सावधानः महत्वाची सूचना

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
28 Dec 2010 - 1:11 pm

मित्रानो
आज मला माझ्या जीमेल अकाउन्टवर एच डी एफ सी ब्यान्केकडून एक ईमेल आले
त्यातील मजकूर खालील प्रमाणे
त्या मेल चे शीर्षक होते HDFC Third Party error code HDFC442190X!!

पाठवणाराचा पत्ता होता HDFC Customer Care
एच डीफची ब्यान्केचा लोगो इमेज पटकन आली नाही. त्या ऐवजी इमेज नॉट डिस्प्लेड असे दिसत होते.
त्या इमेज वर शि पिक्चर केल्यानन्तर देखील बरेच वेळ चित्र दिसले नाही.
इमेल मधील मजकूर खालील प्रमाणे
Security Alert:

Dear Valued Customer

Your Account has generated an error due to a recent mix up of the security question in our server.

As an additional security measure, you are required to follow the security link below to avoid such occurence in the future, you must fill in the correct questions and answers as was filled previously

THIS IS FOR THIRD PARTY TRANSFER ENABLED ACCOUNTS ONLY

You can now enjoy flexibility and more secured transactions.

Please follow the link below to resolve this issue::
या खाली एक लिंक दिली होती त्याचे रंग वेगळे होते
Click here to Re-confirm your online account

Thank You.
आणि खाली बारीक अक्षरात तळटीप होती

Accounts Management As outlined in our User Agreement, HDFC В® will
periodically send you information about site changes and enhancements.
Visit our Privacy Policy and User Agreement if you have any questions.

त्यानी दिलेल्या लिंक च्या प्रॉपर्टीज मात्र वेगळ्या आहेत. त्या तुम्हाला
http://skill-dev.007gb.com/800008.php या साईटवर घेऊन जातात
( कृपया या लिंकवर कोणी क्लीक करू नका)

अशा प्रकारचे कोणतेही इमेल तुम्हाला कोणत्याही बॅन्केकडून आल्यास तुम्ही तेथे कोणतीही माहिती देवू नका.
तुम्हाला असे काही इमेल आल्यास ब्यान्केला कळवा. तसेच तुमच्या मित्राना याबात सावध करा
http://www.hdfcbank.com/aboutus/security/phishing.htm
एच डी एफ सी ब्यान्केच्या या साईटवर अशा प्रकारच्या काही फिशिंग इमेल प्रकारची माहिती दिलेली आहे

समाजमदत

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

28 Dec 2010 - 1:12 pm | पर्नल नेने मराठे

आम्ही तर बबा अ‍ॅक्सिसवाले आहोत ;)

टारझन's picture

28 Dec 2010 - 1:20 pm | टारझन

एक नंबर ची भंगार बँक आहे अ‍ॅक्सीस. माझं एन.ई.एफ्.टी . बंद केलं .. का तर म्हणे ३ महिने युज नाही केलं . चालु करायचं असेल तर ब्रांच ला येऊन फॉर्म भरा.
माझं कार्ड हरवलं , री-इश्यु करा म्हंटलं तर म्हणे ब्रांच ला येऊन फॉर्म भरा. ...
एक नंबरची भिकारचोट आणि भंगार ब्यांक आहे ... ब्यांक बदल चुचे .. नाही तर मी बोलणार नाही तुझ्याशी

पर्नल नेने मराठे's picture

28 Dec 2010 - 1:25 pm | पर्नल नेने मराठे

एक नंबरची भिकारचोट आणि भंगार ब्यांक आहे ... ब्यांक बदल चुचे .. नाही तर मी बोलणार नाही तुझ्याशी

=)) =)) =)) हसुन मर्तेय

कच्ची कैरी's picture

28 Dec 2010 - 2:56 pm | कच्ची कैरी

टारझनचा प्रतिसाद वाचुन हसुन हसुन पूरेवाट लागली माझी ,पोट दुखायला लागले .

सहज's picture

29 Dec 2010 - 10:28 am | सहज

एक्सीस बँकेला पहीला क्रमांक मिळाला की. चुचुची निवड चुकायची नाही. ललिताजीं (सर्फ पावडर वाल्या) नंतर खरीदारी मधे इतकी समजदारी दाखवणार्‍या चुचुजी च :-)

The BT-KPMG study ranks Axix Bank as the best bank in India based on the 26 pre-determined parameters.

अ‍ॅक्सिस बँक फक्त ज्यांचे पोट खराब आहे किंबहुना जुलाबावर बसलेले आहेत , अशा लोकांसाठी घरी येते , अशी त्यांची जाहिरात सांगते.
आमचा अनुभव वाईट. त्यांचं इंटरनेट बँकिंग पण थर्डक्लास आहे. मी त्यांच्या बँक मॅनेजर ला गेल्या महिन्यात एक पत्र लिहीले. त्यात मी त्यांना खुप खडे बोल सुनावले. त्यांच्या इंटरनेट बँकींग मधे चेक बुक रिक्वेस्ट सारखी बेसिक फंक्शनॅलिटी नाही म्हणजे कमालंच की नाही. मग मी सरळ सरळ पत्रात लिहीलंच तसं . म्हंटलं हे पहा मोहोदय , अशी फडतुस बँकिंग करणार असाल तर मी आणि चुचु खाते बंद करुन टाकु . तेंव्हा कुठे त्यांनी ह्या प्रकरण (१५० वे (ड) ) ची दखल घेतलीन इंटरनेट बँकिंग साईट अपडेट करुन त्यात चेकबुक रिक्वेस्ट सह स्पेषल सुविधा रिव्केस्ट सुद्धा अ‍ॅड केल्या.

- (पत्र लेखक) सुमार मारे

विजुभाऊ's picture

28 Dec 2010 - 1:14 pm | विजुभाऊ

त्यानी दिलेल्या लिंक च्या प्रॉपर्टीज मात्र वेगळ्या आहेत. त्या तुम्हाला
http://skill-dev.007gb.com/800008.php या साईटवर घेऊन जातात
( कृपया या लिंकवर कोणी क्लीक करू नका , तिथे कोणतीही माहिती भरु नका)

THIS IS FOR THIRD PARTY TRANSFER ENABLED ACCOUNTS ONLY

हे वाक्य बरेच काही सांगून जाते.

आम्ही साधी माणसे आहोत. राष्ट्रियकृत बॅंकेचे ग्राहक.

जाता जाता- सध्या आयकर विभागाच्या नावे इमेल येत आहेत काहींना. रिर्टनचे पैसे जमा करण्यासाठी बँक अकांउट नं. मागतात. या इमेलना सुद्धा रिप्ल्याय देउ नका.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2010 - 1:15 pm | परिकथेतील राजकुमार

विजुभौ अहो नेट बँकिंग करणार्‍यांनी सगळ्यात आधी http:// आणि https:// मधला फरक समजुन घ्यायला पाहिजे ;)

पर्नल नेने मराठे's picture

28 Dec 2010 - 1:28 pm | पर्नल नेने मराठे

सविस्तत सान्ग जरा... आम्हा non-It/non-SW वाल्यांना मदतच होइल.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2010 - 1:30 pm | परिकथेतील राजकुमार

विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले जातील ;)

परुत्सु

पर्नल नेने मराठे's picture

28 Dec 2010 - 1:42 pm | पर्नल नेने मराठे

हा काहिच विसरत नाहि =)) =))

दिपक's picture

28 Dec 2010 - 1:43 pm | दिपक

विशिष्ठ सेवांसाठी पैसे आकारले जातील

चुचुने आधीच सांगितले आहे स्वस्तात सांग जरा म्हणुन (सविस्तत सान्ग जरा). :-)

दिपक's picture

28 Dec 2010 - 1:47 pm | दिपक

सुरक्षित (Security Certificate) असलेल्या वेबसाइटवर URL च्या आधी https असे असते. http - hyper text transfer protocol -एखाद्या वेबसाइटची जोडणी आणि ती उघडून वाचता येण्यासाठीची यंत्रणा म्हणजे http आणि या यंत्रणेची सुरक्षितता म्हणजे त्यापुढील s होय.

नाते बॅंकिंगशी

विजुभाऊ's picture

28 Dec 2010 - 1:18 pm | विजुभाऊ

अशा प्रकारची इमेल्स स्टेटब्यान्के संदर्भात आल्याची उदाहरणे आहेत.
राष्ट्रीयकृत ब्यान्क असेल तरीदेखील खबरदारी बाळगा

ऋषिकेश's picture

28 Dec 2010 - 2:15 pm | ऋषिकेश

फिशिंग फार कॉमन असले आणि त्याबाबत घ्यावयाची काळजी घेतली की ऑनलाईन बँकीय ही अप्रतिम सोय आहे. वरील धाग्याचा उद्देश जरी धोक्याची सुचना देणे असला तरी अशी सुचना मिळाल्यावर अनेकजण ह्या सुविधेकडे पूर्ण पाठ फिरवतात. (विषेशतः मध्यमवयीन अथवा जेष्ठ नागरीक) प्रत्यक्षात ह्याच गटाने बँकेत हेलपाटे वाचवू शकणारी ही सुविधा नीट समजून, सावधानतेने वापरावी असे मला वाटते.

तुम्ही ब्यांकेतून जितकी कॅश काढता तितका 'काळा पैसा' वाढतो हे लक्षात असु द्या!

तुम्ही ब्यांकेतून जितकी कॅश काढता तितका 'काळा पैसा' वाढतो हे लक्षात असु द्या!

यावर अधिक प्रकाश टाका !

५० फक्त's picture

28 Dec 2010 - 4:29 pm | ५० फक्त

म्हणजे
१. सगळी कॅश ही काळा पॅसा असते
२. सगळा काळा पॅसा हा कॅश असतो
असं म्हणायचं आहे का तुम्हाला.

अहो मग मी ऑफिसातुन घरी जाताना ज्या शेंगा खात जातो, पोराला फुगा, बायकोला गजरा आणि आईला पुजेसाठी फुलं नेतो हे सगळं काय काळ्या पॅशानी घेतो का ?

या बद्दल थोडं समजावुन सांगाल का.

ऋषिकेश's picture

29 Dec 2010 - 12:19 pm | ऋषिकेश

म्हणजे
१. सगळी कॅश ही काळा पॅसा असते
२. सगळा काळा पॅसा हा कॅश असतो
असं म्हणायचं आहे का तुम्हाला.

नाही असे दोन्ही म्हणायचे नव्हते. कॅश काढणे म्हणजे काळा पैसा वाढण्याची शक्यता निर्माण करणे. तुम्ही कॅशमधे केलेले व्यवहार हे सरकार दरबारी रेकॉर्ड होतातच असे नाही.

अहो मग मी ऑफिसातुन घरी जाताना ज्या शेंगा खात जातो, पोराला फुगा, बायकोला गजरा आणि आईला पुजेसाठी फुलं नेतो हे सगळं काय काळ्या पॅशानी घेतो का ?

तुम्ही कदाचित काळ्यापैशाने घेत नसाल, मात्र इथे तुम्ही वर म्हटलेल्या गोष्टींचा विक्रेता पावती देत नसेल व मिळालेली मिळकत जर घोषित करत नसेल किंवा बँकेतही ठेवत नसेल (म्हणजे ती रक्कम त्याच्याकडे आहे हे सरकारला (पक्षी कोणालाही) माहित असण्याची सोय नसेल) तर तुम्ही दिलेल्या पैशाचे रुपांतर काळ्या पैशांत होते. मात्र एखादा व्यवहार तुम्ही कॅशने केलात व रितसर पक्की पावती घेतलीत तरी ते पुरेसे आहे.

अर्थात हे मत माझ्या तोकड्या ज्ञानावर आधारीत आहे. तज्ञ (अवलियांसारखे अनेक मिपाकर) यात भर/बदल सुचवु शकतातच

भारतीय अर्थव्यवस्थेत २०% पैसा काळापैसा आहे असे ऑफीशियल आकडे सांगतात तर तज्ञांच्या मते हा आकडा ५०% पर्यंत आहे (संदर्भ)

चिंतामणी's picture

28 Dec 2010 - 7:46 pm | चिंतामणी

वरील धाग्याचा उद्देश जरी धोक्याची सुचना देणे असला तरी अशी सुचना मिळाल्यावर अनेकजण ह्या सुविधेकडे पूर्ण पाठ फिरवतात. (विषेशतः मध्यमवयीन अथवा जेष्ठ नागरीक) प्रत्यक्षात ह्याच गटाने बँकेत हेलपाटे वाचवू शकणारी ही सुविधा नीट समजून, सावधानतेने वापरावी असे मला वाटते.

मध्यमवयीन आणि जेष्ठ नागरीक कोणाला म्हणले????????? डिटेल्स द्या.:-O

;)

मस्त कलंदर's picture

28 Dec 2010 - 2:38 pm | मस्त कलंदर

आता फक्त http आणि https वर विसंबून चालत नाही. आजकाल सुरक्षित वेब साईटचा अ‍ॅड्रेसबारही हिरवा असतो. खर्‍या व खोट्या वेबसाईटमधला फरक कळण्यासाठी इथे एक क्विझ आहे.
http://www.phish-no-phish.com

बर्‍याच सर्वसाधारणपणे माहित नसलेल्या टिप्स इथे दिल्या आहेत. त्यावरून फिशिंग साईट ओळखता येईल

स्वानन्द's picture

28 Dec 2010 - 2:45 pm | स्वानन्द

धन्यवाद म.क. आणी विजूभाऊ.

परिकथेतील राजकुमार's picture

28 Dec 2010 - 2:51 pm | परिकथेतील राजकुमार

आता फक्त http आणि https वर विसंबून चालत नाही. आजकाल सुरक्षित वेब साईटचा अ‍ॅड्रेसबारही हिरवा असतो.

मकाई सगळेच ब्राउजर्सची अपडेट व्हर्जन वापरत असतात किंवा सिक्युरीटी अपडेट घेत असतात असे नाही :) त्यांना कधी हिरवेपणा लक्षात यायचा ?

शहराजाद's picture

28 Dec 2010 - 11:59 pm | शहराजाद

असाच काहीसा अनुभव मला नुकताच आला.
बँक ऑफ अमेरिका च्या नावे मला एक इ-मेल मिळाली, '.......सुरक्षेसाठी आपले खाते तात्पुरते गोठवण्यात आले आहे. ते पुन्हा चालू करण्यासाठी खालिल लिंक्वर क्लिक करा. ' आता हे खातं मी दोन वर्षांपूर्वी बंद केलेलं आहे. बँकेच्या कस्टमर सर्व्हिस्ला फोन केल्यावर कळ्ले की असा कुठलाच संदेश पाठवल्याची त्याच्याकडे नोंद नव्हती. हा बँकेच्या रेकॉर्डमधला गोंधळ की कोणाचा फिशिंग चा प्रयत्न कोण जाणे. मी नेहमीच अशा कुठल्या इ-मेल मधल्या लिंकवर क्लिक न करता त्या कंपनीच्या माझ्याजवळच्या फोन / वेब साइट्चा वापर करते.