तुझा वाढदिवस
नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी
अगदी मनापासून .
आतून
मनाच्या गाभार्यातून
कारण तुझ्या आठवणीने
माझ्या झाडना फुटतो मोहर
नि फुले फुलतात सुवासाची
तुझ्या आठवणींचा गंध पसारतो दूरवर
त्याने धुंदावून जाते माझेच मन
मी नसलो जरी जवळ
तरी असतो सतत जवळ
आठवणीच्या मोह्ळाला झोंबून असतात
मधमाश्या तसाच मी देखील
तुमच्या आठवणीत असतो हरवलेला
तुझे बालपण ....!,
तुझे तरुणपण ...!!
तुझा तो विमान प्रवास
तू निघताना माझे भरून आलेले डोळे ..
तू आल्यावर आपण एकमेकाला मारलेली मिठी
अमेरिकेहून तू आल्यावर केवढा वाटलास मला गोरा
तुझा वाढदिवस
नि माझा हात फक्त आशीर्वादासाठी
मनापासून
आतून ....!!!
प्रतिक्रिया
22 Nov 2010 - 3:39 pm | गणेशा
अतिशय उत्कृष्ट कविता ...
वडिलांच्या भुमीकेतुन मुलासाठी म्हणुन ही कविता वाचली .. खुप खोल ..
साध्या सरळ शब्दात मनाचे ठाव घेण्यारे शब्द
22 Nov 2010 - 6:00 pm | प्रकाश१११
मनापासून आभार !!