मधुकर घुसळे ह्यांचं एक सुंदर गाण मराठी चित्रपटात आहे.
>>>डोक फ़िरलं या बयेच डोक फ़िरल या
हाताला धरलया म्हणते लगीन ठरलय या <<<
ह्या चालीवर विडंबन (त्या गाण्याचे नव्हे!), समाजात माजलेल्या भस्म्या रोगावर विडंबन सादर करीत आहे. भ्रष्टाचाराला सगळेच नावे ठेवतात, अगदी तडस लागे पर्यंत चरत असतांना देखील. हा भस्म्या रोग आता समाजाच्या मुळात शिरला आहे.
भस्म्या--
भस्म्या झालाय या समद्यांना भस्म्या झालाय या
ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
ह्या कुरणात माजले म्हशे, बघ चरत्यात गळगळघशे
तवाच कागदाला देतात ढुशे अन मारतात मंजुरी ठशे,
दरपत्रक ठरलयं या, वरचे हिस्से ठरलेयं या
ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
भेटे कालेजात सिटं, जरी ब्येकार मारकं-शिट
दक्षिणा चढवून भ्येट, जागा खादीची घे थेट
जुत्यान बडवू या, यांना जुत्यान बडवू या.......
ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
टोपी फ़िर्वाया घडीघडी, खोकी घ्येतात सारी घोडी
सोलती जन्तेची साल।डी, भरती आपुलीच तुंब।डी
शहिदांना इसरुनिया, नेता आदर्श दावी या.......
ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
शेकडो आधी जे घेतले, ते लाखावरी चढले
कोटीकोटीं चरुनी झाले, तरी पुन्हा हपापलेले
घराघरात घुसलेय या, हे घरात घुसलेय या
ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
प्रतिक्रिया
17 Nov 2010 - 10:57 am | प्रकाश१११
भस्म्या--
भस्म्या झालाय या समद्यांना भस्म्या झालाय या
ढेरकं फ़ुगलयं या म्हनतात आनिक खायचय या.....
एकदम मस्त .!! आवडली.!छान कल्पना सुचली.नि छान कविता
17 Nov 2010 - 3:52 pm | गणेशा
अतिशय छान लिहिले आहे मस्त
17 Nov 2010 - 9:44 pm | पैसा
रोज एक या वेगाने जे घोटाळे उघडकीला येतायत, ते पाहता, हे आपलं राष्ट्रीय गीत म्हणायला हरकत नाही!