निषेध्,निषेध!

pramanik's picture
pramanik in जनातलं, मनातलं
13 Nov 2010 - 8:10 pm

मी आज मुंबईला आलो,घरी वीजेचे बील आले होते.रक्कम वाचुन संताप झाला,४८५० रु.,गेल्या महीन्यात हेच बील २९०२ रु. होते,ते मी पुढच्या महीन्यात कमी होईल म्हणुन भरले,तर हे काय?
consumercomplaints.com वर मदत मागायला गेलो तर सर्वीकडे तक्रारी,उत्तराचा पता नाही,मग ह्या रीलायन्सवाल्याला बील देत रहायचे हाच एकच मार्ग उरतो का?
ग्राहक प्रतिनीधी तांत्रिक माहीती अशी देतात की काहीच बोलता येत नाही,पत्र व्यवहार करु शकत नाही म्हणतात्,मग करायचं तरी काय?बील नाही भरले की वीज कापतील म्हणुन भरत रहायचे??
ईथल्या कुणाला असा अनुभव व त्यावरील तोडगा माहीती असल्यास कृपया मदत करा हे नम्र अभिवादन करतो.ह्यावेळी काहीतरी करायचंच असा चंग बांधला आहे,आपली मदत मिळेल अशी आशा करतो.

निस्त्रिश निर्वाण
भगवत् करिश्यति

अर्थात दृष्टांचा नाश देव करील्,पण आपण ही साथ द्यायला हवी.

मुक्तकलेख

प्रतिक्रिया

तिमा's picture

13 Nov 2010 - 8:21 pm | तिमा

रिलायन्सने सप्टेंबरपासून ३००-५०० युनिटसाठी ९ रु. १६ पैसे रेट केला आहे, म्हणून हे बिल वाढलेले आहे. पण त्यावर सोप्पा मार्ग आहे. टाटा पॉवर कडे चेंज करुन घ्या. अर्ज केल्यापासून १ महिन्यात बदलून मिळते. टाटाचा रेट अर्धा आहे. आणि जरी व्हीलिंग चार्जेस ज्यादा लावले तरी रिलायन्सपेक्षा कमीच होतात.
हे कसे करायचे, तर टाटा पॉवरच्या साईटवर जा. तिथे व्यवस्थित गायडन्स मिळेल.
मी हे केले आहे आणि रिलायन्सच्या तावडीतून सुटलो आहे.

लोडशेडींग असणार तर काय करावे?

मी मुंबईत अंधेरीला राहतो.तिथे मिळेल का टाटाची वीज?

तिमा's picture

14 Nov 2010 - 10:52 am | तिमा

हो अंधेरीला टाटाची वीज मिळू शकेल.

रन्गराव's picture

13 Nov 2010 - 9:03 pm | रन्गराव

धिरूभाई का सपना, सारे देश का पैसा अपना ;)

पर्नल नेने मराठे's picture

14 Nov 2010 - 11:09 am | पर्नल नेने मराठे

मला बिल खुपच कमी येते.
मी साउथ मुम्बैत रहाते, आम्हाला best undertaking विज देते.
रिलायन्स चि नाटके मी आइक्ली आहेत.