एकास तीन

अवलिया's picture
अवलिया in जे न देखे रवी...
8 Dec 2010 - 2:21 pm

आमची कंपनी
पर्यावरणाविषयी अत्यंत जागरुक असल्याने
प्रत्येक तोडलेल्या झाडाच्या बदल्यात तीन तीन झाडे
आम्ही लावली असुन कायद्याचे पालन
करण्यात कोणतीही कसुर केलेली नाही
आणि पर्यावरणाचे नुकसान होऊ नये
याची आम्ही दक्षता घेत आहोत

पावडरचे थर थापलेली हसतमुख
तोकड्या स्कर्ट बाह्या घातलेली बाहुली
मान वेळावुन वेळावुन
पत्रकार परिषदेत सांगत होती
आणि
एलसीडी प्रोजेक्टरवर दाखवत होती
कंपनीच्या एमडीच्या हस्ते केलेल्या वृक्षारोपणाचे फोटो
केलेल्या खर्चाचा हिशोब
एकाला तीन झाडे
घातलेले किलोलीटर पाणी
इतके टन शेणखत वगैरे..

निर्विकार मनाने पत्रकार
उतरवुन घेत होते कागदावर
किंवा रेकॉर्ड करत होते मोबाईलवर
दुसर्‍या दिवशी छापुन आणण्यासाठी
वगैरे इत्यादी

हीच पीआर
अशाच पद्धतीने
एक दिवस
हसतमुखाने सांगेल....
विस्थापित करावी लागु नये म्हणुन काही माणसे मारली पण काळजी नको एकास तीन याच प्रमाणात जन्मास घातली आहेत !

समाजजीवनमान

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

8 Dec 2010 - 2:26 pm | मदनबाण

ह्म्म्म...
कितीही माणसे मेली तरी
गंगा आरती करत राहु...
बॉम्ब स्फोट कितीही झाले तरी
असेच पोटार्थी जगतं राहु...

छोटा डॉन's picture

8 Dec 2010 - 2:28 pm | छोटा डॉन

:)

- छोटा डॉन

गवि's picture

8 Dec 2010 - 2:29 pm | गवि

ग्रेट..

नगरीनिरंजन's picture

8 Dec 2010 - 2:30 pm | नगरीनिरंजन

भेदक मुक्तक!!
काय बोलणार?

शिल्पा ब's picture

11 Dec 2010 - 3:48 am | शिल्पा ब

असेच म्हणेन...स्वाक्षरीसकट ..

sneharani's picture

8 Dec 2010 - 2:30 pm | sneharani

:)

परिकथेतील राजकुमार's picture

8 Dec 2010 - 2:34 pm | परिकथेतील राजकुमार

जबर्‍या !!

गणपा's picture

8 Dec 2010 - 2:38 pm | गणपा

मुक्तकाव्य आवडले.

प्रकाश१११'s picture

8 Dec 2010 - 3:37 pm | प्रकाश१११

मुक्त काव्य आणि विचार दोन्ही आवडले मनापासून !!

स्पंदना's picture

8 Dec 2010 - 6:13 pm | स्पंदना

अवलिया!

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

11 Dec 2010 - 3:39 am | निनाद मुक्काम प...

@विस्थापित करावी लागु नये म्हणुन काही माणसे मारली पण काळजी नको एकास तीन याच प्रमाणात जन्मास घातली आहेत !
क्या बात हे
काळजाला चटका लावणारे वाक्य आहे

बेसनलाडू's picture

11 Dec 2010 - 4:28 am | बेसनलाडू

शेवट भेदक!
(वाचक)बेसनलाडू

गंगाधर मुटे's picture

11 Jan 2011 - 7:25 pm | गंगाधर मुटे

हीच पीआर
अशाच पद्धतीने
एक दिवस
हसतमुखाने सांगेल....
विस्थापित करावी लागु नये म्हणुन काही माणसे मारली पण काळजी नको एकास तीन याच प्रमाणात जन्मास घातली आहेत !

आणि त्यावर टाळ्याही पडतील. बोचरे वास्तव.