पसारे तुझे आवरावे कशाला ?
स्वत:ला असे सावरावे कशाला ?
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
जरा सांज होता तुझी याद येते
पारव्याने असे गीत गावे कशाला ?
तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा
तुझ्यातून मी वावरावे कशाला ?
तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला
दीपकाने असे मंद व्हावे कशाला ?
जरा कान देण्या कळी फूल होते
भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ?
जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला
तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?
मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 9:44 pm | स्वैर परी
मनाला स्पर्श करुन जाणारी कविता!
25 Nov 2010 - 9:53 pm | गणेशा
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला
दीपकाने असे मंद व्हावे कशाला ?
हे शेर आवडले
26 Nov 2010 - 10:41 pm | गंगाधर मुटे
सुंदर कविता.
27 Nov 2010 - 6:16 am | अथांग
छन आहे...
27 Nov 2010 - 8:10 am | मदनबाण
सुंदर... :)
झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?
वा... :)
27 Nov 2010 - 10:35 am | अविनाशकुलकर्णी
मस्त
27 Nov 2010 - 4:06 pm | अनिल आपटे
कविता आवडली
एवढी प्रतिभा प्रगल्भ असताना
लिहिण्याचा आळस कशाला
लगे रहो
27 Nov 2010 - 4:22 pm | मनीषा
पसारे तुझे आवरावे कशाला ?
वा ! अगदी माझ्या मनातली ओळ ....!
सुरेख !
27 Nov 2010 - 11:13 pm | प्राजु
वा वा वा!! अतिशय तरल.. लाघवी कविता आहे.
3 Dec 2010 - 11:01 pm | चन्द्रशेखर गोखले
ही गजल..? सुंदर प्राजू म्हणाली तसं लाघवी कविता..!!
4 Dec 2010 - 10:38 am | दिपक
कोण मंद? :-(
मस्त कविता! :-)