युगलगीतः मला वाजतीया थंडी

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
16 Dec 2010 - 2:28 pm

युगलगीतः मला वाजतीया थंडी

तो:

ए, मला वाजतीया थंडी, तू आथरून घाल
अग मला वाजतीया थंडी ||धृ||

ती:

आथरून बिथरून उगा काय नको,
तुमच्या अंगात हाय उबदार बंडी

तो:

गारगार वारं सुटलया मरनाचं
हुडहुडी भरलीया माझ्या अंगात
असला गारठा नाय पाहिला जल्मात कधी
अग मला वाजतीया थंडी,
तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||१||

आथरून बिथरून उगा काय नको,
तुमच्या अंगात हाय उबदार बंडी

तो:

कराकरा दात माझं वाजतया
हातावर हात माझं चोळतोया
जवळ ये, अशी दवडू नको संधी
अग मला वाजतीया थंडी,
तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||२||

आथरून बिथरून उगा काय नको,
तुमच्या अंगात हाय उबदार बंडी

तो:

अशी ग तू काय करते ग
सुखाची रात वाया जाईल ग
आनूया तिसरं आपल्या दोघांमधी
अग मला वाजतीया थंडी,
तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||३||

ती:

ईश, काय बी काय बोलताय
लाज बाई मला येतीया
चला वाट तुमची पाहतीया उशी अन गादी ||४||

दोघः
चला पळवूया थंडी, घातल आथरून
चला पळवूया थंडी, घातल आथरून

हु हु हुहुहुहु......हु हु हुहुहुहु

- पाषाणभेद (दगडफोड्या)
१४/१२/२०१०

हास्यकविता

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

16 Dec 2010 - 5:21 pm | प्रकाश घाटपांडे

मस्तच पाभे.
कारभारीन आन कारभारी थंडीत काय करत्यात याच वर्नन.
यक दिवस पाभेच्या कविता कोंबडी पळाली च्या धर्तीवर गाजनार

कराकरा दात माझं वाजतया
हातावर हात माझं चोळतोया
जवळ ये, अशी दवडू नको संधी
अग मला वाजतीया थंडी,
तू आथरून घाल ना, मला वाजतीया थंडी ||२||

संपुर्ण कविताच बेस्ट एकदम ..

शेवटच्या दोन ओळी पण जबराट ..
दोघः
चला पळवूया थंडी, घातल आथरून
चला पळवूया थंडी, घातल आथरून

तुम्ही मराठी सिनेमाच्या एखाद्या प्रोडूसर ला का नाही भेटत?
सिनेकाव्य लिहीण्यात आपला हातखंडा आहे.