्याने पहायला मिळाली ... मात्र गुंठामंत्री एकदम जवळुन बघतो. अगदी जवळुन ... हा हा हा .. काय तो माज .. भोसरीतल्या आळंदी रोड वर संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी दोन स्कॉर्पियो ( नंबरप्लेट वर घड्याळ आणि आतमधे मिररवर तिरंग्याचं रिबिन ने बनवलेलं कसलंस पदक लटकवलेलं) मस्त गप्पा हाणत बसतात .आणि कोणि हॉर्ण वाजवला तर ... " काय रे आआअय$$घाल्या " म्हणुन त्यालाच खडेबोल सुनावनारे गुंठामंत्री.
गुंठा मंत्र्यांची पोरं पण लगेच ओळखु येतात . ढेरपोटी , शर्टचं पहिलं बटण कधीच लावलेलं नसणे , ढुंगणाखाली बुलेट नाही तर पल्सर हमखास .. आणि आख्या आळी ला ऐकु येण्यासाठी लावलेले मोठे हॉर्न. गल्ली तुन ते विनाकारण वाजवत जाणे . हे असतात गुंठामंत्र्यांचे चिरंजीव :)
शिवाय काम ना धाम पोष्टर लावणार. विस किलोचे का असेनात किंवा एक जोर का मारलेला नसेनात , तरी बॅनर वर "पै" शब्दाने यांची नावे सुरु होतात . =))
एकदम मजेशीर
3 Jan 2011 - 3:16 pm | चिंतामणी
दोन्हीही "लै भारी"
3 Jan 2011 - 3:18 pm | लॉरी टांगटूंगकर
घड्याळ ही सोन्याचा खर्व असलेली वापरतात
खर्व नव्हे भाऊ वर्ख
खर्व मंजे एक वर किती तरी शून्ये १०००००००००००० असेच काहीतरी
3 Jan 2011 - 3:22 pm | यकु
वाशी आणि पुणे भागात असल्या जमातीचे कळपचे कळ्प नजरेस पडले होते..
पुणे ठेसनातल्या कमसम नावाच्या हाटेलमध्ये गरम कुत्रे चघळत, चालू असलेल्या गाण्यावर मध्येच शर्टाच्या आतून मुंग्या चावल्यासारखे त्यांचे हावभाव पाहाताना खूप टाईमपास झाला होता..
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
3 Jan 2011 - 3:25 pm | छोटा डॉन
>>चालू असलेल्या गाण्यावर मध्येच शर्टाच्या आतून मुंग्या चावल्यासारखे त्यांचे हावभाव पाहाताना खूप टाईमपास झाला होता..
=)) =))
अहो बहुतेक ते 'हेवी मेटल' असेल ;)
लेख मजेशीर आहे, उच्चभ्रु जमातीचा अभ्यास हा कॉफी-डे / बरिश्ता, क्रॉसवर्ड आणि अपाचे ह्या स्थानांच्या उल्लेखाशिवाय पुर्ण होऊ शकत नाही, इथं तुम्हाला अजुन काही वेगळेच णमुने बघयाला मिळतील.
- छोटा डॉन
3 Jan 2011 - 3:23 pm | Dhananjay Borgaonkar
लय भारी रे..
गुंठा(डा)मंत्री तर रोजच पहायला मिळतात हिंजवडी मधे.
पांढरी स्कॉर्पिओ आणि त्यात माज करणारे ही मा़कडं.
किती पण गर्दी असो. ट्रॅफिक जाम असो. यांना काहीच फरक पडत नाही.
बिनधास्त बापाचा रोड असल्यासारखी गाडी मधुनच वळवायची आणि अजुन ट्रॅफिकची मारयची.
लै डोक्यात जातात ही लोकं.
3 Jan 2011 - 3:31 pm | स्वतन्त्र
यकदम आवसम बगा !
उच्चभ्रू लोकांची मराठी-हिंदी-इंग्रजी मिश्रित तिसरी भाषा ऐकताना यांची कीव येते.आणि माज पाहून दया.
आणि गुंठामंत्र्यांचा एवढा अमाप पैसा एकदम मिळाल्यावर,तो कसा आणि कुठे करायचा हे डोकं नसतं
3 Jan 2011 - 3:29 pm | गणेशा
अतिशय जबरदस्त ..
निरिक्षण आनि लेखन कौशल्य दोन्हीही छान .. मस्तच
3 Jan 2011 - 3:37 pm | सहज
चार(श्या)ओळीचे प्रेमकाव्य भारीच!!!
पुढचा भाग लवकर येउ दे! :-)
3 Jan 2011 - 3:39 pm | मैत्र
हुच्चभ्रू उत्तम... पण गुंठा मंत्री जबरा...
माजोरी पणाच्या यादीत युवराजला पण धरा... आम्ही इतके दिवस समजत होतो आपल्यालाच मग्रूर वाटतो तो... आज राणीच्या देशात इगो च्या विशेष यादीत त्याला स्थान मिळालंय...
आणि हो त्यांच्या सगळ्या सुवर्ण यादीत ... जड जबरदस्त मोबाईल विसरलात. बार मध्ये नाहीतर स्कॉर्पियो ला टेकून असे काही बोलतात की मोबाईलची गरजच नाही. थेटच ऐकू जावं.
लग्न-पत्रिका म्हणजे मतदान-यादीतील एखाद पान असलेच पाहिजे
उलट जर का 'मार्केट पडलं ' असं आपण यांना सांगीतले तर " कुढ्ढालं ? बाजार समिती च का ?" असे विचारुन समोरच्याला कपाळावर हात मारायला लावेल. बाजार समिती, सरकारी गाळे,आडते, बाळू वाहतुकीचे ट्रक्स अश्या सरकारी मालमत्ता म्हणजे यांची सत्ता-स्थाने असतात, पर्सनल लोन्स, होम लोन्स वगैरै फालतू प्रकार आहेत, (आमच्या एका गुंठा मंत्री मित्राला गोड आवाजातल्या कन्येने " आपली काही पर्सनल लोन ची रिक्वायरमेंट आहे का ? " असे विचारल्यावर त्याने " मला तर नाही पण तुला पाहिजे असलं तर सांग ,पाच-पन्नास देतो मी, ये सांजच्याला असे म्हणून त्या कन्येला अक्षरशः रडवले होते. )
हे लै भारी....
पुढच्या मनुष्य विशेषांची वाट पाहतोय...
3 Jan 2011 - 3:44 pm | यकु
>>>>पुढच्या मनुष्य विशेषांची वाट पाहतोय...
मी सुध्दा!!
>>>>पुढील भागात : फिल्मी, पुस्तकी आणि बुंगारी.
याबद्दल सुहासची खास निरिक्षणे वाचायला खूप मजा येईल.. सुहास लवकर लिही..!!
3 Jan 2011 - 3:40 pm | ५० फक्त
सुहास, अतिशय छान लिहिलं आहेस. या क्षेत्रात असल्यानं या गुंठामंत्र्यांच्या आयुष्याची दुसरी बाजु पण पाहिलेली आहे. जमीन विकुन आलेले पॅसे संपल्यावर माझ्यासारख्या नोकरदाराकडे उधारी करताना पाहिलेलं आहे.
हि लोकं क्रिकेट्च्या आयपीएल सारखं पत्त्याच्या लिग खेळवायची, दिवस दिवस मंदिरात पत्ते चालायचे, जेवण खाण पण तिथेच. घरुन डबा आणायला हाताखालच्यांना पल्सार घेउन दिलेल्या असायच्या. चहा, दुपारचे जेवण, नाष्टा व रात्रीचा चकणा सगळं घरुन यायचं, फक्त दारु बाहेरची. गावाच्या आसपासच्या सगळ्या पेट्रोल पंपावर खाती असायची. ४१४१ हा अतिशय आवडता नंबर गाडिसाठि.
"पाहतोस काय मुजरा कर" ही मुजोरी गाडिच्या काचेपासुन गॉगलच्या काचेपर्यंत असायची. एकदा दारु चढली की दिल दरिया गांड समंदर - अशी अवस्था असते. एका पंपावर गाडीत डिझेल मिळाले नाही म्हणुन सगळा पंप आपल्या लोकांना सांगुन बंद करायला लावला होता. आम्ही कुटुंबियासह १ तास आत अडकुन होतो. नंतर महिनाभर माझा मुलगा त्या वेळी अॅकलेल्या शिव्यांचे अर्थ विचारायचा आणि त्याला समजावता आमच्या नाकी नउ आले होते.
बाकी काही नावांचे उल्लेख खटकले, एका लोकल राजकीय नेत्याचे, हया लोकांना विनोद आणि मस्करीची कुस्करी यातला फरक कळत नाही, त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असे उल्लेख टाळलेले बरे.
3 Jan 2011 - 4:48 pm | sagarparadkar
"पाहतोस काय मुजरा कर" ...
:) :) :)
हे फारच आवडले .... एकदम 'परफेक्ट' निरीक्षण ....
बाकी हे हुच्चभ्रू लोक म्हणजे "अमेरिकेच्या कृपेने उदयाला आलेला 'नव-मध्यम' वर्ग" !!!
(त्या सुमार काकांच्या पुढल्या पिढीने हेच स्थान काही दशकं आधीच गाठलं असणार, असो....)
तर ही उच्च्भ्रू लोकं त्यांच्या नव-मध्यम आर्थिक स्थितीची नवता संपली की आपोआपच कोपर्यावरच्या हाटेलात 'मिसळपाव' खायला येतातच. पण त्यांच्याबद्दल एक बरं आहे कि ती इतरांना फारसा उपद्रव तरी करत नाहीत ...
पण हे गुंठामंत्री म्हणजे काय इचारता महाराजा ... ह्यांचा माज सार्वत्रिक पातळीवर उतरलेला कधी पाहिला नाहीये. म्हणजे एखाद्याचा माज उतरला असेल पण तोपर्यंत अनेक गुंठामंत्री तयार झालेले असतात. मी काय म्हणतो त्याची प्रचीती घ्यायची असेल तर सार्वत्रिक सुट्टीच्या दिवशी शहराबाहेरच्या 'स्पॉट्'वर सहकुटुंब जावंसं वाटणार्या पांढरपेशा सामान्य लोकांना ह्या गुंठामंत्र्यांच्या खरकट्यांमुळे काय काय कटकटी सहन कराव्या लागतात त्याचं प्रत्यंतर घेवून पहा ...
3 Jan 2011 - 3:49 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं रे सुहाश्या... आपल्या इथे विकास हा फक्त जमिनीचा होतो मनुष्यांचा होत नाही. म्हणून आज शेतात हमाली करणारे उद्या आयटी कंपनीचे संडास धुतात इतकंच. असो.
लेख नेमीप्रमाणे लै लै लै भारी.
3 Jan 2011 - 4:02 pm | परिकथेतील राजकुमार
हा हा हा !
मस्त रे, एकदम भन्नाट निरिक्षण. आता एक लेख 'बगलबच्चांवर' पण लिहा.
5 Jan 2011 - 2:07 pm | केशवसुमार
मस्त रे, एकदम भन्नाट निरिक्षण.
पुढचा भाग लवकर टंका..
6 Jan 2011 - 5:48 am | प्रभो
मस्त रे, एकदम भन्नाट निरिक्षण.
3 Jan 2011 - 4:06 pm | बाप्पा
काहि तरी नवीन लिहा राव... हे तर रोजचंच आहे पुणेकरांना.
3 Jan 2011 - 4:11 pm | मुलूखावेगळी
एकदम सही निरीक्षण
उच्चभ्रु बघुन कन्टाळा आल्यामुळे असेल पण मन्त्री न चमचे लय भारी आहे नाक्या नाक्या वर पडीक असतात.
बाहेर स्कॉर्पियो ऊभी असेल (त्या आधी क्वालिस उभ्या असायच्या आणि त्या ही आधी अॅम्बॅसिडर) आणि त्यावर घड्याळाचे चिन्ह असण्याची दाट शक्यता आहे. घड्याळाचे चिन्ह नसले तर आख्ख्या खान-दानाच्या नावाची पाटी नक्की असेल, भगवा वा शिवरायांचे चित्र देखील असू शकतं , पण अशी स्कॉर्पिओ असणे जरा विरळाच .बार मध्ये गेल्यावर, माणसांच्या गर्दीत, ज्या प्राणिमात्रांच्या शरीराच्या उघड्या (बोटे,मान,मनगट, अगदी कधी-कधी कान सुद्धा) भागात सर्वात जास्त सोनं दिसेल तोच हा मनुष्य-प्राणी !!
>>> मला वाटते बराय्चदा स्कोर्पिओ पन पान्ढरी च असते आनि गल्यात ते केशरी किन्वा पान्ढराच दुपट्टा पन असतो काहीजनाना
3 Jan 2011 - 4:18 pm | नगरीनिरंजन
मस्त रे! जबरी निरीक्षण आणि टेसदार भाषा!
हुच्चभ्रू असो वा गुंठामंत्री, माज हा एक सामयिक गुण आजकाल सर्वत्रच आढळतो. विशेषत: हे हुच्चभ्रू लोक इंग्रजी न येणार्या साध्यासुध्या कामकरी वर्गाकडे ज्या नजरेने पाहतात त्या नजरेने आपल्याकडे कोणी पाहिल्यास पाहणार्याचे डोळे काढून ठेवावेसे वाटतील. क्रॉसवर्ड वगैरे सारख्या दुकानांमध्ये या हूच्चभ्रूंची इंटुकपणाची झूल घातलेली 'फन्नी' जत्रा लै पाहायला मिळते.
गुंठामंत्र्यांबद्दल तर लैच भारी आणि शंभर टक्के अचूक लिहीलंय. कधी नाय पाह्यलं आन गटकन गिळलं म्हणतात ना ते हे लोक जगत असतात.
3 Jan 2011 - 4:55 pm | अवलिया
हा हा हा
हुच्चभ्रुंचे वर्णन हुच्च !
3 Jan 2011 - 5:50 pm | सर्वसाक्षी
झकास वर्णन
उच्चभ्रूंची आणखी एक खासियत - रस्ते खड्ड्यांनी भरलेले असले तरी ते पोरांना बाबागाडीतुन फिरवतात आणि कुत्र्यांशी आवर्जुन ईंग्रजीत बोलतात. थोडक्यात यांची एक 'प्रतिसृष्टी ' असते. जायचे होते पण गेले नाहीत असे पश्चिमेचा ध्यास घेतलेले आणि दुर्दैवाने इथे दिवस कंठावे लागणारे हे जीव मग इथेच 'पश्चिम' निर्माण करतात.
गुंठामंत्रीही झकास (यांचे 'टिळे' विसरलात)
3 Jan 2011 - 9:40 pm | उल्हास
आणी परदेशी लोकांसारखे मुले बाबा गाडीत तर कुत्रे मात्र कडेवर घेवुन हिंड्तात
लेख खासच
3 Jan 2011 - 6:25 pm | प्रसन्न केसकर
साला तुझ्या मेंदु एकदा स्कॅन करुन ठेवला पायजे. टीआरपी घ्यायच्या काय काय आयड्या येतात रे तुझ्या डोक्यात?
असो!
तद्दन भंपक लेख. तुझ्यासारख्या गुंठामंत्री अन उच्चभ्रुंना नागडं-उघडं पाहिलेल्याकडुन असल्या वरवरच्या लिखाणाची अपेक्षा नव्हती.
गुंठामंत्र्यांचा सगळा माज गावाबाहेरुन आलेल्या उच्चभ्रुंकरताच राखीव असतो; मैती च्या वेळेस गुंठामंत्री कितीही माजोर्डा असला तरी खांदा द्यायला पुढे सरसावतो; चौफुलाच्या अन झालंच तर मळ्यात कामाला येणार्या बाया तो आपली स्वकष्टार्जित कमाई समजुन वागला तरी स्वतःच्या अन इतर गुंठामंत्र्यांच्या घरातल्या बायकांना तो कायम आईसाहेब, ताईसाहेब म्हणतो; धाब्यावर स्वतःचं बिल देताना इतर पाच पन्नास जणांची बिलं पण तो भागवतो असली बारिक निरिक्षणं गुंठामंत्र्यांबाबत अपेक्षित होती.
उच्चभ्रुंबाबतही तसेच. व्यक्तीस्वातंत्र्य अन घसरत्या सामाजिक नीतीमत्तेबाबत एकाच वेळी उच्चभ्रु दोन्हीबाजुंनी बोलतो; गुंठामंत्र्यांच्या बाईलवेडेपणाबद्दल बोलताना तो स्वतःच्या घरी लावलेल्या नागड्या बायकांच्या चित्रांची भलावण सौंदर्यदृष्टी म्हणुन करतो, स्वतःच्या सायटींवर, सीड्यांवर निळसर रंगाचे चित्रपट पहाण्याला कलात्मकता म्हणतो अन गगनचुंबी हॉटेलांच्या थंडगार खोल्यांमधे कुण्या बाईच्या कुशीत शिरण्याला एंजॉयमेंट म्हणतो; गुंठामंत्र्यानं रस्त्यात कॉर्पियो (त्याला कॉर्पियोच म्हणतात आमच्यात, स्कॉर्पियो नाही.) उभी केली तर चिडणारा तो स्वतः सहजच सिग्नल तोडतो अन पोलिसाला पन्नास्-शंभर रुपये देऊन सगळं मिटवतो अन वर खुप धावपळ असते वेळच नसतो म्हणुन समर्थन पण करतो; गणपती मंडळाच्या लाऊडस्पीकरनं त्याचं डोकं दुखतं पण पार्टीत चाललेला धिंगाणा त्याच्यासाठी अभिव्यक्ती असते अश्या अनेक गोष्टी लिहिल्या नाहीत.
या दुटप्पीपणाचा त्रिवार निषेध!
3 Jan 2011 - 6:36 pm | अवलिया
हा हा हा
3 Jan 2011 - 6:29 pm | सुहास..
असो. ज्या प्रमाणे सवयी आहेत, त्याच प्रमाणे त्याला अपवाद ही. >>>
बाजु दोन्ही आहेत त्यामुळे निषेध अगदी मान्य !!
3 Jan 2011 - 7:22 pm | sneharani
मस्त! पुढचा भाग लिहा...!
3 Jan 2011 - 9:56 pm | मराठे
दोन्ही मस्त!
3 Jan 2011 - 10:54 pm | फारएन्ड
दोन्ही धमाल लिहीले आहे :) आधीचा लेख शोधतो आता.
3 Jan 2011 - 11:32 pm | मुक्तसुनीत
हेच बोल्तो ! :-)
4 Jan 2011 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
+२
3 Jan 2011 - 11:22 pm | वाटाड्या...
जबरी रे सुहास..
निरीक्षणं एकदम भारी भावा..एकदम वंटास का काय म्हणतात ते...
अश्या लोकांकडे पाहून एकच विचार येतो..उद्या खरच जर भारतातील परिस्थीती २० वर्षांपुर्वीची झाली तर ह्या असल्या वरच्या २ प्रकारचे दिव्यांची अवस्था कशी होइल...??
- (कुठलाच मंत्री नसलेला) वाट्यामंत्री
3 Jan 2011 - 11:51 pm | शिल्पा ब
मस्त निरीक्षण...
बाकी कधी नाय पाह्यलं आन गटकन गिळलं म्हंजे काय हो ननि?
4 Jan 2011 - 12:22 am | अडगळ
निव्वळ जळतात. जेलसी. तुम्ही पण फिरा की आमच्यासारख. कोणी अडवलंय ? मिळवा पैसा आणि मग मिरवा. असली नतद्रष्ट लोकं तसल्यांना निवडून देतात . वोटींगला बंदी घातली पाहिजे असल्या लोकांना. डिस्ग्स्टींग.
- १३, बी , विसलींग पामेला , वाकड, पूना.
कोन त्यो. हाडं मोडून पिशवीत देतो भरुन ह्येची. दम लागतोय **त माज करायला बी. नुसत्या मिस्कॉलवर ४ ट्याम्पो पोरं गोळा होत्यात म्हणाव.
-दापोडी , अन्ना म्हनुन इचारा , घरापत्तर आणुन सोडत्यात.
4 Jan 2011 - 12:40 am | मी-सौरभ
नं. १ प्रतिसाद :)
4 Jan 2011 - 1:37 am | शिल्पा ब
आवाल्डं!!!
पन अन्ना, मारवाड्यानं उदारी बंद केली न्हवं...कायबी द्याला तयार न्हाई...पगा की कायतरी.. १५ दिसानी देत्ये की पैकं म्हनावं.
4 Jan 2011 - 8:51 am | llपुण्याचे पेशवेll
अडगळ, लै लै भारी उदाहरणं दिली आहेत....
तुम्हाला कोणी अडवलंय कष्ट करून पैसे मिळवायला? हे तर अगदी पेटंट वाक्य.
अजून काही संवाद.
बरं मी सांगू का निश तुला? (या निशचे नाव खरे अनीश असते) लवासा इज ऑस्सम. बट थोडं एक्स्पेन्सिव्ह आहे. पण लवासा नाहीतर लवासा रोडवर तरी थोडी लँन्ड घे हं. खूप फायदा होईल. इट्स गोन्ना बी ब्लास्ट देअर. (चायला हे हुच्चभ्रु मरणाला वगैरे घाबरत नसावेत. नाहीतर स्फोट होणार हे माहीत असूनही कशा काय जमिनी घेतात. आणि जिथे गुंठ्यानी भाव चालू आहे तिथे स्केअर फुटाने भाव करतात. म्हणजे उगाच गुंठ्यानी घेणार्यांना पण मग त्या जमिनी महाग पडू लागतात.)
4 Jan 2011 - 4:08 pm | प्रसन्न केसकर
ते एजंट/ बिल्डर/ प्रमोटर कडुन जमिनी घेतात. एजंट/ बिल्डर/ प्रमोटर चे व्यवहार विसार पावतीचे असतात त्यामुळे त्यांना जमिन पडते काही हजार रुपयांत गुंठा अन ती प्लॉटिंग झाल्यावर विकली जाते काही लाख रुपयांना गुंठ्याच्या दरात. यांना वाटते आपण दिलेल्यातले बरेचसे पैसे गुंठामंत्र्याकडेच गेलेत अन त्यानं सगळे चौफुला, डान्सबारवर उडवलेत म्हणुन. जमीन मालक मिळालेला विसार करतो खर्च अजुन पैसे येणार म्हणुन अन नंतर बसतो बोंबलत. तोवर थर्ड पार्टी इंटरेस्ट तयार झालेला असल्याने काहिच करणे नसते हातात.
उगीच नाही सहारा, सुमन मोटेल्स, लेक सिटी, आंबी व्हॅलीला जमीन विकणारे बहुतेक सगळे शेतकरी डायस प्लॉट, पर्वती, पौड रोड (जय भवानी नगर, किष्किंधानगर इ.) ठिकाणी सडत.
27 Nov 2013 - 5:23 pm | बाप्पू
:)
4 Jan 2011 - 7:27 pm | अविनाशकुलकर्णी
वा सुहास राव मस्त लीहिले आहे...एकदम तंतोतंत वर्णन...
मस्त
4 Jan 2011 - 9:11 pm | पैसा
अतिशय हुच्च वर्णनं. आता पुढला भाग बुंगारी म्हणजे काय याची उत्सुकता लागली आहे!
5 Jan 2011 - 2:02 pm | बबलु
ज ब रा !!!!
5 Jan 2011 - 4:07 pm | पुष्करिणी
लेख अगदी हुच्च झालाय, मजा आली
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.
27 Nov 2013 - 3:38 pm | पैसा
पुढचा भाग कधी येणार आहे?
27 Nov 2013 - 5:27 pm | बाप्पू
उच्चभ्रू जमातीतल्या लोक्कांचे वर्णन विशेष आवडले…. गेले ३ वर्षे IT कंपनी मध्ये काम करतोय
इथे या जमातीतल्या लोकांचा अक्षरशः सूळसुळाट आहे. वैताग येतो यांचा खुप…
27 Nov 2013 - 7:21 pm | मुक्त विहारि
झक्कास
28 Nov 2013 - 12:40 pm | बाबा पाटील
ते हुच्च्भ्रु आणी गुंडा मंत्री...या दोघांनाही आपल्यात असलेला माज दाखवा बरोबर लायनीत येतात.कालच रात्री पोलिस स्टेशनसमोरच एका गुंठा मंत्र्यांची व्यवस्थीत जिरवलीय.मजा आली साली. आणी हुच्चभ्रु काय्,यांना पोट निट करुन घेण्यासाठी आमच्या शिवाय पर्यायच नसतो.एक जुलाबाची गोळी त्यांना ताळ्यावर आणते.
28 Nov 2013 - 12:48 pm | सुहास..
डिटेलवारी किस्सा प्लिज :)
28 Nov 2013 - 7:33 pm | बाबा पाटील
आम्ही चार जण बालमित्र आहोत.वय सगळेजण सरासरी ३०-३२ वर्ष,एक जण मोठा उद्योगपती,मी डॉक्टर्,दुसराही शिक्षणाने डॉक्टर पण व्यवसायाने पेट्रोलपंपचालक्,व एका मोबाइल कंपनीचा डीलर्,चौथा बिगबॉस वरिष्ठ पोलिस अधिकारी. चौघांचेही बंगले एकमेकांपासुन २०० मिटरच्या परिसरात आहेत्,त्यामुळे दररोज रात्री जेवनानंतर १०.३० च्या सुमारास जव़ळच्या चौकात गप्पा + चहा साठी(बायका घरात रात्री जेवनानंतर चहा पिउन देत नाहीत हो.)जमतो.सगळ्याकडे लायसन्स गन्स आहेत.पोलिसवाल्याकडे दोन, एक शासकिय व एक वैयक्तिक.काल असेच टापा टाकत चौकात पोलिसचौकी शेजारीच गाड्या लाउन बसलो होतो.११ च्या सुमारास एक घड्याळजी फोरच्युनर आमच्या मधल्या ऑडीला एउन धडकली.आम्ही चौघेही तब्येतीने बारिक असल्याने आनी रात्री जिन्स टी-शर्ट अश्या वेशात होतो. रस्त्यावरच शेबंड पोरग पण आम्हाला अश्या अवतारात साहेब म्हणनार नाही.गाडी येउन धडकल्यावर आमच्यातल्या पोलिसवाल्याने साहजिकच खणखणुन शिवी घातली.(साल्या शिव्यांच्या युनिव्हरसीटीचा टॉप रँकर आहे).
तेंव्हा त्या गाडीतुन दोन पांढर्या कपड्यातले गेंडे (वजन अंदाजे १०० किलो च्या आसपास) एकाच्या हातात हॉकी स्टीक दुसर्याच्या हातात लोखंडी पाइप्,आमच्या आख्या खाणदानाचा उद्धार करतच समोर आले.काय कसे झाले माहित नाही पण दुसर्या क्षणी आमच्या चौघांच्या हातात मोजुन पाच गन्स त्यांचा दिशेने रोखल्या गेल्या होत्या,इतर तिघांच्या तिन आणी पोलिसवाल्याच्या दोन्ही हातात दोन,आईशपथ त्या गेंड्यांच कोकरु कधी झाल त्यांनाही कळल नाही.पुढच्या पाच मिनिटात शेजारील चौकीतील पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्,गडी फुल्ल टाईट होते. व एका जवळच्याच आमदारसाहेबांचे नातेवाइक निघाले. त्यांनी माफी मागितल्यावर प्रकरण मिटले.पण त्या जागी आम्ही लोक होतो,त्या एवजी खरच जर कॉलेजची पोर असती तर या गेंड्यांनी दारुच्या नशेत त्यांचे हातपाय तर नक्की मोडले असते.
28 Nov 2013 - 7:48 pm | टवाळ कार्टा
तुम्ही "कॉमन म्यान"च्या व्याखेत बसत नाहीत हो...बंगला, ऑडी, गन आणि खास पोलिस दोस्त :(
28 Nov 2013 - 8:04 pm | कपिलमुनी
राम राम पाटील !
वळख ठीवा ;)
29 Nov 2013 - 1:29 pm | खटपट्या
वळख ठेवा सायेब. कधी भेटण्याचा योग आला तर….
29 Nov 2013 - 10:54 pm | विद्युत् बालक
तुम्ही बंदूक घेऊन चौकात गप्पा मारता?
आयला असे पण उलटे होते काय? अपक्ष आमदार होते कि काय?
28 Nov 2013 - 7:58 pm | भ ट क्या खे ड वा ला
लय भारी ,चपखल , हुबेहूब
अजून येउद्यात
28 Nov 2013 - 8:19 pm | बाबा पाटील
आमच्यातला प्रत्येकजण प्रचंड कष्ट करुन वर आलोय. मी मराठी शाळा मास्तरचा मुलगा आहे,ज्याची ऑडी आहे त्याने बारावीला पेपरची लाइन टाकली आहे.पोलिसवाल्याची आईवडील भाजीविक्रेते होते.पेट्रोलपंपवाल्याचे वडील पोलिस हवलदार होते,मेरीट वर आत डी वाय एस पी आहेत.प्रत्येकाचे शिक्षण मेरीटवर झाले आहे शिवाय प्रत्येक जण ओपन कॅटेगरीत येतो त्यामुळे आरक्षणाचा संबधही नाही. कुनालाही संध्याकाळचे जेवन भाकरीशिवाय जात नाही आणी प्रत्येकाचे आई वडील त्याच्याबरोबरच राहतात.त्यामुळे तथाकथीत उच्च वर्गात आम्ही कधीच जाउ शकत नाही
28 Nov 2013 - 8:38 pm | टवाळ कार्टा
_/|\_ आमुचा दंडवत...
29 Nov 2013 - 7:09 am | रुस्तम
_/|\_ आमुचा दंडवत...
29 Nov 2013 - 10:58 am | वामन देशमुख
आपणांस आणि आपण चौघांसारखी स्वकष्टावर प्रगती करणाऱ्या सर्वांसच- तेथे कर माझे जुळती...
29 Nov 2013 - 11:30 am | मृत्युन्जय
तुम्हाला गन का घ्यावीशी वाटली हे जाणुन घ्यायची उत्सुकता आहे.
29 Nov 2013 - 11:37 am | बाबा पाटील
माझी शेती व वैद्यकिय व मिनरला वॉटरचा प्लांट असे तीन तीन व्यवसाय आहेत.त्यामुळे बहुतेक फिरण किंवा लोकांच्या भेटीगाठी दवाखान्याची वेळ संपल्यावर रात्री दहानंतर असतात.जरी बंद गाड्यातुन फिरत असलो तरी कुठली वेळ कशी असेल ते कोनीच प्रेडीक्ट करु शकत नाही त्यामुळे स्वसंरक्षनार्थ शस्र परवाना मिळाला.
29 Nov 2013 - 12:56 pm | मृत्युन्जय
मलाही रात्री अपरात्री बरेच भटकायला लागते. एखादी घेउन टाकेन म्हणतो. काय करावे लागते (आणि काही पैसे वगैरे चारायला लागतात का?)
29 Nov 2013 - 1:17 pm | बाबा पाटील
सगळ्यात महत्वाची दोन एक बायकोचे आणी दुसरे जन्मदात्या वडीलांचे संमतीपत्र ते पन तहसिलदारांसमोर अॅफेडेव्हीट करुन ते मिळाल की सांगा,बाकीची कागदे सहज मिळतील ,फाइल भक्कम झाली की एक रुपयाही चारावा लागत नाही,निदान मला तरी तसा अनुभव आला नाही.
29 Nov 2013 - 11:15 am | सुहास..
हम्म
29 Nov 2013 - 11:29 am | बाबा पाटील
म्हणुन एकच गोष्ट नेहमी सांगत असतो,आपले बापजादे काय होते हे उगाळत न बसता,शिक्षणाची कास धरा,प्रचंड कष्ट आणी परमेश्वराने दिलेल्या मेंदुचा काळजीपुर्वक वापर केला केला की यश मिळतेच.बाकी दुनियादारी गेली......ड्यात.
11 Feb 2016 - 11:03 am | सिरुसेरि
-------"म्हणुन एकच गोष्ट नेहमी सांगत असतो,आपले बापजादे काय होते हे उगाळत न बसता,शिक्षणाची कास धरा,प्रचंड कष्ट आणी परमेश्वराने दिलेल्या मेंदुचा काळजीपुर्वक वापर केला केला की यश मिळतेच"-----
सुरेख .
29 Nov 2013 - 1:01 pm | इरसाल
तुम्हाला ख म्हणायचे होते ना ? ;)
10 Feb 2016 - 6:22 pm | ईश्वरसर्वसाक्षी
पण दुसर्या क्षणी आमच्या चौघांच्या हातात मोजुन पाच गन्स त्यांचा दिशेने रोखल्या गेल्या होत्या,इतर तिघांच्या तिन आणी पोलिसवाल्याच्या दोन्ही हातात दोन
जबरा...एकदम अस वाटल काउबॉय मुव्हि बघतोय. शतपावली करताना सुद्धा गन्स सोबत बाळगाव्या लागतात आणि पोलिसवाला तर दोन्हि गन्स बाळगतो वैयक्तिक आणि सर्विस रिव्हॉल्वर्...खरच भारत आता राहण्यालायक नाहि राहिलाय.
10 Feb 2016 - 10:23 pm | सतिश पाटील
राम राम पाटील....
तुमीबी पाटील आमीबी पाटील..तवा
तेवढी वळख ठुवा आमची...कसं...
आयला ४ जणांनी मिळून ५ बंदुकी काढल्यावर तेची फुटभर फाटलीच आसल
दीत्तो शिन्मात्ला शिन...
10 Feb 2016 - 10:38 pm | भिकापाटील
इकणारे इकित्याय घेणारे घेत्याय मंग तुमची कम्हूण जळती
14 Feb 2016 - 8:22 pm | shvinayakruti
यक नंबर लेख सुहास भाऊ. लय आवडला
14 Feb 2016 - 8:26 pm | shvinayakruti
बाबा पाटील. तुम्हाला आणी तुमच्या मित्रांना नुसता दंडवतच नाही तर माझा मुजरा