जुनिपर बॉन्साय आणि माझी मला नव्याने ओळख

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
6 Dec 2010 - 12:36 am

दर वर्षी प्रमाणे, या म्हणजे डिसेंबर महीन्यात ऑफीसमध्ये नाताळ पार्टीचे आयोजन केले आहे. नाताळ म्हटले की एकमेकांना भेटवस्तू देणे आलेच. यावर्षीदेखील, "व्हाईट एलीफंट" हा खेळ आम्ही खेळणार आहोत.यामध्ये प्रत्येक जण आणलेली भेटवस्तू एका मेजावर ठेवतो. मग सगळ्यांना क्रमांकाच्या चिठ्ठ्या वाटल्या जातात आणि अनुक्रमे प्रत्येक जण जाऊन भेटवस्तू उघडतो. २ नंबरपासून २ पर्याय उपलब्ध असतात - (१) नवीन भेटवस्तू उघडणे किंवा (२) आधी उघडलेल्या भेटवस्तूची मागणी करणे. यावर्षी आम्ही खूप कमी बजेट ठेवलं आहे - फक्त $७. या बजेट्मध्ये कल्पकता, हुषारी, घासाघीस कौशल्य दाखवून घसघशीत आणि नावीन्यपूर्ण भेटवस्तू आपल्याकडून आणणे ही एक कसोटीच असते.
मी जुनिपर वृक्षाचे एक बॉन्साय खूप घासाघीस करून मिळवले आहे. पण गंमत म्हणजे हा चिमुकला पण डेरेदार वृक्ष घरात ठेवल्यानंतर मलाच त्याचा इतका लळा लागला आहे की सांगता सोय नाही. हा रात्री मलूल होऊन लहान बाळासारखा झोपी जातो. तर सकाळी माझ्या आधी ताजातवाना उठून मला "सुप्रभात" करतो. सकाळी अफलातून टवटवीत दिसतो.
या पार्टीमध्ये मला स्वतःला नीर्जीव वस्तूपेक्षा एखादं रोपटं भेट मिळालेलं आवडेल. पण माझ्यासारखा विचार नक्कीच सगळेजण करत नसणार. त्यामुळे मी विचार करते आहे की हा चिमुकला वृक्ष मी भेट म्हणून देतच नाही. कारण ज्याला तो मिळेल तो त्याची नीट निगा राखेल की नाही कोणास ठाऊक :( .
एक मात्र नक्की दुसर्‍याला भेट द्यायच्या निमित्ताने मला माझीच एक नवी बाजू दिसली. खरच नवनवीन गोष्टी मुद्दाम, प्रयत्नपूर्वक करत राहील्या पाहीजेत ज्याला इंग्रजीत "कनेक्टींग द डॉटस" असं म्हणतात. आपल्याला आपली नव्याने ओळख होते.

नोकरीअनुभव

प्रतिक्रिया

छान छोटे लेखन.
नेहमी वेगळ्या गोष्टी करायला हव्यात नाहीतर कंटाळा येतो.
मी तर आजकाल थंडीत ग्रोसरीला जायला कंटाळते मग जाडजूड कोट घालून, गाडी वेगळ्या ठिकाणी पार्क करून, चालत जाते. तेवढाच बदल.
तुझ्य या बॉन्सायचा फोटो टाकला असतास तर आम्हालाही बघायला मिळाले असते.

अगं रेवती, माझ्याकडे कॅमेरा नाही. खरच वृक्ष आहे चिमुकला. आणि चैतन्यमय, सतेज. त्या बाईने मला काही निगा राखण्याचे नियमदेखील सांगीतले आहेत. जसे दिवसातून ४ तास सूर्यप्रकाश लागतो वगैरे. मी टेक्सास ला असल्याने अद्याप तरी सूर्यप्रकाश भरपूर :)
तू चालत जातेस ते छान करतेस.

मला बोन्साय हा प्रकार फारसा आवडत नाही.
एखाद्या झाडाच्या/ रोपाच्या खोडास/ मुळास तांब्याची तार घट्ट गुन्डाळून त्याची वाढ कृत्रिमरित्या खुंटवतात असे ऐकले/ पाहिले आहे.

शुचि's picture

6 Dec 2010 - 6:39 am | शुचि

माझे बाबा खूप सुंदर बॉन्साय करतात. लहान १० -१२ संत्री लगडलेली १ फूटाची झाडे घरी आहेत.
माझ्या आईला ते आवडत नाही. तिचे देखील हेच म्हणणे आहे की एखाद्या झाडाची वाढ अशी दु:खद रीतीने खुंटविणे फार भूषणास्पद नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. मूळांना तारा बांधतात. :(

शिल्पा ब's picture

6 Dec 2010 - 8:04 am | शिल्पा ब

माझा काका फोरेस्टात ऑफिसर आहे...त्याच्याकडे असले बरेच बोन्साय बघितले आहेत...अगदी मोठ्ठा घेर असणारे प्रचंड वृक्ष यांचे बोन्साय पण होते...फळांनी लगडलेले झाड वगैरे पण होते...
किती छान दिसत असले तरी हा एक प्रकारचा क्रूरपणाच आहे असं वाटतं.

बाकी मुक्तक छान.

मी पारिजातकाचे बोन्साय करायचा प्रयत्न केला होता... अनेकवेळा त्याची मूळे कापावी लागत.
नंतर नंतर अशी झाडाची नैसर्गिक वाढ नियंत्रित करणे अयोग्य वाटल्याने,तो उद्योग सोडुन दिला.

स्पंदना's picture

6 Dec 2010 - 4:07 pm | स्पंदना

>>हा रात्री मलूल होऊन लहान बाळासारखा झोपी जातो. तर सकाळी माझ्या आधी ताजातवाना उठून मला "सुप्रभात" करतो. सकाळी अफलातून टवटवीत दिसतो.>>

शुची गुंतलीयस तु! नको देउ भेट म्हणुन.

परिकथेतील राजकुमार's picture

6 Dec 2010 - 4:10 pm | परिकथेतील राजकुमार

लेख वाचलेला आहे. आवडलेला आहे .

शुचि मामीला भेट म्हणुन आजची ही स्वच्छ प्रतिक्रीया ;)

रन्गराव's picture

6 Dec 2010 - 7:54 pm | रन्गराव

एकिकडे त्या झाडाची काळजी आहे म्हणताय दुसरीकड त्याला पाहिजे तस वाढू देत नाही. खरं सांगायच झालं तर त्याच अस खुंटण तुम्हाला आवडत. तो मेला तर तो आनंद तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे त्याला जपण्याच्या नावाखाली स्वतःच्या आनंदाची काळजी घेताय. लळा लागण आणि पझेसिव्ह असण ह्यात फरक आहे. त्याची खरच काळजी असेल तर त्याला खोलीतून काढून आंगणात आणा, मुळांच्या तारा काढून टाका. तुम्हाला त्याची काळजी तिथही घेता येइल. तिथ जगेल का नाही हे माहित नाही, पण जितके दिवस राहील तेवढा सुखी राहील. आणि खरच काहीही करून जगवायच असेल बोटॅनिस्ट काही कमी नाहीत अमेरिकेत. आणि हे सर्व केल्यावर तुमची तुम्हाला अजून एक ओळख पटेल,

जर वरील सर्व आवडल/पटल नाही तर त्या झाडाच्या जागी तुमच्या मुलीला ठेवून बघा. ती जर पाच वर्षाचीच गोड दिसते आणि समजा वय फ्रिझ करण्याचं तंत्र उपल्ब्ध आहेत अस मानुयात. म्हणून तिच वय फ्रिझ कराल का तुम्ही? तुमच्या लेखाची अ‍ॅनालोजी वापरून, तुम्हीच तिची काळजी घेवू शकता, उद्या मोठी होवून घरातून बाहेर पड्ल्यावर काय होणार नाही तिचं? :(

मी विचार करते आहे माळ्याला सांगून ते रोप रुजवायचा. मी दुसर्‍या मजल्यावर रहाते. पण माळी ते रोप अंगणात लावू शकेल आमच्या अपार्टमेंट्च्या. मलाही खूप वाईट वाटतं आहे.

वाचून खरच खूप आनंद झाला. मला माहिती होतं की तुम्ही माझ्या क्रूर भाषेतील प्रतिसादाचा राग माननार नाही आणि योग्य तीच गोष्ट कराल. म्हणून इतका मोठा प्रतिसाद लिहायची तसदी घेतली. ही खरी तुमच्या मोठेपणाची ओळख आहे. अभिनंदन :)

इंटरनेटस्नेही's picture

6 Dec 2010 - 8:33 pm | इंटरनेटस्नेही

मस्त लेख! आवडला.. काही प्रतिसादकांच्या क्रुरते बाबत मताशी देखील बर्‍याच अंशी सहमत!

प्रियाली's picture

6 Dec 2010 - 8:38 pm | प्रियाली

बागेतल्या झाडावरची भाजी किंवा फळे तोडताना त्या झाडाला किती वेदना होत असतील नाही. आता इथे तुमच्या मुलांना उभे करा. त्यांचे हात, पाय तोडा म्हणजे त्या वेदनेची अनुभूती तुम्हाला येईल आणि ती आली की भाजी, फळे वगैरे खाणे तुम्ही आपसूक बंद कराल.

दाणे भिजत घालून त्याला मोड आले की त्यात जीव जगतो असे काही म्हणतात. ते लहान अर्भक उकडून, शिजवून खाणे म्हणजे किती क्रौर्य. कोंबडी, मटण, मासे यांच्याबद्दल न बोललेले बरे. फक्त तिथे तुमच्या मुलीला उभे करा म्हणजे झाले.

कुत्र्यांचे (विशेषतः कुत्रीचे स्पेइंग केले जाते, त्यामुळे पिल्लावळ होत नाही) असे करणारे अनेक आहेत. ते आपल्या मुलांना डोळ्यासमोर उभे करत असावेत. किंवा हे उदाहरण सोडून द्या. साधे उदाहरण घेऊ, सीडलेस द्राक्षे, कलिंगडे आवडतात का? आता तुमच्या मुलांना सीडलेस करून वाढवले तर कसे वाटेल?

----

कोंबड्या खाणारे आणि फळे खाणारे स्वतः त्या कोंबड्या मारत नसतील किंवा फळे तोडत नसतील किंवा असतीलही. जे स्वतः प्राणी मारतात त्यांना त्यात क्रौर्य वाटत असेलच असे नाही. किंवा एखाद्याला ते तसे वाटू शकते. हा व्यक्तिगत मामला आहे. त्यासाठी आपल्या पोरांना समोर उभे वगैरे करायची गरज नाही.

तुम्हाला पटत असेल तर बोन्साय करा किंवा करू नका. हा तुमच्या आवडीनिवडीचा प्रश्न आहे. ज्या क्रौर्याचा वर विचार सुरु आहे तसे क्रौर्य माणूस अनेकदा दाखवतो त्यासाठी स्वतःला अपराधी मानणे सोडून द्या.

१००% सहमत.
आधी हे वाचल असत तर खालचा प्रतिसाद टंकायचे परिश्रम वाचले असते. :)

रन्गराव's picture

6 Dec 2010 - 10:06 pm | रन्गराव

>>बागेतल्या झाडावरची भाजी किंवा फळे तोडताना त्या झाडाला किती वेदना होत असतील नाही.

तरीच काल रात्री चांदण्या दिसत नव्ह्त्या आभाळात. मला उगाचाच शाळेत शिकवल होत अमावस्या असल्यामुळं दिसत न्हायती म्हणून. आता उमजलं कुठ गेलत्या ते. ;)
असो एक मुद्दा इसरलात. भाजीची शेती ही मला भाजीचा लळा लागलाय म्हणून मी ती शेतात लावली आहे अस म्हणणारा शेतकरी अजून दिसला नाही. फरक लक्षात आला का मुळ लेखामागची लेखिकेची भावना आणि तुम्ही त्याची केलेली गफलत ह्यातला?

आणि मी अजून स्वतंत्र प्राणी आहे त्यामूळं हात पाय तोडायला पोरं बाळं न्हायती. पर तुमी एवढ प्रेमान सांगताय म्हंटल्यावर प्रयोग करायच पायजे. तुमचीच असत्याल तर द्या धाडून. अन ती नसत्याल तर तुमीच या. तुमचं हात पाय तोडून बघतो. मग भावना का कोण ती येत्या का बघू. काळजी करू नका तोडलेले हातपाय वाया जाणार न्हायती. परवाच एक मैतर म्हनला, आपण कोंबड आन बोकाड कापून खातो मग माणूस का नाय? त्यो आन मी मिळून चांगल मटण बनिवतो गरम मसाला घालून. नाय म्हणजे एका दणक्यात तुमचा प्रयोग होईल आन आमचाबी.
बर आमी अस एक बघून हाय, झाडाच फळ तोडल तरी परत नवीन येतय. मानसाच बी तसच असल नाय? आमी काय ईज्ञान का काय म्हणताय ते शिकल्यालो नाय. तुमी लई शिकलायसा. आकाशातल. तारं तुमाला पायजे तिथ नेतायसा. त्यामुळा तुमासनी माहिती असनार.

प्रियाली's picture

6 Dec 2010 - 10:21 pm | प्रियाली

मी शेतकर्‍याबद्दल काहीच लिहिलेलं नाही. बागेतल्या असे लिहिले आहे. ती स्वतःची बागही असू शकते आणि लोक प्रेमाने झाडे वाढवतात आणि फळे, भाजी तोडून खातात.

बाकी, आपण जे उर्वरीत लिहिले आहे ते अनावश्यक आहेत. माझा प्रतिसाद लेखिकेला आहे. आपल्याला नाही. तेव्हा स्वतःचे महत्त्व वाढवून घेऊ नका.

गणपा's picture

6 Dec 2010 - 8:56 pm | गणपा

लेख आवडला.
काहींच्या मते बोन्साय करणे क्रुर आहे.
व्यक्तीशः मला बोन्साय आवडतात. (कुणी कितीही इमोशनल ब्लॅकमेल केल तरी) ;)
सगळ्यांनाच प्रशस्त अंगण/परस उपलब्ध असतोच अस नाही.
जेव्हा कुंड्यांतुन फुलझाडं, शोभेचीझाडं लावता तेव्हा एक प्रकारे एवढ्याश्या जागेत त्यांच्यावर पण अन्याय होतोच ना? पण म्हणुन फुलझाडं शोभेची झाडं लावाणार्‍यांवर कुणी आक्षेप नाही घेत.
सिमेंटच्या जंगलात जर कुणी घरात चार झाड लावत असेल तर मला त्यात काही वावग वाटत नाही. मग ते बोन्साय का असेना.

सद्ध्या काही धागे अन त्यावरचे प्रतिसाद पाहुन मिपावर आलोय की माबोवर असा संभ्रम पडु लागला आहे. (आता लोक रडतील, ह्याची तुलना त्याच्याशी करणे किती क्रुर आहे वगैरे, साली ही इमोशनल सिस्टीम फार माजलीए सद्ध्या, काय म्हंता गुर्जी? ;-) )

इंटरनेटस्नेही's picture

8 Dec 2010 - 1:19 am | इंटरनेटस्नेही

साली ही इमोशनल सिस्टीम फार माजलीए

=)) =)) =)) =))

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

10 Dec 2010 - 2:40 am | निनाद मुक्काम प...

बोन्साय करणे हि शुध्द विकृती आहे .
मनुष्याने वा ह्या जगातील कोणत्याही जीवाने स्वताला जगवण्यासाठी त्याला जे जमेल व पचेल ते खाणे हा नैसर्गिक स्थायीभाव आहे .पण स्वताच्या नेत्रसुखासाठी एखाद्या जीवाची वाढ रोखणे व त्यास अनैसर्गिक रूप देण्यात आनंद मानणे हि विकृती आहे .
एखादा उच्च शिक्षित माणूस वा युवती जर खुजी असेल (सर्कशीतल्या विदुषका एवढी )तर त्यांच्याशी कोणी सामान्य उंचीचा लग्न करतो का ?(सहजा सहजी )
मला स्मिता तैंचा चौकट राजा व त्यातील बोन्साय चा प्रसंग बालवयात चटका लावून गेला
हे बोन्साय इतर सामान्य झाड पाहून म्हणत असतील
मी असा कसा असा कसा
वेगळा वेगळा
येथे इमोशनल होत नाही आहे मी .स्वताच्या जगण्यासाठी दुसर्याला मारणे (मग वनस्पती व प्राणी आले ) हे नैसर्गिक साखळीच आहे (शाळेत शिकलो होतो हि साखळी )
स्वताच्या नेत्रसुखासाठी एखाद्याची वाढ जाणीवपूर्वक थांबवणे हे कधीच शम्य नाही .

शुचिताईंनी बोन्साय कुंडीतून काढून बाहेर लावले हे छान. कोणी आत ठेवेल तर तेही छान. शुचिताईंचे वडील सुंदर बॉन्साय करतात, तर त्यांच्या कौशल्याचे कौतूकच वाटते. उगाच काहीबाही निरर्थक सांगून कोणी त्यांच्या वडलांच्या छंदाबद्दल शुचिताईंच्या मनात कडवटपणा का कालवावा?

भावनांवर दडपण आणायचे हे प्रकार म्हणजे काहीच्याकाही - असे मी का म्हणतो आहे? हो ना - एखादी क्रूर कृती थांबवण्यासाठी भावनिक दडपण आणणे ठीक असू शकते.

"दृष्टिसुखासाठी वनस्पतीची जाणीवपूर्वक थांबवणे क्षम्य नाही" हा नैतिक नियम सांगून मग फक्त बोन्सायलाच लागू करणे फारच विचित्र आहे. कित्येक लोक आंगणात शोभेचे गवत लावतात - ("लॉन" म्हणून) - आणि दर आठवड्या-दोन आठवड्यांनी वाढले की कापतात. शनिवार वाड्यातल्या उद्यानातही असे गालिचासारखे सुंदर गवत मी बघून माझी दृष्टी सुखावलेली आठवते. हा गवताची वाढ खुंटवण्याचा अक्षम्य प्रकार मानल्याबद्दल चळवळ कुठे दिसून येत नाही.

जे लोक गुलाबांची निगा राखतात, ते अधूनमधून गुलाबाच्या झुडुपाच्या फांद्या खुडतात. खुडलेली रोपे जोमाने वाढतात, त्यांना जास्त फुले येतात... वगैरे. मग हे लोक झुडपे खुडतात ते दृष्टिसुखासाठीच ना? काय वाईट करतात? गुलाब माळ्यांच्या विरोधात मी नाहीच, पण वरील "बोन्साय-क्रूर-वादी" लोक तरी असा विरोध करतात का?

बगीचामध्ये फुलांचे वेल कधी कमानीवरती चढवतात, ते तुम्ही बघितले असेलच. वेल कमान सोडून इतस्ततः वाढला तर माळी त्याला पसरू देत नाही, पसारा कापतात. म्हणजे पुन्हा दृष्टिसुखासाठी वाढ खुंटवलीच ना?

जर वरील भावनिक दडपणकार गवत कापणे अक्षम्य मानत असतील, गुलाबाचे झुडूप खुडणे अक्षम्य मानत असतील, वेलींचा पसारा आवरणे अक्षम्य मानत असतील, तर मग त्यांनी बोन्सायला अक्षम्य मानावे. त्यांचे तत्त्व अंतर्गत सुसंगत तरी आहे. पण गवत-झुडपे-वेली कापणे क्षम्य मानत असतील, तर त्यांचा "दृष्टिसुखासाठी खुंटवण्याबद्दल" विसंगत नैतिक नियम बाद करून टाकायला पाहिजे. आणि तो नैतिक नियम बाद झाला, तर लोकांवर भावनिक दडपण आणायचा त्यांच्यापाशी कुठलाच अधिकार उरत नाही.

"बॉन्साय"चा खुजेपणाशी संबंध मराठीत जसा ऐकला आहे, तसा अन्य भाषांत ऐकलेला नाही. मराठीतही हा केवळ काव्यालंकार आहे. याचे भान सुटून कसे चालेल? काही लोक बोन्साय बागायतीला खरोखरच क्रूर मानू लागले, हा त्या काव्यालंकाराचा अतिशय विकृत परिणाम म्हटला पाहिजे.

उद्या "कमळासारखे डोळे" ही उपमा ऐकून कोणी असे केले तर : दृष्टिसुखासाठी कमळे तोडून माळणारी माळीण "तळ्याचे डोळे उचकटून त्याला आंधळे करते..." असा आक्रोश कोणी करू लागेल. तसे करू नये.

पंगा's picture

10 Dec 2010 - 7:16 am | पंगा

"दृष्टिसुखासाठी वनस्पतीची जाणीवपूर्वक थांबवणे क्षम्य नाही" हा नैतिक नियम सांगून मग फक्त बोन्सायलाच लागू करणे फारच विचित्र आहे. कित्येक लोक आंगणात शोभेचे गवत लावतात - ("लॉन" म्हणून) - आणि दर आठवड्या-दोन आठवड्यांनी वाढले की कापतात. शनिवार वाड्यातल्या उद्यानातही असे गालिचासारखे सुंदर गवत मी बघून माझी दृष्टी सुखावलेली आठवते. हा गवताची वाढ खुंटवण्याचा अक्षम्य प्रकार मानल्याबद्दल चळवळ कुठे दिसून येत नाही.

खरे आहे.

तसे (इतरांच्या) दृष्टिसुखासाठी मी अधूनमधून (चाळिशीत पिकून पांढरे झाले तरीही अमर्याद वाढणार्‍या) माझ्या केसांनाही कापतो. (इतरांची दृष्टी त्याने खरोखरच सुखावते की नाही ते इतरच जाणोत.)

पूर्वी 'हे अनैसर्गिक आहे' हे विचार मला खात असत; आता विचार करायचा कंटाळा करतो. (वेल, डिपेंड्स... कधी केस कापायचा कंटाळा करतो तर कधी विचार करायचा कंटाळा करतो. केस कापायचा कंटाळा केला तर केस न कापल्याने मन खात नाही; विचार करायचा कंटाळा केला तर विचार न केल्याने मन खात नाही.) परिणामी झोप छान लागते.

थोडक्यात, एक तर केस तरी कापू नयेत किंवा विचार तरी करू नये. (बोन्सायचेही असेच असावे का?)

शिल्पा ब's picture

10 Dec 2010 - 7:30 am | शिल्पा ब

तुम्ही केस कापा नाहीतर नका कापू अन रंगवायचे तर रंगवा पण आम्हाला नका सांगू...अशा गोष्टींचा (झालाच तर ) तुमच्या बायकोला त्रास/आनंद किंवा अजून काय व्हायचं ते होईल...
झाडांचं मात्र कापा/ वाढवा, बोन्साय करा किंवा नका करू किंवा झाडं लावा नाहीतर नका लावू याचातील एकाचा पर्यावरणासाठी चांगला तर एकाचा विपरीत परिणाम होतो...

उपास's picture

10 Dec 2010 - 6:14 am | उपास

बोन्साय म्हटला की मला 'चौकट राजा' आठवतो.. आणि मग वड, पिंपळासारखे डेरेदार वृक्ष असे टीपॉय वर खुजलेले मनाला चटका लावून जातात.. बरोबर असेलही बोन्साय करणार्‍यांच पण मला व्यक्तिशः बघवत नाहीत.. :(
शुचि, फोटो नक्की टाक.. तुझ्याकडचा नसेल तर जालावरचा..