नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन ) (Nasates Ghari Tu Tevha...)

बोलघेवडा's picture
बोलघेवडा in जे न देखे रवी...
25 Nov 2010 - 10:12 am

नसतेस घरी तू तेव्हा... "फणसाची फुले" ( विडंबन )

मराठी मध्ये सध्या विडम्बनाला चांगले दिवस आहेत. याच लाटेचा फायदा घेऊन मी हि 'पोळी' गरम तव्यावर भाजून घेतली आहे. या कवितेचे मूळ कवी श्री. संदीप खरे आणि संगीतकार श्री. सलील कुलकर्णी, तमाम मराठी वाचक यांची माफी मागून आणि कै. आचार्य अत्रे यांना स्मरून मी हि माझी "फणसाची फुले" आपल्याला सदर करत आहे. कृपया गोड मानून घ्यावीत.

नसतेस घरी तू तेव्हा...

नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो,
गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो.

दुध नासून साय विरावी, कल्लोळ तसा ओढवतो,
हा चहा चवहीन होतो, तरी मलाच प्यावा लागतो. || नसतेस घरी तू तेव्हा...

येतात उन्हें दाराशी, पारोसा तरी मी असतो
खिडकीवर टॉवेल ओला, तव गंध हा कुजका येतो. || नसतेस घरी तू तेव्हा...

तू सांग सखे मज काय, मी सांगू या गॅसवाल्या,
ज्योतीची आच हि मंद, अन नसे स्टोव्ह हा घरात. || नसतेस घरी तू तेव्हा...

- बोलघेवडा
http://bolghevada.blogspot.com/2010/05/blog-post.html

हास्यविडंबन

प्रतिक्रिया

प्रीत-मोहर's picture

25 Nov 2010 - 11:07 am | प्रीत-मोहर

मस्त.....

प्रकाश१११'s picture

25 Nov 2010 - 1:24 pm | प्रकाश१११

मित्रा छान लिहिले आहेस .आवडले विडम्बन !!

>>नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो,
गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो.

हे ग्रेट !!

मेघवेडा's picture

25 Nov 2010 - 5:02 pm | मेघवेडा

नसतेस घरी तू तेव्हा, कप फुटका फुटका होतो,
गिळण्याचे होती वांदे, अन खिसा फाटका होतो.

हे भारीच!

पैसा's picture

25 Nov 2010 - 9:55 pm | पैसा

मला पण आवडलं.

इंटरनेटस्नेही's picture

25 Nov 2010 - 1:32 pm | इंटरनेटस्नेही

मस्त!

गणेशा's picture

25 Nov 2010 - 1:52 pm | गणेशा

छान

प्राजक्ता पवार's picture

25 Nov 2010 - 4:42 pm | प्राजक्ता पवार

मस्तं :)

गंगाधर मुटे's picture

26 Nov 2010 - 10:38 pm | गंगाधर मुटे

छान.

लॉरी टांगटूंगकर's picture

29 Nov 2010 - 7:14 pm | लॉरी टांगटूंगकर

वाह्ह