प्रेरणा - http://misalpav.com/node/15406
जय नावाचा इतिहास जो
घडले तसेच सांगत आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
मानवबुद्धी श्रेष्ठ कर्तबगारी
वचन गीतेत महान आहे
परंतु केवळ लालसेपायी
मानवधर्म तो गहाण आहे
पांडवास हरवण्या दान करुनी
सूर्यपुत्र अधर्माने वागत आहे
दिसता सामोरा मृत्यु अटळ
त्याला धर्म आठवत आहे
रजस्वलेची फेडुनी वस्त्रे
अंकी बसण्या बोलवत आहे
अंधपुत्रा फोडीन तीच मांडी
भीम दरबारी गर्जत आहे
अजुनी नसे जो जन्मला
सुड त्याजवर उगवत आहे
अशा अधमांच्या कपाळी
अमरत्वाचा शाप आहे
कुणास न झुकते माप इथे
व्यास प्रतिभेचा सन्मान आहे
प्रतिक्रिया
12 Nov 2010 - 6:42 pm | प्रियाली
आवडली.
12 Nov 2010 - 6:53 pm | धमाल मुलगा
क्लाऽऽस!
क्या बात है! मस्त जुगलबंदी. खूप खूप दिवसांनी अशी मजा आली वाचायला.
जियो नाना, जियो निरंजन :)
12 Nov 2010 - 7:27 pm | मेघवेडा
क्या बात है! मस्त जुगलबंदी. खूप खूप दिवसांनी अशी मजा आली वाचायला.
जियो नाना, जियो निरंजन
+ १. ऐसाच बोल्ताय.
12 Nov 2010 - 7:46 pm | असुर
+१
असेच म्हणतो!!
--असुर
12 Nov 2010 - 8:56 pm | प्रीत-मोहर
अशेंच म्हण्टां :)
12 Nov 2010 - 6:54 pm | sneharani
अगदी मस्त!
सुरेख!
12 Nov 2010 - 7:31 pm | llपुण्याचे पेशवेll
मस्तं रे नान्या. झक्कास.
12 Nov 2010 - 7:39 pm | रन्गराव
एका पेक्षा एक सरस :)
12 Nov 2010 - 8:01 pm | स्पंदना
चर्चेत अवलियाजी, साहित्यात अवलियाजी, अन आता काव्यात अवलियाजी, इती अव्लियाजी महापुराणम !
12 Nov 2010 - 8:17 pm | रन्गराव
मिपावर सगळ्यात जास्त कौल नानांनीच काढल्यात!
12 Nov 2010 - 8:22 pm | राघव
मस्त. आवडले. :)