मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
5 Dec 2010 - 11:18 am

मरण्यात अर्थ नाही

.

संवेदनेत आता, जगण्यात अर्थ नाही
जाळून या मनाला, सजण्यात अर्थ नाही

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

गंगाधर मुटे
.....................................................

वीररसकवितागझल

प्रतिक्रिया

अवलिया's picture

5 Dec 2010 - 11:20 am | अवलिया

क्या बात है ! सुरेख !!

राघव's picture

5 Dec 2010 - 12:35 pm | राघव

अगदी अस्सेच म्हणतो!
प्रत्येक शेर ख ण ख णी त!! क्लास. :)

स्वानन्द's picture

5 Dec 2010 - 12:46 pm | स्वानन्द

वा वा मस्तच!

कवितांच्या सहसा वाटेला न जाणारा मी चुकून इथे आलो आणी थक्क झालो. मस्तच.
खूप छान लिहीले आहे. पुलेशु.

मयुरेश साने's picture

5 Dec 2010 - 1:15 pm | मयुरेश साने

हो अभय एकदाचा, निश्चिंत निश्चयाने
ऐसे क्षणाक्षणाला, मरण्यात अर्थ नाही

क्या बात ...लाजवाब ..प्रत्येक शेर अस्खलित..बहारदार..

शिल्पा ब's picture

5 Dec 2010 - 1:22 pm | शिल्पा ब

मस्त...
थोडी थट्टा करावी म्हणुन उघडला धागा पण.. ;)

प्रत्येक शेर छान..आवडली कविता.

आहे दिले तुला मी, आयुष्य दान माझे
आता वळून मागे, बघण्यात अर्थ नाही

सुंदर...

ही खिंड राखताना, मृत्यूसवे लढावे
जखमांस घाबरोनी, पळण्यात अर्थ नाही

अ प्र ति म . . . :)

गंगाधर मुटे's picture

6 Dec 2010 - 7:16 am | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल आभारी आहे सर्वांचा. :)

sneharani's picture

6 Dec 2010 - 12:18 pm | sneharani

अगदी मस्त गझल.
सुरेख!!

यशोधरा's picture

6 Dec 2010 - 12:23 pm | यशोधरा

ते भाग्यवंत थोडे, शिखरास गाठती जे
आता पुढेच जावे, हटण्यात अर्थ नाही

सुरेख.

व्वा !! वीररस कसा ओसांडुन वाहत आहे .. :) मस्त हो गमु.

अवांतर : कवितेचे नाव "मारण्यात अर्थ नाही"असं चुकुन वाचलं .. पण नंतर चुक उमगली ... मग नंतर याचं विडंबण होऊ शकतं असं वाटलं .. पण पुन्हा चुक उमगली की मारण्यात काही अर्थ नाही :)

- कवितक कुरुजी