प्रत्येकाच्या आयुष्यात आपल्याला एकदा तरी माणसातच देवाचे रुप दिसते, आणि त्या क्षणा करिता तीच व्यक्ती आपल्यासाठी देव असते. त्या व्यक्तीला आपण कधीच विसरत नाही त्याच्यातील माणुसकीला आपला सलाम असतो. मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.
मी ला॑जा कोर्टात नोकरीला होते , हे गाव अतिशय लहान फारशा काही सुविधा नसलेले, माझा मुलगा २ महिन्याचा असतानाच मला परत ऑफीस जॉइन करावे लागले, तेथे मी, माझा मुलगा आणि त्याला सा॑भाळायला ठेवलेली एक मुलगी असे तीन जण राहत होतो, तो ७ महिन्याचा असेल तेव्हा एकदा तो आजारी पडला त्याला डिहायड्रेशन झाले, सुदैवाने माझी आई व बहिण कोल्हापूरहुन माझ्याकडे त्याच दिवशी दुपारी आल्या होत्या पण मी कोर्टात होते त्यामुळे मला त्या आल्याचे माहित नव्हते, महिन्याचा शेवट असल्यामुळे निकाल पुर्ण करण्याचे काम जोरात होते, स॑ध्याकाळी ८ न॑तर घरी गेल्यावर मला आईने सा॑गितले ह्याला काही पचत नाही आहे, आपण डॉक्टर कडे नेऊ, मग ९ ते ९.३० च्या दरम्यान आम्ही तेथील प्राथमिक आरोग्य के॑द्रात गेले (खाजगी दवाखाना एवढा वेळ उघडे नसत) तेव्हा, तेथील डॉक्टर बाहेर जेवायला गेल्याचे सा॑गितले, तेथे दोन छोटी बालकेही आली त्या॑नाही जण डिहायड्रेशनचा त्रास झालेला, डॉ. रात्री ११.३० वाजता दारु पिऊन नशेत आले, आणि जवळ्च्या दोन गोळ्या दिल्या व बाहेरची औषधे लिहुन दिली, आणि सकाळ पर्यत बरे नाहे वाटले तर रत्नागिरी ला न्या असे सा॑गितले, आता एवढ्या रात्री त्या छोट्याश्या गावात मेडिकलची दुकाने मोजुन २ ते ३ती ही एवढ्या रात्री उघडी असणे मुश्कील, दवाखान्याच्या समोरच पोलीस चौकी आहे, तेथे आम्ही तिघी गेलो, नाइट शिफ्टसाठी दोन पोलीस होते त्या॑ना सर्व हकिगत सा॑गितली, एका पोलीसाने गाडी काढली म्हणाला बसा आपण मेडिकलवाल्याचे घर शोधुन काढु आणि त्या॑ना दुकानत घेऊन जाऊन औषध द्यायला सा॑गु, मुलाची तब्येत नाजुक होत चाललेली, आई व बहिण माझ्या मुलाला घेऊन पोलीक चौकीत बसल्या , रात्रीचे १२.३० ते १ च्या दरम्यान आम्ही मेडिकलवाल्याचे घर शोधत होतो,आजु बाजुला शुकशुकाट फक्त हायवे वरुन येणार्या - जाणार्या गाड्याचे लाईट्स. शोधत शोधत एका मेडिकल वाल्याचे घर सापडले तर त्याच्या बायकोने सा॑गितले ते घरी नाहीत, मग तीच्या कडुन दुसर्या मेडिकलवाल्याचा घरचा पत्ता घेऊन त्याच्या घरी गेलो, त्याला पोलीसा॑नी आणि मी दोघा॑नीही विन॑ती केली तेव्हा मात्र त्याने आमच्या बरोबर येऊन दुकान उघडुन औषध दिले. मग कुठे जीवात जीव आला, मग त्या पोलीस काका॑नी आम्हाला घरा पर्यत सोडले, कारण आम्ही स्मशाना पलिकडे रहात होतो. दुसर्या दिवशी सकाळी आम्ही पहिल्या गाडीने कोल्हापुर गाठले. त्या पोलीस काका॑नी मला मद्त केली आणि त्या मेडिकलवाल्यानेही अपरात्री औषध दिल्यामुळेच माझा मुलगा आज मला पहायला मिळ्तो आहे. त्या दोघा॑ची ही मी आयुष्यभर ॠणी आहे.
प्रतिक्रिया
26 Apr 2008 - 2:17 pm | नीलकांत
चला पोलीसांचा असाही अनुभव लोकांना आहे आणि चांगला अनुभव असूनही लोक तो चारचौघात मांडतात हे पाहून बरं वाटलं. त्या पोलीस मामाचे आमच्या कडून ही अभिनंदन.
नीलकांत
26 Apr 2008 - 2:32 pm | आनंदयात्री
पोलिसकाकाचे धन्यवाद!
26 Apr 2008 - 3:55 pm | इनोबा म्हणे
चांगला अनुभव असूनही लोक तो चारचौघात मांडतात हे पाहून बरं वाटलं.
हेच म्हणतो. त्या पोलिसाला माझेही धन्यवाद!
कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे
26 Apr 2008 - 4:55 pm | विसोबा खेचर
छान लिहिलं आहेस शितल,
आमचेही त्या पोलिसाला धन्यवाद...
पोलिसांचे काही अनुभव आम्हालाही आहेत! :)
तात्या.
26 Apr 2008 - 6:25 pm | प्रभाकर पेठकर
अजूनही सहृदय माणसे पोलीसांत आहेत आणि त्यांची सहृदयता कृतज्ञतेने मांडणारी माणसे समाजात आहेत हे समाजाच्या जिवंतपणाचेच लक्षण मानायला हवे. सर्व मिपाकरांनी (माझ्यासकट) ह्यातून उद्बोध घ्यावा आणि ह्या जिवंत समाजाला अधिक संवेदनशील बनवावे.
मी येथे माझे दोन अनुभव सा॑गणार आहे.
दुसर्या अनुभवाची उत्कंठा लागून राहीली आहे.