कधीही काहीही होऊ शकते ..!!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जे न देखे रवी...
31 Dec 2010 - 6:52 am

हे प्रचंड शहर
खास पोटापाण्यासाठी राखीव कुरण
गरिबांचे शहर
श्रीमंताचे शहर
मौज-मस्तीचे शहर
संस्कृतीचे शहर
सांस्कृतिक शहर
चिंचोळ्या गल्लीतून दिसणाऱ्या खिडकीचे शहर
आता हे शहर आहे बंदुकीच्या टोकावर
गोळी कधीही उडू शकते
बोंब कधीपण फुटू शकतो

गाडीमध्ये ...
स्टेशनमध्ये ......
भर गर्दीत ...
कोठेही
कधीही ..!
सावध ..!
नि फक्त सावध ..!!
काय करू शकतो...?
मी? ,तुम्ही ,??आपण ???
तुमच्या पाठीत कधीपण घुसू शकतात संगीनीची टोके
आजकाल मरायच्या नि मारायच्या गोष्टी फार सोप्या होऊन गेल्यात
अम्बुलंसवाला सहज सांगतो ;थकलो साहेब ,शंभर बोड्या सोडून आलो
काय मजाक आहे का ?
नि साले बोनस देत नाहीत .....

हे शहर ज्वालामुखीच्या मुखावर बसले आहे
कधी,केव्हाही काहीही होऊ शकते
फार लवकर विसरून जातो कालची घटना
२६/११ ची घटना मेणबत्त्या लावून साजरी केली जाते
नि आजचा रंगीत कार्यक्रम बघण्यात हरवून जातो ..
मी ,तुम्ही ,आपण ...नि हा समाज ..
डोळे क्षणभर बंद करून ठेवतो
उघडतो नि दिसतेय ..
संस्कृती कशी बदलून जातेय एका क्षणात
जगण्याची ,जीवनाची झिंग घेतोय भरून
बार फुल आहेत ,डान्स बार फुल आहेत
कुणाचीतरी नजर बारीक आहे
उद्या काहीही होऊ शकते
कधीपण ..केव्हापन ..!!
थोडसे घाबरून पुन्हा सावरण्याची सवय होऊन गेलीय
मला ,तुम्हाला ,सगळ्यांना ..!!
तसे फीडिंग करून ठेवलेय
ते डिलीट पण करता नाही येत
कारण कोणीतरी ते लाक करून ठेवलेय ..

कधी काहीही होऊ शकते
माझ्या ,तुमच्या पाठीत संगिनी कधीपण घुसू शकतात ....!!

भयानककविता

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

31 Dec 2010 - 10:06 am | पाषाणभेद

एकदम थरारक काव्य. एखादे युद्ध काव्य आहे असेच वाटले.

जाणीव होऊन धडकी भरली..

फार चांगले.

गणेशा's picture

3 Jan 2011 - 2:58 pm | गणेशा

कविता आवडली