(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा. तसेच लेखातील भाषा "फक्त प्रौढांसाठीच" हा इशारा. आक्षेपार्ह वाटणारं असेल तर कृपया येथूनच परत फिरा.)
गेल्या काही दिवसात संस्कृत, संस्कृती ह्यावरून काही चर्चा होतीय. प्राचीन भारतात प्रगती, ऐहीकसूख वगैरे वगैरे. अजून एका चर्चेत स्त्रीवाद, समानता, लैंगीकता, विचारस्वातंत्र्य, प्रकटन, मु़क्तभावनाविष्कार वगैरे वगैरे.
एका आचार्यांनी सांगीतलेल्या श्लोकावरून सूचलेले अजून एक स्फूट.
********************************************
नारी स्तनद्वयनाभिप्रदेशम|
दृष्ट्वा मा गा मोहावेशम |
एतन्मांसवसादि विकारम |
मनसि विचिन्तय वारंवारं |
भज गोविन्दम भज गोविन्दम | गोविन्दम भज मूढमते |
(साधारण) अर्थ : स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.(त्यात मोह पडण्यासारखे काय आहे? इट इज जस्ट अ मॉडिफिकशन ऑफ फ्लेश & फॅट ) असा विचार मनात आण. पुनःपुन्हा हाच विचार कर.
*****************************************
माझ्या मनात स्वभावीक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तिने शेकडो वर्षांपुर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तिला सांगीतले असावे. सामान्य माणसाला शंकराचार्यांनी असे अनैर्सगिक सांगीतलेत तर तो त्यांना तोंडावर नाही पण पाठीमागे नक्कीच वेड्यात काढेल. बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे. सामान्य माणसाच्या ते शब्दश: कधीच पचनी पडणार नाही.
स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे. प्रत्येकाने आपल्या मनाला विचारावे की जर का कुणालाही कळणार नाही (एकदम गुप्त), मनसोक्त इंद्रीयसुखाशिवाय त्यातून इतर काही गुंतागुंत होणार नसेल तसेच आपल्या व समोरच्या व्यक्तिच्या ते मनाविरुद्ध नसेल तर असे शारिरि़क संबध उपभोगायला आवडतील का नाही? जे काय उत्तर येईल त्यावरून कळेल की Resistance is totally futile. शतकानुशतके हे चालु आहे व बहूतेक राहीलच. बहूतेक अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही. स्त्रियांना देखील पुरूषदेहाचे तितकेच आर्कषण निर्सगाने बहाल आहे पण जननक्षमता बिग बिग फॅक्टर. ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो. क्वॉलीटी ओव्हर क्वॉंटीटी. स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही. (विकृतीचा अपवाद वगळता)
बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे. जिथे कामशास्त्राची निर्मीती झाली. वेगवेगळ्या संस्कृत काव्यातून शृंगाराची बहार आली, स्त्रीचे मोहक अंग दिसेल अशी वेशभूषा असलेली आपली संस्कृती एकदम लाजेच्या सुनामी लाटेत कशी मुक्त किनार्यावरून दरीत, डोंगरमाथ्यावर अडकली? थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला? इतिहासाच्या वेगेवेगळ्या टप्प्यावर स्त्री पुरूष संबध, मोठमोठ्या व्यक्तिमत्वांची वैयक्तिक आयुष्य पहाता शरीरसंबध हा शब्द एकाच वेळी अत्यंत आर्कषक काहीतरी किंवा अरेरे हे असे काय (जर तुम्ही त्या संबधातील नायक नायीका असाल / नसाल) अश्या परस्परविरोधी भावना कशा काय बरे उत्पन्न करते.
जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली? अश्या आर्कषणाचे भान, धुंदी ही योग्य रितीने मुलामुलींच्या अंगवळणी पडेल व विशेषता त्यातील तोटे, अयोग्य त्यांना समजेल असे जाणिवपूर्वक प्रयत्न (सामाजिक जबाबदारीने) व्हायला हवेत कितपत होतात ?
लैंगीक शिक्षण फार मोठी गोष्ट झाली. मला आठवतेय नात्यातल्या, शेजारच्या वयस्कर महीलांच्या नजरेतून व तोंडून लिपस्टीक, स्लीव्हलेस ब्लाउज घातलेल्या तरूण बाईकडे पहाताच टोमणा निघायचाच. ते सोडा, साधा अंगभर गाऊन घालणे हे देखील काहींना मान्य नव्हते. असे असेल तर विषयसुखाकडे निकोपतेने बघणे किती अवघड असेल.
स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले? नवर्या-बायकोने एकमेकांना नावे ठेवणे हा वैवाहीक जीवनाचा महत्त्वाचा भाग मानले गेले आहे का? लहान मूले अनुकरणाने शिकतात. मोठी माणसे इतर मोठ्या माणसांना दिसणार नाही असे भांडतात पण स्वतःच्या मुलांसमोर हे बिनधास्त भांडतात. त्याचा मुलांवर मोठेपणी परीणाम होत असेल का?... अगदी आत्ताचे उदाहरण म्हणजे चांगले शिकलेले, सुखवस्तू, परदेशात रहाणारे लोक, बायका नवर्यांच्या व नवरे बायकांच्या कागाळ्या इतरांकडे (माझ्याकडे ;-)) करताना पाहीले आहे. मी व बायको अश्या लोकांच्या घरी जायचे असेल तर थट्टेत म्हणतो बर आज तु माझ्याबद्दल असे सांग, मी तुझ्याबद्दल हे सांगू का?
आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्याचदा असूयेने) निकाल देत असतो.
शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही? जसे वय वाढते तसे लक्षात येते की आर्थीक, सामाजीक जबाबदारी नसताना खूप प्रिय असलेला "विषय" जरा वयानूसार मागे पडतो. सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात. अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते. मुले बाळे, बायको, घर एक नियमीतता ह्याचे देखील व्यक्तिला खूप आर्कषण येते. फॅमीली, कुटूंब ह्या सारखे उत्तम टॉनीक नाही असे वाटते. तरूण असताना जगाशी झुंजाल पण जखमी झालात तर कोणीतरी हवे ही भावना कुटूंबाचे आर्कषण अजूनच वाढवते.
माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहाणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही. २५ वर्ष पुर्ण झाल्यावरच लग्न केल्याने भारताची लोकसंख्या वाढ थोड्याप्रमाणात तरी कमी करू शकू, स्वतःच्या आयुष्याच्या कल्पना, स्वप्ने पुरी करू शकू. जरा परखून जोडीदार निवडू शकू. स्वतःचे आयुष्य थोडे तरी सुखी करू शकू.
पण खर्या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल.
प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्या व्हाव्या असे वाटते. पण बर्याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड.
प्रतिक्रिया
2 Oct 2007 - 8:30 pm | प्रकाश घाटपांडे
लपले त्यावरी टपले सारे, ओळखीचे चोर गं! कुठल्या लावणी कि काव्य आहे ते आठवत नाही.सविस्तर प्रतिक्रिया नंतर.
प्रकाश घाटपांडे
26 May 2010 - 8:00 am | टारझन
खल्लास लेखण !!! जबरदस्त सहजराव :) !!
- (५० मार्काचा संस्कृत पेपर दिलेला) टारझन
2 Oct 2007 - 8:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सहजराव !
तुम्ही विषय मस्त मांडलाय, पण आम्हालाही घाटपांडे साहेबांप्रमाणे जरासा वेळ हवाय !
कारण जराशा नाजूक विषयावर लिहायचे असल्यामुळे जरा घाई करत नाही !
बाकी तुमची डेअरींग सभ्य संस्कृतीत बसेल का ? याच विचारात आम्ही सध्या तरी व्यस्त आहोत !
अवांतर ;) बाकी शंकाराचार्यांचे श्लोक अष्टके यांचा संदर्भासाठी योग्य ठिकाणी योग्य वापर केला आहे !
तुमच्या अभिरुचीची आणि पाहण्याच्या दृष्टीकोणाची दाद दिली पाहिजे !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
2 Oct 2007 - 8:46 pm | विकास
लेख फारच आवडला सहजराव!
>>>बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच.
हे अगदी योग्य आहे. म्हणून बंधन नाही, पण जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते. त्यामुळे बर्याच गोष्टी सुखकर होऊ शकतात.
विकास
2 Oct 2007 - 9:29 pm | स्वाती दिनेश
जबाबदारीची जाणीव करून देणे आणि एकमेकांशी (आई-वडील आणि मुले) कुठल्याही विषयावर "योग्य भाषेत" चर्चा करता येण्यासारखे वातावरण घरात असले पाहीजे, संवाद असला पाहीजे असे वाटते.
विकास यांचे हे वाक्य अगदी पटलेच.
सहज,
लेख आणि नाजूक विषयाची मांडणी आवडली.
स्वाती
27 May 2010 - 12:08 pm | गुंडोपंत
मस्त लेख आहेच!
विषयही रोजचा - पण उघडपणे टाळला जाणारा. :)
बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच.
हे तर खरेच!
असे अजून आणि सातत्याने यायला हवे असे वाटले.
आपला
गुंडोपंत
2 Oct 2007 - 9:01 pm | प्रकाश घाटपांडे
'मैत्र' ही किरण यज्ञोपवित यांची एकांकिका ही मिळून सार्या जणी च्या वर्धापन दिनाला एकदा पाहिली होत. त्यात हे अंतर्मनातले संवाद सैतानाचे विचार म्हणून प्रतिबिंबित असे दाखवले होते. मनातील द्वंद्व फारच सुंदर दाखवले आहे.
सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात.
प्रकाश घाटपांडे
2 Oct 2007 - 9:16 pm | प्रियाली
>> सहजराव आपण या उपेक्षीत 'विषया' ला वाचा फोडल्या बद्द्ल आभार. सगळ्यांनी भरभरुन प्रतिक्रिया द्याव्यात.
सहमत आहे. लेख चांगला जमला आहे.
अवांतर:
अशुद्धलेखनाबद्दल सहजराव जाहीर लिहितात म्हणून जाहीरच सांगते. इतरांनी अशुद्धलेखन काढून दाखवले की त्रास होतो तितकाच त्रास अशुद्धलेखन वाचताना होतो. हे सांगताना मीही शुद्धलेखनाची पंडिता नाही, माझ्याही अगणित चुका होतात तरीही शुद्धलेखन तपासून जितके शक्य आहे तितक्या सुधारणा करा असेच सांगेन. फायदा तुमचाच आहे.
2 Oct 2007 - 9:23 pm | चित्रा
आजचा लेख खरोखरच उत्तम (नुसताच बरा नाही)! काही काही गोष्टी तर अगदी मनातल्या बोलताय असे वाटले. पटकन विचार आले ते लिहीते आहे. (प्रतिसादांना फाटे फुटायला लागले की अजून लिहीन!). पण लेख ज्या मोकळेपणे लिहीला आहे आणि जसा मांडला आहे ते विशेष करून आवडले.
उदा:
>>स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. ते पुर्णत्व करण्याच्या ऐवजी वर्चस्वाच्या लढाईत कसे काय अडकले गेले?
>>माझ्यामते वयाची किमान २५ वर्षे पुर्ण, कमीत कमी २ ते ५ वर्षे जगाचा अनुभव म्हणजे स्वःताच्या पायावर उभे रहाणे, शिवाय नोकरी करत एकटे रहणे (एकटे ह्या करता की घर कसे चालवायचे हे शिक्षण कोणाच्याही मदतीशिवाय) ह्या शिवाय कूठल्याही सर्वसामान्य व्यक्तिला लग्न करायची लायकी येत नाही.
>>खर्या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल.
>>जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील, अन्यथा यू आर स्क्रूड.
अगदी खरे.
>>जाणत्या वयापासून ह्या आर्कषणाच्या थोड्या धूंदीत असलेल्या किंवा असलेली वर असंस्कृत, बहकलेला/ली अशी लांच्छन का आली?
मुलामुलींनी मोकळेपणे वागणे आणि छचोरपणा/सैल वागणे या दोन थोड्या वेगळ्या गोष्टी आहेत. सगळ्याचा तोल सांभाळता आला तर उत्तम, पण प्रत्येकालाच ते जमत नाही. जास्त चिकित्सा करीत नाही , तुम्हीच म्हणालात म्हणून :-).
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला?
सामान्य माणसांच्या मर्यादा पडतात. लहान कपडे म्हणजे किती लहान हे सीमारेषेवरचे ठरतील हे कोण सांगणार? त्यापेक्षा अंग झाकून टाकलेले बरे अशा विचारातून हे सर्व आले असावे. अर्थात काय योग्य काय अयोग्य हे ज्याने त्याने आपल्या विचाराने ठरवावयाचे स्वातंत्र्य त्याला / तिला हवे - समाजाला काय वाटेल असे विचार करण्याची गरज भासू नये.
2 Oct 2007 - 9:23 pm | प्रकाश घाटपांडे
`आमच्या शाळेतल्या वाड्यावस्त्यांवरच्या थोराड मुलांना तमाशाचे फार आकर्षण . गावात तमाशे कायम. आमच्या देव गुरुजींना ते आवडायचे नाही. ते म्हणायचे " अरे सकाळी सकाळी मिश्री लावताना या बायांची थोबाड बघा. ओकायला येईल. गोरे गोमटे रंग लावलेले असतात तोंडाला. चालले लगे तमाशाला' आकर्षणा बद्दल ते म्हणायचे 'वान्याच्या पोराला भजी खावीशी वाटतात, हॉटेल वाल्याच्या पोराला गुळ खोबरं खावस वाटतं.'
पण खर्या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल.
सुख सुख म्हणताहे दु:ख ठाकोनी आले , भजन सकळ गेले चित्त दु:श्चित्त झाले
(असमर्थ)
प्रकाश घाटपांडे
2 Oct 2007 - 9:25 pm | कोलबेर
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला?
अमेरिकेत न्यू जर्सी मध्ये एका मुलीवर बलात्कार झाला तेव्हा, बील ओ रायली म्हणाला "हॉल्टर टॉप घालून रात्री न्यू यॉर्क मधून फिरले तर असेच होणार"
साधारण दोनेक वर्षांपूर्वी मुंबईत एका मुलीवर पोलिसाने बलत्कार केला तर प्रमोद नवलकर म्हणाले होते की "आमच्या काळातील मुली नाही हो अश्या चौपाटीवर फिरायला जायच्या!"
प्रमोद नवलकर आणि बिल ओ रायली दोघांनीही आपला हा लेख वाचावा!
अवांतर: ' सुचना' मात्र जाम आवडली!
2 Oct 2007 - 9:39 pm | विकास
>>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला?
त्यावरून दोस्ताना सिनेमातील अमिताभचा एक डायलॉग आठवला:
बिकीनीत समुद्रावर चालणार्या झीनतच्या मागे एक दारूडा शिट्या वाजवत मागे लागतो. ती त्याला (इश्टाईल मधे) पकडून पोलीसचौकीत घेऊन येते आणि इन्स्पेक्टर अमिताभ कडे तक्रार करते. तीच्या कडे पाहात अमिताभ म्हणतो, " इस तरह के कपडे पेहेन्कर अगर आप रस्ते पे घुमने जायेंगी तो लोग सिटीयॉ नही बजायेंगे तो क्या मंदीर की घंटीया बजायेंगे ?" (माझ्या हिंदीबद्दल मराठी प्रमाणेच माफी!) या त्याच्या एका कॉमेंटनंतर झीनत त्या सीनेमात अंगभर वेषातच दाखवली आहे...
2 Oct 2007 - 10:01 pm | धनंजय
नीट विचार करून उत्तर लिहितो. पण हा विषय प्रौढ सभ्य समाजात शंभर टक्के चालण्यासारखा असावा असे माझे मत आहे. सुसंस्कृत समाजात हे डेअरिंगबाज मुळीच वाटू नये, सामान्य वाटावे.
हा विषय चर्चेला काढल्याबद्दल धन्यवाद.
2 Oct 2007 - 10:05 pm | प्रकाश घाटपांडे
स्त्रीदेहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे (देहाचे आर्कषण ही नैर्सगीक देण आहे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे
लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच. माझ्या पहाण्यात कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती ?
आपण सतत इतरांना, (विशेषता "सुखपाखरांना") जज् / पारखत असतो, कठड्यात उभे करुन त्यांच्या विषयी प्रतीकूल (बर्याचदा असूयेने) निकाल देत असतो.
मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला
प्रत्येकाला आपल्या सर्व इच्छा, कामना, वासना पूर्या व्हाव्या असे वाटते. पण बर्याचदा ह्यासाठी आपल्याशिवाय दुसर्याची साथपण लागते. जर एकमेकांच्या कलाने घेत तुम्ही तुमचे कोडे नीट सोडवले तर तुमच्या सगळ्या (शारीरिक (पेटपूजा, देहपूजा), मानसिक / वैचारिक) भूका, चोचले पुरवले जातील,
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भिती
अर्ध्या रात्री घालतील घाला
तुझ्या उसाला लागलं कोल्हा
(कोल्हा)
प्रकाश घाटपांडे
2 Oct 2007 - 10:54 pm | राजे (not verified)
लेख ही व विषय ही..
काही गोष्टींची मर्यादा व बंधन हे समाजामध्ये वावरताना स्वतः घालून घेणे कधी ही उत्तम, दुसरा कोणी सांगू लागला की ते प्रवचन वाटू लागते, तेव्हा मर्यादा व बंधन जरुरी.
" पण खर्या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. "
सहमत.
मागे एकदा मनोगत वर अथवा कोठे तरी महाजालावर मी लिहले होते की,
सामान्य मानवाने स्त्री ह्या विषयाकडे त्याच वेळी वळावे जेव्हा तुमची,
१. तीची इच्छा जाणून घेण्याची कुवत असेल.
२. तीची योग्य मागणी पुर्ण करण्याची ताकत असले.
३. ती जेव्हा म्हणेल तेव्हा वेळ देण्याची तयारी असेल.
४. विषयवस्तू कडे पाहण्याची कलात्मक नजर असेल.
५. व तीच्या बद्दल अथवा स्वतः बद्दल अपराधीक बोध नसेल.
व सर्वात महत्वाचे खिस्सा तपासून पाहा व मगच तिच्याकडे वळा.
काय म्हणता ? बरोबर आहे ना ?
राजे
(*हेच राज जैन आहेत)
2 Oct 2007 - 11:02 pm | विसोबा खेचर
सहजराव,
अतिशय उत्तम लेख!
शिवाय हा लेख आणि याला सन्माननीय सदस्यांकडून आलेल्या प्रतिसादावरून मिसळपाव हे एक सशक्त, सुदृढ आणि निरोगी असे संकेतस्थळ आहे याबद्दल माझ्या मनात तिळमात्रही शंका उरलेली नसून मी मनोमन सुखावलो आहे!
सहजराव, आपल्याकडून असेच उत्तमोत्तम लेख यापुढेही यावेत असे वाटते. मिसळपावचे सदस्य ते सहज झेलतील, पचवतील, आणि त्यावर तेवढ्याच तोलामोलाने आपले विचारही मांडतील अशी खात्री वाटते!
बाऊलमधे ठेवलेली मांस, चरबी व कमनीय देहावरचे पुष्ट अवयव एकाच मापात मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे.
च्यामारी कसली आल्ये विरक्ती? हे सगळे साले शब्दांचे रचलेले पोकळ मनोरे आहेत.
मला सांगा, शंकराचार्य दोन वेळा काहीतरी खातच असतील ना? त्यांनाही भूक लागतच असेल ना? जे काही खात असतील त्याची त्यांना चव तर लागतच असेल ना? मग झालं तर! उगाच कशाला वासना शमवण्याच्या वगैरे गप्पा मारायच्या? ते ब्रह्मचारी होते. अहो परंतु कुठलाही प्राणिमात्र म्हटला की लैंगिक भूक ही नैसर्गिकच गोष्ट आहे. शंकराचार्यांनी भले लग्नकार्य केलं नसेल, बाईपासून ते चार हात दूर असतील. तरीही निसर्ग कुणालाच चुकला नाही. शंकराचार्यांनादेखील स्वप्नदोषाचा विकार होऊन झोपेतल्या झोपेत त्यांचाही निचरा होत असेल/असलाच पाहिजे!
मग मारे दिवसभर,
' स्त्रियांचे स्तन आणि नाभिप्रदेश पाहून मोहात पडून तू उद्दीपित (मोहावेश ) हो ऊ नकोस. हे अवयव म्हणजे मांस आणि चरबी (वसा) यांत निर्माण झालेली केवळ विकृती होय.'
या गफ्फा मारायला शंकाराचार्य मोकळे तिच्यायला! :))
असो..
आपला,
आदितात्याचार्य!
2 Oct 2007 - 11:42 pm | विसोबा खेचर
(सूचना - अपघाती लिखाण, धोकादायक अशुद्धलेखन पूढे. चिकित्सेचा काळा चष्मा काढा अपघात टाळा.
हे बाकी सहीच! :)
तात्या.
--
मिसळपाववर शुद्धलेखनाबद्दलची फाजील चर्चा, मजकूरापेक्षा त्यातील शुद्धलेखनाला असलेले अवास्तव महत्व, भाषेचे-शुद्धलेखनाचे वगैरे जीवघेणे नियम, या गोष्टींना कमितकमी महत्व असेल. मिसळपाव ही सामान्य जनांची उठबस करण्याची टपरी आहे. येणार्याने इथं यावं, काय एखाददोन प्लेट खायची ती मिसळ खावी, वर थंडगार ताक प्यावं आणि म्होरच्या वाटंला लागावं! कसं? :)
3 Oct 2007 - 7:42 am | प्रमोद देव
अतिशय मुद्देसुद लिखाण! सहजराव तुमच्या नावाप्रमाणेच गंभीर विषय देखिल तुम्ही अतिशय सहजतेने मांडलाय.
भविष्यातही असेच विचारप्रवण लेखन आपल्याकडून अपेक्षित आहे.
3 Oct 2007 - 8:20 am | सहज
सर्वप्रथम मोकळ्या मनाने लेख स्वीकारल्याबद्दल (व प्रतिसाद दिल्याबद्दल, देणार्या) सर्वांचे आभार. अजूनही प्रतिसाद बहूतेक येणार असतील.
>>हॉल्टर टॉप घालून ....तर असेच होणार
अश्या वेशभूषेने कोणाच्या भावना अनावृत्त झाल्या मान्य पण म्हणून स्व:ता ते उपभोगायचा अजीबात हक्क नसताना लगेच दुसर्याच्या मनाविरुद्ध बळजबरी करणे हे त्या व्यक्ति व ( व हे स्पष्टिकरण स्वीकारणार्या समाजाच्या ) "असंस्कृत"पणाचे निर्दशक आहे. तसेच ते पुर्णता चूकीचे कारण आहे. त्याच न्यायाने एखादा फळविक्री ठेला /हॉटेल मधे घूसून पैसे न देता, मला छान फळ दिसले, वास चांगला आला. कशाला ठेवलेत उघड्यावर ? वास बंद ठेवायचा. तुमचा दागीना/बंगला/गाडी (चांगला आहे. का इथे बांधलात? का रस्त्यावर आणलीत?) चांगला आहे मी घेतला. बजबजपूरी होईल.
मधे वाचले होते की आदिवासी जे कपडेपण घालत नाहीत. त्यांच्यामधे बर्याच जमातीत रेप इज अनर्हड ऑफ.
>>थोडेफार अंगप्रदर्शन
अस आहे की ह्या विषयावर प्रत्येकाची वेगवेगळी व्याख्या / मत असणार आहे. मी दिलेले उदाहरण स्लीव्हलेस कपडा, लिपस्टीक मला वाटते आजच्या जगात तरी ह्या दोन गोष्टीवरून कोणी बायकांना हिणवणार नाही. पण एकेकाळी तसे झाले आहे. आज जी तुम्हाला फारच भडक वेशभूषा वाटेल, एक दोन पिढ्यांनी सहज स्वीकारली असेल. आपण ("संस्कृतीरक्षक" बनायची) एवढी आगपाखड करायची काय गरज आहे. सिनेमा, टीव्ही ते काम चोख करतोय हळूहळू तरुणांचे कपडे असेच असायचे हे लवकरच सर्वमान्य होइलच.
>>शुद्धलेखन
अहो मला देखील आवडले असते व्याकरण नियम पाळायला पण कित्येक वर्षांनी मराठी लिहीत आहे. त्यामुळे जरा टंकलेखनाच्या चुका पण जोडल्या जातात. जाणूनबुजून चूका करत नाही पण मतिर्ताथ सोडून शुद्धलेखनावर घसरू नका हो. हा आता, तुमच्या विकत घेतलेल्या पुस्तकात, शालेय अभ्यासक्रमात अश्या चूका होणे गंभीर पण मुक्त व मुफ्त आंतरजालावर काटेकोर अपेक्षा जरा बंधनकारक वाटते. मग वर म्हणल्याप्रमाणे, बंधन घातले की मनुष्यस्वभावच असा आहे की तोडणारच!
अश्या चुका तुम्ही जरूर मला खरड, व्य. नि. ने कळवा मी त्याचा नक्की पुढच्या लेखनात उपयोग करीन. तुम्ही समजवून दिलेत तर एकदा केलेली चूक शक्यतो परत करणार नाही.
तरीही न जमल्यास मात्र क्षमस्व.
असो शुद्धलेखनाच्या बाबतीत माझ्या सुचना मजेशीर असतात कि नाही ;-)
3 Oct 2007 - 11:42 am | तो
लेख बहकलेला वाटला. वेगळ्याच गल्लीत सुरू होऊन भलत्याच चौकात संपला. पटलेल्या/न पटलेल्या मुद्यांबद्दल सवडीने.
3 Oct 2007 - 11:45 am | सर्किट (not verified)
मला सहजरावांचे विचार आवडले. मांडणी सहज सुधारता येईल. पण विचार सुधारणे कठीण. म्हणून त्याच्याशी सहमत असूनही, त्याने अशा क्षुल्लक गोष्टींना महत्व देऊ नये, असे वाटते.
- सर्किट
3 Oct 2007 - 1:06 pm | तो
प्रतिसाद आगाऊ, चिकित्सक स्वरूपाचा वाटल्यास नाईलाज आहे. लेखाचा प्रत्येकाने आपापल्या भूमिकेतून अन्वयार्थ लावला आहे असे त्याला वाटते. लेखात निष्कर्षाप्रत येण्यापुरता विदा नाहे असे त्याला वाटते.
>स्त्रीदेहाचे आर्कषण विशीष्ट वेळेतच म्हणालो याकरता की तुमची कितिही आवडती / कमनीय स्त्री असो, ती जर का तुम्हाला अजिबात आवडणार नाही अशी "वागली" तर कूठलीही वेळ असो तुम्ही त्या स्त्रीदेहात त्याक्षणी तरी रमणार नाही.
मानवी मनाच्या भावनांची निश्चित क्रमवारी असावी. जसे हताशेत भिती वाटत नाही/ हसू येत नाही. त्यामुळे हसणे/भिती क्षुल्लक गोष्टी व हताशा मुलभूत भावना मानणे अवास्तव आहे. पुन्हा मुद्दा मांसाच्या गोळ्याच्या बाजूने तर नाही वळला?
>थोडेफार अंगप्रदर्शन हा अपराध कसा काय झाला?
असे कायदे परदेशातही असावेत. सार्वजनिक ठिकाणे काय कपडे घालावेत हा अपराध असू शकतो. खाजगीत तुम्ही काय करता यात सरकार/समाज लुडबूड करते असे वाटत नाही.
>सहजीवन, दैनंदीन आयुष्यातील स्थीरता, सहजता ह्या किती समाधान देऊन जातात.
वयोमानानुसार समाधानाच्या व्याख्या बदलत असाव्यात. हे नैसर्गिक असावे.
>अती (खुप चॉइस) झाले की निसर्गनियमाने परत एकाच विशीष्ट निवडीला महत्त्व येते.
इथे कुठली 'विशिष्ट निवड' अपेक्षित आहे?
किरकोळ निरीक्षणे:
>...मोजायला पराकोटीची विरक्तावस्था पाहीजे.
किंवा तसे वय. कारण पुढे आहेच..
>...हे) व विशीष्ट वयात व वेळेतच येणारी आहे.
>अशाकरता म्हणालो की उद्या कोणीच पाहीला नाही.
कधी म्हणाला? इथे संदर्भ वाटला नाही. भरीचे वाक्य असावे.
>ह्याबाबतीत स्त्रीयांचा मेंदू, पुरूषाच्या मेंदूपेक्षा आधीक प्रगल्भतेने काम करतो.
मुद्दा नाही समजला. नक्की कसा?
>स्त्री-पुरूष दोघेही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत.
इथून पूर्ण नवा लेख सुरू होतो असे त्याचे मत आहे.
>शेवटी मनात विचार येतो मग हे असेच कोणी कधीही कूणा बरोबर ही?
वाक्य समजण्यास असमर्थ. बरेच संदर्भ या लेखाबाहेरचे दिसतात.
हलके घ्या:
>माझ्या 'पहाण्यात' कित्येक कडकशिस्तीतल्या घरातील मुलींनी एकदम मवाली गणला जाईल अश्या मुलांशी पळून जाऊन लगन केले आहे.
अरेरे.. तुम्ही तुलनेने 'सालस' असाल ;)
3 Oct 2007 - 2:38 pm | यनावाला
१/श्री. सहज यांच्या या लेखाच्या प्रारंभी 'भज गोवन्दम' मधील जे कडवे आहे ते मी एका प्रतिक्रियेत उद्धृत केले आहे. त्यात काही चुका आहेत. एक संस्कृत रूपही चुकले आहे.पण जो सर्वसाधारण अर्थ दिला आहे तो मूळ कडव्याच्या अर्थाशी प्रामाणिक आहे हे नि:संशय.
*
२/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....."
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे.
*
३/देहासक्ती ही स्वाभाविक आहे याची आद्यशंकरांना जाणीव होतीच. म्हणून तर त्यांनी " या मोहात पडू नकोस असा उपदेश केला. काम,क्रोधादि विकार नैसर्गिकच अहेत.पण मोक्ष हवा असेल तर त्या विकारांवर संयमाने विजय मिळवायला हवा.त्यासाठी देहासक्ती जायला हवी.मणून "देह म्हणजे रक्त.मांस, चरबी इ.चा पुंज,श्लेष्मा,मल,मूत्र,रोगजंतू यांचे कोठार अशी वर्णने आहेत. तारुण्यात सुंदर दिसणार्या देहाचे अपरिहार्य वृद्धत्वात काय होते याचे वर्णन ज्ञानेश्वरीतही आहे. (अ.१३,ओव्या ५५० ते ५८०).
*
४/(चौर्याऐशी लक्ष योनी, पुनर्जन्म, मोक्ष इ. वर माझा तिळमात्र विश्वास नाही. सद्ध्या रिचर्ड डॉकिन्स (डीएडब्लुकेआय एनएस )
ज्याचा नित्य उदघोष करीत आहे त्या डार्विन उत्क्रांतिवादालाच मी विश्वासार्ह मानतो.)
*
५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत.
.........यनावाला.
3 Oct 2007 - 3:36 pm | सहज
२/ श्री.सहज लिहितात "माझ्या मनात स्वभाविक प्रश्र आला की अरे जर का शंकराचार्यांसारख्या अधिकारी व्यक्तीने शेकडो वर्षांपूर्वी हे सांगीतले. ते "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे. ....."
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे.
"मूढमते किंवा मुमुक्षु साठीच आद्यशंकराचार्यांनी हे रचले" असे नंतर कोणी तरी घुसडले असण्याची / त्यांच्या नावावर खपवण्याची शक्यता आहे का? कारण १५०० वर्षे झाली तरी हे सामान्यांच्या पचनी पडले आहे असे तुम्हाला वाटते ? मी "ऑलमोस्ट अधिकारी" किंवा एकदम जवळच्या व्यक्तीला सांगितले असावे"असे म्हणालो याचे कारण तेच लोक आद्यशंकराचार्यांचे म्हणणे गंभीरतेने घेईल. वेड्यात काढणार नाही अश्या प्रकारच्या व्यक्तिला ते उद्देशून असेल असे मला अजूनही वाटते.
३/ वैषयीक सुखापायी व्यसन, अतिरेक, दुराचार करू नये समजते. संयमाने विजय मिळवायला हवा म्हणजे नक्की काय ? का हि पण सारवासारव/ शाब्दीक बुडबुडे आहे. पण तूला मोक्ष मिळेल मिठाइ खाऊ नको. नैर्सगीक भावना दाबून टाक. अपरिहार्य वृद्धत्व आहे म्हणून तारूण्यात मोह करू नको, हे लॉजीक कधीच मान्य होइल असे वाटत नाही. मानववंश पूढे कसा वाढणार, का तेवढे पुढारलेले विज्ञान होते, आहे?
महात्मा गांधीना जसा स्वातंत्र्यप्राप्ती नंतर काँग्रेस पक्ष विलीन करावयास हवा होता असे म्हणतात तसे हे मोक्षवादी पार्टीच्या नेत्यांना मानव जात विसर्जीत करायची होती का काय?
असो तुम्ही मोक्ष इ. वर तिळमात्र विश्वास नाही म्हणता त्यामूळे जाऊ दे...
3 Oct 2007 - 6:50 pm | विकास
हे अनुमान पटण्यासारखे नाही. त्यात "मूढमते " असे संबोधन आहे. तसेच पुढे "भगवद्गीता किंचिदधीता |" असेही म्हटले आहे. ते 'ऑल्मोस्ट अधिकारी " व्यक्तीच्या संदर्भात संभवत नाही. आद्यशंकराचार्यांनी हे सर्व सामान्य मुमुक्षु साठीच रचले आहे.म्हणूनच आज सार्धसहस्र (१५०० ) वर्षांनीही ते आपणाही उपलब्ध आहे.
शंकराचार्य आपल्या शिष्याबरोबर काशीमधे हिंडत असताना त्यांना एक संस्कृतचा म्हातारा शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांकडून कर्मठपणे केवळ व्याकरणाची घोकमपट्टी करवून घेताना दिसला. ते पाहून त्यांना सुचलेले हे काव्य आहे. त्याला स्त्रोत्र वगैरे म्हणून कोणी त्याच्या सारखे वागण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही. कदाचीत पाचव्या वर्षीच पारमार्थीक ओढ लागलेल्या या व्यक्तीस संस्कॄत कधी कोणी शिकवले होते का ते माहीत नाही पण अवगत चांगलेच होते हे नक्की. त्या अनुभवावरून आणि पिंड कवीचा असल्यामुळे ते लिहीले गेले असावे. एम एस सुब्बालक्ष्मीमुळे मला आणि माझ्यासारख्या अनेकांना ते आवडले असावे.
अवांतरः रात्रभर जागून सकाळच्या वेळेस " मॉर्निंग वॉ़क" घेणार्या गदीमांना म्युनिसिपॅलीटीचे दिवे सकाळ झाली म्हणून मालवले जात असलेले दिसले आणि "मायाबाजार" या सिनेमातील "विझले रत्नदिप.. आता उठा यदुुनाथ" असे कृष्णावरचे गाणे सुचले. तसाच काहीसा प्रकार शंकराचार्यांच्या बाबतीत घडला. त्याचा अर्थ कसा लावायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न.
4 Oct 2007 - 12:25 am | चित्रा
हे काय होते आहे, की इथल्या काहींना (माझ्यासारख्या संस्कॄत अजिबात येत नाही). सहज यांच्या या कवितेप्रमाणे. त्यामुळे ह्या सर्व गोष्टींवर लिहीताना कसलाच संदर्भ नसतो आणि रूपांतर किंवा कोणी तरी समजावून सांगेल यावर अवलंबून रहावे लागते. यामुळे संस्कॄत परत एकदा शिकण्याचा विचार करते आहे. पण ते असो.
आत्तासाठी म्हणून भज गोविंदमवर बोलण्याआधी ते काय आहे ते समजून घेण्यासाठी इंग्रजी भाषांतरे शोधली. ती मिळाली खालील्प्रमाणे- (तेथील काही कडवी मुद्दाम भाषांतर केलेलीच देत आहे - ज्यांना अधिक वाचायचे आहे ते त्यांनी दुव्यावर जाऊन वाचावे.)
भज गोविंदम शोधताना हे एक रूपांतर सापडले. त्यात म्हटल्याप्रमाणे -
He may be absorbed in enjoyment of the senses
Or in yoga, he may be engrossed
In somebody’s company or he may be alone,
But if his heart dwells in the divine,
then it is he who is blissful,
It is he who is blissful,
It is he alone who is blissful.
पुढे म्हटले आहे -
Oh God, protect me from this troublesome world
where one has to be born again and again,
die again and again,
and fall into the womb of a mother again and again,
and take me to the other shore.
जर शंकराचार्य इतरांना म्हणत असले तर मधूनच "मी " कुठून आले? शंकराचार्यांनी स्वतःसाठीच ही कविता कशावरून रचली नसेल (मनाच्या श्लोकांप्रमाणे) ? "मूढमते" ते स्वतःलाच कशावरून म्हणत नसतील? आपण नंतर ते "श्लोक" करून टाकले - कशावरून त्यांनी ते "लोकांसाठी" रचले होते?
अजून पुढे -
Dropping sex, anger, greed and attachment,
Meditate upon yourself: Who am I?
Because fools without self-realization
Suffer the anguish of deep hell here.
अजूनही काही भाषांतरे मिळाली.
भज गोविंदमचे इंग्लिशमध्ये रूपांतर
अजून एक
4 Oct 2007 - 1:08 am | धनंजय
ओशो-भक्ताने तुम्हाला सापडलेल्या दुव्यावर लिहिलेले भाषांतर छान आहे, आध्यात्मिक दृष्टीने विचार करण्यालायक आहे, पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही. म्हणून 'मधूनच "मी " कुठून आले?' असा अभ्यास त्या भाषांतरावरून करता येत नाही.
पुनरपि जननम् पुनरपि मरणम्
पुनरपि जननीजठरे शयनम्
इह संसारे खलु दुस्तारे
कृपयापारे पाहि मुरारे ॥
पाहि म्हणजे "वाचव" (मला वाचव असे नाही - कोणाला वाचव हे सांगितलेले नाही). पण "मला वाचव" हा अर्थ आजकालच्या भक्ताच्या अध्यात्मासाठी ठीक आहे, एक स्वतंत्र कृती म्हणून तसा विचार करायला काहीच हरकत नाही. पण शंकराच्या मूळ रचनेचे शब्दविश्लेषण म्हणून वापरू नये.
मूढमते, भज, वगैरे मध्ये "त्वम्"="तू" अध्याहृत आहे. असे शब्द जवळजवळ प्रत्येक कडव्यात आहेत.
पण "का ते कान्ता कस्ते पुत्रः" (कोण तुझी प्रियस्त्री, कोण तुझा पुत्र...) मध्ये ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे.
असो. पण तुमचा अभ्यास चालू दे! परत सांगायचे : या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.
4 Oct 2007 - 1:29 am | विकास
>>>एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.
एक तर हा अध्यात्मीक विचार म्हणून ज्याला घेयचा असेल त्याला घेऊदेत अथवा मी आधी वर त्यांची पूर्वपिठीका सांगितली त्या संदर्भातील काव्य समजून घेऊ देत. शंकराचार्यांचा काही सामाजीक/राजकीय प्रभाव भारतवर्षावर पड्ल्याचे ऐकीवात नाही. आध्यात्मिक काही अंशी असेल.
त्यांनी काय अथवा इतर कुठल्याही भारतीय/हिंदू संतमहंताने कुणावर दमदाटी केली नाही की काही कर आणि माझेच ऐक. आपल्याकडे अद्वैतवादी शंकराचार्य चालले, द्वैताचा उपयोग करून अद्वैतच जपणारे ज्ञानेश्वर चालले, भारूडातून समाजजागृती करणारे एकनाथ चालले, नाठाळाचे माथी हाणू काठी म्हणणारे तुकाराम चालले आणि एकीकडे बुद्धी दे रघूनायका म्हणत दुसरीकडे मुर्खाची लक्षणे सांगणारे रामदासपण चालले. पण या सर्व (इतिहासाचार्य राजवाड्यांच्या भाषेत) संताळ्याने काम सोडून हरीहरी करत बसा असे सांगीतल्याचे ऐकीवात नाही की कधी स्वत:चे विचार इतरांवर लादल्याचे एकलेले नाही.
म्हणून मुद्दा एव्ह्ढाच, की आपल्या कडे जी काही संशोधनाला ओहटि लागली त्याचे कारण म्हणून केवळ शंकराचार्यांना झोडपणे योग्य वाटत नाही.
4 Oct 2007 - 1:46 am | धनंजय
एकट्या शंकराचार्यांना कोण झोडपतो आहे हो. अशा प्रकारचे विचार अनेकांनी सांगितले. पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले.
"जग मिथ्या आहे, आणि ऐहिक बाबतीत काहीच अर्थ नाही" असे सांगणार्यांपैकी त्यांचे भाषामाधुर्य, भाषाप्रभुत्व आणि तर्कमंडन सर्वोत्तम आहे, म्हणून त्या दुसर्या चर्चेत हे उदाहरण घेतले.
आता त्यांनी दमदाटी केली की नाही याबाबत कथा आता काहीशा दंतकथाच आहेत. मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात. (हा भाग शिवलीलामृतात आहे का - नीट आठवत नाही.) माझ्या मते बहुतेक आचार्यांनी खुद्द दमदाटी केली नसावी. पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही.
इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते.
4 Oct 2007 - 2:50 am | विकास
>>>इथे सहजराव "नारीस्तनभर..." वरून वेगळा विषय हाताळायला घेत आहेत असे वाटते.
सहजरावांच्या चर्चेचे मूळ हे शंकराचार्यांवर आधी चालू केलेल्या चर्चेत असल्याने त्याचा संदर्भ मी दिला. म्हणून वरील संदर्भ देत पुढे शंकराचार्य सामान्यांना उद्देशून म्हणले नसावे या अर्थी म्हणाले, म्हणून सुरवात ही एकंदरीत आपल्या संपूर्ण लेखासंदर्भातील वाटली...
>>>पण शंकराचार्यांनी ते अत्यंत गोड अशा गीतात सांगितले, ते आपल्यापैकी खूप लोकांच्या तोंडात आहे, म्हणून त्याचे उदाहरण दिले.
तेच आमचे म्हणणे आहे. त्यांनी गोड गीतात सांगीतले. नव्हे त्यांनी नुसते काव्य रचले. त्याचे गीत एम एस सुब्बालक्ष्मीमुळे झाले आणि आमच्या सारख्यांना ते भावले. तीच कथा ज्ञानेश्वरांच्या, तुकोबाच्या आणि इतरांच्या अभंगांची . त्या संदर्भात इतकेच म्हणणे आधी आंणि आत्त्ताही आहे, की त्यांनी जे काही केले ते पारमार्थीक होते राजकीय अथवा सामाजीक ढवळाढवळ नव्हती. उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही किंवा (तुकोबाच्या बाबतीत) शिवाजीने अफझलखानास कसे मारावे हे ते सांगत बसले नाहीत...
>>>मंडनमिश्राला हरवल्यानंतर त्याची चांगलीच खरड काढली अशी दंतकथा (शंकराचार्य यांना शिवाचा अवतार मानणारे) शिवभक्त मोठ्या चविष्टपणे सांगतात.
दंतकथा असेल नसेल पण, "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला. कारण मंडनमिश्र आणि शंकराचार्यांचा वादविवाद झाला होता. त्यात दमदाटीचा प्रश्न उद्भवत नाही. आपल्यास अर्थातच माहीत असेल पण इतरांसाठी थोडक्यातः मंडनमिश्रांचे गुरू कुमरील भट्टांकडे अद्वैत आणि पूर्वमिमांसा या दोन विचारधारांवरून "डिबेट" करायला तत्कालीन हिंदू प्रथेप्रमाणे शंकराचार्य गेले होते. तेंव्हा कुमरील भट्टांनी मंडनमिश्र त्यांच्याशी वादविवाद करेल असे सांगीतले. त्याची (मंडनमिश्राची) पत्नी ही "रेफरी" झाली. अनेक दिवस झालेल्या चर्चेत शंकराचार्य जिंकले. पण त्यांचा विजय तीने निर्विवाद ठरवला नाही कारण ते ब्रम्हचारी असल्याने त्यांना "कामसुत्राचे" ज्ञान नाही. तेंव्हा पुढची दंतकथा अशी आहे त्यांनी एका मेलेल्या राजामधे कायाप्रवेश करून याविषयाचे ज्ञान करून घेतले. मग परत दोघांचा वाद झाला आणि त्यात मंडनमिश्राने हार मान्य केली आणि त्यांचे शिष्यत्व पत्करले. असो.
या गोष्टिवरूनपण लक्षात काय येते की त्यांचे पारामार्थीक ज्ञान आणि ज्याला प्रबंध - थिसीस म्हणता येईल त्या वेदांताचा आणि शंकराचार्यांचे आध्यात्मिक श्रेष्ठत्व आंधळेपणाने कोणी तेंव्हा मान्य केले नव्हते. त्यांना त्याचे सध्याच्या भाषेत "प्रेझेंट" करून वैचारीक वादविवादात यशस्वी करून दाखवावे लागले. त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही.
>>>पण कुंभमेळ्याच्या वेळेला त्यांच्या साधूंचे चाळे पाहिले, तर त्यांच्या परंपरेने दमदाटी केली असेल असे कोणी सांगितले, तर अगदीच काही नवल वाटणार नाही.
त्या साधूंचे कोणी समर्थन करत नाही की भलतासलता मान देत नाही. बर "त्यांचे साधू" असे म्हणताना त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे करताना पाहीले तरी नाही आहे. नाहीतर प्रसिद्धीमाध्यमे काही निवांत बसली नसती....
4 Oct 2007 - 3:52 am | धनंजय
ते कधीतरी वाचायचे आहे, पण जरा बॅकबर्नरला टाकले आहे. त्यामुळे लगेच व्यासंगपूर्ण उत्तरे देता येणार नाहीत.
> त्यांनी कुणावर तलवार उपसली नाही की स्वतःच्या गणंगांना कुणाच्या अंगावर सोडले नाही.
हे बरोबर आहे.
> त्यांच्या पिठांचे सध्याचे उत्तराधिकारी तरी कुंभमेळ्यास जाऊन अथव इतरत्र चाळे
गैरसमजाबद्दल दिलगीर. इथे त्यांच्या पीठाधीशांचा उल्लेख करायचा नव्हता, दहा आखाड्यांतल्या साधूंचा करायचा होता.
> "चांगली खरड काढली" हा शब्दप्रयोग जरा अयोग्य वाटला.
या दंतकथेच्या अनेक आवृत्ती आहेत. पैकी एकात मंडनमिश्र सरस्वतीला दारूच्या घड्यात बुडवून तिच्याकडून वेद वदवून घेत पडद्यापाठीमागून शंकराचार्यांशी वाद घालत होता, शंकराचार्यांनी सरस्वतीला पराभूत करून पडदा दूर करून दारुड्या मंडनमिश्राची कानउघडणी केली, अशीही दंतकथा आहे. ही दंतकथा मला मान्य नाही हे वर सांगितलेच आहे, पण त्या परंपरेत दुसर्या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे.
> उ.दा. पृथ्वीला गोल म्हणावे का नाही...
इथे तर खरेच शांकरभाष्य वाचावे लागेल मला. पण थोडेफार उल्लेख देतो. त्याविषयी तपशील मात्र कोणी जाणकाराने द्यावेत. ब्रह्मसूत्रांवरील भाष्यात, सांख्य "जड प्रकृती आहेत" म्हणतात, त्याचे उत्तर तशी नाही असे देताना, वैशेषिकांना त्यांचे अणू खरे नाहीत वगैरे सांगताना, शंकराचार्यांना वैज्ञानिक बाबतींबद्दलच बोलायचे होते असे दिसून येते. प्रलयाच्या काळी अणू अमुकतमुक प्रकारे हलू शकणार नाहीत असाही त्या ठिकाणी शंकराचार्यांचा वाद आहे. हे थोडेफार "पृथ्वी गोल आहे की नाही"च्या दिशेने जाते. खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही.
> तुकोबा
तुकोबा हे अद्वैतवादी किंवा संन्यासवादी किंवा इहलोक-असत्य-वादी होते हे मान्य नाही. तुकोबांना सामाजिक स्थितीविषयी मते नव्हती हेही पटत नाही. परत याचे उत्तर कोणी वारकरी पंथातला अभ्यासक माझ्यापेक्षा चांगले देईल.
4 Oct 2007 - 4:34 am | विकास
>>>तुम्ही तर मला शांकरभाष्यच वाचायला लावणार! ते कधीतरी वाचायचे आहे,
मला आपल्या व्यासंगावर विश्वास आहे, त्यामुळे (वाचून झाल्यावर,) आपले समतोल विचार वाचायला नक्कीच आवडतील.
>>>पण त्या परंपरेत दुसर्या परंपरांविषयी कधीकधी भयंकर आकस दिसून येतो, हे जरूर सांगायचे आहे.
हे मान्य आहे आणि त्यात काही नाविन्य नाही. आपल्यास अमेरिकेतील "ऍकेडेमीक रायव्हलरी" कशी असते ते माहीत असेलच. हा मानवी स्वभाव आहे आणि तो कुठेही तसाच राहणार! असे म्हणताना मी काही अशा वागण्याचे समर्थन करत नाही पण वस्तुस्थिती म्हणून सांगतो. त्यात शंकराचार्यांनी एकीकडे बुद्धाच्या विचारांना अप्रत्यक्ष आव्हान देत एका अर्थी अद्वैतरूपात त्याच पद्धतीचे विचार आणले (कदाचीत फरक असेल तर तो निर्वाणावस्थेत कारण बुद्धाला पुनर्जन्म मान्य नव्हता तर शंकराचार्यांच्या "पुनरपी जननम.." ओळी आपणच वर उल्लेखल्या आहेत. परीणामी त्यांना होणारा विरोध हा प्रस्थापितांचा होता. या संदर्भात मला विवेकानंदांचे शब्द आठवतातः त्यांनी म्हणले होते की कुठल्याही नव्या विचाराला तीन टप्प्यांमधून जावे लागते: "sheer indifference, severe opposition and then broad acceptance". जे विचार ह्या तीन तप्पे पार करून राहतात ते दूरगामी राहू शकतात.
>>आता जरा खुलासा: खुद्द पृथ्वीच्या गोलाकाराबद्दल त्यांचे काही मत होते की नाही ते माहीत नाही.
हे म्हणायचे माझे कारण होते, की ज्या प्रकारे चर्चने पृथ्वी सपाट आहे ह्या त्यांच्या अंधश्रद्धेचा भडीमार करून २० व्या शतकापर्यंत गॅलीलीओला त्याच्या (पृथ्वी गोल आहे हे म्हणण्याच्या) पापातून मुक्त झाल्याचे मान्य केले नाही तसे काही शंकराचार्यांचे धर्मपिठ वागल्याचे ऐकीवात नाही. अगदी ज्ञानेश्वर भावंडांच्या मुंजीच्या वादात पण शंकराचार्य कधी पडल्याचे ऐकले तरी नाही...जे काही झाले ते पैठणच्या कर्मठांपुरतेच मर्यादीत राहीले. अशी बरीच उदाहरणे देता येतील पण आपण आधी म्हणल्याप्रमाणे "नारीस्तनभर..." या मूळ विषयापासून (विषय - हा शब्द कुठल्याही अर्थाने!) दूर जाईल म्हणून येथेच माझा खुलासा थांबवतो!
4 Oct 2007 - 5:44 am | चित्रा
तुमच्याशी वाद घालायचा नाही, ही चर्चा मूळ मुद्द्यावरून बरीच भरकटते आहे - पण तरी -
पाहि म्हणजे "वाचव"
भाषांतरात "वाचव" याअर्थी "protect" हा शब्द आला आहे. तुमचे म्हणणे वरील भाषांतर पण शब्दांच्या दृष्टीने ठीक नाही मान्य केले तरी - जर वरच्या भाषांतरातले me काढून टाकले तरी "मला" वाचव असाच अर्थ निघतो.
Oh God, protect -- from this troublesome world
where one has to be born again and again,
die again and again,
and fall into the womb of a mother again and again,
and take -- to the other shore.
शंकराचार्य मधेच "दुसर्याला वाचव" ("माफ कर" - येशूप्रमाणे) म्हणत नसावेत!
ते = तुझी/तुझा असा सरळ सरळ "तू"चा उल्लेखच आहे.
हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? !
या सर्व गोष्टी स्तोत्र म्हणणारा स्वतःशी मनन करत म्हणत असेल असा तुम्ही वाटल्यास अर्थ लावू शकता, एक आध्यात्मिक विचार म्हणून तो ठीकच आहे.
एवढ्यावर आपण सहमत आहोत हे पण खूप आहे. मी काही कसली तज्ञ वगैरे नाही, तुटपुंज्या ज्ञानावर उगाच काहीतरी लिहीण्यात अर्थ नाही हे मलाही माहिती आहे. पण तसे कोणाचे ज्ञान इथे पूर्ण आहे? !
माझे मत या सर्वावर एवढेच आहे की गांधीजींच्या विचारांवर न समजून घेता जशी टीका होते, तसाच काहीसा प्रकार शंकराचार्य वगैरेंवरून होत असावा. असेच गीतेचे. एक पुल देशपांडे तुझे आहे.. मध्ये म्हणाले म्हणून कोणी गीता वाचलीच नाही, गीताईसुद्धा नाही. या मोठ्या अधिकारी लोकांचे आपण काही वाचलेले नसते, कोणी सांगते म्हणून विश्वास ठेवायचा हे करण्यापेक्षा जे काही भाषांतर आहे ते वाचल्यास निदान भावार्थ तरी कळेल यामुळे ते भाषांतर इथे दिले होते. त्याच्यातले पाठभेद/श्लेष मला कळत नाहीत, पण जसा जमेल तसा अभ्यास तर चालू ठेवायलाच पाहिजे नाही का?
तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का? मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन.
4 Oct 2007 - 12:58 pm | धनंजय
तुमची वृत्ती खरोखर अभ्यासक आहे.
त्यामुळे तुम्ही ते इंग्रजी भाषांतर सोडून शक्यतोवर एखादे चांगले मराठी भाषांतर (म्हणजे शब्द-शब्द समजावून सांगणारे वगैरे) वापरावे असे वाटते. इंग्रजीच्या काही व्याकरणविषयक लकबी संस्कृताला लागू नाहीत. तुम्ही ज्या खोल रीतीने अभ्यास करत आहात त्या दृष्टीने पाहता त्या दुव्यावरील भावार्थ/भाषांतर खूपच मोघम आहे. त्यात मुळातल्यापेक्षा इतके फरक आहेत, की भाषांतरकर्त्याची स्वतंत्र प्रतिभा त्याच्यात उतरली आहे, असे म्हणता येईल.
> हे मान्य. पण आपले एक सदस्य "तो" नाही का असा त्रयस्थासारखा स्वत:चा उल्लेख करीत? !
तुमचे म्हणणे विचार करण्यासारखे आहे. शंकरांनी रचलेली अनेक स्तोत्रे महाजालावरती उपलब्ध आहेत. आपल्या इथल्या "तो." सारखे शंकराचार्य स्वतःचा "तू"म्हणून उल्लेख एक वैयक्तिक लकब म्हणून करतात का - हे अभ्यास करण्यासारखे आहे. शिवाय त्यांच्या शिष्यपरंपरेत सांगितलेल्या या स्तोत्राविषयीच्या कथेच्या संदर्भाचाही जरूर विचार करावा.
> तसेच शंकराचार्य इतरही बरेच काही सांगत असतील, त्यांचे सर्व आपण ऐकतो का?
> मग एवढेच एक जर ऐकले असेल तर तो लोकांच्या बुद्धीचा जास्त दोष आहे असे मी म्हणेन.
फार उत्तम विचार. या बाबतीत एक चांगली गोष्ट आहे, की शंकरांनी खूप काही वैचारिक लिहिलेले आहे, ते अजून उपलब्ध आहे. त्यामुळे एखाद्या पाठभेदामुळे त्यांचे विचार चुकीचे कळले असे व्हायची शक्यता खूप कमी आहे. कारण त्यांचे अन्य वैचारिक साहित्य उपलब्ध आहे, त्याच्यावरून ताळा करून घेता येईल.
तुमच्या अभ्यासाला माझ्या शुभकामना आहेत. हल्ली आपल्या संस्कृतीतल्या अन्य ग्रंथांकडे माझे अधिक लक्ष वेधले गेले असल्यामुळे शंकरांचे ग्रंथ मी लगेच अभ्यासायला घेणार नाही आहे. त्यामुळे तुम्हाला जसे जसे अभ्यासातून कळत जाईल, तसे तसे ते तुमच्याकडून वाचायची उत्सुकता आहे.
3 Oct 2007 - 11:31 pm | लिखाळ
नमस्कार,
अश्या विषयांवर खुलेपणाने लेखन आणि चर्चा मराठी संकेतस्थळांवर या पूर्वी झाली नसावी आणि त्यामुळे वैचारिक लेखन आणि वाचन करणारे सदस्य खूष झाले असावेत असा कयास आहे. अश्या (तथाकथित) 'ना़जूक' विषयावर आपण लेखन केलेत हे अभिनंदनीयच.
(मागे मनोगतावर कमी कपडे आणि बळजबरी यावर चर्चा झाली होती.)
यनावाला म्हणतात त्याप्रमाणे,
>>५/ बाकी लेखांत आणि प्रतिक्रियांत व्यक्त झालेली मते ही आधुनिक पुरोगामी समाजातील मान्यता प्राप्त विचारांनुसारच आहेत.<<
लेख थोडा विस्कळित वाटला. पण विचार चांगलेच आहेत.
इस्लामी राजवटीमध्ये स्त्रीयांच्या कपड्यांवर बंधने आली आहेत का? म्हणजे त्यांनी लादलेले नियम म्हणून अथवा त्यांनी पळवून नेवू नये म्हणून. यावर कोणी तज्ञाने खुलासा करावा ही विनंती.
संतांनी आणि विद्वानांनी कोणी कसे वागावे यावर केलेली भाष्ये अनेक ठिकाणी दिसतात. सामान्य माणसाने समाजात कसे वागावे आणि रोजचा व्यवहार करीत असताना परमार्थात प्रगती होण्यासाठी काय करावे याबद्दल अनेक गोष्टी दिसतात. खरेतर भारतात सामान्य माणसाने व्यवहारात (संसारात) राहून परमार्थाकडे नजर ठेवून वागावे अशीच संतांची शिकवण दिसते. त्या पुढे जावून जे मुमुक्षु आहेत, ज्यांच्या मनात परमार्थप्राप्तिची ओढ निर्माण झाली आहे त्यांनी कसे वागावे हे सुद्धा दिसते. पुढे सिद्धावस्थेतल्या माणसाचे वागणे कसे असते त्यावर सुद्धा भाष्य दिसते. असे असता आपण जे वाचतो आहोत ते त्या संताने नक्की कोणाला सांगितले आहे ते आपल्याला लागू आहे का? याची शहानिशा करणे आगत्याचे ठरते.
अवांतर : 'सूचना' खास आहे :)
--लिखाळ.
मला बरेच काही समजते असे मला अनेकदा वाटते हेच माझ्या असमंजसपणाचे निदर्शक आहे.
4 Oct 2007 - 12:59 am | प्राजु
पण खर्या अर्थाने सूखी व्हायचे असेल तर मात्र जोडीदाराला सुखी करावे लागेल. आज एखाद्याने तुमच्याकडे जर १०० रु मागीतले व तुमचा स्वतःचा अत्यावश्यक खर्च वगळता तुमच्याकडे १०० रु शिल्लक असतील तरच तुम्ही ते देऊ शकता. सुखाचे तेच आहे. जर आपल्याकडे स्वतःजवळ सुख नसेल तर दुसर्याला काय देणार? आयुष्याच्या सुरवातीला स्वतःसाठी सुख मिळवा व जोडीदार मिळाल्यावर त्याला/तिला सुख द्या. मगच ती व्यक्ती तुम्हाला देऊ शकेल.
हे मात्र लाख बोललात. अगदी खरं आहे हे.
लेख छान आहे. विचार करायला लावणारा आहे.
- प्राजु.
26 May 2010 - 8:38 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
छान.........! अजून येऊ दे.
-दिलीप बिरुटे
26 May 2010 - 9:12 am | शिल्पा ब
लेख आणि चर्चा दोन्ही वाचण्याजोग्या आहेत...मधेच एकदम संस्कृतचे आणि शंकराचार्यांबद्दल शिक्षण झाले :-)
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
27 May 2010 - 1:14 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहजमामा, लेखणी का म्यान झाली आहे एवढी वर्ष?
लेख आणि चर्चा दोन्ही आवडले.
अदिती
10 Jun 2010 - 8:41 pm | विनायक प्रभू
लय भारी