स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

अमोल देशमुख's picture
अमोल देशमुख in जनातलं, मनातलं
24 Dec 2010 - 4:41 pm

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते, गेल्या हजार वर्षात असा राजा झाला नाही, पुढे होणार नाही, त्यांच्या गुरुविषयी आपण का बोलावे, त्यांचे व्य्क्तीमत्वच ईतके उत्तुंग होते की आपले विचारही त्यां उंचीर्यंत पोहोचत नाहीत, मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल, महाराष्ट्रातले काही लोक म्हणतात हे त्यांचे गुरु होते, काहींचे म्हणने आहे ते नाही हे होते, उगाच वाद वाढतो आहे, त्या वादाचे आता राजकारण होत आहे.

बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ? मग हा वाद कशासाठी, या वादचा मुळ उद्देश काय ? सामान्य माणसाच्या जीवनात याने काय फरक पडेल ? या वादाला वैचारीक क्रांती म्हणायचे का ? हा वाद घालणारे लोक म्हणतात की मागील ३०० वर्षापासुन महाराष्ट्रातील जनतेला हा खोटा इतिहास शिकवला जातो आहे, आणि हा खोटा इतिहास आम्हाला मान्य नाही आम्ही तो बदलणार , जे मान्य नाही ते जरुर बदलावे परंतु महाराजांनी शेकडो वर्षापासुन मुघल राजवटीत पिचलेल्या महाराष्ट्रातील जनतेला स्वराज्याची पहाट दाखवली, चारही बाजुंनी मुस्लीम राजवटी होत्या त्यामध्ये महाराष्ट्रातील जनता हालअपेष्टा भोगत होती, त्यातुन महाराजांनी जनतेची सुटका केली, स्वराज्याची बांधणी करीत असताना अनेक युध्दाचे प्रसंग आले, महाराजांनी प्रतापगडावर अफजलखानाचा कोथाळा बाहेर काढला, लालमहालात शाहीस्तेखानाची बोटे कापली वगैरे प्रसंग तरी तसेच राहु द्यावेत कारण त्यात महाराष्ट्राच्या मर्दमुकीचा इतीहास आहे, गर्वाने प्रत्येस महाराष्ट्रीय माणसाची छाती अभिमानाने फुलुन यावी असे हे प्रसंग आहेत, दहशतवादाचा मुकाबला कसा करायचा याचा हा इतिहास आहे, हे तरी आपणास मान्य असेल तर हे बदलु नका ,अफजलखानाचा धडा अभ्यासक्रमात राहु द्या.

महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे परंतु जातीजातीत भांडणे लावुन देण्यासाठी अशा वादांना हवा दिली जाते आहे. मात्र सरकारमधील नेत्यांनी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवुन त्यांना गुरु मानावे म्हणजे तरी ते चांगला राज्यकारभार चालवु शकतील , दहशतवादाशी समर्थपणे मुकाबला करु शकतील. एवढे मात्र नक्की की विचार हे असे भुत आहे की टाळकी फोडली, मेंदु बाहेर आला तरी ते जात नाहीत कारण जे विचार त्या टाळक्यात घुसायला ३०० वर्षे लागली ते विचार ईतक्या सहजासगजी बाहेर निघतील असे समजने म्हणजे तो विनोद होईल मात्र महाराष्ट्रालाच काय संपुर्ण भारताला छ्त्रपती शिवाजी महाराजांसारख्या राजकीय गुरुची खरी गरज आहे येवढे निश्चीत मग महाराज खरच इतके थोर होते त्यांचे गुरु कोणी का असेना जर ते असतील तर किती थोर असतील ?.

-----------------------------------------------------------------
महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे.
अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे.
- संपादक मंडळ

-------------------------------------------------------------------

इतिहासमत

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 4:44 pm | परिकथेतील राजकुमार

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती, ते एक स्वयंभू व्यक्तिमत्व होते

अगदी अगदी.

ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा.

काय बोल्ता ?

सुहास..'s picture

24 Dec 2010 - 6:05 pm | सुहास..

ह्या विचारांचा आदर ठेवुन हातासरशी इतरही पुतळे काढून लालमहालात फक्त महाराजांचाच पुतळा ठेवावा. >>
हा हा हा !!पर्‍या अजुन दादोंजीच्या पुतळ्याची 'व्यवस्था ' कुठे करणार हे चर्चीले गेले नाहीये .

धाग्याबद्दल : उद्या म्हणाल त्यांच्या पत्रीकेतदेखील गुरु नव्हता.

स्पा's picture

24 Dec 2010 - 4:46 pm | स्पा

चान चान

यकु's picture

24 Dec 2010 - 4:47 pm | यकु

मग हे चर्चेचे गु-हाळ कशासाठी ही चर्चा केल्याने काय होईल,

हे लिहीत अस्तानाही तुम्हाला तुमचा हात आवरावा वाटला नाही ;-)
कमाल आहे बुवा..

गोब्राम्हणप्रतिपालक, सिंहासनाधिश्वर, राजाधिराज शिवछत्रपती महाराजांना खरे पाहता गुरुची गरजच नव्हती

शिवाजीराजांनी उभ्या आयुष्यात कोणत्याही एकाच जातीचा कैवार घेतल्याचे आढळले नाही. मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 5:04 pm | परिकथेतील राजकुमार

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी? महाराज इतरांचे प्रतिपालक नव्हते का?

'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....

'इतर' सुद्धा स्वयंभु असतील. त्यांना प्रतिपालकाची गरजच न्हवती....

म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 5:09 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणजे? स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का? यात इतर म्हणजे कोण आले? शिवाजीमहाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या, त्यांची आवडती घोडी कृष्णा याचे प्रतिपालक कोण होते? शिवाजीमहाराजांची लाडकी गाय असल्याचे कुठे वाचले नाही.

गो आणि ब्राम्हण (यांना आदराने बामण असे देखील म्हणले जाते) हे सोडून उरतील ते सगळे 'इतर' ह्या सदरात मोडतात.

स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का

हाही एक प्रश्न विचारला होता. ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 5:19 pm | परिकथेतील राजकुमार

स्वयंभू असणे आणि प्रतिपालकाची गरज असणे याचा काही संबंध आहे का

स्वयंभूंना कशाचीच गरज नसते. मग ते गुरु असो वा प्रतिपालक. (हा अर्थ आम्ही वरिल लेखातुन प्राप्त केला आहे.)

ब्राम्हण सोडून इतर जाती स्वयंभू कशा? गाय सोडून इतर प्राणी स्वयंभू कसे? हे स्वयंभू संशोधन तुमचे आहे की तुम्ही इतरत्र कुठे वाचले आहे?

आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत. तुम्ही लेख निट वाचला नसावा किंवा हा महान लेख तुमच्या आकलनाबाहेर असावा.

अनेक रहस्ये उलगडून दाखवणार हा लेख म्हणजे जणु ज्ञानेश्वरीच आहे. जितकी वाचावी तेवढे नवे नवे कळत जाते.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:24 pm | आजानुकर्ण

आम्ही तुम्हाला वरच सांगीतले आहे की ब्राम्हण व गाय सोडुन इतर सर्व स्वयंभू आहेत

म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय?

मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल.

हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 5:27 pm | परिकथेतील राजकुमार

म्हणजे? तुम्ही काही निराधार थापा मारल्या तरी त्या खऱ्या मानायच्या काय?

मी विचारले आहे की हे सर्व संशोधन तुमचे आहे की तुम्ही एखाद्या विश्वासार्ह ग्रंथात असे वाचन केले आहे? जर तुमचे स्वतःचे संशोधन असल्यास त्याकडे दुर्लक्ष करता येईल.

हा लेख आणि तुमचे प्रतिसाद आकलनशक्तीच्या बाहेर असल्यानेच ते समजून घेण्यासाठी मी प्रश्न विचारत आहे.

मी पुन्हा पुन्हा सांगतोय की हे सर्व ज्ञान आम्हाला सदर लेखातुनच मिळाले आहे. आपण लेख तर सोडाच पण माझे प्रतिसाद देखील निट वाचत नाही असे दिसते.

असो...

तुम्हाला एका गुरुची गरज आहे.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:31 pm | आजानुकर्ण

सदर लेखातून जर तुम्हाला ज्ञान मिळत असेल तर माफ करा. मला या लेखात तसे काही आढळले नाही.

तुमचे प्रतिसाद नीट वाचूनच त्यात पुरेसे स्पष्टीकरण नसल्याने मी काही शंका विचारल्या होत्या. त्यांची समाधानकारक उत्तरे देणे तुम्हाला शक्य नाही असे दिसते.

तुम्हाला एका गुरुची गरज आहे.

हा वदतोव्याघात वाटतो. तुमच्या गृहीतकानुसार सर्व अब्राम्हण स्वयंभू आहेत. मी ब्राम्हण नाही त्यामुळे मला गुरूची गरज नसावी. मात्र तुम्ही मला गुरूची गरज असल्याचे प्रतिपादन करत आहात. त्यामुळे तुमच्या मूळ गृहीतकात किंवा वरील निष्कर्षात काहीतरी गफलत झाली असावी असे वाटते.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Dec 2010 - 5:36 pm | परिकथेतील राजकुमार

चालू द्या....

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:14 pm | llपुण्याचे पेशवेll

शिवाजी महाराजांचा लाडका कुत्रा वाघ्या कधी होता बरे? आमच्या माहीतीनुसार बडोद्याचे तुकोजीराव होळकर यांचा कुत्रा होता वाघ्या. स्मारक निधी साठी सर्वात जास्त देणगी तुकोजीरावांनी दिली होती व त्या बदल्यात त्यांच्या वाघ्याची समाधी तेथे बांधली होती असे वाचलेले आहे. अर्थात तुकोजीराजे प्रजाहितदक्ष व देशप्रेमी असल्याने त्यांना हा गुन्हा माफ.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:19 pm | आजानुकर्ण

तुमची माहिती चुकीची आहे. बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे.

निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही.

तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात?

ए.चंद्रशेखर's picture

24 Dec 2010 - 5:23 pm | ए.चंद्रशेखर

निनाद बेडेकर आता कॅ न्सल आहेत हो. त्यांना इतिहास वगैरे काही कळत नाही असे जाणकारांचे म्हणणे आहे.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:25 pm | आजानुकर्ण

निनाद बेडेकर हे शाहीरच आहेत. पण त्यांचे लेखन वगळता कुठेही वाघ्या कुत्रा होळकरांचा होता असे वाचनात आले नाही. म्हणून तेवढा संदर्भ देता आला. त्यांच्या लेखनाचे संदर्भ देणे विश्वासार्ह नाही. ते भाजपाच्या व्यासपीठावरही असतात.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:30 pm | llपुण्याचे पेशवेll

सोयिस्कर तेवढे घ्यावे उरलेले टाकून द्यावे. छान. :)

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:33 pm | आजानुकर्ण

वाघ्या कुत्रा होळकरांचा असल्याचे प्रतिपादन तुमचे होते माझे नाही. (मी फक्त ते कुठे वाचले हे सांगितले). एक तर तुम्ही होळकर हे बडोद्याचे असल्याचे सांगितले. ते धादांत चूक आहे. (निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे). वाघ्या कुत्र्याची समाधी होळकरांनी बांधली असल्याचे संदर्भ फक्त बेडेकरांच्याच लेखनात आले आहेत आणि ते पुरेसे विश्वासार्ह नाहीत.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:39 pm | llपुण्याचे पेशवेll

निनाद बेडेकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात राजांची समाधी बांधण्यासाठी पैसे दिलेले इंग्रजांना आवडणार नाही म्हणून होळकरांनी त्यांच्या कुत्र्याची समाधी बांधण्यासाठी पैसे दिल्याचा उल्लेख केला आहे. पण त्यात कुत्रा होळकरांचा असल्याचे आठवत नाही.
आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे. पुन्हा वाचावे. आणि त्यांच्या म्हणजे होळकरांच्या असाच सकृत दर्शनी अर्थ निघतो. किंवा आपल्या लिखाणात पुरेशी स्पष्टता नाही हे दिसते.

निनाद बेडेकर यांच्याकडून या प्रकारची चूक शक्य आहे
निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:42 pm | आजानुकर्ण

आपल्या वाक्यात आपणच त्यांच्या कुत्र्याची असे म्हटलेले आहे

निनाद बेडेकर यांनी तसे लिहिले आहे. मी नाही.

निनाद बेडेकरांइतकीच ती जयसिंगराव पवार व अन्य अनेक ज्यांची नावं घ्यावीत अशी लायकी नाही अशा लोकांचीही आहे.

हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत. तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:46 pm | llपुण्याचे पेशवेll

हो पण मी त्यांची नावेही घेतलेली नाहीत.

तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे.

तुम्ही कशाला उगाच त्यांच्यावर खार खाऊन आहात.
आम्ही त्यांच्यावर कुठे खार खाल्ला आहे बॉ? आम्ही सत्य प्रतिपादन केले.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:49 pm | आजानुकर्ण

तुम्ही त्यांची नावं घेण्या नं घेण्यानी काय फरक पडणार आहे.

मान्य आहे पण त्यांची नावे अचानक घेण्याचे कारण समजले नाही.

सदर चर्चेत निनाद बेडेकर यांचा संदर्भ वाघ्या कुत्र्याची समाधी कोणाची ह्या तुम्ही उपस्थित केलेल्या शंकेतूनच आला. मात्र जयसिंगराव पाटील व इतरांबाबतची तुमची टिप्पणी सत्य असल्याचे क्षणभर गृहित धरले तरी हे सत्यप्रतिपादन अस्थानी वाटते. मी आज दुपारी वडापाव खाल्ला हे सत्य आहे पण या चर्चेत त्याचे प्रतिपादन करणे अस्थानी आहे असे मला वाटते.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:28 pm | llपुण्याचे पेशवेll

बडोद्याचे गायकवाड, इंदूरचे होळकर आणि ग्वाल्हेरचे शिंदे.

बरोबर. आमची मिष्टेक मान्य करतो. चुकून बडोद्याचे ऐसा टायपला.
तुमची माहिती चुकीची आहे
मान्य पण मग शिवाजीमहाराजांचा वाघ्या ही तुम्ही पुरवलेली माहीती चुकीची आहे हे मान्य आहे ना.

तुकोजीराजांनी काय गुन्हा केला होता बरे ज्यासाठी तुम्ही त्यांना मोठ्या मनाने माफ करत आहात?

तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:37 pm | आजानुकर्ण

वाघ्या शिवाजीमहाराजांचा नव्हता हे सिद्ध कुठे झाले आहे? माझी माहिती चुकीची असल्याचे सिद्ध न झाल्याने मी तसे मान्य का करू.

तिथे समाधीसाठी नुसतेच पैसे न पुरवता ती वाघ्याची समाधी तिथे बांधवली हा.

हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:51 pm | llपुण्याचे पेशवेll

मग वाघ्या शिवरायांचा होता हे कुठे सिद्ध झाले आहे ते दाखवा...

हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

हे विचारणारे तुम्ही कोण?

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:58 pm | आजानुकर्ण

वाघ्या कुतरा तो राजाचा वेगानें धावुनि आला ।

झडप टाकुनी अग्नीवरती तो हि पहा जळुनी गेला ॥जी॥

राजाचा अंत जाहला । पण कीर्तिची मिठी कायमची पडली देहाला ॥

अनेक गीतांमध्ये, पोवाड्यांमध्ये, लोककथांमध्ये वाघ्या शिवरायांचा होता अशी समजूत प्रचलित आहे. ही समजूत (श्रीरामकथेप्रमाणेच) ग्राह्य धरून मी तो दावा केला होता. मात्र ही समजूत खोटी असल्याचे पुरावे प्राप्त झाल्यास वाघ्या शिवरायांचा होता हे अमान्य करता येईल.

पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण? हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना.

हा गुन्हा कसा काय? असे माफीचे विशेष अधिकार तुम्हाला कसे काय प्राप्त झाले आहेत?

हे विचारणारे तुम्ही कोण?

आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो.

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 6:17 pm | llपुण्याचे पेशवेll

सदर पवाडा कोणत्या शाहीराचा? आणि तो ग्राह्य कसा मानायचा?
बाकी कोणत्या शाहीराचा पवाडा ग्राह्य मानायचा आणि कोणाचा नाही याचे निकष काय?

पण कृष्णा घोडीबाबत काय? आणि शिवरायांची कोणतीही गाय नसताना त्यांना गो-पालक म्हणायचे काय कारण?

शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का?
हा मूळ मुद्दा या उपचर्चेत हरवून चालला आहे ना.
हा उगाच मूळ चर्चेला फाटे फोडण्याचा प्रयत्न वाटतो आहे.


आम्ही सामान्य व्यक्ती आहोत. उद्या पुढेमागे आम्ही काही गुन्हा केल्यास तुमची माफी मागावी लागेल की काय याचा विचार करत होतो.

तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 6:28 pm | आजानुकर्ण

शिवाजी महाराजांच्याकडे पुष्कळ गाईबैल असल्याचे उल्लेख आहेत. तशा गाई त्यांनी कल्याणस्वामींचे बंधू दत्तात्रय यांच्या मठाला दान दिल्याचेही उल्लेख भोसले रुमालात सापडतात. मग शिवरायांची कोणतीही गाय नाही हे म्हणण्यास काय आधार आहे बॉ? बाकी मग ते सर्वांचा प्रतिपाळ करणारे होते म्हणून प्रत्येक जातीतले एक फेवरीट पात्र हुडकायला लागायचे का?

फाटे फोडण्याचा प्रयत्न नाही. महाराजांकडे गाईबैल आहेत, त्याचप्रमाणे कुत्रा आणि घोडीही आहेत.महाराजांची कुत्रा आणि घोडी ही त्यांच्याकडच्या गाईबैलांपेक्षा अधिक लोकप्रिय असावीत असे अनेक पोवाडी, कथा, वाघ्याची समाधी वगैरे उदाहरणांवरून वाटते. त्यामुळे महाराजांना निदान श्वानप्रतिपालक किंवा अश्वप्रतिपालक म्हणणे सयुक्तिक ठरले असते असे सामान्य तर्क लावला असता वाटते. पण सत्य इतके सरळसोट कधीच असत नाही.

मग महाराजांना गो आणि ब्राम्हण यांचेच प्रतिपालक ठरवण्याचा आणि जयजयकाराच्या मार्फत पुन्हा पुन्हा ठसवण्याचा उद्देश काय हे समजावून घेत आहे.

तुम्ही इतके साळसूद आहात? व्वा!

असे काही नाही. तुम्हाला साक्षात तुकोजी होळकरांसारख्यांना माफी देण्याचे अधिकार असल्याचे (तुम्हीच लिहिल्याचे) वाचून थोडा सावध पवित्रा घ्यावा असे वाटले.

नन्दादीप's picture

24 Dec 2010 - 6:32 pm | नन्दादीप

मला वाटते महाराजांना "गोब्राम्हणादिप्रतिपालक" असे म्हणायचे.....

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 6:35 pm | आजानुकर्ण

रोचक मुद्दा आहे. असे तुम्हाला का वाटते?

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Dec 2010 - 5:08 pm | llपुण्याचे पेशवेll

'इतर' सुद्धा स्वयंभु असतील.
हा हा हा... शक्यता नाकारता येत नाही.
सहमत समर्थन आहे.

अप्पा जोगळेकर's picture

24 Dec 2010 - 5:33 pm | अप्पा जोगळेकर

मग महाराज हे गो आणि ब्राम्हण यांचे प्रतिपालक होते असा खोडसाळपणा कशासाठी?
अगदी अगदी. शिवाजी महाराजांनी स्वतः तयार करवून घेतलेल्या राजमुद्रेवरसुद्धा गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द लिहिलेला आहे. याबाबत कोणावर खटला भरावा याबद्दल काही मार्गदर्शन केल्यास आवडेल.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:40 pm | आजानुकर्ण

शिवाजीराजांच्या मुद्रेवर खालील ओळी होत्या.

प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते

यात गोब्राम्हणप्रतिपालक हा शब्द कुठे दिसतो? तुम्हाला एखादी स्पेशल राजमुद्रा माहीत आहे काय?

अप्पा जोगळेकर's picture

24 Dec 2010 - 5:53 pm | अप्पा जोगळेकर

ओक्के ओक्के. आमची चूक झाली असेल. आपण ज्ञानी आहात असे वाटते.
पण मग 'गोब्राम्हणप्रतिपालक' हा शब्द कुठून ईंट्रोड्यूस झाला याबाबत काही ज्ञान दिल्यास आवडेल.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 6:06 pm | आजानुकर्ण

माफ करा मी ज्ञानी नाही. मिपाकरांच्या ज्ञानाने प्रभावित होऊन काही ज्ञानकण वेचण्यास मी येथे येतो. मात्र माझ्या शंकांचे समाधान करणारी उत्तरे मिळत नसल्याने वाईट वाटते. गोब्राह्मणप्रतिपालक हा शब्द कुठून आला हे वाचण्यास मलाही आवडेल.

अप्पा जोगळेकर's picture

24 Dec 2010 - 6:11 pm | अप्पा जोगळेकर

माफ करा मी ज्ञानी नाही.
हा तुमचा विनय तर नाही ना ?

आत्ताच थोडे गूगलून पाहिले.यु-ट्युब किंवा गूगलवर शिव गर्जना असे टाईप करा. असंख्य संबंधित क्लिप्स मिळतील. ही आरोळी याआधीही अनेकदा ऐकली आहे.

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 6:14 pm | आजानुकर्ण

हा तुमचा विनय तर नाही ना

Don't be so humble, you're not that great. या वाक्यावर आमची नितांत श्रद्धा आहे.

आरं तिच्या...
हा पण खोडसाळपणा आहे होय.
शाळेत शिकवलेला इतिहासच फक्त माहीत असल्याने हा खोडसाळपणा आहे हे आम्हाला माहीतच नव्हते.
असो. वरिजनली, हा खोडसाळपणा आणि अजुन जे काही असतील ते, कोणी केले ते शोधले पाहिजे.
फारच त्रास होतोय आजकाल.

- सूर्य

ए.चंद्रशेखर's picture

24 Dec 2010 - 5:02 pm | ए.चंद्रशेखर

"महाराजांचे गुरु खरच कोण होते हे आजच्या सरकारमधील नेत्यांना पक्के माहीत आहे "
आजच्या सरकारमधील नेते ४०० वर्षे वयाचे आहेत हे माहीत नव्हते ब्वा!

आजानुकर्ण's picture

24 Dec 2010 - 5:04 pm | आजानुकर्ण

चंद्रशेखरराव, तुम्ही बाँबच टाकलात. :-D

विजुभाऊ's picture

24 Dec 2010 - 5:21 pm | विजुभाऊ

बालपणी गुरु असल्यामुळे शिष्याच्या व्यक्तिमत्वाला एक दिशा मिळते, विचार मिळतो, परंतु स्वयंभु व्यक्तिमत्वाच्या शिष्याला गुरु असला काय अन नसला काय काय फरक पडतो ?
वा वा वा. तुम्ही हे लिहीताना नक्की कोणत्या उद्देशाने लिहीलय हे उमजले नाही.
पण कितीही थोर व्यक्ती असली तरी तिला गुरुची आवश्यकता असतेच ना. माणसाची पहिली गुरु आई असते.
शिक्षण घेतले नाही तर ती व्यक्ती थोर कशी होणार? राम , कृष्ण या देवतेसमान व्यक्तीना सुद्धा गुरु होते. त्यानी शाळेत्/आश्रमात शिक्षण घेतले होते.
दत्तत्रेया नी तर २४ गुरु केले होते म्हणे.
लहानपणी शिवाजी महाराज जर राज्यशास्त्राचे /तलवारबाजीचे /युद्धशास्त्राचे धडे शिकले नसते तर त्यानी मोठेपणी राज्य कसे स्थापन केले असते?
काहीही शिकायचे म्हंटले तरे निदान इन्डायरेक्ट गुरु तरी हवाच ना?

अमोल जी पहिल्यांदा हा धागा पाहिला तेंव्हा वाटले होते पुन्हा एकदा तेच तेच सुरु झाले वाटते ..

परंतु आपण लिहिलेले विचार आणि त्यामागील शुद्ध हेतु स्पष्ट कळत आहे.
तुम्ही जे लिहिले आहे तसेच बर्याच जणांना वाटते ..
परंतु त्यांच्या वाटण्याकडे जआणीवेने दुरल्क्ष केले जाते ही खंत आहे..

---

ह्या धाग्यातील मुख्य हेतु खुप छान होता असे मला वाटले .. पण पुन्हा रिप्लाय वाचुन खेद वाटला ..
आपणही काही तरी तर्क घेवुन भांडतच आहोत तर मग काही लोक फक्त वेगळ्या पातळीवरुन भांडत आहेत ..
मग त्यांना आपण दोष देतो .. तर मग आपण काय करतोय ? तेच ना ..

जावुद्या व्यर्थ वादात पडायचे नाहिये .. वाईट वाटले बस्स ..

गुरुविण नाही कोणी रे....
गुरु नाम हाची ध्यास रे...............

गुरूचा महिमा अगाध आहे.....
शिवरायांची आई हि सुद्धा त्यांची गुरूच होती....

हिरा जरी स्वयंभू असला तरी त्याला तासणारा हा लागतोच....
अंगीभूत गुण जागृत करतो तो गुरु....

अविनाशकुलकर्णी's picture

24 Dec 2010 - 6:28 pm | अविनाशकुलकर्णी

यांचे म्हणणे आहे...अहो दादा यांचे म्हणजे बिगेडी चे..

नरेशकुमार's picture

24 Dec 2010 - 6:47 pm | नरेशकुमार

स्वयंभू राजें शिवछत्रपतींना गुरुची गरजच नव्ह्ती.......

शक्यता नाकारता येत नाय.........

एकदम जोषात चर्चा चालु आहे .. रोमहर्षक आहे :)

अविनाशकुलकर्णी's picture

24 Dec 2010 - 9:08 pm | अविनाशकुलकर्णी

पुतळा हलवु देणार् नाहि..उद्धव साहेब गरजले..

आधि औरंगाबादचे संभाजी नगर करा...

स्टेडीयम बाहेर गोंधळ....प्रबोधन कारा बद्दलचे ब्रिगेडचे प्रेम बेगडी.. सेनेच्या श्री शिंदे यांची प्रतिक्रिया

पुण्यात भाजप. व सेना व नागरिकांचा मोर्चा..
स्टार माझा..

Pain's picture

24 Dec 2010 - 10:52 pm | Pain

-----------------------------------------------------------------
महाराष्ट्राचे आदरस्थान असलेल्या शिवाजी महाराजांच्या चर्चेत शिवाजी महाराज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक ज्ञात / अज्ञात व्यक्ती / घटना / इतर गोष्टींबाबत चर्चा करताना सदस्यांनी थोडे भान ठेऊन योग्य भाषा आणि संयमित आचरण ठेवावे अशी संपादक मंडळाची अपेक्षा आहे.
अनावश्यक फाटे फोडणारे आणि चुकीच्या गोष्टीवर वाद घालणारे प्रतिसाद अप्रकाशित केले जाऊन संबंधित सदस्याची मिपा व्यवस्थापन गंभीर दखल घेईल असे इथे सर्वांना सुचित केले जात आहे, सर्वांकडुन सहकार्याची अपेक्षा आहे.
- संपादक मंडळ
-------------------------------------------------------------------

तुम्हाला त्यांच्या आणि संबंधितांच्या प्रतिष्ठेची खरच इतकी काळजी असती तर असे द्वेषमूलक, चिथावणीखोर आणि चुकिची माहिती पसरवून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यारे धागे इथे येउच दिले नसते.

प्रशु's picture

24 Dec 2010 - 11:33 pm | प्रशु

ज्या घोषणे वरुन वाद सुरु आहे ती अर्धवट आहे , गो ब्राम्हण च्या पुढे 'क्षत्रिय कुलावंत' हा शब्द राहुन गेलाय...

शिल्पा ब's picture

25 Dec 2010 - 4:29 am | शिल्पा ब

प्रोब्लेम फक्त ब्राह्मणांबद्दलच असतो..

महाराज अवघ्या महाराष्ट्राला एक ठेवण्यासाठी झिजले आणि , महाराजांनाही वाटुन घेतला रे लोकांनी ! छे !!

शिल्पा ब's picture

25 Dec 2010 - 9:09 am | शिल्पा ब

आता काय करता टारोबा ssssss !!! सांगा..

मंडळाने सरळ हे लेख उडवावेत असे माझे मत आहे :) आपण मत व्यक्त करतो फक्त :)

शिल्पा ब's picture

26 Dec 2010 - 9:16 pm | शिल्पा ब

जाउद्या... बाकी आम्हालापण गुरुची गरजच नव्हती पण घरी त्रास देतो म्हणुन शाळेत घातलं...त्यामुळेच आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.)

पंगा's picture

26 Dec 2010 - 9:55 pm | पंगा

आम्ही राज्यस्थापन करु शकलो नाही...(कुठे? कोणाचे? का? वगैरे प्रश्न बाद.

लपंडाव नाही खेळलात कधी लहानपणी? राज्य नाही आलं कधी तुमच्यावर?

डावखुरा's picture

25 Dec 2010 - 12:38 am | डावखुरा

१)गो-गाय : गायीचे महत्व फार पुर्वीपासुन भारतीय समाजात आहे...
गायीला आपण पवित्र मानतो...
तसेच तिच्या पोटात ३३ कोटी देवतांचा वास आहे अशी श्रद्धा आहे...
आणि मुस्लिमांपासुन गोमातेला संरक्षण देणारा राजा ....

पण ब्राह्मण का यावर मी काही बोलु नाही शकत...

२)शिवरायांचे गुरु..
शस्त्रास्त्र शास्त्र आणि राज्य्कारभार : दादोजी कोंडदेव
अध्यात्मिक आणि राजकीय गुरु.. : समर्थ रामदास स्वामी (दासबोधकार आणि शक्तीउपासनेला सदिव प्रोत्साहन देणारे...)

एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ...

जय भवानी जय शिवाजी

छत्रपती's picture

26 Dec 2010 - 2:11 pm | छत्रपती

एवढे माहीती.... " पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती " हेच एकमेव सत्य ..बाकीचा वाद व्यर्थ...

हे जर्स्त्य अस्येल त्र अवरन्गजेबाच्या पद्री अस्नार्या अन्सी टक्के रज्पुत सयनिकाचे सुन्ता क झले नाहे?
अस मझा परस्न आहे.

शिल्पा ब's picture

25 Dec 2010 - 4:29 am | शिल्पा ब

रोचक चर्चा.

पण गर सिवाजी न हो तो सुनति सबकी होती "
एक शंका शिवाजी महाराजांच्या अगोदर भारतात विशेष करुन उत्तर भारतात हिंदु रहात होते कि नव्हते?
महाराज मुस्लिम विरोधात होते हे सतत का सांगत असता तुम्ही?

रन्गराव's picture

25 Dec 2010 - 2:37 pm | रन्गराव

काय चालल आहे? जातीयवाद, जाज्वल्य अभिमान ह्या गोष्टी किती टोकाला न्यायच्या? तुम्ही अमक्या जातीत जन्मलात हा योगायोग होता, त्यात अभिमान बाळगण्यासारखा काय कमवल? गेल्या काही महिन्यातील लेखांवरील प्रतिक्रिया वाचून जातीयवाद कमी होण्याएवजी वाढतोच आहे अस वाटू लागल आहे. " सावरकर ब्राह्मण होते म्हणून त्यांच्यासाठी कोणीही काही करत नाहीत" , " ब्राह्मणांनी हजारो वर्षे दलितांवर अन्याय केला" ही काही उदाहरणे. ह्याच्यापेक्षा खालच्या दर्जाचे प्रतिसाद येऊ शकत नाहीत.

दादोजी कोंडदेव हे एक कारभारी होते. शहाजी राज्यांच्या जहागीरीतील पुणे परगण्याचा कारभार ते पहात होते. जिजाऊ व शिवाजी महाराजांच्या देखभालीची जबाबदारीही त्यांच्याकडे होती. त्याना शिवाजी महाराजांना शिकवण्याचे काम दिलेले नव्हते. शिवाजी महाराजांना शस्त्रात्रे चालवण्याचे इ. काम दुसर्‍या कुणी तरी केलेले असणार. दादोजी कोंडदेवाना गुरू म्हटल्याने त्यांची किंमत वाढते कारभारी म्हटल्याने कमी होते असं मानण्याचं कारण नाही.

शिल्पा ब's picture

26 Dec 2010 - 8:39 pm | शिल्पा ब

या माहीतीचा स्रोत काय आहे?

अविनाश कदम's picture

28 Dec 2010 - 12:30 am | अविनाश कदम

या माहीतीचा स्रोत काय आहे?

शिवशाहीचा इतिहास म्हणून आढावा घेणार्‍या इतिहासकारांची (शाहिरांची नव्हेत) पुस्तके.

सध्या जी काही चर्चा आणि गोंधळ चालला आहे महाराष्ट्रात तो बघून, 'पुन्हा एकदा शिवाजी' म्हणून कोणीजन्म घ्यायला धजावेल असे वाटत नाही. अगदी प्रत्यक्ष महाराज सुद्धा!

सन्जोप राव's picture

26 Dec 2010 - 6:04 am | सन्जोप राव

वर चालू असलेल्या अत्यंत उद्बोधक व ज्ञानवर्धक चर्चेत ब्राह्मण हा शब्द दोन प्रकारे लिहिला गेला आहे. शिवछत्रपतींनी हा शब्द कोणत्या प्रकारे लिहिला आहे याबाबत जाणकारांचे मत जाणून घ्यायला आवडेल. इथे छत्रपतींना लिहिता-वाचता येते असे गृहितक आहे. मिरासदारांचे या बाबतीतले मत वेगळे आहे.

पंगा's picture

26 Dec 2010 - 8:23 pm | पंगा

मराठी शुद्धलेखनाच्या 'जुन्या' (पारंपरिक?) नियमांप्रमाणे 'ब्राह्मण' (अर्थात संस्कृताप्रमाणे) हे रूप बरोबर आहे. 'नव्या' (सुधारित किंवा सुलभीकृत? नाही म्हणायला हे लागू होऊनसुद्धा गेला बाजार चाळीसएक वर्षे होऊन गेली असावीत) नियमांप्रमाणे 'ब्राम्हण' हे रूप (अर्थात मराठीतील उच्चारास अनुसरून) बरोबर आहे, परंतु 'ब्राह्मण' हे रूप वापरल्यास चुकीचे मानले जात नाही, असे काहीसे आठवते. (याच नियमानुसार 'आह्लाद', 'प्रह्लाद', 'चिह्न' हे शब्द नव्या मराठी शुद्धलेखनात अनुक्रमे 'आल्हाद', 'प्रल्हाद' आणि 'चिन्ह' असे लिहिले जातात. मात्र काही कारणाकरिता 'ह्य' हे जोडाक्षर या नियमास अपवाद आहे. 'बाह्य' हा शब्द 'बाय्ह' असा लिहिता येत नाही.)

मी माध्यमिक शाळेत असताना (१९७५-१९८१) पाठ्यपुस्तकांतून 'ब्राम्हण' हे एकमेव रूप वापरले जात असल्याचे आठवते.

शिवाजीमहाराजांच्या काळात मराठी शुद्धलेखनाचे काही काटेकोर नियम असण्याबद्दल साशंक आहे, परंतु यदाकदाचित असलेच, तर बहुधा हा शब्द महाराजांनी 'ब्राह्मण' असा (संस्कृतानुरूप) लिहिला असण्याची शक्यता दाट वाटते. (चूभूद्याघ्या.)

राखी हिन्दुवानी, हिन्दुवानको तिलक राख्यो |
अस्मृती पुराण राखे वेदविधि सुनी मैं ||
राखी रजपुती , रजधानी राखी राजन की |
धरामे धर्म राख्यो , राख्यो गुन गुनी मैं ||
भूषण सुकवि , जीती हद्द मरह्टट्न की |
देस देस कीर्ति , बरवानी तव सुनी मैं ||
साही के सपूत , सिवराज समशेर तेरी |
दिल्ली दल दाबी कै, दिवाल राखी दुनी मैं ||
वेद राखे विदित , पुराण राखे सारयुत |
रामनाम राख्यो , अति रसना सुघर मैं ||
हिन्दुन की चोटी, रोटी राखी है सिपहीन की |
कान्दे मैं जनेऊ राखे , माला राखी गर मैं ||
मिडी राखे मुगल , मरोरी राखे पातसाह |
बैरीपिसी राखे , बरदान राख्यो कर मैं ||
राजन की हद्द राखी , तेगबल सिवराज |
देव राखे देवल , स्वधर्म राख्यो घर मैं ||
देवल गिराविते , फिराविते निसान अली |
ऐसे डूबे रावराने , सबी गए लबकी ||
गौर गणपती आप , औरनको देत ताप |
आपनी ही बार सब , मारी गये दबकी ||
पीरा पैगंबर , दिगंबर दिखाई देत |
सिद्ध की सिदधाई गई , रही बात रब की ||
कासी की कला जाती, मथुरा मस्जिद होती |
सिवाजी न होते तो , सुन्नत होती सबकी ||
- कविराज भूषण.
जगन्मान्य असलेल्या जाणत्या राजाला स्वत:च्या स्वार्थासाठी आधुनिक काळातला स्वयंघोषित जाणता राजा आपल्या बगलबच्च्यांकरवी जाणिवपुर्वक वापरतोय हे या वादाचे सत्य आहे...सगळ्या बाजूने कोंडित सापडल्यावर भावनेला हात घालत राजकारण करणे हाच सत्ताधारी पक्षाचा जुनाच हातखंडा आहे...ज्यांची शिवछत्रपतींवर निस्सिम व निस्पृह भक्ती आहे ते कदापी जेम्स लेन सारख्याच्या अनर्घल लिखाणाला आपल्या तेजस्वी विचारात थारा देणार नाहित.....मुळात या नव्याने इतिहास प्रसवणार्‍यांकडे कसलेही पुरावे नाहित पण आमचेच खरे म्हणत छत्रपतींना फक्त मराठा समाजाच्या दावणीला बांधण्याचा हा निव्वळ अट्टाहास आहे.....काविळ झालेल्याला जग पिवळे दिसते तसे यांना केवळ ब्राम्हणवादाने पछाडलेले आहे.....आणि याच भावनेतुन दोदोजी व समर्थ शिवरायांचे गुरु नव्हते अश्या प्रकारचा विखारी प्रचार या बगलबच्च्यांनी सुरु केला...पुतळे हटवले म्हणून दादोजींचे शिवरायांच्या जिवनाच्या जडणघडणीतले स्थान कमी होत नाही....आणि स्वतःच्या स्वार्थासाठी इतिहासाची विटंबना करणार्‍यांचा व भ्रष्टाचाराने स्वतःच्या तुंबड्या भरणार्‍यांचा भविष्यात लिहिला जाणारा इतिहास हा काळाकुट्ट असणार आहे जो पुढच्या पिढीला प्रेरणादायी कदापी असणार नाही....दादोजींचे नाव शिवरायांबरोबर कायमच जोडल व सुवर्णाक्षरांनी कोरल गेलय ते पुसण्याचा प्रमाद या स्वयंनिर्मित नव-इतिहासकारांनी करु नये ती त्यांची तितकी कुवत देखिल नाही व पात्रता तर मुळीच नाही.
जय हिंद!
जय महाराष्ट्र!

मैत्र's picture

27 Dec 2010 - 10:33 am | मैत्र

एक वेगळा मुद्दा मनात आला...

संभाजी ब्रिगेड नामक एका नव्यानेच अस्तित्वात आलेल्या संघटनेने जेम्स लेन प्रकरणात तोड फोड केल्या नंतर सर्व सामान्य लोकांना दोन गोष्टींची माहिती मिळाली -
१. या नावाची एका कुठल्याही बर्‍या वाईट संस्थेवर / लोकांवर शाब्दिक शारिरीक हल्ला करू शकणारी एक संघटना आहे. ज्यांना संभाजी महाराजांच्या थोर नावानंतर एक मराठी शब्द सुद्धा मिळाला नाही संघटनेला नाव ठरवताना.

२. कोणी एक जेम्स लेन नावाचा इतिहास संशोधक भारतात आला होता. तो पुण्यात राहिला. त्याने शिवाजी महाराजांबद्दल एक पुस्तक लिहिले आहे. त्यात एका पानावर कुठे एक अत्यंत आक्षेपार्ह मजकूर आहे.
त्याने प्रस्तावनेत त्याला पुण्यात ज्यांनी मदत केली त्यांचे आभार प्रदर्शन आहे.

खरं तर हे होई पर्यंत सामान्य मनुष्य सोडा, कोणालाही या सर्व प्रकरणाची सुतराम कल्पना नव्हती. नेहमी वाचन करणारे, अनेक विषयांचा चांगला अभ्यास असलेले अनेक लोकही पूर्ण अनभिज्ञ होते.
अनेक लोकांनी लिहिलं नंतर की पुण्यात पन्नास वर्षांच्या वास्तव्यात असले दळभद्री विचार कुठे ऐकले नाहीत.

पुन्हा खूप धुरळा उठला. माहिती कळल्यानंतर जेवढा ब्रिगेडच्या गुंडगिरीचा निषेध झाला त्याहून जास्त लेनच्या पुस्तकाला एकत्र पणे विरोध झाला. कारण तिथे कोणालाही जात / व्यक्ती मध्ये आली नाही. महाराजांबद्दलचा आदर आणि अभिमान याहून महाराष्ट्रात काहीही मोठं नाही.

पण इथे विषय संपला असता तर काही चूक नव्हतं एका अर्थी... पण तो गेली अनेक वर्ष मुद्दामून चावला गेला आणि पुन्हा पुन्हा अतिशय विखारी पद्धतीने धुरळा उठवला जात आहे.

एक विचार मनात आला. की पुतळा काढू नये, दादोजी कोंडदेव हेच महाराजांचे गुरू होते म्हणणार्‍यांनाही विचारा की इतिहासात शाळेत वाचलेला भाग काय, कादंबर्‍या, नाटकांमध्ये पाहिलेला काय कोणाच्याही मनात किती मोठं स्थान होतं दादोजींविषयी... अतिशय परखडपणे पाहिलं तर खूप मोठं नव्हतंच !
नेहमी दादोजी हे कारभारी आणि कर्तव्य दक्ष व्यक्ती ज्यांनी आपल्या होणार्‍या सुभेदाराला / शहाजी राजांसारख्या अतिशय महत्त्वाच्या सरदाराच्या मुलाला मार्गदर्शन केलं. म्हणजे बरोबर बसवून न्याय, महसूल वगैरे त्यांच्या अखत्यारीतल्या गोष्टी दाखवल्या / समजावल्या. त्यांना शरीरसंपदा कमावण्यासाठी आणि तेव्हाची शस्त्रं वापरण्याची - तलवार, दांडपट्टा, भाला, बिचवा इ., योग्य व्यक्तींची नेमणूक केली.
मला वाटतंय की अगदी दादोजी या व्यक्तीला पूर्ण समर्थन असलेल्यांना सुद्धा असं कधीच मनात नसावं की जसं चाणक्याने चंद्रगुप्ताला शोधून तयार केलं आणि एका काळापर्यंत पूर्ण सेना उभारली, राज्य सांभाळलं त्याच्या जवळपास सुद्धा दादोजींचं काम होतं.
दुसरी गोष्ट बहुतेकांना हेही माहीत नव्हतं की ही व्यक्ती कुठल्या जातीची होती. ही सर्व माहिती बहुसंख्य सामान्य जनांना आणि अभिजनांना ब्रिगेडनेच पुरवली.

मग फक्त हे सिद्ध असताना की या नावाची एक व्यक्ती कारभारी म्हणून होती, ते कारभारी म्हणून खरंच चांगलं वजन आणि महत्त्व असलेले होते. तसं नसेल तर ब्रिगेड आणि आपण सर्व चक्क शहाजी राजांबद्दलच अविश्वास दाखवतोय ज्यांनी आपली बायको आणि लहान मुलगा, त्यांच्या जबाबदारीवर जहागिर सांभाळण्यासाठी पुण्याला पाठवले.

तेव्हा असं वाटतं की तेवढं जे काही थोडं महत्त्व आहे ते खूप मोठा गदारोळ करून खोडून काढण्याने ब्रिगेड चक्क त्यांचं महत्त्व वाढवतेय !

अजून एक मुद्दा आज सकाळ मध्ये आलेला - काही विरोधकांनी म्हटलंय की सोन्याचा नांगर वगैरे भाकड कल्पना महाराजांशी जोडल्या जाऊ नयेत.
असं वाचनात आलं होतं की मुरार जगदेवाने पुणं जाळून गाढवाचा नांगर फिरवला आणि पुणं नष्ट झाल्याची घोषणा केली. तेव्हा सोन्याचा नांगर हे प्रतिकात्मक होतं की आता नव्याने पुणं वसवून इथे सुवर्ण भूमी उभी केली जाईल...
जर दुसरी गोष्ट खोटी असेल तर पहिली पण खोटीच असली पाहिजे. हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत.

थोडक्यात - ज्या गोष्टीने फार फरक पडत नाही त्याचा खूप मोठा मुद्दा करण्यात राजकीय सोडता (आणि कसलेही कारण नसलेल्या जातीय संदर्भाचा) कुठलाही लाभ किंवा हेतू दिसत नाही.

हे विरोधक कुठलाही पुरावा देत नाहीत. आणि समर्थकही देत नाहीत. >>

+१ ..

१ ) जेम्स लेन ने पुस्तक लिही पर्यंत ब्रिगेड कोठे होती ?
२ ) शिवधर्म स्थापन करुन ' शिवधर्म 'च मुळात न पाळणार्‍यांचा नेमका धर्म कुठला ?

सरळ - सोट पणे हा सगळा प्रकारच राजकारण आहे.

आपला रिप्लाय मनापासुन आवडला ...

सामान्य माणसाचे मत असेच असते .. पण ज्यांना प्रसिद्धी .. राजकारण हवे असते ते अश्या गोष्टींना जाणीवेन बगल देतात

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

27 Dec 2010 - 11:59 am | निनाद मुक्काम प...

सोनोपंत डबीर ह्यांचा महाराष्ट्रात कुठे पुतळा आहे का ?
ब्रीग्रेड संघटनेला लगेच माहिती पुरवावी म्हणजे अजून एक अचाट सत्याचे प्रयोग करतील ते .
त्वरा करा

नाना बेरके's picture

27 Dec 2010 - 12:34 pm | नाना बेरके

१. 'सोनोपंत डबीर' हे कोण होते ?
२. वरच्या प्रतिसादात 'ब्रीग्रेड' हा शब्द आला आहे. तो शुध्दलेखनदृष्ट्या योग्य आहे कां ? कारण काही लेखनात हाच शब्द बीग्रेड किंवा ब्रिगेड असाही आला आहे.
३. जसा एखादा राजा स्वयंभू असू शकतो तश्याच इतरही गोष्टी स्वयंभू असू शकतात कां ? उदा. स्वयंभू गुरु, स्वयंभू शिष्य इ. इ.

एक स्वयंभू प्रतिसादक
नाना भू-रके

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

28 Dec 2010 - 12:40 am | निनाद मुक्काम प...

महाराजांचे अष्टप्रधान मंडळ ठाऊक नाही आपल्याला ?
बाकी कशाला शुध्द लेखनाची आपण पर्वा करायची
बिहार विकासाच्या मार्गावर लागलाय आणि त्याची मोडतोड संस्कृती महराष्ट्रात वणव्यासारखी पसरत आहे .
पुण्यनगरीत झालेला तमाशा नववर्षाचे स्वागत करणार तर .

हा लेख आणि त्यावरील प्रतिसाद वाचल्यावर मी नुकताच पोस्ट केलेल्या "भारतीय-कसा मी? असा मी!" मधील खालील परिच्छेदाची आठवण झाली आणि आपण कुठे चाललो आहोत याबद्दल काळजी निर्माण झाली. सर्वांनी विचार करून असले फूट पाडणारे विषय टाळायला हवेत!
त्यांची संवेदनशीलता राज्यव्यवस्था जगविण्यासाठी आवश्यक असलेली नियमनाच्या आणि जुळवून घेण्याच्या प्रवृत्तीला उत्तेजन देईल? भारतीय लोक सांप्रदायिक अतिरेकाचा अवलंब करतील कीं त्यांची अक्कल आणि अराजकाची नावड त्यांच्यातील (गरजेपोटी) एकत्र रहाण्यासाठी लागणारे व्यवहारचातुर्य बळकट करेल? त्यांच्यातले कांहीं नेते निधर्मीपणावर आधारित समाजरचनेला धोका निर्माण करतील कीं भारतात यशस्वी राजकारणाला निधर्मी राज्यव्यवस्थेशिवाय दुसरा कुठालाच पर्याय नाहीं हे त्यांना उमजेल? प्रादेशिक संवेदनशीलता वाढीला लागून भारताची शकले होतील कीं ’सर्व-भारतीय-एक’ ही भावना वाढेल? भारतीय उच्चभ्रू समाजाची भारताला एक जागतिक महाशक्ती बनविण्याची तीव्र इच्छा लष्करी साहस करायला प्रवृत्त करेल कीं तडजोडीला आणि स्वरक्षणाला महत्व देण्याकडे असलेला भारतीयांचा कल आपल्याला एक जबाबदार अण्वस्त्रधारी राष्ट्र बनवेल?

अविनाश कदम's picture

28 Dec 2010 - 12:47 am | अविनाश कदम

भारतीय समाज व्यवस्था निधर्मी असणं केव्हाच शक्य नाही. भारत हे बहुधर्मीय राष्ट्रच आहे. म्हणूनच इथली शासनव्यवस्था व राज्य व्यवस्था धर्मनिरपेक्ष असणंच उपयोगाचं आहे. भारतीय राज्यघटनेने धर्मनिरपेक्षतेचंच तत्त्व स्विकारलेलं आहे.