हळूच द्या मज झोका कान्हा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
14 Dec 2010 - 5:26 pm

हळूच द्या मज झोका कान्हा

हळूच द्या मज झोका कान्हा
चित्त नाही माझे थारा
हळूच द्या मज झोका कान्हा ||धृ||

मन विचलीत झाले वासनांनी भरले
घुसळोनी लोणी काढूनी घेती
तयाप्रमाणे वासना काढाना ||१||

संसारी राहून पाही जगजेठी
पापपुण्या लावी गाठी
कितीक करावी तुमची आरती
जन्ममरणाचा पाळणा हलवा ना ||३||

- पाषाणभेद (दगडफोड्या)
०४/११/२०१०

शांतरसकविता

प्रतिक्रिया

टारझन's picture

14 Dec 2010 - 5:34 pm | टारझन

लै लवकर उरकलंत ?

गणेशा's picture

14 Dec 2010 - 5:43 pm | गणेशा

संसारी राहून पाही जगजेठी
पापपुण्या लावी गाठी
कितीक करावी तुमची आरती
जन्ममरणाचा पाळणा हलवा ना

छान

संजयशिवाजीरावगडगे's picture

14 Dec 2010 - 8:03 pm | संजयशिवाजीरावगडगे

घुसळोनी लोणी काढूनी घेती
तयाप्रमाणे वासना काढाना
व्वा ! खुपच मस्त !!
लई भारी

अविनाशकुलकर्णी's picture

14 Dec 2010 - 10:14 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त