अंधारयुगी हरविलेले
अंधुक संकेतचिन्हे
घंटेच्या निनादात
विखुरलेले शब्दथवे
भग्न शिवालय
अंधार्या कपारी
सांध्यसंध्या उभी
एकटीच दूरवरी
मनभृंग पोखरे
विचारांच्या भिंती
छ्प्पर हरविलेले
घरटे विराण रडती
अंतरीचे दाटता धुके
भासांची स्मरणे मागे
दग्ध भाव निर्मिते
मायेचे सोवळे धागे
-------- शब्दमेघ
प्रतिक्रिया
1 Dec 2010 - 4:20 pm | प्रकाश१११
अंधारयुगी हरविलेले
अंधुक संकेतचिन्हे
घंटेच्या निनादात
विखुरलेले शब्दथवे
भग्न शिवालय
अंधार्या कपारी
सांध्यसंध्या उभी
एकटीच दूरवरी
हे सगळेच आवडले ...!!!
मस्त लिहित राहा .जुने आठवताना
नवीन समोर येईल. जरूर.!!