तुला आपलेसे करावे किती ?
जगावे किती ? मी ! मरावे किती ?
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
तुझी याद येते ! तसा तोल जातो
सावरून मी ! वावरावे किती ?
ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
चांदणे सारखे आज जाळू पहाते
तुझे आज नसणे स्मरावे किती ?
मिठी दे युगांची ! धुके दूर सारु
फुलांनीच दव पांघरावे किती ?
तुला "मी "- मला "तू" - मला "तू" - तूला "मी"
परक्या परी -हे झुरावे किती ?
मयुरेश साने...दि.०५-डिसेंबर-१०
प्रतिक्रिया
6 Dec 2010 - 12:46 pm | पियुशा
सुन्दर लिहिलिय
6 Dec 2010 - 4:01 pm | मदनबाण
छान...
6 Dec 2010 - 10:33 pm | राजेश घासकडवी
कविता चांगली आहे. लिहीत रहा.
मिठी दे युगांची ! धुके दूर सारु
फुलांनीच दव पांघरावे किती ?
इथे मला
मिठी दे, युगांचे धुके दूर सारु
अधिक आवडलं असतं.
6 Dec 2010 - 10:47 pm | प्राजु
ते "कुबेरास- लक्ष्मीस" घेऊन आले
लिलावात माझ्या ! हरावे किती ?
थोडे संदिग्ध वाटते आहे.
कविता आवडली. गझल असे नाही म्हणणार कारण, थोडी वृत्ताची गडबड वाटते आहे.
किनाराच मी ! भरती ओहटिचा
बुडावे किती ? मी ! तरावे किती ?
तू जवळून जाता ! मनी बाग फुलते
तू खुडावे ! मी ! मोहरावे किती ?
हे छान!