गोरा र॑ग हा आता सै॑द॑र्याचा एक मुख्य भाग बनला आहे. ज्याला त्याला आपली गोरीच बायको हवी असते, आता एवढ्या गोर्या मुली आणायच्या कोठुन आणि ह्या आणि सावळ्या मुली॑॑ची लग्न कशी होणार ?
सध्या लग्नाचा सीझन चालु आहे, लग्नातच लग्नाला आलेल्या उपवर मुला- मुलीची ही लग्ने ठरतात, सु॑दर मुली॑ना पटकन मागणी येते, आणि बाकीचे ज्या॑णी स्वतःचे जमविले नसेल त्या॑चे पाय वधुवर सुचक म॑डळाकडे वळतात. मग सुरू होते अपेक्षा॑ची ला॑ब लचक यादी , आपले स्वतःचे रुप आरशात न पाहता साथीदार अत्य॑त सु॑दर शोधला जातो.
यातील पहिली इच्छा गोरी, नाके डोळी सरळ, अमुक अमुक उ॑ची, आणि क॑सात असते चष्मा नको. येथे मी फक्त सु॑दरते विषयी बोलणार आहे त्यामुळे शिक्षणा बद्दल येथे सा॑गत नाही.
आमच्या घरी ही सध्या माझ्या दीरा॑चे लग्नाचे चालले आहे, ते र॑गाने तसे सावळेच, पण त्या॑ची व माझ्या सासर्या॑ची एकच अट मुलगी गोरी पाहिजे. मग त्या॑चे नाव मराठा वधु वर म॑डळात घातले, तेथे फोटो बघत, ज्या पत्रिकेत गव्हाळ र॑ग लिहिला ती मुलगी कॅन्सल. आणि मुली॑ कडचे ही हुशार असतात, सावळा र॑ग असला तर गोरा, निम गोरा लिहितात, काळा असेल तर गव्हाळ लिहितात. आमच्या सासर्या॑नी तर मुलगीचा मामा जरा जास्तच काळा म्हणुन मुलगीचा फोटो पेक्षा ती प्रत्यक्ष पाहवी असे ठरवले. अजुन आम्ही गोरीपान मुलगीच्या शोधात आहोत.
माझ्या नवर्याचा मित्र तो ही र॑गाने काळा पण त्याने २ वर्ष गोर्या मुलीच्या शोधासाठी घालवली, तो सा॑गत होता, त्याच्या घरातील दोन तीन वेळा र॑गाने निम गोरा, गव्हाळ अशा मुली पाहुन आले पण मग ठरविले र॑ग गोरा असे पत्रिकेत लिहिले असेल तर मग फोन करुन त्या॑ना विचारायचे खरच गोरा की कागदावर लिहायण्या पुरता गोरा. त्याला र॑गाने गोरी बायको मिळाली, ती माझ्या कॉलेजची आणि कॉमन फ्रे॑ड मधली निघाली, मग तीला आम्ही तिच्या नवर्याच्या गोरा र॑गाच्या हट्टासा बद्दल सा॑गितले.
बरे मुला॑ना जशी गोरी बायको हवी तशी मुली॑ना देखिल गोरा कि॑वा निम गोरा र॑गचा नवरा हवा असतो, एखादीने जर सावळा मुलगा पस॑त केला तर तीला मैत्रिणी विचारतात का ग एवढी डार्क शेड निवडलीस, कि॑वा, काही समजुत घालतात असु दे र॑गात काय आहे स्वभावाने चा॑गला आहे ना, पैसा पाणी, घर दार व्यवस्थित आहे ना मग झाले. आणि ज्या विचारु शकत नाहीत त्या आपापसाथ बोलतात चाग॑ली नोकरी असेल, पैसेवाला आहे.
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा. आम्ही खुप हसलो.
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो.
प्रतिक्रिया
28 Apr 2008 - 12:28 am | भडकमकर मास्तर
यामुळेच फेअर अँड लव्हली इ.इ. भारतात मजबूत खपते...
शिवाय आता फेअर अँड लव्हली फॉर मेन सुद्धा जोरात खपते ...
( उपयोग होतो की नाही हा मुद्दा निराळाच )
28 Apr 2008 - 1:03 am | धनंजय
आजच दुकानात जाऊन फेअर अँड लव्हलीच्या डब्यावरचे घटक वाचले.
त्या घटकांपैकी कार्यशील एकच मला दिसला - तो म्हणजे सूर्याची अति-जांभळी (अल्ट्राव्हायोलेट) किरणे थांबवणारा पदार्थ. हा पदार्थ कातडीवर असला तर ती किरणे त्वचेच्या आतल्या पेशींपर्यंत पोचत नाहीत. या किरणांना प्रतिक्रिया म्हणून पेशी काळे द्रव "मेलानिन" निर्माण करतात. मलमामुळे ते द्रव तितके निर्माण होत नाही. अशा प्रकारे मलमाचा थर जोपर्यंत त्वचेवर आहे, तोवर त्वचा उन्हाने रापण्याचे प्रमाण थोडे कमी होते.
मात्र मलमाचा थर चेहर्यावर दिवसभर ठेवणे जवळजवळ अशक्य असते. त्वचेतून कळे-न-कळे सारखा घामाचा पाझर होत असतो, आणि तो आपल्याकडून पुसला जात असतो. त्यामुळे फासलेले मलम लवकरच पुसले जाते. मग त्वचा रापायची ती रापतेच.
28 Apr 2008 - 9:45 am | विसोबा खेचर
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा.
हा हा हा! कुकराचा दांडा बाकी मस्तच! :)
मला विचाराल तर (अजून लग्न व्हायचे आहे हो माझे!;) होणारी बायको ही काळी किंवा गोरी असण्यापेक्षा पाहताचक्षणीच मनात भरणे महत्वाचे! मग रंगाने ती कशीही असो...
एनीवेज, म्यारेज इज नॉट माय कप ऑफ टी! :)
तात्या.
28 Apr 2008 - 10:15 am | रामदास
थोडसं बदलू या.marriage is not my glass of drink.
28 Apr 2008 - 10:32 am | विसोबा खेचर
थोडसं बदलू या.marriage is not my glass of drink.
हरकत नाही!
Marriage is not my glass of GlenMoranjie..! :)
28 Apr 2008 - 10:58 am | विजुभाऊ
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो.
हर किसी को मुकम्मल जहांन नही मिलता...किसि को जमीन तो किसीको आसमांन नही मिलता.( प्रत्येकालाच परफेक्ट जग मिलते असए होत नाही कोणाला नुस्ते आकाश तर कोणाला नुस्ती जमीन मिळते)
चांद मिलता नही हर किसीको यहां है दिया ही सही रौशनी के लिये.
28 Apr 2008 - 11:39 am | धमाल मुलगा
झालं...
आज विजुभाऊंना 'उर्दु'र रोग जडलेला दिसतोय :>
आईशप्पथ....च्यायला ती काय साडी आहे का ब्लाऊजपीस? :)
अवांतरः आमच्या 'ही'ला पण असाच प्रश्न विचारत असावेत काय?
28 Apr 2008 - 2:50 pm | आनंदयात्री
>>तीला मैत्रिणी विचारतात का ग एवढी डार्क शेड निवडलीस
काय बॉ या पोरी ... नवरा म्हणजे काय लिपष्टीक का केसाचा रंग वाटला यांना .. निषेध - निषेध - निषेध !
28 Apr 2008 - 11:30 am | इनोबा म्हणे
पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा.
हा हा हा!
माझ्या मते(म्हंजी तूला आहे तर) रंगापेक्षा स्वभाव महत्वाचा.मन चांगलं हवं,रंगरुप काय आज आहे उद्या नाही.
(आजन्म अविवाहीत) निमगोरा इनोबा
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
28 Apr 2008 - 11:59 am | वेदश्री
माझी मावसआजी इत्तक्की सुंदर होती की तिला तुल्यबळ स्थळच मिळत नव्हतं. इत्तक्की प्रचंड गोरी, सुंदर, उंचेली, नाजूक, गृहकृत्यदक्ष, सुगरण, सालस वगैरे की विचारता सोय नाही ! त्याकाळात ती घोडनवरी झाली आणि तिच्या घरच्यांना सो कॉल्ड समाजाकडून बरंच काही सुनावलं गेलं आणि शेवटी तिचे लग्न माझ्या मावसआजोबांशी झाले. ते दिसायला एकदम ढुस्स काळे, उंचीलाही आजीपेक्षा कमीच.. आजोबा आजीहून उजवे असतील तर ते त्यांच्या स्वभावाच्या, ताकदीच्या आणि अक्कलहुशारीच्या बाबतीत. दिसण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका विजोड जोडा कुठला दुसरा नसेल पण असण्यावरच जायचे म्हटले तर त्या दोघांइतका यशस्वी जोडा दुसरा कुठला नसेल ! आजोबांनी लग्नात घेतलेला उखाणा मला आठवत नाहीये पण त्यात कोंबड्याला हिरकणी मिळाली असं ते म्हणाले होते म्हणे. दिसण्याचा इतरांनीच इतका बाऊ केला होता पण ते दोघे अगदी सुखाने मश्गुल होते एकमेकांत ! इतके जिंदादील जोडपे.. अशा दिग्गजांकडे पाहिलं की आजकालच्या सो कॉल्ड तरूणांच्या सौंदर्यकल्पनांबद्दल कीव येते.
28 Apr 2008 - 12:14 pm | चतुरंग
पण तरुणपणी ते जाणण्याची गुणग्राहकता आपल्यात असतेच असे नाही. आपण दिखाऊ गोष्टींनी भुलतो!
आणि निसर्गाचेही असेच काही गणित त्यामागे असावे जेणेकरुन हे असेच मुख्यत्वे होत राहील अन् पिढ्या मागून पिढ्या ह्या कोड्याची उकल करीत रहातील!
यदाकदाचित ती गुणग्राहकता पुढेमागे आलीच, तरी त्यावेळी का होईना त्याचा उपयोग करुन घेणं हे जमायला हवं.
सबब, निराश होऊ नका सगळे जग सुंदरच आहे फक्त ते तुम्हाला पाहता यायला हवे!
चतुरंग
28 Apr 2008 - 2:02 pm | मदनबाण
सुंदर जोडीदार कोणाला नको असतो? पण माझ्या मते तरी मनाचा समजुतदारपणा जास्त महत्वाचा आहे,,,,,नुसत दिसण्यावर जाण्यात काहीच अर्थ नाही !!!!!
दोघांचे स्वभाव जर खुप भिन्न असतील तर बायको माधुरी सारखी सुंदर असुन सुद्दा त्यांच एकमेकांशी पटणार नाही.....
(अजुनतरी अविवाहीत)
मदनबाण>>>>>
28 Apr 2008 - 2:13 pm | चेतन
एकदा आमच्या सरदार मास्तरनी प्रश्न विचारला होता.
You have two choices...
one to marry with a educated but ugly girl
Other to maary with a beautiful but uneducated girl
And his answer was second
Beautiful but uneducated girl
(uneducated girl can be made educated the other way is not possible)
('दिल' के साथ) डोक्यानी विचार करणारा सरदार. अर्थात मी पाहिलेला
~X(
सरदार (चेतन)
28 Apr 2008 - 2:17 pm | प्रभाकर पेठकर
शादी वो लड्डू है जो खाए वो पश्ताए, जो ना खाए वोभी पश्ताए.
कुठल्याही कोष्टकात पा।हून संसार सुखाचा होत नाही. रंग रूपावर काही अवलंबून नसते आणि स्वभाव कळे-कळेस्तोवर अर्ध आयुष्य उलटून गेले असते. परतीचे दोर केंव्हाच कापलेले असतात.
खर्या सुखाचा अर्थ मला उमजला, पण तो पर्यंत माझे लग्न झालेले होते.
28 Apr 2008 - 2:32 pm | धमाल मुलगा
क्या कही !!!!
वाह!!
:)) :)) तरी म्हणलं, काका अचानक असे गंभीर वगैरे कसे झाले?
28 Apr 2008 - 2:45 pm | धोंडोपंत
प्रत्येकाची आवड वेगवेगळी आहे. कुणाला गोरी बायको हवी असेल तर ती त्याची वैयक्तिक आवड आहे. त्यासाठी त्यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही.
कुणी म्हणेल की गोरीच बायको कशाला? सावळ्या मुली काय संसार नीट करीत नाहीत? :W
त्याचही उत्तर हेच आहे की वैयक्तिक आवड.
व्होडका पिणारा व्हिस्की का पीत नाही? आवड.... दुसरं काय?
बरं, दुसरी गोष्ट म्हणजे गोरी बायको केली तर ती संसार नीट करेलच याची खात्री नाही....
हे खरे आहे.
पण हेच विधान सावळ्या मुलीच्या बाबतीतही वापरता येईल.
तेव्हा कोणी काय करावे यावर आपण भाष्य न करणे चांगले. "लोकांना त्यांच्या "लायनीपरमान" जाऊ द्या"
आमचे वैयक्तिक मत विचाराल तर ............
शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही. विचार करायचा असेल तर मुलीच्या फिगरचा करावा, रंगाचा नाही.
पण हा सुद्धा प्रश्न ज्याचा त्याचा....
आपला,
(पर्यायसूचक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
28 Apr 2008 - 2:48 pm | प्रभाकर पेठकर
शरीरसुखाचा आणि काळे गोरे पणाचा काहीही संबंध नाही.
फक्त शरीरसुख हा लग्नाचा उद्देश होऊ शकत नाही. त्या साठी लग्नाची आवश्यकता देखिल नाही.
28 Apr 2008 - 2:55 pm | वेदश्री
>फक्त शरीरसुख हा लग्नाचा उद्देश होऊ शकत नाही. त्या साठी लग्नाची आवश्यकता देखिल नाही.
क्या डायलॉग मारा है ! एकदम खत्तरी.. जियो प्रभाकर(काका?) !
28 Apr 2008 - 2:58 pm | प्रभाकर पेठकर
(काका?)
होऽऽऽ चालेल.
28 Apr 2008 - 5:04 pm | विकि
हे चूकीचे आहे . बायको नुसती गोरी असून काय उपयोग . ती घरातल्यांशी कसे वागेल ,ती समजूतदार आहे का, भांडखोर ,आळशी,घमेंडी नाही ना हे पाहणे महत्वाचे. जे रंगाने गोरे नाहीत त्यांनी काय करायचे?
प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे.
कळावे
कॉ.विकि
28 Apr 2008 - 5:53 pm | शितल
>>>प्रत्येकाच्या नशिबात मधुबाला नसते, मग जी मिळेल तीच आपल्यासाठी मधुबाला असे मानुन स॑सार करावा लागतो. हे तुमच्यासारख्या स्रिने लिहावे आश्चर्य आहे.
कळावे >>>
विकी साहेब ,मी लेखात वरच लिहले आहे मी येथे फक्त सु॑दरता ह्या विषयी लिहले आणिआहे, मला इथे सा॑गायचे आहे की प्रत्येकाच्या मनात आपला साथीदार कसा असावा ह्याची चौकट असते बाह्यरुपाची (मनाचा था॑ग आपण जेव्हा त्या व्यक्तीच्या २४ तास जवळ राहतो तेव्हाच लागतो असे माझे व्ययक्तीक मत आहे) आपल्या मनाच्या चौकटीत परफेक्ट बसेल असा साथीदार कोणाला तरी मिळतो, पण ज्या॑ना मिळत नाही, त्या॑नी मनाला सजावुन त्या चौकटच्या जवळ पास बसण्यार्या व्यक्तीशी स॑सार करावा असेच सा॑गायचे आहे.
मधुबाला ही सै॑दर्याचा मानबि॑दु होती, पण प्रत्येकाला तशी सु॑दर बायको कशी काय मिळणार, म्हणुन मिळेल ते गोड मानुन घ्यावे एवढेच सा॑गायचे आहे.
28 Apr 2008 - 5:59 pm | जयवी
माझी काकु एका लग्नाला गेली लग्नाहुन आल्यावर आम्हाला सा॑गते पोर (नवरी मुलगी) काय नक्षत्रा सारखी होती, पण नवरा मुलगा म्हणजे कुकरचा दा॑डा.
सॉलिड :D
28 Apr 2008 - 6:18 pm | आंबोळी
कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम्
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना:
हेच खरे.
(कुठल्याही लग्नात मुला मुलीचे रंग न पहाता फक्त मिष्टान्ने चापणारा) आंबोळी