विकी लिक्सने उघडलेल्या २५०,००० गोपनीय कागदपत्रांमुळे उठलेले वादळ शमण्याचे लक्षण दिसत नाही. यात केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक राष्ट्रांची/त्यांच्याबद्दलची माहिती थेट/संदर्भाने उघड होते आहे / झाली आहे. त्याच बरोबर अमेरिकेचे दुटप्पी धोरणही दिसत आहे. मात्र अमेरिकेनेआशी कागदपत्रे उघड करणे राष्ट्रीय सुरक्षेच्या विरुद्ध मानले आहे.
विकी लिक्स मुळे अमेरिकन सरकारचे दुटप्पी धोरण, "ग्राहक राष्ट्रांसाठी" गुंडाळलेले/बदललेले/वाकवलेले नियम, त्रयस्थ राष्ट्रांबरोबरचे गुप्त समझौते / व्यापार / व्यवहार, प्रसंगी शत्रु राष्ट्राबरोबरचे व्यावारी संबंध वगैरे माहिती उघड झाली आहे. अमेरिकन सरकारचे अधिकृत धोरण आणि प्रत्यक्षातली कृती / व्यवहार यांतील तफावत विकि लिक्सने जनतेच्यासमोर आणली आहे. त्यामुळे काहि मंडळी विकी लिक्स ला पाठींबा देताहेत.
तर दुसरीकडे अमेरिकन सरकारच्या मते उघड झालेल्या माहितीमुळे अमेरिकेचे परदेशांत असलेले नागरीक व सौनिक यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच अमेरिकेचे परराष्ट्रसंबंध तसेच नेत्यांची, नागरीकांची व पर्यायाने देशाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
हा चर्चा प्रस्ताव "विकी लिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार" यांत तुम्ही कोणाची बाजु घ्याल आणि का? याची चर्चा करण्यासाठी मांडत आहे. काहि मुद्दे/प्रश्न चर्चेला दिशा देण्यासाठी देत आहे. मात्र चर्चा या विषयाशी संबंधीत अन्य दृष्टीकोनातून करण्यास हरकत नाहि.
- तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
- तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
- तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
- जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
- सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
प्रतिसाद बर्यापैकी अवांतर असल्यास वेगळा चर्चाविषय उघडावा. वैयक्तीक गप्पा / वाद / चर्चांसाठी खरडवही / व्यनि चा वापर करावा.
विदा व चर्चाविषय ह्या बातमीवर बेतला आहे.
प्रतिक्रिया
29 Nov 2010 - 7:03 pm | छोटा डॉन
मी ह्या बाबतीत विकीलिक्सच्या मोहीमेचे समर्थन करु इच्छितो :)
>>•तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
हो !
सामान्य माणसास माहित असणे ही गरज असण्याची आणि त्या उपलब्ध माहितीच्या आधारे त्याला भविष्यात आपले नेते ठरवण्यास मदत करणारी 'अत्यावश्यक' माहिती उगाच 'गोपनिय्'चा शिक्का मारुन दडवुन ठेवायला आमचा तात्विक विरोध आहे. म्हणुनच आम्हाला विकीलिक्सचे जे करते ते योग्य वाटते.
मात्र त्यांनी ते करताना अत्यंत संवेदनाशील माहिती देणे टाळावे.
>>•तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
हो !
उलट मी विकीलिक्सला 'भारताकडेही लक्ष द्याचे' असे सुचवु इच्छितो.
आपण पाकीस्तानचा जिंकलेला मुलुख का परत दिला ? शास्त्री कशामुळे गेले ? सुभाषबाबुंचे काय झाले ? चीनबरोबर युद्ध कशामुळे हरलो ? कचरा क्वालिटीची रशियन हत्यारे वर्षानुवर्षे का विकत घेतली जात आहेत ? ईशान्य भारतात सरकारचे नक्की धोरण काय ? श्रीलंकेत सैन्य घुसवण्याचा निर्णय का झाला ?
भ्रष्टाचाराची तर अगणित उदाहरणे आहेत, मला हे सर्व जाणण्यात रुची आहे.
>>•तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
फरक पडत नाही, पण हरकत नाही असे सांगतो.
>>•जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
अलबत !
ते तसेच व्हावे आणि आत्तापर्यंत जे खपुन गेले आहे ते उजेडात यावे म्हणुन असे घडणे आवश्यक आहे.
पण कृती करताना प्रत्येक घटनेचा आणि त्यामागच्या पैंलुंचा सेप्रेट विचार व्हावा, सरसरट प्रत्येकाला 'राष्ट्रद्रोही' ठरवणे योग्य नाही.
मात्र ह्यामुळे सत्तेचे दलाल आणि व्यापारी मात्र त्वरित एक्झेक्युट केले पाहिजेत.
>>•सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
दोघांचीही !
मात्र विकीलिक्सचे मला जास्त कौतुक करु वाटते, त्यांच्या ह्या दट्ट्यामुळे सरकारे जागेवर येतील.
जेव्हा डायरेक्ट उच्चपातळीवरुन एखाद्या वेबसाईटची दखल आख्ख्या जगातील सरकारे घेतात तेव्हा 'उनकी बातों मे दम है बॉस' असेच वाटते व म्हणुन कौतुक वाटते.
मग्रुर सरकारला डोक्यावर अशी टांगती तलवार हवी म्हणुन विकीलिक्सची मोहीम मला आवडते.
तुर्तास एवढेच, बाकी जसे चर्चा पुढे सरकेल तसे :)
उत्तम चर्चाविषय असे म्हणतो.
- छोटा डॉन
29 Nov 2010 - 7:15 pm | आनंदयात्री
आपल्या मतांशी इथे असहमती दर्शवु इच्छितो.
या अश्या शोधपत्रिकारितेचे साईड इफेक्ट्स त्यांच्या फायद्यांपेक्षा घातक ठरत असावेत असे वाटते.
जसे माझ्या देशाच्या बाहेर लढणार्या एका सैनिकाचे जरी प्राण या लिक्स वैगेरे मुळे डावावर लागणार असतील तर मी आणि माझ्यासारखे अनेक त्याचा प्राणापणाने विरोधच करतील.
29 Nov 2010 - 7:20 pm | छोटा डॉन
>>जसे माझ्या देशाच्या बाहेर लढणार्या एका सैनिकाचे जरी प्राण या लिक्स वैगेरे मुळे डावावर लागणार असतील तर मी आणि माझ्यासारखे अनेक त्याचा प्राणापणाने विरोधच करतील.
हा तद्दन चुकीचा आणि मुद्दाम दिशाभुल करण्यसाठी चालवलेला प्रचार आहे असे आमचे मत आहे.
अहो सैनिकांचे प्राण नेहमीच डावावर असतात, सीमेवर कधीही युद्धजन्य प्रतिस्थितीच असते ( ऑफिशियली नसली तरीही ). पण देशाच्या लीडर्सच्या आत्तापर्यंतच्या कुकर्मामुळे किती सैनिकांना प्राण गमवावे लागले त्याचा हिशेब नको का व्हायला ?
अर्थात बाजु थोडीशी पटत असली तरी उगाच भावनांना हात घालुन 'चुकीचा प्रचार' चालु आहे असे वाटते.
सैनिकांना ह्यावर आक्षेप असे वाटत नाही. उलट आतले हरामखोर आधी जावेत असेच त्यांचे मत असणार, बाहेरच्या लोकांसाठी सैनिक समर्थ आहेत. :)
- छोटा डॉन
29 Nov 2010 - 7:53 pm | आनंदयात्री
>>हा तद्दन चुकीचा आणि मुद्दाम दिशाभुल करण्यसाठी चालवलेला प्रचार आहे असे आमचे मत आहे.
आम्ही निवडणुकात फक्त मतदार म्हणून भाग घेतो त्यामुळे प्रचार करण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे वरिल वाक्याला आमचा आक्षेप आहे.
>>अहो सैनिकांचे प्राण नेहमीच डावावर असतात, सीमेवर कधीही युद्धजन्य प्रतिस्थितीच असते ( ऑफिशियली नसली तरीही ). पण देशाच्या लीडर्सच्या आत्तापर्यंतच्या कुकर्मामुळे किती सैनिकांना प्राण गमवावे लागले त्याचा हिशेब नको का व्हायला ?
अहो लिडर्स नालायक म्हणून जर प्राण गमावतायेत (हे तुमचे पुरावे नसलेले विधान) तर अजून असल्या कुलंगड्यांमुळे पण त्यांना त्रास होउ द्यायचा का ? आणि "सैनिकांचे प्राण नेहमीच डावावर असतात" हे "पाटबंधारे खात्यातल्या कारकुनांना लवकर चष्मा लागतो" यासारखे वाक्य वाटले. दोन्ही उदाहरणांच्या परिस्थितित काही फरक नाही असे वाटत असल्यास आपल्यात तीव्र मतभेद आहेत.
1 Dec 2010 - 5:43 pm | विजुभाऊ
पाटबंधारे खात्यातल्या कारकुनांना लवकर चष्मा लागतो
पाटबंधारे खात्यातल्या कारकुनांना लवकर चष्मा लागतोयाचा अर्थ सगळे चष्मेवाले पाटबंधारे खात्यात कारकून असतात असा घ्यायचा का?
1 Dec 2010 - 5:40 pm | विजुभाऊ
डानरावांचा मुद्दा बरोबर आहे.
सरकारला त्याच्या कृत्यांसाठी जाब विचारणारे कोणीतरी निष्पक्ष असायलाच हवे.
शोध पत्रकारीतेचा बट्ट्याबोळ पहायचा असेल तर बरखादत्त वगैरे आणि आजतक सबसे तेज इंडीयाटीव्ही ,आयबीएन सारखे चॅनेल्स पहा.
अर्थात बरेच प्रश्नांना वाचाच फुटत नाही. कारण ती वाचा फोडणारेच विकले जातात.
उदा: नाशीकच्या बंगल्यात सापडलेल्या त्या कोट्यावधी रुपयांच्या नोटांचे पुढे काय झाले?
लवासा प्रकरणाला शासनाची मान्यता कशी मिळाली
अॅम्बी व्हॅली हा प्रकल्प इतका गोपनीय का आहे? स्वतन्त्र भारताच्या नागरीकाला तेथे भेट द्यायची असल्यास परवाना
घ्यावालागतो.
अवांतर : धमालमुलाचे लग्न झाले . तो बाप झाला तरी अजून धमाल मुलगाच कसा काय राहीला आहे?
मिपालीक्स याबाबत काय म्हणते?
2 Dec 2010 - 7:30 am | मिसळभोक्ता
अवांतर : धमालमुलाचे लग्न झाले . तो बाप झाला तरी अजून धमाल मुलगाच कसा काय राहीला आहे?
मुलगा हा मनाने असतो, उदाहरणार्थ मिसळभोक्ता. धमाल नसला तरी मुलगाच आहे. जो लीक करतो.
धमालजींना आम्ही अद्याप भेटलेलो नसलो, तरी ते भेटण्यालायक असावेत असे वाटते. म्हणजेच, ते मुलगाच आहेत हे नक्की.
विजूभाऊ, मुलगा व्हा.. भाऊ नको...
29 Nov 2010 - 10:27 pm | ऋषिकेश
प्रश्न हा नाहिये की त्या लिक्समुळे सैनिकांचे प्राण जातील. मुळात सरकारने अशी गोष्ट करावीच का? की जी उघड झाल्यावर सैनिकांना प्राण गमवावे लागावेत. जर सरकार अशी गोष्ट करत असेल तर ती करण्याआधी / करतेवेळी त्याची माहिती जनतेला देणे सरकारचे कर्तव्य आहे.
ज्या माहितीमुळे सैनिकांचे प्राण जातात असा व्यवहार गुप्तपणे करायचा आणि मग उघड झाल्यावर उघड करणार्यामुळे सैनिकांचे प्राण जातात असे ओरडायचे हे योग्य वाटते का?
29 Nov 2010 - 10:35 pm | आनंदयात्री
सगळ्याच गोष्टी रामराज्यात चालाव्यात तश्या "ideal" असु शकतात का ?
29 Nov 2010 - 11:00 pm | ऋषिकेश
आयडीयल कशाला म्हणावे याचे उत्तर प्रत्येक जण वेगळे देइल. पण ते असो.
मात्र इथे आयडीयल चा मुद्दा नीटसा कळला नाही. एखाद्या सरकारने जनतेला एक सांगितले व वेगळाच व्यवहार केला. ते सत्य एखाद्याने समोर आणले तर समोर आणणारा राष्ट्रद्रोही कसा?
आणि हा नियम इतर स्थानिक भ्रष्टाचाराला लागु आहे तर राष्ट्रीय धोरणाला (जसे परराष्ट्र धोरण, संरक्षण धोरण) का लागू नसावा?
आणि प्रत्यक्षातली परिस्थिती बघावी तर ही गोपनीयता जनतेसाठी आहे. सर्व राष्ट्रांच्या गुप्तहेर खात्याकडे दस्ताऐवज आधी पासूनच असतील / मिळवले असतील. आता ते जनतेसमोर उघड करून सरकारचे खरे रूप समोर आणले आहे (अश्या वेळी आणले जाते)
29 Nov 2010 - 7:16 pm | Dhananjay Borgaonkar
+१
मी अजुनही काही विषय मांडु इच्छितो.
कोणत्या भारतीय नेत्याकडे किती बेहिशेबी मालमत्ता आहे?
कोणी किती गैरव्यवहार केला?
नक्की स्विसबँकेत किती काळा पैसा आहे भारतीयांचा?
भारतीय नोकरवर्ग सोडुन किती व्यावसायिक प्रामाणिक कर भरतात?
30 Nov 2010 - 10:48 am | पंख
अगदी सहमत ! विशेषकरुन भारताची अशी गोपनीय माहिती ऊघड झालेली आवडेल..
>>•तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
हो !
उलट मी विकीलिक्सला 'भारताकडेही लक्ष द्याचे' असे सुचवु इच्छितो.
आपण पाकीस्तानचा जिंकलेला मुलुख का परत दिला ? शास्त्री कशामुळे गेले ? सुभाषबाबुंचे काय झाले ? चीनबरोबर युद्ध कशामुळे हरलो ? कचरा क्वालिटीची रशियन हत्यारे वर्षानुवर्षे का विकत घेतली जात आहेत ? ईशान्य भारतात सरकारचे नक्की धोरण काय ? श्रीलंकेत सैन्य घुसवण्याचा निर्णय का झाला ?
भ्रष्टाचाराची तर अगणित उदाहरणे आहेत, मला हे सर्व जाणण्यात रुची आहे.
= अगदी मनातले प्रश्न! यांची ऊत्तरे जाणण्यात मलाही रुची आहे.
30 Nov 2010 - 11:45 am | कोकणप्रेमी
अगदी सहमत, मी पण विकीलिक्सला 'भारताकडेही लक्ष द्यावेच' असे सुचवु इच्छितो
नवे प्रश्न असेही पडतात की
ए. राजा नी नक्की किती पैसे खाल्ले ? व कोणा कोणाला पासऑन केले ? करुणानिधी, मनमोहन सिन्ग का सोनिया गान्धि ?
29 Nov 2010 - 7:11 pm | बिपिन कार्यकर्ते
तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
तटस्थ. अमेरिकेच्या भल्याची काळजी मी करत नाही. (इथे अमेरिके ऐवजी कोणत्याही देशाचे नाव असू शकते.)
तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
नाही.
तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
तटस्थ. पाकिस्तानच्या भल्याची काळजी मी करत नाही. (इथे पाकिस्तानऐवजी कोणत्याही देशाचे नाव असू शकते.)
जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड
केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
बहुतेक, हो. पण हे केस बाय केस विचार करून अंतिम मत देत जाईन.
सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
संपूर्ण माहिती नाही. म्हणजे या सगळ्या प्रकरणात विकिलिक्स हे नक्की का करत आहे वगैरे...
29 Nov 2010 - 9:37 pm | नितिन थत्ते
सहमत आहे.
जनरलाइज्ड पाठिंबा किंवा निषेध नाही.
अनेकदा एखादी कृती निषेधार्ह वाटते पण आपल्याला त्यामागची पार्श्वभूमी माहिती असतेच असे नाही.
दुसरे म्हणजे ज्यांच्याविषयी लिहिले आहे त्याला बाजू मांडायची संधी बर्याचदा मिळत नाही किंवा त्याची बाजू समरीली डिसमिस केली जाते.
29 Nov 2010 - 7:19 pm | यकु
मला तर बुवा वाटते हे विकीक्लिक्स अमेरिकन सरकारनेच सोडलेले पिल्लू आहे! मला संशय येतो म्हणजे येतो! (साभार, वर्हाड निघालंय लंडनला )
एवढी राज्ये तिच्यायला त्या अमेरिकेत आणि एवढी सारी लफडी. राहातंय कुणाच्या डोक्यात. इथे नाही रोज लोक नागवे होतात आणि पुन्हा तुरूंगाच्या खास घोंगड्या पांघरूण पुन्हा त्यांना अब्रू बहाल केली जात?
ते विकिक्लिक्स वाचू गेलो तर एक अक्षर कळेल तर शपथ.
हे अमेरिकन लोक उद्या "हौ टू रिड विकिक्लिक्स" छापून विकू लागले तर आश्चर्य वाटणार नाही.
29 Nov 2010 - 7:51 pm | गणेशा
हे सर्व मला पहिल्यांदाच कळाले आहे , त्यामुळे प्रतिक्रिया जास्त काही माहिती नसताना देत आहे ...
तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
--> गोपनीय माहिती म्हणजे जर सामाण्य जनतेला ती कळुन राष्ट्रावर , महत्वाच्या स्थळांवर वा माणसावर काही आघात वा हल्ला होणार नसेल तर ती माहीती उघड करणे योग्य वाटते ...
तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
--> नक्कीच (वरील उत्तर लक्षात घेवुन )
तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
--> हो.
जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
जर सरकारचे ते व्यवहार / कृती यामुळे देशावर संकट उभे राहत असेल तर तो राष्ट्रद्रोह च आहे असे वाटते .. आणि जर ते व्यवहार / कृती यामुळे देशाचे नुकसान नाही पण माणसांची दिशाभुल केली जात असेल तर तो लोकशाही कलंक समजला जावा असे वाटते ..
सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
सध्या नक्की कश्या पद्धतीने चालु आहे ते माहीत नाही, लिंक ही ओपन नाही केली अजुन , त्यामुळे ठोस उत्तर देत नाही . परंतु वरील उत्तरांवरुन याचे उत्तर कळत असेन
29 Nov 2010 - 8:09 pm | मदनबाण
तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
हो.
तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
हो. तसेही आपले नेते लोक काय "आदर्श" ठेवुन आहेत ते सगळ्यांना कळलचं आहे.
बाकी हिंदुस्थाना संबंधीत केबल्स तुम्ही वाचलेल्या दिसत नाहीत...
घ्या वाचा :--- http://ibnlive.in.com/news/where-does-india-figure-in-wikileaks-cablegat...
ये तो डेमो हय...अभी तो पडदा उठना बाकी हय.
तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
पाकड्यांकडील माहितीला अनन्यसाधारण महत्व आहे. हे उलट्या खोपडीचे सटक लोग त्यांची टाळकी कशी चालवतात त्याबद्धल मला तरी लयं उत्सुकता हाय... ;)
जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
जनतेला सांगुन कोणते सरकार राजद्रोह करेल काय ? राजकारणी लोक इतकेही बावळट नाहीत हो...उदा. जी भाजपा २जी बद्धल कॉग्रेसकडे जेपीसी प्रोब मागते तीच भाजपा येडीयुरप्पा प्रकरणात अळीमिळीगुपचिळी ठेवुन आहे की नाही ? ;)
सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
अर्थातच विकीलिक्स्ची... कारण अमेरिकेची काळी बाजु कोणालाही न घाबरता ते समोर आणत आहेत.
31 Jul 2011 - 3:52 pm | मदनबाण
जी भाजपा २जी बद्धल कॉग्रेसकडे जेपीसी प्रोब मागते तीच भाजपा येडीयुरप्पा प्रकरणात अळीमिळीगुपचिळी ठेवुन आहे की नाही ?
हा येडी भाजपाला महाग पडणार हे ठावुक होत... त्यावेळीच भाजपने त्याच्या मुसक्या आवळल्या असत्या तर आज येडी त्यांना डोईजड झाला नसता बहुधा...
असो... आता येडीची मजल इतकी पोहचली आहे की शक्ती प्रदर्शन तर केलेच केले आणि आता म्हणतो कसा आधी नव्या मुख्यमंत्र्याच नाव जाहिर करा मग राजिनामा देतो... याला म्हणतात सत्तेचा आणि पैश्याचा माज.
29 Nov 2010 - 8:41 pm | अविनाशकुलकर्णी
विषय् क्लिष्ट् आहे..
29 Nov 2010 - 8:46 pm | आत्मशून्य
फट्दीशि साईट बॅन व्हायची......
29 Nov 2010 - 11:12 pm | ऋषिकेश
सगळ्यांचे अजून पर्यंत दिलेल्या मतांबद्द्ल धन्यवाद.
माझे मतः
होय.
मुळातच माहिती आणि गोपनीयता हे एकत्र असणे मला मान्य नाही. सरकार जे काही करते त्याची माहिती नागरीकांना हवीच. पारदर्शक कारभार करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. सरकार म्हणजे राजे नव्हेत. ते केवळ आमचे प्रतिनिधी आहेत. सुरक्षा व्यवस्था, व्यापार, देवघेवी, परराष्ट्र धोरण ह्या गोष्टी देखील गोपनीय असता कामा नयेत. आणि होणारे व्यवहारही त्या अनुशंगाने होताहेत की नाही हे ही जनतेला माहित असणं मला अत्यावश्यक वाटतं.
अर्थातच नाही
विकिलिक्स
एक डिस्क्लेमर:
माझे मत केवळ लोकशाही देशांना लागु आहे. अन्यत्र लोकांचे राज्य नसल्याने त्यांचा माहितीवर अधिकार असेलच असे नाही.
शिवाय गोपनीयता नको असे जेव्हा मी म्हणतो तेव्हा तात्पुरत्या गोपनीयतेला माझा विरोध नाही. काहि परीस्थितीत (जसे युद्ध) गोपनीयता पाळली तरी परिस्थिती निवळल्यावर केलेला "संपूर्ण" व्यवहार, करार, समझौते वगैरे सरकारने उघड केलाच पाहिजे. (सरकारे ते करत नाही तेव्हा विकीलिक्स सारखी माध्यमे जन्म घेतात)
29 Nov 2010 - 9:28 pm | श्रावण मोडक
१, २, ३ - हो. ४ - नाही. ५ - विकीलीक्स. पण गोपनियता कायद्याखाली कुठं काही खटला झाला तर त्यालाही विकीलीक्सने तोंड द्यावे. त्यासाठी विकीलीक्सला मी पाठिंबा देतो. सक्रिय मात्र सध्या काही करणे शक्य नाही. ;)
29 Nov 2010 - 11:12 pm | ऋषिकेश
प्रका टा आ
डिस्क्लेमर वरच्या प्रतिक्रीयेत हलवला आहे
30 Nov 2010 - 1:51 am | राजेश घासकडवी
या चर्चेमागे मुळात प्रश्न 'सरकारला काही विशिष्ट माहिती गोपनीय ठेवण्याचा अधिकार आहे का? असावा का?' असा वाटतो. आदर्श व्यवस्थेत तसा तो नसावा असं मला वाटतं. आदर्श व्यवस्था म्हणजे जिथे युद्धं नाहीत, शत्रु राष्ट्र नाहीत, हेरगिरी नाही... मात्र जर आपले हेर परदेशात पाठवणं, अनधिकृतरीत्या इतर देशांमध्ये कारवाया करणं हे सरकारकडून जनतेला अपेक्षित असेल तर त्यांची माहिती फक्त मोजक्या लोकांना असावी ही सरकारची अपेक्षा रास्त वाटते. केक खायलाही हवा आणि जपूनही ठेवायचा हे दोन्ही साध्य कसं करणार?
प्रश्न असा येतो की या रास्त अपेक्षेतून मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर होतो आहे का? तसा तो होऊ नये यासाठी अधूनमधून काही जबाबदार प्रकाशनसंस्थांना आपल्या मार्गाने अशी माहिती मिळवून ती प्रसिद्ध करता यावी. ही एक प्रकारे आंतर्गत हेरगिरीच आहे. शत्रुवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी जनता सरकारतर्फे जशी हेरगिरी करते, तशीच सरकारवर नजर व नियंत्रण ठेवण्यासाठी प्रकाशन संस्थांतर्फे हेरगिरी देखील व्हावी. इथे ती दुधारी तलवार सरकारवर उलटते. आम्ही (सरकार) करणार तीच हेरगिरी योग्य व इतरांची (जनतेची) चूक हे म्हणता येत नाही.
तेव्हा माझं थोडक्यात मत असं की तूर्तास तरी दोन्ही हेरगिऱ्या चालू राहाव्या. मात्र दोन्ही पक्षांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करू नये. म्हणजे सरकारने आपल्याला गैरसोयीची माहिती दडपून ठेवू नये. व प्रकाशकांनी आपल्या हाती माहिती आली तर ती प्रसिद्ध करण्यात राष्ट्रीय सुरक्षेला धोका नाही याची खात्री करून घेण्याचा प्रयत्न करावा.
मूळ बातमीत ती माहिती काय स्वरूपाची होती याचा अंदाज येत नसल्याने वरील भूमिकांच्या आधारे कुठच्याच पक्षाची बाजू घेता येत नाही.
30 Nov 2010 - 2:23 am | क्रेमर
माझे हितसंबंध धोक्यात येणार नाहीत तोपर्यंत विकिलिक्सची बाजू घेईन. आतापर्यंत ते तसे न आल्याने विकिलिक्सचे वागणे योग्य वाटते आहे. सरकारविषयी औपचारिक-अनौपचारिक सर्वच बाजू लोकांसमोर येणे योग्यच आहे.
30 Nov 2010 - 5:32 am | मिसळभोक्ता
ही लोकशाहीची कसोटी आहे, आणि त्यात अमेरिकन सरकार पास झालेले आहे.
विकीलीक्स हे संकेतस्थळ येथे अजूनही दिसते (डीडॉस झाल्यामुळे काही काळ वेळ लागत होता, पण अपाचेच्या प्लगिनच्या कॉन्फिगरेशनमधली ती चूक होती).
कुणी हगले-पादले की पुस्तके, सिनेमे ब्यान करणार्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने शिकण्यासारखी गोष्ट आहे.
30 Nov 2010 - 7:49 am | राजेश घासकडवी
संस्कृती या शब्दाचं भाषांतर हिंदीमध्ये सभ्यता असं का करतात हे अशा गोष्टींमधून दिसून येतं.
30 Nov 2010 - 8:10 pm | बिपिन कार्यकर्ते
सहमती दाखवायच्या आधी थोडे थांबावे असे वाटते. अमेरिकन सरकारने ही माहिती बाहेर येऊ नये म्हणून बरेच प्रयत्न केले आहेत असे कळते. साम दाम दंड भेद वगैरे. जर का ही माहिती बाहेर आली तरी आम्ही त्याला खंबीरपणे तोंड देऊ असे म्हणले असते तर नक्कीच कौतुक वाटले असते. माझ्या माहितीप्रमाणे (जी चुकीची असू शकते), विकिलिक्सला दम वगैरे देऊन झाला. उपयोग नाही झाला म्हणून मॅनेज करायचेही प्रयत्न झाले. आजही अमेरिकन सरकार विकिलिक्सने जे केले ते गुन्हा आहे का आणि त्यावर खटला भरता येईल का याचा तपास करत आहे अशी बातमी बघितली. असे जर असेल तर अमेरिकन सरकारचे कौतुक निर्विवादपणे कसे करावे?
आता किंचित अवांतरः
भारताने अमेरिकन सरकारचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवायचे तर भारतात पूर्ण लोकशाही येईल हे मान्य. त्याशिवाय इतर देशातली नकोशी सरकारे (भले ती सरकारे लोकशाही मार्गाने सत्तारूढ झालेली असोत) येनकेन मार्गाने उलथून आपल्या समस्या सोडवता येतील हा अॅडेड बेनिफिट पण आहेच. खरंच, खूपच फायदा आहे आपला. ;)
नॅशनल जॉग्रफिकच्या सध्याच्या अंकात याबाबतीतले अमेरिकेचे वर्तन कसे आहे याचा उल्लेख आहे. मध्यपूर्वेत लोकशाही यावी असा गळा काढणार्या अमेरिकेने, तिथे इस्लामकडे झुकणारे आणि खरोखर जनाधार असणारे, पण गैरसोयीचे ठरणारे पक्ष वरचढ ठरत आहेत हे पाहून लगेच आपले वर्तन बदलले होते.
सांगायचा मुद्दा एवढाच की, अभिनंदन इतक्यात नको, थोडे थांबू की.
वि.सू. : माझा अमेरिकेवर रागही नाही, लोभही नाही. ;)
1 Dec 2010 - 1:42 pm | अवलिया
ही लोकशाहीची कसोटी आहे, आणि त्यात अमेरिकन सरकार पास झालेले आहे.
विकीलीक्स हे संकेतस्थळ येथे अजूनही दिसते (डीडॉस झाल्यामुळे काही काळ वेळ लागत होता, पण अपाचेच्या प्लगिनच्या कॉन्फिगरेशनमधली ती चूक होती).
कुणी हगले-पादले की पुस्तके, सिनेमे ब्यान करणार्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीने शिकण्यासारखी गोष्ट आहे.
ईंटरपोल वाँटेडची यादी बघा! सेक्स क्राईम... :)
http://www.interpol.int/public/data/wanted/notices/data/2010/86/2010_524...
हं... काय म्हणत होते तुम्ही... ?
2 Dec 2010 - 7:28 am | मिसळभोक्ता
हं काय म्हणत होते तुम्ही ????
7 Dec 2010 - 4:52 pm | बिपिन कार्यकर्ते
http://timesofindia.indiatimes.com/world/us/Faced-with-cablegate-champio...
हं काय म्हणत होते तुम्ही????
तेवढं सेक्स क्राईम मधे काय अंतर्भूत धरलंय ते ही बघा. :)
अर्थात, अजून कोणतीच बाजू निर्विवाद सिद्ध झाली नाहीये म्हणा... पण असल्या कारणावरून डायरेक्ट रेड कॉर्नर नोटिस? छ्या: !!! सगळाच योगायोग बघा. ;)
30 Nov 2010 - 6:32 am | विकास
मात्र मूळ प्रश्नांसंदर्भात अजून काही मते, कारण नुसते "होय/नाही" मधे त्याला न्याय मिळेल असे वाटत नाही. :
तुम्हाला विकी लिक्सने अमेरिकेची गोपनीय माहिती उघड करणे योग्य वाटते का?
काळ-वेळ पाहून आणि नक्की काय साध्य होणार आहे याचा विचार करून करावे इतकेच वाटते.
तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
वर जे अमेरिकेच्या बाबतीत म्हणले आहे तेच भारताच्या बाबतीतही. मात्र भारतात आपले राजकारणी मुरलेले असल्याने इतके लेखी पुरावे ठेवतील असे वाटत नाही. शिवाय असे उघडकीस येणार म्हणल्यावर पुरावे म्हणण्यापेक्षा जाळावे म्हणण्याचा "आदर्श" आपण ठेवू शकतोच. ;) आपली वृत्तपत्रे साधे बरखागेट बाहेर येऊन देत नाहीत अर्थात लपवत आहेत. आज रतन टाटांनी सुप्रिम कोर्टात जाऊन माहीती वाचवण्याची विनंती केली आहे. त्या बातमीत देखील बरखा दत्त/वीर सिंघवीचा साधा उल्लेख करायची हिंमत टाईम्स ऑफ इंडीया मधे दिसत नाही. :(
तुम्हाला एखाद्याने पाकिस्तानमधील अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
काही इंटरेस्ट नाही. आपल्या गुप्तचर खात्याने ती माहिती मिळवून जर सरकारने त्याच योग्य वापर केला तर जास्त योग्य वाटेल... नाहीतर अशा फुटलेल्या माहीतीचा वापर तेथील सरकारच्या विरोधात जनतेला पेटवण्यासाठी अल कायदा अथवा तालीबान सारख्या संघटना करतील आणि अधिकच अस्थिरता आपल्या सीमेलगत तयार होईल जे आपल्यासाठी चांगले नाही... एकूणच व्हिसलब्लोअर प्रकार लोकशाही राष्ट्रांसाठी योग्य आहे. जिथे लोकशाही नाही तेथे व्हिसलब्लोअरपेक्षा सशस्त्र/नि:शस्र क्रांतीच होणे महत्वाचे.
जर निवडून दिलेले सरकार जनतेला जे सांगते त्यापेक्षा वेगळे प्रसंगी विरुद्ध व्यवहार/कृती करत असेल व ते एखाद्याने उघड केले तर तो राष्ट्रद्रोह आहे असे तुम्हाला वाटते का?
ह्याचे उत्तर देखील स्थलकालसापेक्ष असेल.
सध्या चाललेल्या विकीलिक्स विरुद्ध अमेरिकन सरकार यांपैकी कोणाची बाजु तुम्ही योग्य समजता व का?
अमेरिकन सरकार जे काही करत आहे त्यात अमेरिकन स्वार्थ आहे, त्यांना काय साध्य करायचे आहे ते थोड्याफार फरकाने समजू शकते. विकीलीक्स जे करत आहे त्यात नक्की त्यांचे हेतू काय आहेत हे माहीत नाहीत. ते देखील कोणी जाहीर केले तर कुणाची बाजू अधिक योग्य ते समजू शकेल.
-------------------------
अवांतरः ज्या आयडी स्वत:चे खरे नाव लपवत येथे गोंधळ घालतात, त्यांची खरी नावे "मिपालिक्स" वर जाहीर करायची का? ;)
30 Nov 2010 - 7:22 am | Pain
१) मी विकी च्या बाजूचा.
२)< em>•तुम्हाला एखाद्याने भारताची अशी गोपनीय माहिती उघड केली तर ते योग्य वाटेल का?
प्रश्न चुकीचा आहे. भारतात राष्ट्रीय गुपित असी काही नाही. योग्य ते पैसे दिल्यावर सगळ्यांना सगळे मिळते.
30 Nov 2010 - 7:54 am | Pain
अमेरिका पूर्वीपासून स्वत:च काही गोपनीय माहिती ३० वर्षे किंवा काही एका कालवधीनंतर प्रसिद्ध करते असे कुठेसे ऐकले होते. ते बरोबर आहे का?
30 Nov 2010 - 8:18 am | विकास
बहुतेक गोपनीय माहिती ३० वर्षांनी पण काही नाजूक बातम्या कदाचीत अधिक काही काळानी.
30 Nov 2010 - 2:11 pm | अवलिया
अमेरिकन सरकारने प्रकाशित केलेल्या माहितीत कायदे, अंमलबजावणी, विविध माहिती, युद्ध इत्यादी माहितीला स्थान दिले जाते. या व्यतिरिक्त अनावश्यक माहिती ठेवली जाते. परंतु, अशी कोणतीही माहिती आक्षेपार्ह किंवा अनावश्यक वाटल्यास अमेरिकन सरकार ही माहिती अप्रकाशित करते.
विकिलिंक्सवरील माहिती सरकारी संस्थळावर ठेवण्यास अनावश्यक वाटत असल्याने अमेरिकन सरकारने सदर माहिती अप्रकाशित केली आहे याची कृपया नोंद घ्यावी.
अमेरिक सरकार तर्फे जनहितार्थ ;)
मजाक पुरे...
उत्तरे - होय, होय, होय, नाही, सध्या मौन
बहुधा अमेरिकन सरकार विकीलिक्सवर कारवाई करेलच असे संकेत मिळत आहेत. लोकशाहीवादी देश आहे ना ;)
30 Nov 2010 - 7:57 pm | तिमा
ह्यावर मिपाच्या क्लिंटन साहेबांनी भाष्य करावे अशी मी त्यांना विनंति करतो.
30 Nov 2010 - 8:53 pm | नितिन थत्ते
>>विकी लिक्स विरूद्ध (अमेरिकन) सरकार
मिपाचे एक जुने सदस्य विकि अमेरिकेच्या विरोधात असणार हे ठीक पण त्यांना "लिक्स" हे बिरूद?
1 Dec 2010 - 5:44 am | सुनील
मटाकारांना यात कॉन्स्पिरसी थियरी दिसतेय, तुम्हाला?
1 Dec 2010 - 8:59 am | ऋषिकेश
लोकशाही देशांत कोणतीही माहिती कायमची गोपनीय असु नये असे विकीलिक्स मानते हे कारण (हल्लीच्या मतलबी जगात वगैरे वगैरे) कोणालाच पुरेसे वाटत नाही बहुतेक ;)
1 Dec 2010 - 9:24 pm | फारएन्ड
इतर देशांची (मुख्यतः न-लोकशाही देशातील) माहिती अशीच उघड करू शकते का? शकेल का? (मला माहीत नाही म्हणून विचारतोय). नसेल तर सर्व लोकशाही देशांच्या शत्रूंना हा आयताच फायदा मिळेल असे वाटते (अनफेअर अॅडव्हांटेज). लोकशाही देशात त्या नागरिकांचा माहितीवर अधिकार आहे पण माहिती जेव्हा उघड होते तेव्हा ती इतर देशातील नागरिकांना - म्हणजेच जर एखादा देश युद्धात असेल तर त्याच्या शत्रूला सुद्धा मिळते. आणि तो शत्रुदेश जर लोकशाही देश नसेल त्यांची माहिती अशी कोणी उघड करू शकत नाही.
जगातील सर्व देशांची माहिती अशी उघड केली तर निदान फेअर गेम म्हणता येइल.
त्यामुळे अशा बाबतीत अमेरिका, भारत वगैरेंना जास्त मोठे चॅलेंज आहे असे वाटते.
3 Dec 2010 - 10:02 pm | आत्मशून्य
Big brother is watching... so are we. तर एकदम मजेशीर.एथे पहा खरच ह्याना देणगी दिली पाहीजे, मी आताच पेपल वरून मदत केली. These people deserves it. ;)