मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी

देवदत्त's picture
देवदत्त in जनातलं, मनातलं
11 Dec 2010 - 12:25 pm

साधारण २००६ पासून ऐकण्यात असलेली ’मोबाईल नंबर पोर्टेबिलीटी’ सुविधा अखेर २५ नोव्हें २०१० पासून हरियाणामध्ये सुरू झाली. इतर भागांत ती २० जाने २०११ पासून सुरू होईल अशा बातम्या आहेत.

मी ह्या ४ वर्षांत ३ क्रमांक बदलले. पण ह्या सुविधेचा मला फायदा झाला नसता, कारण माझे शहर आणि मोबाईलचे क्षेत्र ह्यांतच बदल होत गेला. आणि सध्यातरी ह्या सेवादात्याकडून एकदम बदलूनच टाकावे अशी काही वाईट सेवा नाही. तरीही ही सुविधा नेमकी कशाप्रकारे वापरता येईल हे पहायचा प्रयत्न केला. त्यात मिळालेली चांगली माहिती तुम्हालाही सांगावी असे वाटले.

मराठीमध्ये तरी ह्याबाबतची माहिती मला मटाच्या संकेतस्थळावरच मिळाली. त्यासोबतच इतरत्र आणखी माहिती शोधायचा प्रयत्न केला.

दूरसंचार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर अर्थातच सर्व सूचना/माहिती आहेच. पण बहुतेक वेळा ती आपल्यासारख्या सर्वांना समजण्यासारख्या सोप्या भाषेत नसते. पण तिकडे पाहिल्यावर भरपूर कळण्यासारखे वाटले ;).

त्या सर्व माहिती/नियम पुस्तिकांचे दुवे.

    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/Backgroundnote.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/87/draftregulation30june09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/89/Regulation23sep09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/90/Regulation20nov09.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/91/MNPRegulation_amendment28jan10.pdf
    * http://www.trai.gov.in/WriteReadData/trai/upload/Regulations/97/MNP_Regulation24nov10.pdf

"मलेशियामध्ये सध्या ही सेवा सुरू असून तेथे अॅक्टीव्हेशन आणि डीअॅक्टिव्हेशनमध्येच अडथळे येत आहेत. त्यामुळेच तेथे ही सेवा यशस्वी झालेली नसल्याचे टेलिकॉम क्षेत्रात ऑडिट आणि सल्लागाराची जबाबदारी पेलत असलेले केपीएमजीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर रोमाल शेट्टी सांगतात."
मटावरील ह्या वाक्यामुळे असे वाटले की फक्त मलेशियातच ही सुविधा सुरू आहे. पण अमेरिका आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया वगैरे देशांमध्येही सुविधा आहे असे ऐकून होते. त्यामुळे संभ्रम झाला. पण मग विकिपिडियावर त्याबाबत दिलेल्या माहितीप्रमाणे ५० पेक्षा अधिक देशांनी आधीच ही सुविधा सुरू केली आहे. विकिपिडियावर अर्थातच नेहमीप्रमाणे सुरेख माहिती दिली आहे.

त्यातूनच मग मला दुसर्‍या संकेतस्थळाचा दुवा मिळाला, जिथे भारतातील मोबाईल नंबर पोर्टेबिलीटीबाबत माहिती आणि सर्वसाधारण किंवा नेहमी पडणार्‍या प्रश्नांची  उत्तरे दिली आहेत.

मटावर तर मुद्देसूद माहिती दिलेलीच आहे. तरीही ज्या काही गोष्टी लिहिल्या नाहीत त्या म्हणजे.

    * सुविधा घेण्याकरीता PORT < NUMBER > असा एसएमएस १९०० ह्या क्रमांकावर पाठवायचा आहे. उदा. PORT 9812345678
    * जुन्या प्रिपेड कार्डची उरलेली रक्कम नवीन कार्डवर नेता येणार नाही.
    * जुन्या कंपनीचे सिम कार्ड नवीन कंपनीच्या क्रमांकावर वापरता येणार नाही. नवीन कंपनीचे सिम कार्डच वापरावे लागेल.

सुरूवातीला असे वाटत होते की पोर्टेबिलीटीचा दर एवढा नको आणि प्रक्रिया अशी किचकट नको की त्यापेक्षा ती सुविधा न घेणेच बरे. पण प्रक्रिया ही सोपी आहे आणि दूरसंचार मंत्रालयाच्या पुस्तिकेत दिल्याप्रमाणे १९ रू हा दर खालील प्रमाणे ठरविण्यात आला आहे.

तपशील

एकक

रक्कम

एकूण खर्च

दशलक्ष रू

२३२०.४७

सरासरी सेवादाता बदल (पोर्टींग)

दशलक्ष  

१२३.२६

प्रत्येक बदलाचा खर्च  

रू.

१८.८३

लायसन्स फी @१%

रू.

०.१९

प्रत्येक बदलास एकूण खर्च

रू.

१९.०२

जवळील ठोकळ संख्येत खर्च

रू.

१९.००

म्हणजे १२३ दशलक्ष क्रमांकांचे लोक स्वत:च्या सेवादात्यावर खुष नाहीत/नसतील. तरीही सेवादाता आपली सुविधा सुधारण्यास तयार नव्हते?

सध्यातरी एवढी माहिती पुरे. आपल्या भागात ही सुविधा सुरू करेपर्यंत ह्या प्रक्रियेत बदल न करोत अशी आशा. :)

तंत्रबातमीमाहिती

प्रतिक्रिया

ह्या मूळे ? जरा वाइच जास्ती म्हायती ध्याना भाऊ....... इथच

विजुभाऊ's picture

11 Dec 2010 - 2:27 pm | विजुभाऊ

मी इकडे तिकडे फिरत असतो. महाराष्ट्र , मुम्बै ( हो टेलीकॉम सेवादात्यांसाठी मुम्बै स्वतन्त्र विभाग आहे ) कर्नाटक , तमीळनाडू हैदराबाद वगैरे. मोबाईल पोर्टेबलेटीचा मला काय फायदा होईल.
माझा नंबर न बदलतासुद्धा सेवादाता बदलता येईल का? तसे झाल्यास रोमिंग ही संकल्पना संपेल

नितिन थत्ते's picture

11 Dec 2010 - 2:29 pm | नितिन थत्ते
परिकथेतील राजकुमार's picture

11 Dec 2010 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

धन्यवाद. खुपच उपयुक्त माहिती.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 6:39 pm | निनाद मुक्काम प...

शायानिग इंडिया
येत्या काही वर्षात भारतातील शहरातील जनता जगातील सर्वात जास्त टेक्नो सेवी असणार (एक अनिवासी भारतीय म्हणून परदेशात आपली कॉलर ताठ )विजेचा प्रश्न (निदान महारष्ट्र पुरता २०१२ ला संपणार ह्या आश्वासनावर विसंबून )

वेताळ's picture

11 Dec 2010 - 6:44 pm | वेताळ

तुम्ही तुमची सही आता बदलली तरी चालेल.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 7:59 pm | निनाद मुक्काम प...

जशी आपली मर्जी

नीलकांत's picture

12 Dec 2010 - 11:28 am | नीलकांत

येत्या काळात ही सेवा महाराष्ट्रात सुरू होईल. त्याबाबत असा लेख खासच आहे. भारतातील एवढ्या मोठ्या ग्राहक वर्गाचा सेवाबदल सांभाळणारा कुणीतरी एक सर्व्हर असेल का?

यापुर्वी कसं व्हायचं ते माहिती नाही मात्र एखादा नंबर पाहिल्यावर त्याच्या सेवादात्याबद्दल अंदाज बांधता यायचा. आता ते शक्य होणार नाही कुणी ९४२२१२३४५६ असा क्रमांक आता युनिनॉरचा सुध्दा असू शकेल.

यासेवे बाबत सध्यातरी आयडीयाच्या जाहिराती दिसताहेत. बाकी सेवादाते याबाबत जास्त उत्सुक दिसत नाहीयेत.

- नीलकांत