खूप पूर्वी वाचलेल्या सत्यकथेच्या एका अंकात असेच प्रयोग होते.
अर्धी फाटलेली, चुरगळलेल्या कागदावरची कविता ('थोडाच वेळ' - तुमची आहे काय?) नेमके काय सांगते आहे?
"जागते रहो " सिनेमासारखी वाटली.
समस्यापूर्तीसाठी म्हणूनही देता यईल.:)
प्रयोग आवडला.
(कागदामागचे टेक्स्चर वापरले नसते तर बरे झाले असते का?)
@विसुनाना - चित्रातील प्रमुख ठिपक्या फराट्यांची मांडणी मीच केलेली आहे. "टेक्श्चर" आयते घेतलेले आहे. (कपट्यावर रदिफ असलेली कविता असल्याचे मानले तर एक तरी समस्यापूर्ती जमवून मी बघितलेली आहे हे कबूल करतो.) जागते रहो सिनेमातली काही प्रसिद्ध गाणी माहीत आहेत, बघितलाच पाहिजे. नेटफ्लिक्सवर अजून मिळत नाही :-( राजकपूर दिग्दर्शक असता तर बघायची इच्छा झाली नसती.
@क्रेमर - मिक्स्ड मीडिया :-) मिश्र तंत्रे ही सर्व संगणकावरचीच आहेत. एकावर एक थर दिलेले आहेत. कागदावर शाईचे ठिपके उमटवून-धुवून-चुरगळून-वाळवून छायाचित्र काढण्याचा प्रयोग मी नुकताच केला आहे. त्याच्यात माध्यमे वेगवेगळ्या कलापरंपरांमधली होती. अनेक लोकांना चित्र दाखवले सुद्धा आहे. मात्र त्याबद्दल चर्चा वेगळी झाली.
सिगरेटच्या पाकिटातली चुरगळलेली चांदी अधिक छान दिसली असती.
दृष्य परिणाम 23 Nov 2010 - 1:32 pm | चिंतातुर जंतू
कागदाचा पोत - चुरगळलेला, अस्ताव्यस्त. सर्व पृष्ठभाग व्यापणारा.
पार्श्वभूमीचा पोत - सुभग रचनेचा. कुसर म्हणता येईल एवढा नेटका पण गोलाईचा अभाव असणारा. तोही मोकळी जागा न ठेवणारा, सर्वव्यापी.
कागदावरची अक्षरे - पुन्हा सुभग. गिचमिड नाही. कुसर म्हणता यावी इतकी नेटकी, एकसारखी. बराचसा कागद व्यापणारी. एकच ओळ इतरांहून लांब (शोधले रस्त्यात...)
कागदाची कड - चुरगळलेली नाही, म्हणजे पुन्हा एकरेषीय, सुभग.
रंग - आधीच फार फिक्या नसणार्या पार्श्वभूमीकडून काळ्या अक्षरांपर्यंत अधिकाधिक गडद होत जाणारे.
मोकळ्या जागा अजिबात न ठेवलेले भाग डोळ्यांना विसावा घेऊ देत नाहीत. काळ्या अक्षरांचा गडदपणा कागदाच्या गडद रंगामुळे आणि पोतामुळे वाचायला त्रास देतो. इतर सुभग कुसरीमध्ये कागदाचं चुरगळलेलं असणं कृतक/कृत्रिम वाटतं.
एकंदर दृष्य परिणाम - कुणीतरी भर दुपारी घराच्या इंटिरीअरसाठी करवती, ड्रिल वगैरे चालवून कटकट करतं आहे असं वाटतं (कारण ते आवाजही सुभग, एकरेषीय असतात. पण सर्व दुपार व्यापणारे असतात. कानठळ्या बसत नाहीत, पण त्यांचा गदारोळ त्रास देतो; निवांत होऊ देत नाही).
प्रतिक्रिया
18 Nov 2010 - 10:55 am | श्रावण मोडक
काही तरी वेगळं वाटलं. काय ते सांगता येत नाही. पण प्रकरण आवडले, लक्षवेधीही आहे. :)
18 Nov 2010 - 11:13 am | विसुनाना
खूप पूर्वी वाचलेल्या सत्यकथेच्या एका अंकात असेच प्रयोग होते.
अर्धी फाटलेली, चुरगळलेल्या कागदावरची कविता ('थोडाच वेळ' - तुमची आहे काय?) नेमके काय सांगते आहे?
"जागते रहो " सिनेमासारखी वाटली.
समस्यापूर्तीसाठी म्हणूनही देता यईल.:)
प्रयोग आवडला.
(कागदामागचे टेक्स्चर वापरले नसते तर बरे झाले असते का?)
21 Nov 2010 - 7:12 pm | युयुत्सु
आमच्या आय आय टी मधले एक प्राध्यापक र कृ जोशी विराम चिन्हांच्य कविता लिहीत असत. त्यांची आठवण झाली.
22 Nov 2010 - 6:48 pm | क्रेमर
चुरगळलेल्या कपट्यावरील अक्षरे मात्र सरळ आहेत. कपट्यावर कदाचित हस्ताक्षर लादल्यासारखे वाटले नसते, असे वाटते.
22 Nov 2010 - 6:59 pm | सहज
सापडले नाही?
23 Nov 2010 - 2:35 am | धनंजय
सर्व प्रतिसादकांना धन्यवाद.
@विसुनाना - चित्रातील प्रमुख ठिपक्या फराट्यांची मांडणी मीच केलेली आहे. "टेक्श्चर" आयते घेतलेले आहे. (कपट्यावर रदिफ असलेली कविता असल्याचे मानले तर एक तरी समस्यापूर्ती जमवून मी बघितलेली आहे हे कबूल करतो.) जागते रहो सिनेमातली काही प्रसिद्ध गाणी माहीत आहेत, बघितलाच पाहिजे. नेटफ्लिक्सवर अजून मिळत नाही :-( राजकपूर दिग्दर्शक असता तर बघायची इच्छा झाली नसती.
@क्रेमर - मिक्स्ड मीडिया :-) मिश्र तंत्रे ही सर्व संगणकावरचीच आहेत. एकावर एक थर दिलेले आहेत. कागदावर शाईचे ठिपके उमटवून-धुवून-चुरगळून-वाळवून छायाचित्र काढण्याचा प्रयोग मी नुकताच केला आहे. त्याच्यात माध्यमे वेगवेगळ्या कलापरंपरांमधली होती. अनेक लोकांना चित्र दाखवले सुद्धा आहे. मात्र त्याबद्दल चर्चा वेगळी झाली.
@ सहज - सांगता येत नाही, कोणास ठाऊक.
23 Nov 2010 - 7:25 am | ए.चंद्रशेखर
कगद चुरगळलेला आहे पण त्याच्यावर छापलेली कवितेची अक्षरे मात्र चुरगळलेली नाहीत यातून कवीला काही सूचित करायचे आहे काय?
23 Nov 2010 - 9:09 am | मिसळभोक्ता
सिगरेटच्या पाकिटातली चुरगळलेली चांदी अधिक छान दिसली असती.
23 Nov 2010 - 1:32 pm | चिंतातुर जंतू