बघ कशा संवेदना गातात माझ्या

मयुरेश साने's picture
मयुरेश साने in जे न देखे रवी...
24 Nov 2010 - 10:31 pm

फक्त दे तू हात या हातात माझ्या
बघ कशा संवेदना गातात माझ्या

मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो
मोगर्‍याचा गंध मुक्कामात माझ्या

भक्तिने नेवैद्य मी अर्पुन आलो
जेवतो माझा "विठू" ताटात माझ्या

काय तू रमते अशी भासात मझ्या
ठेव थोडा श्वास तू श्वासात माझ्या

कुंकवाचा साज भाळी रेखुदे ना
रंगुदे सौभग्य ते रंगात माझ्या

मी हिशेबी राहिलो नाही तरीही
बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या

मयुरेश साने....दि...२३-नोव्हेंबर-१०

शृंगारगझल

प्रतिक्रिया

मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो
मोगर्‍याचा गंध मुक्कामात माझ्या

कहर केलायेस मित्रा...
झकास...............

अप्रतिम

मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो
मोगर्‍याचा गंध मुक्कामात माझ्या

हा शेर विषेश आवडला

मेघवेडा's picture

24 Nov 2010 - 10:41 pm | मेघवेडा

सुंदर. आवडली. :)

प्रत्येक कडवं सुंदर आहे.

संदीप चित्रे's picture

25 Nov 2010 - 1:11 am | संदीप चित्रे

>> मी हिशेबी राहिलो नाही तरीही
बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या >>
विशेष आवडला !

अप्रतिम आहे.. प्रत्येक शेर सुंदर आहे..

शेवट तर खासच!!