फिशपॉन्ड

शितल's picture
शितल in जे न देखे रवी...
27 Apr 2008 - 11:03 pm

कॉलेज मध्ये असताना आपल्यावर काही फिशपॉन्ड पडले असतील, तर काही आपण इतरा॑वर टाकले असतील, तर काही असेच आपल्या मित्र- मैत्रिणी॑वर पडले असतील तर ते आपण सा॑गु एकमेका॑ना.
आमच्या बस मधील इजि॑नीअरी॑ग॑ची मुले आमच्या कॉलेजच्या मुलीवर शायनि॑ग मारत असत, तर त्यातील एक मुलगा आमचा मित्र झाला तो सिव्हील साईडला होता, तो सा॑गत होता त्याच्या वर्गात काही पाहण्या सारख्या मुली नाहीत मग त्याने आम्हाला सा॑गितले त्याने फिशपॉन्ड डे ला त्याच्या वर्गातील मुलीवर हा फिशपॉन्ड टाकला.
आमच्या सिव्हील वाल्यानचे नशीबच फुटके आमच्या वर्गात आहेत दोन हत्ती आणि चार बदके.
आता दुसरा फिशपॉन्ड बद्दल, माझ्या बहिणीची मैत्रिण ती खुप छान दिसायची पण खुप खुप शायनि॑अग माराची , होती थोडी सुकडी पण छान छान ड्रेस घालायची. तीला फिशपॉन्ड पाडला होता,
पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट.

जीवनमानविरंगुळा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

28 Apr 2008 - 6:54 am | विसोबा खेचर

पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट.

हा हा हा! मस्त आहे हा फिशपॉन्ड! :)

आपला,
(मागूनपुढून भरलेला!) तात्या.

झंप्या's picture

28 Apr 2008 - 8:01 am | झंप्या

पुढुन सपाट मागुन सपाट हे तर आहे गोदरेजचे कपाट.

शितल ताई/दादा,
अतिशय घाणेरडा आणि अश्लिल वाटला हा फिशपाँड. प्रामाणिक मत राग नसावा.
-झंप्या

एक's picture

28 Apr 2008 - 10:01 am | एक

अहो हा तर फार नॉर्मल फिशपॉड आहे...

नशीब आमच्यावेळी या श्लील्-अश्लील संकल्पना आल्या नव्हत्या त्यामुळे खतरनाक फिशपॉड ऐकायला मिळाले..

मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात.
माझ्या एका मित्राला एका मुलीने दिला होता...

..."जिसको बनाना था लडकी उसको लडका बना दिया.."

पिवळा डांबिस's picture

28 Apr 2008 - 9:40 pm | पिवळा डांबिस

मुलींना सज्जन अजिबात सज्जन समजू नका. त्यापण भारी भारी लिहितात.
आम्ही कॉलेजात असतांना एका आउटगोइंग (चालू) मुलीला इतर मुलींनीच फिशपॉन्ड दिला होता....

"लेक लाडकी या घरची,
होणार सून मी दहा घरची"

आम्ही सर्व मुलं अवाक झालो होतो...
:))

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 10:33 am | धमाल मुलगा

घड्याळ घालतो ऑटोमॅटिक...
लाईन मारतो सिस्टिमॅटिक...

-(यत्ता शेकंड इयर, तुकडी अ) ध मा ल.

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 10:38 am | मनस्वी

इथे ओशाळला वजनकाटा..

स्वतःला समजते पूजा भट्ट
पण आहे फारच मठ्ठ.

विजुभाऊ's picture

28 Apr 2008 - 10:44 am | विजुभाऊ

आमच्या ग्रुप मधल्या दोघाना
खुळा आणि खुळा ...खुळखुळा...

एका मुलीला
बाजुने दिसते हेमा मालीनी
मागुन दिसते बिंदिया गोस्वामी
पुढुन मात्र चक्क रामदास स्वामी

आणि अस्मादिकाना
गुजर रहे थे वह जिस गली से.
गुजर रहे थे हम भी उसी गली से
फूल बरस रहे थे उनपर
फूल बरस रहे थे हमपर
मगर्...........
मगर वे थी डोलीमें
और
हम थे डोली उठाये कन्धोपें.
.......

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 11:01 am | आनंदयात्री

चंद्र वाढतो कलेकलेने
प्रसाद वाढतो किलो किलोने :)

(सध्या किलो किलो ने कमी होणारा) आंद्या

इनोबा म्हणे's picture

28 Apr 2008 - 11:13 am | इनोबा म्हणे

जबरा फिशपाँड आंद्या :))

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

डोमकावळा's picture

4 Jun 2008 - 5:18 pm | डोमकावळा

मलाही नेहेमी मिळणारा...
आंद्या... राव तू जुन्या आठवणींना उजाळा दिलास..

(स्वगतः आठवणींनी वजन वाढत तर नाही ना! :-/ )

इनोबा म्हणे's picture

28 Apr 2008 - 11:08 am | इनोबा म्हणे

एक जाड्या-रोड्याची जोडी होती. त्यांना सगळे 'एक हत्ती-दूसरा अगरबत्ती' म्हणायचे.(याला फिशपाँड म्हणतात काय वो?)

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

शरुबाबा's picture

28 Apr 2008 - 1:52 pm | शरुबाबा

मि नाहि त्यातलि कडि घाला आतलि

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 1:58 pm | धमाल मुलगा

अरे शरुबाबा...
मार खायचाय का तुला?

आयला, तीने झोडपलं नाही का तुम्हाला असं ऐकल्यावर?

आनंदयात्री's picture

28 Apr 2008 - 2:10 pm | आनंदयात्री

मि नाहि त्यातलि कडि घाला आतलि

तिच्यायला आज खर्राखराच वेडा झालो हसुन :)) :)) :)) :))
ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ... अन ठ्या करुन फु ट लो ... अक्षरश: फु ट लो ...

आमच्या शरुला कित्यांदा सांगितले बाबा कळफलक शिक रे ... अशे भयंकर विनोद होतात मग..

धमाल मुलगा's picture

28 Apr 2008 - 2:15 pm | धमाल मुलगा

ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले ...

च्यामायला, आज काय रे सगळेच बहिसटला आहात????

खत्तरा रे...अक्षरश: फु ट लो ...सालं आमचं कॉफी+स्क्रिन हे समीकरण काही केल्या तुटत नाहीये.

आंद्या हलकटा...ह्या गब्रुची (म्हणजे मी!) पार अब्रु गेली...डायरेक्ट खोब्रु..हे...आपलं...खोबरं झालं तुझ्यामुळं...
सगळे तिच्याआयला वळून वळून बघताहेत अजुनही माझ्या तोंडाकडं...

मदनबाण's picture

28 Apr 2008 - 2:17 pm | मदनबाण

ते कडि मि पहिल्यांदा काडी वाचले
मी सुद्दा असेच वाचले होते आणि मग..... =))

(नको तिथ किडा-कांडी करणारा) :D
मदनबाण

मनस्वी's picture

28 Apr 2008 - 2:02 pm | मनस्वी

समोरून आला म्हशींचा (/रेड्यांचा) घोळका
त्यातल्या शरुबाबांना ओळखा!

(हघ्या.)

शरुबाबा's picture

28 Apr 2008 - 2:08 pm | शरुबाबा

समोरून आला म्हशींचा (/रेड्यांचा) घोळका
त्यातल्या शरुबाबांना ओळखा!

धमाल मुलगा
का रे बाबा उत्तर मिळाले कि नाहि , अशिच प्रतिक्रिया मिळालि होति

ब्रिटिश टिंग्या's picture

28 Apr 2008 - 2:16 pm | ब्रिटिश टिंग्या

अभियांत्रिकीला प्रथम वर्षाचे इंजिनीयरींग ग्राफिक्स शिकवणारे मास्तर लई म्हणजे लईच काटकुळे होते.....त्यांच्यावर पडलेला फिशपाँड -

फ्रंटव्ह्युवमध्ये लाईन,
टॉपव्ह्युवमध्ये पॉइंट!

- टिंग्या ;)

सुधीर कांदळकर's picture

28 Apr 2008 - 7:26 pm | सुधीर कांदळकर

प्रा. रा. वि. सोवनी वार्षिक सोहळ्यात अतिशय आकर्षक रीतीने फिशपाँड वाचत. त्यामुळे पोरांना ऊत येई व एका पेक्षा एक सरस फिशपाँड देत. त्यापैकी कांही असे:

१. आर्ट्समधील चार मुलींच्या एका टोळीला. या सतत एकत्रच असत:
लहान माझी बाहुली .
मोठी तिची सावली
नकटे नाक उडविते
घारे डोळे फिरविते.

२. एका अनाकर्षक मुलीला (त्या गाण्याच्याच चालीवर):
चांदसा मुखडा
यूं शरमाया.
अरे हट
तुझे एप्रिल फूल बनाया.

सुधीर कांदळकर.

शरुबाबा's picture

28 Apr 2008 - 7:44 pm | शरुबाबा

मी बाई संतीन माझ्या मागे दोन तीन

पुष्कर's picture

28 Apr 2008 - 7:43 pm | पुष्कर

इंजिनियरिंगच्या इयत्ता दुसरी मध्ये (SE) असताना एका काटकुळ्या 'अजिंक्य' वर फिशपाँड हा असा पडला:- एका हाफ इंपिरियल शीट वर वारली चित्रकलेप्रमाणे (नुस्त्या रेषांचं) एका मुलाचं चित्र काढलेलं. त्याखाली मोठ्या अक्षरात "अजिंक्य" असं नाव लिहिलेलं आणि खाली तळटीप लिहिलेली - "All Dimensions are in mm"

केशवराव's picture

28 Apr 2008 - 10:57 pm | केशवराव

आमच्या वेळेस [१९६९] एका चालू मूलीला पडलेला. . . . . . . [ आमच्या वेळेसही चालू मूली असायच्या.]
' दिल एक मंदिर है.... मगर उसमे एक उंदिर है .'

झकासराव's picture

29 Apr 2008 - 7:37 am | झकासराव

जाड्या मुलीला
जा मुली जा दिल्या घरी सुखी रहा
दरवाज्यातुन नाही गेलीस तर भिंत तोडून आता जा. :)
जाड्या मुलाला
अरे मित्रा कोण म्हणत की तु खड्ड्यात पडलास
अरे तु पडलास म्हणुन तर खड्डा पडला :)

बाकी वरचे सगळे खल्लास आहेतच पण तो टायपिन्ग मिष्टेक चा जोक =))

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 11:00 am | धमाल मुलगा

एक शिष्ट मुलगी होती... तीला

ही ज्या घरात जाईल त्या घराचा स्वर्ग करेल......
आणि घरातले......स्वर्गवासी!!!!

कै च्या कै च आहे नै? पण तरीही ती जाम उचकली होती..:)

धोंडोपंत's picture

29 Apr 2008 - 12:17 pm | धोंडोपंत

आमच्या महाविद्यालयातील एका अती "लोकप्रिय" मुलीला मिळालेले फिशपॊंड असे

एक ना धड भाराभर चिंध्या

एक दुजे के लिए, लेकिन सिर्फ घुमने के लिए.

एका अविवाहित प्राध्यापक बाईंना ---

दिसामागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू
जिवलगा कधी रे येशील तू?

आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

विजुभाऊ's picture

29 Apr 2008 - 12:22 pm | विजुभाऊ

धोंडोपन्त
जिवलगा कधी रे येशील तू? या ओळी खाली लगेचच असलेल्या
आम्हाला येथे भेट द्या
याचा अर्थ काय घ्यायचा लोकानी

अनिल हटेला's picture

29 Apr 2008 - 12:52 pm | अनिल हटेला


कॉलेज कस पन्ढरी जस,
शिक्शक कशे विटठल रुख्माई जशे,
कॉलेज च्या मुली कश्या ,
इन्द्रायनी च्या मासोळ्या जश्या,
कॉलेज ची मुले कशी,
त्या वर टपलेली बगळी जशी!!!!

झकासराव's picture

29 Apr 2008 - 1:32 pm | झकासराव

कोण म्हणतं की मी फॅशन करते
अहो मी तर माझ्या भावाचे कपडे अल्टर करुन घालते :)

गणपा's picture

29 Apr 2008 - 4:30 pm | गणपा

काय बाई सांगू, कशी ग सांगू
काय बाई सांगू, कशी ग सांगू
मलाच माझी वाटे लाज ,
वजनाचा काटा तुट्लाय आज.

(गबदुल) गणपा.

धमाल मुलगा's picture

29 Apr 2008 - 4:34 pm | धमाल मुलगा

गणप्या....
जबरान् रे....

=))
लय दिवसांनी वाचला हा फिशपाँड !!!!

ठणठणपाळ's picture

30 Apr 2008 - 5:12 pm | ठणठणपाळ

अशाच एका गुट्गुटीत मुलीसाठी :
दूरसे देखा तो कश्मिर की कली
पास जाके देखा तो जय बजरंग बली

धमाल मुलगा's picture

30 Apr 2008 - 5:17 pm | धमाल मुलगा

हाण तिच्याआयला......
=))

दुसरे वाक्य शोधा!!!!!

सत्या's picture

2 May 2008 - 11:53 am | सत्या

स॑डास मालकाच,
रुबाब भ॑ग्याचा.

धमाल मुलगा's picture

2 May 2008 - 12:29 pm | धमाल मुलगा

ती आली,
तीने पाहिलं..
ती हसली.....
बाब्बो...मी पळूनच गेलो!!!!

प्राजु's picture

2 May 2008 - 4:50 pm | प्राजु

१. प्राजक्ता गेली करायला रक्तदान, डॉक्टर म्हणाले बाटली नको चमचा आण.

आणि दुसरा म्हणजे धमालने जसे माझे वर्णन केले "बडबडी.. नॉनस्टॉप".. तसाच.. तो होता मला आणि माझ्यासारख्याच एका मैत्रीणीला..
२. "किर्कोळ गप्पांचे ठोक व्यापारी: प्राजक्ता आणि कविता.."
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

इनोबा म्हणे's picture

2 May 2008 - 9:21 pm | इनोबा म्हणे

प्राजक्ता आणि कविता..
इथेही कविता आहेच का?

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे

पार्टनर's picture

4 Jun 2008 - 9:31 am | पार्टनर

दोन आठवड्यात एकदा दाढी करणार्‍या आमच्या सिव्हिलच्या(प्रेमळ) मास्तरांना
मी हा फिशपॉन्ड टाकलेला :

बंगला बांधीन म्हणतो
गाडी घेईन म्हणतो
कोणी दोन रूपये द्या रे
दाढीही करीन म्हणतो :D

१.५ शहाणा's picture

4 Jun 2008 - 10:22 am | १.५ शहाणा

माझ्या काटकुळ्या मित्राला पड्लेला
काण म्हणतय मी चालतोय मी तर वार्‍याने हलतोय

१.५ शहाणा's picture

4 Jun 2008 - 4:03 pm | १.५ शहाणा

माझ्या एका ढापणी जाड भिंगाचा चष्मा घालणार्‍या मैत्रिणी ला पडलेला फिशपॉन्ड

चष्मा घातल्यावर मुले बघत नाहीत
चष्मा काढल्यावर मुले दिसत नाहीत

जो सगळ्यांत लुडबुड करायचा त्याला....
घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो....

- डोम :D

शितल's picture

4 Jun 2008 - 6:00 pm | शितल

>>>घेतो न देतो, अन् फुकटचे कंदील लावतो....
ओ, हा मुलगा आ॑बोळी तर नसावा ना ?
नाही क॑दील म्हट॑ल तर काळोखात उजेड दाखवणार हे विसरून फक्त दुसर्‍याची बत्ती गुल करायचाच आ॑बोळीचा क॑दील आठवतो.

डोमकावळा's picture

4 Jun 2008 - 6:49 pm | डोमकावळा

असेलही...
कारण बहुतेक सगळेच थोड्याफार प्रमाणात फुकटचे कंदील लावतात... :D

काय म्हणता?

- डोम कंदीलवाला...

छोटा डॉन's picture

4 Jun 2008 - 9:54 pm | छोटा डॉन

ही एक "कोकणी म्हण" आहे ...

"तुला नाय देणं, मला नाय घेणं ...
मग कशाला उगाच रातीच कंदिल लाऊन येणं ?"

"श्लिल व अश्लिल" च्या मर्यादा "येवढा डाव" माफ करा ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

डोमकावळा's picture

5 Jun 2008 - 8:37 am | डोमकावळा

बहूतेक तो टाकणारा कोकणी असेल...

पन डान राव तुमी काइबी म्हना, टाइमाला ह्यो डाईलॉग लई भारी ...
पार नाकातल केसं जाळतय बोल्ल्या वर...
;)
काय म्हन्ता?

अनिवासी चन्द्रपूरकर's picture

5 Jun 2008 - 1:31 am | अनिवासी चन्द्रपूरकर

हा आमच्या कॉलेजात सर्वात देखण्या मुलीवर पडलेला फिशपॉन्ड....

स्वत: ला समजते कॉलेजची परी,
तुझ्यापेक्षा तर आमची मोलकरीन बरी...

रविराज's picture

5 Jun 2008 - 10:11 am | रविराज

माझ्या क्लास मधल्या टॉपर ला...

मौजमस्ती करायला आमची काही ना नाही
पण अभ्यासा शिवाय दुसरे काही येतच नाही!