अनुभव !!

प्रकाश१११'s picture
प्रकाश१११ in जनातलं, मनातलं
20 Dec 2010 - 2:23 pm

हाताच्या तळव्याएवढ्या टक्कल असलेल्या गृहस्ताच्या तोंडून शब्दाने तिरकी उडी घेतली ,
"काग्र्याच्युलेशंस !"
बंडोजी धिल्लम मिणमिण हसत म्हणाला ,
"अभिनंदन !!"
गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त नुसताच हसला
लक्षच नव्हते त्याचे .कणाकणाने गहाळ होत जाणारे भान .म्हणजे आपण आपल्या ह्या प्रचंड धान्य गोदामात
एकटेच आहोत .आपल्या एका सहकार्याने दांडी मारली आहे .आणि काम नसल्यामुळे एकजण पसार झाला आहे.
हे सारे तो विसरून गेला होता नि खुर्चीवर सैलपणे पसरून कसलातरी विचार करीत होता कदाचित काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करीत होता
आणि हे करीत असताना अपरिहार्यपणे त्याचे भान गहाळ होत होते.
मग पंधरा सेकंदात त्याला बरेच काही जाणवले हरवलेले भान परत आले. तो मिणमिण हसला मग त्याने धिल्लमकडे पाहत एक डोळा मिचकावला
गालाला मुठभर खड्डा असलेल्या गृहस्ताकडे बघून प्रश्नार्थक चेहरा केला कोर्या चेहऱ्याने कोन्ग्राच्यूलेशन करणाऱ्या गृहस्ताकडे पहिले .विचार टपकला !
गृहस्ताचे टक्कल बरेच बाळसेदार बनत चाललय हात फिरवायला ...ह्या ..आणि हे बडोजी धिल्लम ह्यांनी व्यायाम करायला हवा कमीतकमी योगासने
ह्यांचे म्हणजे दमादम खाणे नि....!!

त्याने तिघांकडे रोखून बघितले .मग हसून गबाळेपणाने म्हणाला ,
कशाबद्दल ...कशाबद्दल अभिनंदन ?
हाताच्या तळव्याएवढे टक्कल असलेला तो धूर्त गृहस्त डोळे विलक्षण बारीक करीत म्हणाला ,
"एस.दि.सराफ आपणच ना?"

तो माफक हसून म्हणाला ,
"माहित नाही बा हरवलाय की काय?"
बंडोजी धिल्लम लुच्चेपणाने म्हणाला ,
"मासिक चाळता चाळता आपले नाव दिसले
मग थांबून हळुवारपणे म्हणाला
"कदाचित ते नाव आपलेच असावे ! आपलेच ना ?-अभिनंदन !
टक्कल असलेला गृहस्त दिलखुलासपणे म्हणाला ,
"अभिनंदन लेखक महाशय ..!!"
गालाला मुठभर खड्डा असलेल्या गृहस्ताने नुस्तीस गालातल्या गालात जीभ घोळ्वली नि हात पुढे केला
अभिनंदन स्वीकारता स्वीकारता तो मिणमिण हसत म्हणाला ,
"बस काय घेणार ? चहा ? कॉफी? ..
तिघांचे रिकामे चेहरे बघून तो हासला म्हणाला ,
"माझ्या तीन मित्रांना मला वाटते चहाच आवडेल ? नाही..?
तिघांनीही एकमेकाकडे आळीपाळीने चोरून बघितले बंडोजी धिल्लमने खिशातून रुमाल काढला
भाळावरचा घाम पुसत म्हणाला ,
ह्या ...काय उकड्तेय ब्वा .....!
करकरीत टक्कल असलेला गृहस्त म्हणाल ,
"मला वाटते शंबर वर्षाचे रेकार्ड तोडलेय घाम नुसता घाम ....!!
गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त नुसताच हसला
ऑफिस प्युनला बोलावून त्याने गोल्ड-स्पोट मागविला .तिघांचेही चेहरे जी भरके जीयोच्या उत्साहाने भळभळून फुलले
गोल्ड स्पोट चवीने पिणं झाल्यावर टक्कल असलेल्या गृहस्ताने खिशातून सिगरेटचे पाकीट काढले .प्रत्येकाच्या
पुढ्यात धरीत म्हणाला
"ह्याव अ सीगार... ?
त्याच्यापुढे जेव्हा पाकीट धरले तेव्हा तो हसून म्हणाला ;
"नो थ्यांक्स ...!!
टक्कल असलेला गृहस्त दचकून म्हणाला ,
नाही ओढत सिगारेट ..? अहो एवढे लिहिता आणि ...जो लिहितो त्याला खाणे पिणे ...ओढणे .अनुभव हवाच काय ..?
बंडोजी धील्लम नाकातून धूर सोडीत म्हणाला ,
"कमीतकमी सिगारेट तरी ?"
टक्कल असलेला गृहस्त ओठाकडे अंगठा करून खाजगी स्वरात म्हणाला ,
म्हणजे हा अनुभव शुन्याच म्हणायचा ....???"
बंडोजी धील्लम जाभाड पसरीत म्हणाला ,
"अरे बाबा ,अनुभव हा हवाच .जाउया एके दिवशी एखाद्या आडवाटेच्या गल्लीत .?बाहेरून सुनसान सामसूम .
अगदी मुठीयेवढी खोली आडवी तिडवी पसरलेली दोन तीन बाकडे .मध्ये कळकट टेबल .त्यावर पडलेला एखादा फुटकां ग्लास
आजूबाजूच्या भिंतीवर हव्या त्यां देवांची साक्षीदार चित्रे ...."
बंडोजी धील्लमने त्याच्याकडे एकदा बघून घेतले .मग हसून म्हणाला ,
"अरे बाबा कोण म्हणतोय प्या म्हणून ?कमीतकमी आमच्या बरोबर तर चला .बघां तिथले वातावरण एखादे सुचले कथानक तर घ्या खिशात घालून ..."
टक्कल असलेल्या गृहस्थाने एक जोरदार झुरका घेतला नि सिगारेटचे थोटूक खाली ठेऊन त्याला बुटाने ठेचून काढीत म्हणाला
काही म्हणा मिस्टर सराफ अनुभव हा हवाच .आता तुमची कथा वाचली तशी बरी आहे .पण तीच वरण भाताची ..!!ह्यात नवीन ते काय ..?
अठराशे सत्तावन पासून हेच घडतंय की राव ?अरे,जरा बाहेर भटका हवे तर फूटपाथच्या कानाकोपर्यावर बसणार्या भिकार्याशी गप्पा मारा
अरे जाम अनुभव मिळतो .नुसतेच विल्यम फोक्नेर काय वाचता ..?

गालाला मुठभर खड्डा असलेला तो गृहस्त काहीसा खिन्नपणे हसला .
मग थोडेसे थांबून विचार करून बोलू लागला ,
"अनुभव काय कोठेही मिळतो .जरासे सावध असा म्हणजे झाले
आता माझ्या गालाचा खड्डा घ्या चांगला मुठभर आहे.पण कोणी कधी विचारलाय का ?-कारे बाबा हा खड्डा कसला आहे.
कमीतकमी लेखक महाशय तुम्हीतरी कधी विचारायचे होते ?नसता मिळाला एखादा अनुभव यैकायाला ?मला वाटते
आपणा सर्वांची ओळख होऊन चार-पाच महिने झाले असावेत आपण ईतके भेटतो बोलतो .तुम्ही फक्त खड्ड्याकडे बघता -
लक्ष असते माझे .-पण काही विचारीत नाही ...!
मग काहीसा थांबून सर्वावरून नजर फिरवून म्हणाला ,
"आतातरी कोणी विचारणार आहे का ?"
त्याने हळूच त्याच्या गालावरच्या खड्ड्याकडे बघितले .मग त्याला जाणवले कीं,तो खड्डा कानाकडे सरकत सरकत कानाकडे उतरला आहे.
बंडोजी धील्लम म्हणाला ,
“कसला ?..कसला खड्डा आहे ?”
टक्कल असलेला गृहस्त हळुवारपणे म्हणाला ,
"कुणाच्या भावना दुखावव्या हे मनात नसल्यामुळे नाही विचारले .!कळेल आता? सांगाल?
तो संथपणे म्हणाला
"कसले ऑपरेशन वगैरे ?"
गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त निर्विकारपणे म्हणाला
" कॅन्सर..!कॅन्सरचे ऑपरेशन ?"
सर्वजण प्रचंड दचकले .सारे वातावरण क्षणभर गोठ्ल्यागात झाले
तो भिजल्या स्वरात म्हणाला ,
"केव्हा ..?कधी झाले ऑपरेशन ?
गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त मिणमिण हसत म्हणाला ,
"दहा वर्षापूर्वी .डाक्टर म्हणतात तू पूर्ण वाचला आहेस .आणि मी अजून जिवंत आहेच की ?"
मग तपशीलवार माहिती सांगून गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त म्हणाला ,
"उजव्या बाजूच्या खालच्या हिरडीला झालेला कॅन्सर कापून काढताना त्याची मुळे खोलवर सरकलेली डाक्टरला दिसली
मुळाचा शोध घेत घेत डाक्तरच्या तेज सूर्या खांद्यापर्यंत येऊन थडकल्या ....!!
एवढे बोलून गालाला मुठभर खड्डा असलेला गृहस्त थांबला मग चटकन त्याने आपल्या शर्टाची बटने सोडवून घेतली नि आपला मोकळा खांदा दाखविला
खांद्यावर ओपेरेशांच्या शिळ्या खुणा अजूनही जिवंत होत्या ...
गालाला मुठभर खड्डा असलेल्या गृहस्ताचा जीवघेणा अनुभव यैकून तो गुदमरून गेला .मग ते तिघे अदृश्य झाले .
ते कधी गेले ,जाताना आपण त्याच्याशी काय बोललो हे त्याला काही केल्या आठवेना ,खुर्चीवर सैलपणे पसरल्यावर
त्याला एकाच जाणीव होत राहिली की आपल्याही जबड्याची हाडे कोणीतरी कापतो आहे आणि आपली गालाला मुठभर खड्डा पडतो आहे ....!!

कथाअनुभव

प्रतिक्रिया

हा.. हा.. हा...
मस्तच लिहीलीय बैठक..
पण तो अंधार्या गल्लीतला अनुभव पण लिहा ना..

गणेशा's picture

22 Dec 2010 - 4:38 pm | गणेशा

बरेच लिखान कमी वाटत आहे ..
आणि लिखान पकड घेत नाहिये असे वाटते आहे ..
नेक्स्ट टाईम तुम्ही जशी कवितेत वातावरण निर्मिती करता तसे लिहा ना ..
तसे एकदम जबरी लिखान होईल ..
आजच मी विचार करत होतो तुम्ही लेख लिहिल्यास ते किती मनाला भावतील ..
लीहा पटकन ... वाट पहात आहे