आई... मिटलेला श्वास.. १०
भाग ९ :- http://www.misalpav.com/node/15559
नयनांच्या ओंजळीत
ओला सागर गहिरा
स्पंदनांच्या ठोक्यावर
आसवांच्या अधिर धारा
आठवांच्या वाटेवर
दु:ख पारावर घट्ट
सुनसान विराण शांततेत
सुन्न भयरात काळीकुट्ट
आशेने नभाकडे पाहता
चेहरा दिसतो आई
सुर ही येता एकू
वारा गातो अंगाई
---- शब्दमेघ
नयनांच्या ओंजळीत ओला सागर
आशेने नभाकडे पाहता चेहरा
आवडली.