प्रार्थनेचे सूर येतात दूरवरून
लांबून ..पहाडातून
किती नि कसे छान वाटते
हिरव्या माळरानावरून तरंगत येतात
ते दैवी सूर
मन कसे शांत नि शांत होते
बघा एकदा अनुभवून
पाखरांचा स्वर
त्यांचा वावर
झाडाचे असणे
फुलणे
निळ्या निळ्या डोंगरावरून येणारी झुळूक
ही सगळीच प्रार्थनेची
टिंबे,उदगारचिन्हे ,वेलांट्या नि मात्रा
नि कडवी
मन जाते हरवून
बघा एकदा अनुभवून
हिरव्या मैदानावचे गुरांचे चरणारे कळप
ती शांत नागमोडी नदी
पाखरांचे आवाज
फुलपाखरांचे फुलाभोवती
गिरकत राहणे
हेपण असतात प्रार्थनेचे सूर
बघा एकदा अनुभवून
देवाजवळचा दिवा
समयी ..निरांजन
त्याचा मंद प्रकाश
किती पवित्र वाटतो
घ्या मनात साठवून
कहीही न मागणे
निव्वळ आभार मानणे
बघा एकदा अनुभवून
प्रतिक्रिया
24 Dec 2010 - 11:08 am | टारझन
मी आज ऑफिस ला येताना ट्राफिक आणि बेजबाबदार पणे गाड्या चालवणार्यांवर खुप भयंकर चिडलो होतो . रागाच्या भरात मी दोन ट्रेलर्स , १ कार्गो कॅरियर , ५ ट्रका , ४ सेडान , ४ हॅचबॅक, आणि १२ मोटरबाईक्स पल्टी करुन आलो होतो . आता ऑफिसातल्या मॅनेजर्स , क्युबिकल्स आणि मिटींग रुम्स ची पाळी होती . परंतु हा शांतरसाचा अतिशय सुरेख णमुणा वाचावयास मिळाला आणि मी शांत झालो . आणि संभाव्य धोका टळल्याने आयटीवाला पुणेकर सुखावला .. उप्स.. बचावला.
धन्यवाद प्रकाश१११
-( ती प्रेमी) टारात्मा पांदी
24 Dec 2010 - 1:25 pm | गणेशा
हिरव्या मैदानावचे गुरांचे चरणारे कळप
ती शांत नागमोडी नदी
पाखरांचे आवाज
फुलपाखरांचे फुलाभोवती
गिरकत राहणे
हेपण असतात प्रार्थनेचे सूर
बघा एकदा अनुभवून
नेहमीप्रमाणे मस्त
26 Dec 2010 - 10:31 am | पियुशा
सहि लिहिलेय