ती दिसली नि तिच्यावर जीव जडला
असे होते काहो तुमचे ?
[किंवाअसे कधी झाले होते काहो तुमचे ?]
तसे माझे तर झाले बाबा!
माझा तर चक्क बोल्ड झाला !!
काय गमंत असते ह्या प्रेमाची
जीव खरेच खुळावला
काय आवडले मला तिचे ?
डोळे?
तिचे बोलणे ?
नजरेतील कोवळेपणा ?
काय कुणास ठाऊक ?
पण माझा तर जीव जडला
तिच्या साध्या साध्या संवादातून
नि जीव माझा हरवून गेला !!!
श्रावणातल्या सकाळी सकाळी ती आली
की , किती छान दिसायची
अबोली रंगाच्या साडीत ती किती मस्त वाटायची
आई तिच्याशी बोलता बोलता
माझ्याकडे हलकेच बघायची
कुणास ठाऊक ती का अशी बघायची ??
का ती पण कोठल्या स्वप्नात हरवून जायची ?
का तिला पण ती आवडायची ?
नि माझ्या भावी आयुष्यचे स्वप्न बघायची ??
कुणास ठाऊक ??
तिला सोडायला म्हणून मी थोडसे अंतर जायचो
तेह्वा आभाळ किती गच्च वाटायचं
निळे निळे एक वेह्लाळ पाखरू
कसे छान गिरकी घ्यायचे
तिचा निरोप घेता घेता कसे उदास उदास वाटायचे
हलकासा तिचा स्पर्श
केवढा काहूर माजवायचे
असे झाले काहो कधी तुमचे ?
माझे तर फार झाले !!
माझे पुढे काय झाले ?
तुम्हीपण सांगा तुमचे काय झाले ?
प्रतिक्रिया
25 Nov 2010 - 1:08 pm | अविनाशकुलकर्णी
निळे निळे एक वेह्लाळ पाखरू
मस्त आहे कविता..
25 Nov 2010 - 2:17 pm | गणेशा
तिला सोडायला म्हणून मी थोडसे अंतर जायचो
तेह्वा आभाळ किती गच्च वाटायचं
निळे निळे एक वेह्लाळ पाखरू
कसे छान गिरकी घ्यायचे
अप्रतिम