जीव गुंतला ( चाल : खेळ मांडला )

गणेशा's picture
गणेशा in जे न देखे रवी...
24 Nov 2010 - 3:11 pm

प्रिय पाचोळ्या

तुझ्या आठवांची मनी पानं उभी र्‍हाई
साद सुन्या आभाळाची तुझे गीत गाई
तरी मेघ दाटला हा पाचोळ्याच्या ठायी
हरवल देह भान मावळल्या नभी
झाकोळुनी हरवतो श्वास वेडापिसा
वनवा ह्यो उरी पेटला... जीव गुंतला

जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला

सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा
तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला
ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा
ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला

ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी
झडलेल्या झाडापरी जीनं, अंगार, जीवाला जाळी

आस घेयी भिडायाला पीरतीची ओढ दे
बोलवीती प्रीतगान वादळात झेप घे
उसवला श्वास राजा संपला प्रवास
तरी न्हाई प्राण सोडला ... जीव गुंतला
जीव गुंतला ....जीव गुंतला ...जीव गुंतला...जीव गुंतला

--- तुझा मेघ

(कविता पुन:प्रकाशीत)

करुणप्रेमकाव्यकविता

प्रतिक्रिया

नगरीनिरंजन's picture

24 Nov 2010 - 3:23 pm | नगरीनिरंजन

मेघ आणि पाचोळा... रुपक आवडले. पण ढगांच्या उरात कोणता वणवा पेटला आणि कोणता अंगार का जाळतो ते कळालं नाही.

गणेशा's picture

24 Nov 2010 - 3:40 pm | गणेशा

धन्यवाद !

पार्श्वभुमी : "साळसुद पाचोळा " हे प्रोफाईल नेम आणि माझे " शब्दमेघ" हे प्रोफाईल नेम असे आम्ही ऑर्कुट वर एका ठिकानी एकत्र आलो आणि बोलता बोलता १५० रिप्लाय मध्ये बरेच गद्य लिहिले (पाचोळ्याची आस .. मेघाचा श्वास..) त्या सर्वांचे सार या कवितेत घतेलले आहे ..

त्यातील साळसुद पाचोळ्याची ( मुळ नाव : सचिन ) काही वाक्य खरेच जबर्दस्त आहेत..
जेंव्हा मेघास, शोधुन ही पाचोळासापडत नाही .. तेंव्हा त्यांनी लिहिलेली मी सर्वत्र आहे .. फांदिवरती आहे .. पानघळीत आहे .. मी वादळात आहे .. आणि कड्याच्या टोकावर ही आहे .. "

त्यानंतर त्यांनी लिहिले होते की मेघा तुझ्या पर्यंत येण्यासाठी मला वनवा बनावे लागते .. तेंव्हा धुर रुपी मला, तुझ मिठी मारता येते .. तु काळा नाहीच तु सोनेरी कडा ल्यायलेला माझा मित्र आहेस"

तेंव्हा मेघ लिहितो :
तुला शोधतना मी कासाविस होतो .. तुझ्या साठी मी दवबिंदु होउन तुला अल्हाद स्पर्श देतो ... दुपारी उन्हात तुला तरसवणार्या सूर्य किरणांच्या आड येवुन तो अंगार मी माझ्यात शमवतो .. फक्त तुझ्या साठी .. हा वनवा झेलुन ज्याला तु सोनेरी कडा म्हणतो ते रुप तुझ्या पिवळ्या रुपाची लकीर आहे .. ते तुझेच रुप आहे .. तुझ्या प्रेमाची आस घेवुन मी वाट पाहतो आहे .. ....

अश्या असंख्य शब्दांनंतर ही कविता आहे ..

धन्यवाद ..

" ओघळली प्राणज्योत दुर, डोंगर , दु:खाची खायी"

ही ओळ अश्याच एका वाक्यावर आधारीत आहे
मेघ पाचोळ्याच्या शोधात वाहत असतो .. फांदिवर .. दोंगरावर कुठेच तो सापडत नाही तेंव्हा मेघ आपली प्राणज्योत कड्यावरुन उडी घेवुन मालवु पाहतो तेंव्हा हळुच एक पान ( पाचोळा ) त्याला कवेत घेते ..

या साठी वरील ओळ आहे ..

-- तसे कवितेला येव्हडे उलगडुन सांगणे मला आवदत नाही.. कारण प्रत्येक वाचकाची एक वेगळी स्तीथी असते ..
परंतु ही कविता खुप गद्या नंतर आलीये म्हणुन आवडले लिहायला
आणि तुअम्चे धन्यवाद

प्रकाश१११'s picture

25 Nov 2010 - 4:34 pm | प्रकाश१११

सोडली रे फ़ुलपान घेतला वसा तुझा
तूच प्रीत दाखीव गा जीव गुंतला
ओली दवा थंडगार, झोंबती रे ही हवा
ह्यो तुझ्याच काळजात जीव गुंतला

अरे मस्त नि मस्त .चाल लागेल बघ . अगदी झकास !!!